100 डेज - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49

रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या कोठार्‍यांनी टीव्हीचे कोठारं व्यापलीत... जय मल्हार, गणपती बाप्पा, कॉमेडी ट्रेन आता हा पण कोठारे.. दुसर्‍याना काही करु देणार की नाही टीव्हीवर..

हो..मलाही आवडला. पार्श्वसंगीतही त्या माहौलला साजेसं आहे.

सध्या कोठार्‍यांनी टीव्हीचे कोठारं व्यापलीत... जय मल्हार, गणपती बाप्पा, कॉमेडी ट्रेन आता हा पण कोठारे.. >>> स्टार प्रवाह अजून बाकी आहे.

तेजस्वीनी सिड्युस करणार त्याला सिरीयलमध्ये,आणि तो काही बधणार नाही ,शेवटी मालिका संपणार.

मॅक्स शी सहमत
जिस्म वाटतोय....

झी कडून फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही त्यात ही dam it कोठारेची म्हणजे तर पहीला आणि शंभरावा भाग पहावा.

सध्या कोठार्‍यांनी टीव्हीचे कोठारं व्यापलीत... जय मल्हार, गणपती बाप्पा, कॉमेडी ट्रेन आता हा पण कोठारे.. दुसर्‍याना काही करु देणार की नाही टीव्हीवर..>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

मराठीतला "एकटा कपूर" बनायचे वेध लागलेत त्यांना .

पहिला भाग आवडला. तेजस्विनीचं काम आवडलं चक्क. दिसलीय पण छान. बघूया पुढे काय होतंय.

पांडू लेखक नाही तर संवादलेखक आहे ना??

राखेचात गणेशाच्या झिपर्‍या कोणीतरी कापाव्यात अशी फार इच्छा होती. ती इथे तरी पूर्ण झाली. Wink

सरिताला या रुपात बघायची सवय व्हायला वेळ लागणार मलातरी. तिचं राखेचातलं रुपडंच डोक्यात फिक्स झालंय.

१०० डेज मध्ये सरिता आणि गणेश ला काम मिळालेलं दिसतंय. होनेस्ट ने रात्रीस च्या धाग्यावर म्हटल्याप्रमाणे निर्माते संतोष अयाचित आणि डायलॉग रायटर प्रल्हाद कुर्तडकरच ( पांडू ) आहेत . तेजस्विनी ला अशी काम जमतात Happy

कोठारे वाल्यांची नाहीये बहुतेक, पण कुठेतरी वाचलं होतं, त्यांची आहे.

राखेचाचे अजूनपण असतील कलाकार. ते पं युज करते सर्वांचा स्वार्थासाठी असं वाटतंय., मग युज अँड थ्रो असेल. जिस्ममधे बिपाशा करते तसं.

पहिल्या भागात काय झालं ते लिहा कुणितरी सविस्तर.
शिवाय रिपिट कधी असतो ते ही सांगा. राखेचा रात्री १०.३० आणि १२.३० ला असायचं
टाटा स्काय वर १०० दिवस रात्री १ ला दिसतंय Sad मध्ये पैलवान आलाय १२.३० ला :नामुभा:

पहिल्या भागात काय झालं ते लिहा कुणितरी सविस्तर.
शिवाय रिपिट कधी असतो ते ही सांगा. राखेचा रात्री १०.३० आणि १२.३० ला असायचं
टाटा स्काय वर १०० दिवस रात्री १ ला दिसतंय Sad मध्ये पैलवान आलाय १२.३० ला :नामुभा:

तो विकी तेजस्वीनीला डार्लिंग्/बेबी म्हणौनी डावा डोळा फडकवत असतो, का?? तो फारच लहान दिसतोय तिच्यासमोर.
तेजस्विनी मस्तच.

तिचं सिरियलमधलं नाव राणी. बाकी तो गणेशाचा बापूस पाच लाख रुपये ट्रान्सफर करतोय लेकाला कश्याला/काय्/कुणाला वगैरे न विचारता.
घरातले सरिता (सॉरी संगिता) आणि तो दुसरा नोकर मस्तच दाखवलेत.

टायटल साँग बद्दल लिहा कुणीतरी

अजून्तरी मध्यरात्री १ वाजता दाखवत आहेत रिपीट टेलिकास्ट. आम्हाला जिओ टिव्ही कृपेने दिवसभरात कधीही बघता येतेय कुठलीही मालिका.... त्यामुळे मी आज प्रवासाचा वेळ ही मालिका बघण्यात सत्कारणी लावला.

मालिकेने जरा पकड घेतली की एखाद्या रविवारी मॅराथॉन एपिसोड्स दाखवतील. मग रि. टे.च्या वेळाही वाढतील.

मला आवडलाय पहिला भाग. सगळं साधं सरळ दाखवलं तरी तसं नसेल कदाचित.

आदिनाथ चा पहिलाच संवाद मस्तच!!! तो म्हणतो नवरा हरवल्याची तक्रार करायला बाई एवडी नटून आली!!!

काल पाहिली मालिका. तेजस्विनी फिट्ट एकदम भुमिकेला.

तो विकि गणेशा आहे का?

त्याचा बाप झालेला पण ओअळखीचा आहे.

तो नोकर पण... इनस्पे क्टरच काम करत होता कुठे तरी.

>>तो नोकर पण... इनस्पे क्टरच काम करत होता कुठे तरी.

तो 'हॅहॅहॅ कुंकू' मधला वाकनीस आहे. सुनील बर्वेचा सेक्रेटरी असतो तो.

विश्वासरावने गणेशच्या झिंज्या धरून उपटल्या होत्या ना त्यामुळे केस गळाले असतील बहुतेक Happy काल मी ओळखलंच नाही आधी. तरी ह्या सिरियलमध्ये बढती झालेली दिसते. एकदम पाच लाख वगैरे मागतोय.

>>तेजस्विनी फिट्ट एकदम भुमिकेला

हे बरीक खरं. पण थोडी ओव्हरबोर्ड जातेय का? असो. राखेचाची कडवट चव अजून जिभेवर असल्याने ही सिरियल पहायचं धाड्स होत नाहिये.

मला कालची साडी आवडली तिची, तिनेच डिझाईन केली होती की काय? ती आणि अभिज्ञा भावे यांचा बिझनेस आहे साडी डिझाईनचा 'तेजाज्ञा' नावाने. साडीत भारी वाटते तिची personality. मला फारशी आवडत नाही ती. पण ह्या रोलसाठी फिट्ट. तो गणेश जाम डोक्यात गेला इथेही.

कालाय तस्मैय नम: मध्ये पण ते पं व्हिलन होती. असंभव हिट झाली म्हणून इ टीव्हीने copy करायचा प्रयत्न केला होता त्यात बहुतेक, पण दोन तीन एपिसोड बघितल्यावर कांटाळले मी पण तिला व्हिलन म्हणून आधी बघितलंय.

Pages