निसर्गाच्या गप्पा (भाग २९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 January, 2016 - 01:19

सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.

भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्‍या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्‍या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...

पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषी , ट्युलिप पॉपलर नावाचे झाड आहे हे. नॉर्थ इस्ट मधे अतिशय कॉमन, भरभर वाढणारे झाड आहे. पण फारसे स्ट्रॉन्ग नसते म्हणून साधारणपणे कोणी मुद्दाम लावत नाहीत. आपोआप उगवलेली झाडे जंगलात चिकार दिसतात.

मानुषी , ट्युलिप पॉपलर नावाचे झाड आहे हे. नॉर्थ इस्ट मधे अतिशय कॉमन, भरभर वाढणारे झाड आहे. पण फारसे स्ट्रॉन्ग नसते म्हणून साधारणपणे कोणी मुद्दाम लावत नाहीत. आपोआप उगवलेली झाडे जंगलात चिकार दिसतात.

ह्म्म्म....मेधा धन्यवाद.
इथे घराजवळ एक ट्रेल आहे...अगदी २ मिनिटांवर. इथे आधी झाडांचे खराटे होते. सध्या भरपूर पाऊस चालू आहे....संपूर्ण ट्रेल हिरवागार झालाय. अगदी बघता बघता परिसराचं प्रचम्ड ट्रन्स्फॉर्मेशन . या त्रेलमधे बेड्कांचा जोरदार आवाज येतो. इतरही अनेक अनोळखी पक्षांचे आवाजही खूप आहेत. चढ उतारावरून छान पाण्याचे चिमुकले झरे वाहताहेत. आणि या (वरच्य फोटोतल्या)फुलांचा सडा पडलेला असतो.

वंदना - आणि दुसरीकडे हे... >>>>> त्या पांढर्‍या फुलामधे गुलाबी ठिपका असलेल्या फुलाचे नाव श्रब विन्का - shrub vinca

नक्कीच शोभा. !<<<<<<...आम्हाला ह्या सगळ्या वर्णनाचे फ़ोटो दाखव बाई. फिदीफिदी>>>>>$$
वेळ मिळाला की तिकडेच मोर्चा असतो.
दिनेश काय क्युट कवीकल्पना आहे! <<<< फुलाच्या आत बसावेसे वाटतंय !>>>>>>
अश्यावेळी वाट्तं .....ते भुंगे, मधमाश्या, कीट्क यांची काय मज्जा असेल नाही का?

मेधा छान माहिती..
घरात मुलं आणी बाहेर फुलं...मानु ची मज्जाये.. Happy
दिनेश फुलात बसायला तुला थंबलिना व्हावं लागेल.. Lol

वर्षू.....:फिदी:
घरात मुलं आणी बाहेर फुलं...मानु ची मज्जाये>>>>
आणि वर्षू....थंबलीना खूप दिवसांनी आठवली गं.

मानुषीताई,

गोधडीच्या आत बॅटींग काय घातलंय , सांगू शकाल का प्लीज...
सॉरी,पण आवडीचा विषय आहे quilting म्हण्जे,रहावेना विचारल्याशिवाय 

अगं वृषाली
ही गोधडी माझ्या आत्याने केलीये. त्यामुळे नक्की माहिती नाही. पण ती जनरली गोधडीत जुन्या साड्या चौपदरी करूऩ किंवा जुन्या चादरी असं काहीही वापरते.

धन्यवाद शशांक! फूल खूप ओळखीचे वाटत होते पण नाव माहीत नव्हते.

बापरे! केवढा मोठा वृक्षच झालाय मधुमालतीचा! मस्त प्रचि सायु स्मित>>> +१ त्यात पांढरी फुले कसली आहेत?
ट्युलिप पोप्लर सुंदर!!!

दिनेश माझ्या फोटोतले सीता अशोक आहे? नवी पालवी ज्या प्रकारे आलेली त्यावरून मला वाटले ते दुसरेच कसले झाड आहे. मागे कधीतरी इथेच फोटो बघितलेला बहुतेक... वाळकी फांदी वाटावी असा गुच्छ येतो आणि मग त्यातून केळ्याचे कोके बाहेर पडावे तशी पाने बाहेर येतात...

सध्या आमच्याइकडे सिकाड्याचा खूप आवाज येतोय. इतक्या वर्षात मुंबईमध्ये त्याचा आवाज ऐकलेले बिलकुलच आठवत नाही. आता आवाज येतोच आहे तर उत्सुकता आहे त्याचे भारतीय/मराठी नाव काय आहे?

मस्तच फोटो सर्वांचे. सोनमोहर, गुलमोहर सोसायटीत पण आहेत. मस्त वाटतं बघायला.

सायली अशी मधुमालती पहिल्यांदाच बघितली.

सायु, मस्त माजलाय मधुमालतीचा वेल.

व्हीटी.. सिकाडा दर १७ वर्षांनी दिसतात. भारतीय नावही तेच आहे. चितमपल्लींनी तेच वापरले आहे.

सायु.. मधुमालती चा चक्क वृक्ष.
इंद्रा खरंच ही बिफोर आफ्टर् ची जादूच असते निसर्गाची.
हे सिकाडा काये?....
गुगलल्यावर ....बहुतेक कीटकसदृश काहीतरी...

मागच्या वर्षी लावलेली पॅंन्जीज आणि रोझमेरी. मी पहिल्यांदाच माझ्या अंगणार रोझमेरीची फुलं पाहतेय. इकडे तिकडे दिसली असती तर मला लॅव्हेंडर्सची जात वाटली असती. रोज चहा घेताना हे रंग पाहणॅ हा सध्या आवडीचा छंद आहे.

एंजॉय.
pansies (1).jpgRosemary.jpg

रोझमेरीची फुले मस्तच. पण मला वाटते ज्यांना ती जेवणासाठी वापरायची असते, ते लोक फुले येऊ देत नाहीत. खुडत राहतात ती. नैरोबीमधे बघितलीय मी.

बाप रे केव्हढा पसारा आहे मधुमालती चा.. मस्तं..

ती पिवळी फुलं कसलीयेत?? माझ्या ही घरासमोर फुललीयेत..सगळी शेंड्याकडे.. आभाळाला खडी ताजिम देत उभीयेत

वेका.. काय मस्तं नजारा आहे.. रोजमेरी ची फुलं मी पाहिली कोस्तारिका मधे.. Happy

अजून कोणते हर्ब्स लावलेस घरी??

Pages