सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.
भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...
पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.
वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
सर्वच फोटो सुंदर, सुंदर.
सर्वच फोटो सुंदर, सुंदर.
सर्वच फोटो सुंदर!! मानुषीताई,
सर्वच फोटो सुंदर!!
मानुषीताई, माझ्यामते ते झाड वीपींग विलो आहे. हॅपॉ मध्ये वर्णन केलेलं
वा, मानुषी .. मस्तच फोटो.
वा, मानुषी .. मस्तच फोटो. एखादा फुलांचा क्लोज अप हवा होता.
विपींग विलो नाही वाटत हे, त्याला पिवळी फुले येतात बहुतेक. आणि इतक्या संख्येनेही नसावीत.
https://en.wikipedia.org/wiki
https://en.wikipedia.org/wiki/Salix_babylonica इथे विपींग विलो ची माहिती आहे.
धन्यवाद दिनेश! मानुषी मस्त
धन्यवाद दिनेश! मानुषी मस्त फोटो! पण बेस्ट तुझ्या मनातला!
वीपिग चेरी आहे ते झाड. विलो
वीपिग चेरी आहे ते झाड.
विलो ला अशी फुले येत नाहीत . फि़कट हिरव्या -पिवळ्या ( Chartreuse ) रंगाच्या कोवळ्या फांद्या दिसताहेत हा सीझनमधे ,
वादि च्या शुभेच्छांसाठी
वादि च्या शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार
मानुषी फोटो सुं द र
काही अपडेट आहेत का?
काही अपडेट आहेत का?
>>>>>>>>>>>>>
जिप्सी | 14 March, 2016 - 22:51
चैत्रबहराचा मागोवा घेण्यासाठी शनिवार दि.९ एप्रिल (महिन्यातील दुसरा शनिवार) रोजी राणीबाग गटग.
(शुक्रवार दि.८ एप्रिल रोजी गुढिपाडव्याची सुट्टी आणि दुसर्या दिवशी रविवार आहे. सो शनिवारी बहुतेक सगळ्यांनाच जमेल असा कयास आहे. स्मित )
सध्यातरी मी,साधना, नितीन, उजु फिक्स आहोत. बाकीच्यांनी सांगा. स्मित
साधारण प्लान असा असेलः
भल्या पहाटे ठिक ७ वाजता व्हिटी स्टेशनला भेटायचे. तेथुन नेव्ही नगरला सागर उपवनला जायचे. १० वाजेपर्यंत सागर उपवन (हे उदयान सकाळी ५ ते १० व संध्याकाळी ४ ते १० असे सुरू असते). तेथुन थेट राणीबागेत (साधारण १०:३० ते १०:४५ पर्यंत). राणीबागेत भटकंती, नंतर खादाडी आणि मग घरी (आपआपल्या).
ज्यांना भल्या पहाटे सागर उपवनला यायला जमणार नाही त्यांनी १० वाजता थेट राणीबागेत आले तरी चालेल. स्मित
बाग बहरत आहे...हा सीझनचा
बाग बहरत आहे...हा सीझनचा पहिला टोमॅटो..:)
स्टार जास्मिन मस्त फुलत आहे..:)
Happy Gardening!
अरे वा कसले भारी फोटो आहेत,
अरे वा कसले भारी फोटो आहेत, माउ.
माउ टोमाटो मस्तच... दुसरे
माउ टोमाटो मस्तच... दुसरे कसले आहे, पारिजातक आहे का?
गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या
गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा.
सर्वात ऊंच गुढी निसर्गाची !
सर्वात ऊंच गुढी निसर्गाची ! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
दार्जीलिंग मधे दिसलेले एक
दार्जीलिंग मधे दिसलेले एक झाड...
सगळीकडे गुलाबी जांभळी असणारी हि फुले, जॅपनीज पॅगोडाजवळ मात्र शुभ्र रंगात होती.
एक चहावाला हे पाईन कोन्स विकत होता ( याचे काय करतात ते मात्र कळले नाही, म्हणजे मी विचारले नाही. )
काही अपडेट आहेत का?>>>>>>हो
काही अपडेट आहेत का?>>>>>>हो vt220 उद्याचा प्लान फिक्स आहे. तुम्ही येणार आहात का? सध्यातरी मी, साधना, इनमिनतीन, उजु आणि इंद्रा फिक्स आहोत. जर सकाळी जमणार नसेल तर १० वाजता थेट राणीबागेच्या गेटजवळ भेटा. साधना किंवा मला संपर्कातुन तुमचा मोबाईल नंबर कळवा म्हणजे तुमच्याशी संपर्क साधता येईल.
आहाहा निसर्गाची गुढी
आहाहा निसर्गाची गुढी सुंदर....केव्हढी ताडमाड ..
मस्त फोटो, दिनेशदा.
मस्त फोटो, दिनेशदा.
दिनेशदा, निसर्गाची गुढी आणि
दिनेशदा, निसर्गाची गुढी आणि इतर फोटो मस्तच
. जर सकाळी जमणार नसेल तर १०
. जर सकाळी जमणार नसेल तर १० वाजता थेट राणीबागेच्या गेटजवळ भेटा. साधना किंवा मला संपर्कातुन तुमचा मोबाईल नंबर कळवा म्हणजे तुमच्याशी संपर्क साधता येईल. स्मित >>>>>>>>
उप्स! आज दिवसभरात इकडे भटकले नाही.
माझा मोबाईल तुम्हाला सम्पर्कात कळवते आहे, तुम्ही प्लीज तुमचा मोबाईल एसेमेस करा.
बहुतेक नाही जमणार, कारण १ वाजेपर्यंत वरळीला जायचे आहे. आणि आता इतक्या उशिरा झोपल्यावर सकाळी लवकर झेपणार नाही. तरी निघालेच तर कॉन्टॅक्ट करता येईल.
माउ, टोमॅटो कसला भारी आहे!
माउ, टोमॅटो कसला भारी आहे!
चैत्रबहराचा मागोवा घेण्यासाठी
चैत्रबहराचा मागोवा घेण्यासाठी शनिवार दि.९ एप्रिल (महिन्यातील दुसरा शनिवार) रोजी राणीबाग गटग. >>>
कसा झाला गटग? फोटो प्लिज!
सागर उपवन, कुलाबा येथील हे
सागर उपवन, कुलाबा येथील हे काही फोटो. बाकीचे फोटो थोडे थोडे करून इथे टाकेन.
ये मोह मोह के धागे.........
(मोहाची फुले, Madhuca indica)
कोकणात जसा नारळ कल्पवृक्ष समजला जातो, तसा मोह सातपुड्यातल्या आदिवासींचा कल्पवृक्ष आहे. मोहाच्या फुला-फळांपासून त्यांना रोजगार मिळतो. भाकरीची सोय होईल इतपत पैसे मिळतात. तसेच फुला फळांचा अन्न म्हणूनही ते उपयोग करतात. बैलघाणीत बियांचे तेल काढतात. त्यांचा स्वयंपाकात उपयोग करतात. त्याच तेलाचे दिवेही ते पूर्वी जाळायचे. तेल काढल्यावर बियांची पेंढ बनवितात, तिचा खतासाठी उपयोग होतो. मोहाच्या सालीपासून रंग बनवितात. बिया वाटल्यावर तुपासारखे तेल निघते म्हणून मोहाला इंग्रजीत ‘बटर ट्री’ म्हणतात.
मोहाची फुले रानावनात राहणाऱ्या आदिवासींच्या उत्पन्नाचे मोठे साधन आहेत. उन्हाळ्यात त्यांची उपजीविका मोहाच्या फुलांवर होते. मोहांच्या फुलांत साखर आणि अल्कोहोलचे प्रमाण चांगले असते. त्यापासून आदिवासी मद्य बनवितात. या मद्यात ब जीवनसत्त्व असते. विवाह व इतर सणांच्या दिवशी मोहाचे मद्य प्राशन करणे आदिवासी पवित्र समजतात. कोणताही आजार झाला की ठाकर, कातकरी, कोरकू, गोंड, माडिया या आदिवासी जमाती मोहाच्या दारूचा औषध म्हणून उपयोग करतात.
फुलात साखरेबरोबरच कॅल्शियम व इतर जीवनसत्वे असतात. कार्बोहैड्रेटस्, प्रोटीन्स, व्हिटॅमिन व अनेक पोषक द्रव्ये फुलात असतात. आदिवासी तांदळात मोहाची फुले शिजवून खातात. इतर कोणत्याही टॉनिक पेक्षा अशा प्रकारचे अन्न हे उत्तम टॉनिक आहे. त्याचा आदिवासींच्या शरीरपोषणास उत्तम उपयोग होतो.
अधिक माहिती येथे वाचा.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
मस्त माहिती जिप्सी! प्रचि ४
मस्त माहिती जिप्सी! प्रचि ४ मधल्यासारखे झाड बघितल्यासारखे वाटते, पण खात्री नाही. ह्या दिवसात कितीतरी झाडे ह्या रंगाची पाने लेवुन असतात.
गेल्या शनिवारी घणसोलीकडुन डोंबीवलीकडे जाणार्या रस्त्याने गेलेले, तिथे एक २०-२५ फुट सरळसोट उंच झाडाला ह्याच रंगाची पाने होती. पण मोहाच्या पानांची रचना जरा खासच वाटते आहे. बघु पुढल्यावेळेस ओळखता येते का!!
सध्या बारिक पांढर्या फुलान्चे एक झाड फुललेले दिसतेय. मागे कुणीतरी कुरमुर्याचे झाड वगैरे म्हणाल्याचे आठवतेय. ते कधी फुलते? त्याची माहिती कुठे मिळेल??
सध्या बारिक पांढर्या फुलान्चे
सध्या बारिक पांढर्या फुलान्चे एक झाड फुललेले दिसतेय.>>>>पांढरा कुडा आहे का?
रेशम धावडा महाधावडा आणि धावडा
रेशम धावडा
महाधावडा आणि धावडा या वृक्षांचा लहान शोभणारा हा वृक्ष फारच दुर्मिळ आहे. मूळचा गुजरात आणि मध्य प्रदेशातील हा वृक्ष. रेशम धावड्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव आहे अॅनोगिसस सेरिसिया (Anogeisus sericea) . महाधावडा, धाकरा आणि धावडा यांचा समावेश याच प्रजातीमध्ये होतो. याचा अर्थ वरच्या बाजूला वळलेलं पंख असलेली फळे येणारे झाड. फुलांचा रंग पिवळसर दिसतो. त्यात पाकळ्या नसतातच. पुष्पकोश केसार असुन त्याला दोन सूक्ष्म पंख असतात. पुंकेसर १० सुटे बाहेर डोकावणारे असतात.
(श्री. द. महाजन, देशी वृक्ष)
सध्या बारिक पांढर्या फुलान्चे
सध्या बारिक पांढर्या फुलान्चे एक झाड फुललेले दिसतेय.>>>>पांढरा कुडा आहे का? >>>
कुड्याचे फ्लॉवर्स ऑफ इन्डिया साइटवरचे फोटो बघितले. खात्री नाही पण नसावा... हे झाड खुप दाट पानांनी भरलेले आहेत आणि फुले आहेत असे पहिल्यान्दा कळतच नाही पण काहितरी वेगळे जाणवते. मागे कुणीतरी कुरमुर्याचे झाड म्हणालेले, ते आठवले. पण शोधत होते तर मिळलेच नाही.
सन्ध्याकाळच्या प्रकाशात नीट फोटो यायचा नाही. पण प्रयत्न करीन.
पहिल्यांदा घण्सोली डोंबीवली रस्त्यावर पाहिला. आणि शुक्रवारी बोरिवलीमधे पण दिसले एक झाड.
चक्क ५ व्या पानवार धागा
चक्क ५ व्या पानवार धागा
मोहाच्या झाडावर दिनेशदांचा एक
मोहाच्या झाडावर दिनेशदांचा एक लेख पण होता ना पूर्वी?
जिप्सी, फोटो माहिती सर्वच
जिप्सी, फोटो माहिती सर्वच छान, छान.
सध्या बारिक पांढर्या फुलान्चे
सध्या बारिक पांढर्या फुलान्चे एक झाड फुललेले दिसतेय.>>>>पांढरा कुडा आहे का? >>>
हे पहा...
Cropped image
हा जमिनीवरचा सडा... मागे कधीतरी कुणीतरी कुरमुरे सांडल्यासारखे दिसतात म्हणालेले... तसा!
Pages