माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते तर आहेच पण दिसण्यात किंवा अ‍ॅटिट्युडमधे तो गॅरीला टक्कर वाटत नाही. तो शनायाच्या टाईपचा वाटत नाही. >>> नाहीतर काय ! तो एक्दम वरणभात टाईप्स वाटतो .
ती शनाया त्याला विकुन खाईल असं वाटत .
गुरवाच्या बाबाना बघून , नार्वेकरांची आठवण आली .

ती शनाया त्याला विकुन खाईल असं वाटत .>>> तसं वाटायला हवंच आहे आणि कदाचीत घडायलाही Happy

काल तो गुरव चुगली करतो म्हणून आपल्या मुलाला जी खून्नस देतो ते नाही पटले अजीबात.

काल तो गुरव चुगली करतो म्हणून आपल्या मुलाला जी खून्नस देतो ते नाही पटले अजीबात.>>
त्याला मुलाबद्दल काही प्रेम वाटतच नाही. आधीही मुलाला १०३ ताप असताना घरात असलेलं औषध लपवून औषध आणायला बाहेर पडून नटुलीला भेटायला जातो तो. मग बायकोला घराबाहेर काढायचं आयतं कारण असताना मुलाने चुगली केली म्हणून त्याला खुन्नस देणं ही विचित्र वाटलं नाही. (मलातरी.)

त्या मनिषला मुद्दामहून आणलंय का पानवलकरांनी आणि गुरवाच्या मित्राने. त्याचं टेबल पण अगदीच नटुलीच्या बाजूला आहे. आणि पहिल्या दिवसापासूनच त्याचं तिच्याशी फ्लर्टींग करणं पण शंकेला चालना देतं. Happy

बाई किती पण मॉडर्न असली तरी आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा इतका भयंकर शब्दात ब्लंटली अपमान करू शकत असेल असं मला वाटत नाही. हे फक्त सिनेमा आणि शिरेलीत घडू शकते कारण अपमान करणारा, करून घेणारा ह्या दोघांनाही माहित असते की हे खोटं आहे. शिवाय त्याचे पैसे मिळतात. वास्तवात असं कुणी करू शकत नाही.

त्या मनिषला मुद्दामहून आणलंय का पानवलकरांनी आणि गुरवाच्या मित्राने. >> हो

काल गुरव 3 दिवस येणार नाही म्हटल्यावर शनाया वैतागली. तिचा वैताग पाहून त्या वरणभात मनिषच्या चेहऱ्यावर जे काही एक्स्प्रेशन होते त्याचा अर्थ मला अजूनही कळलेला नाहीये. Uhoh

बाई किती पण मॉडर्न असली तरी आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचा इतका भयंकर शब्दात ब्लंटली अपमान करू शकत असेल असं मला वाटत नाही.>> इथे माॅडर्न असण्याचा नाही तर स्वभाव किंवा संस्कारांचा प्रश्न आहे. शनाया मुळातच उर्मट दाखवलेली आहे. गुरव तिच्या खिशात आहे त्याचा माज तिच्या एकंदर वर्तनात दिसतो. आणि अशा बाया बघितलेल्या पण आहेत मी. Happy

आणि अशा बाया बघितलेल्या पण आहेत मी.
>> हो मी पण. अश्या बायांना फार माज असतो. आणि तो पुरुष त्यांच्या खिशात असतो त्यामुळे फार उद्धट वागतात. ती बॅग भरून मुलासह निघते ते मला फारच वाइट वाटले. अश्या देखील किती बायका असतात व दरवे ळी सासरचे मदत करत नाहीत. मुलाची लफडी अ‍ॅक्नॉलेज सुद्धा करत नाहीत. आधार देणे तर दूरचे. शेजारी विचारायला येतात. ते अगदी दु:खद. पण तिने परत घरी यायला नको होते. टॉक टू माय लॉयर म्हणून फोन ठेवायचा. चांगले घर स्वतःच्या नाववर करून घेउन . मुलाच्या नावावर पैसे ठेवून घेउन ह्याला पार लोळवले पाहिजे. मग तो बच्चा काय ते बघून घेइल. झी वाल्यांनो वाचा जरा. किती दिवस पदर डोळ्याला लावून बसायचे.

शनाया कधीच नीट कपडे घालून येत नाही का? ती सेक्रेटरी छान आहे.

शनाया मॉडर्न आउटफिट्स मधे असते आणि राधिका नसते, हे एकमेव कारण तिच्या प्रेमात पडायला हिरोला पुरेसं होतं का? कारण तिचा स्वभाव वागणं प्रेमात पडण्यासारखं नाही. ती काही सुंदर नाही, तिचे चेहरे हावभाव अगदीच अनअ‍ॅट्रॅक्टिव असतात, तिचं कपड्यांच चॉइस बंडल आहे, ती कधी कधी स्मार्ट दिसते, पण कालच्या शॉर्ट्समधे आणि बर्‍याच कपड्यांमधे ती G t M - गावठी टर्न्ड मॉडर्न दिसते. दोघी जर गावठी आहेत तर हिच्याच प्रेमात पडण्याचं कारण शनायाचे छोटे छोटे कपडेच कारणीभुत असावेत.

पण कहानी में ट्विस्ट आणण्यासाठी राधिकाला मॉडर्न केलं तर अजुन वेगळाच अत्याचार. हिची बोलण्याची स्टाइल, माउथ, फिगर असं आहे कि हिने काहीही घातलं तरी हि काकुबाईच दिसणार.

गॅरी / हिरो - माझा पास. कमेंट करण्यासारखं काहीच नाही या माणसात.

नविन आलेला जो कोणी, हा काय म्हणे हिरोला टक्कर देणार. खुपच ऑर्डिनरी कोणी घेतला आहे. मोठ्या कंपनीत येताना, शेव न करता आला आणि कपडे इतके इन्फॉर्मल ( कॅजुअल नाही) कि मी त्याला तेव्हाच नापास केलं. एकुणात काय तर कास्टिंग गंडलेलं आहे. बाकी हल्ली मराठी सिरियल्सकडुन कथा वगैरे अपेक्षा नसतेच. स्टारकास्ट चांगलं असेल तर पहायचं, त्यामधे पण नापास.

पण कहानी में ट्विस्ट आणण्यासाठी राधिकाला मॉडर्न केलं तर अजुन वेगळाच अत्याचार. हिची बोलण्याची स्टाइल, माउथ, फिगर असं आहे कि हिने काहीही घातलं तरी हि काकुबाईच दिसणार.>> नाही हो.
ती गावठी आणि गुरवाला शोभू नये अशी दिसण्यासाठी या सिरियलमध्ये तिचा मेकअप फारच बटबटीत केलेला आहे. आणि अभिनय पण फारच लाऊड करायला लावलेला आहे. ती नेहमी छान दिसते. संयत अभिनय असतो तिचा. इतर कपडे पण छान कॅरी करते ती.

हो गुरुची आई मला पण फार आवडली. फेस कट पण अगदी वेगळा आहे पुण्या मुंबईच्या नट्यांपेक्षा.
शेजारच्या घरातली सून पक्की पुणेरी वाट्ते.

ती शनाया काय म्हणून एवढा माज दाखवते? ऑफिसात सुंदर मुली असतात पण त्या नॉलेज बाळगून किंवा कुठल्यातरी मोठ्या पोस्टवर अथवा बॉसची मुलगी एखाद्या डायरेक्टर ची नातेवाईक असते. पण इथे शनाया एक रूम शेयर करून राहते आहे. ऑफिसात तिची पोस्ट काय आहे ते सुद्धा कळत नाहीये आणि हा खुळा गुरव मागे लागलाय आणि हो ते बच्चा बच्चा बोलणे जाऊन डार्लिंग बोलून राहील न बेन....

अनिता दाते बोलायला लागली की एका झटक्यात जबड्याचा व्यायाम करुन घेते असं वाटतं. ते हाउ नं पण नाहीच जमत तिला. भारती पाटील अगदी बारकाव्यांसहीत बोलते एक्दम ऑथेंटीक.
शनाया सुंदर वैगरे तर अजिबात नाही तिच्यापेक्शा जेनी चांगली दिसते.

तिचं ते "हाऊ नं" आणि गुरवाला हाक मारतानाचं "आओ" एकदम इरिटेटींग आहे. ते ताबडतोब बंद करायला पाहीजे. अन्यथा शिरेली चा टीआरपी झटक्यात घसरण्याची शक्यता आहे...नागपुरात व एकंदरीतच विदर्भात असं कुणी बोलत नाही!

ऑफिसमध्ये शॉर्ट घालुन येतात्?:अओ: ती शनाया आगाऊ वाटतेच आणी भरीस भर ते होसुमीयाचे, येडं मनीष तिला मदत करायला हपापलेल दाखवलयं. गुरवाची आई आवडली, दाते बाई काम छान करतायत, पण लाउड वाटल्या जरा. वैदर्भी टच नाही वाटला. आमचे शेजारी वैदर्भीयच होते, पण इतके हेल काढुन नव्हते बोलत कधी.

Pages