निसर्गाच्या गप्पा (भाग २९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 January, 2016 - 01:19

सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.

भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्‍या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्‍या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...

पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती पिवळी फुलं कसलीयेत?? माझ्या ही घरासमोर फुललीयेत..सगळी शेंड्याकडे.. आभाळाला खडी ताजिम देत उभीयेत+++ सोनमोहर, कॉपर पॉड ची फुल आहेत ती..

१ त्यात पांढरी फुले कसली आहेत? ++++ व्ही टी, अग ती देखिल मधुमालतीचीच आहेत..:)

ईंद्रा, खरच निसर्गाची किमया अनोखीच, पिवळ्या झळझळीत फुलांनी न्हाऊन निघालय सोन मोहराच झाड..:)

वेका ,सुपर्ब आहे तुझी पिवळे जांभळी रांग..

मानुषी सिकाडा एक किडाच असतो आणि त्याचे एक विशिष्ट जीवनचक्र असते. दिनेश म्हणाले तसे १७ वर्षे जमिनीत राहून mating साठी बाहेर येतात आणि मग त्यांचे प्रेमसंगीत सुरु होते. जेव्हा त्यांचा आवाज चालू असतो तेव्हा अक्षरशः हा आवाज कधी थांबणारच नाही की काय असे वाटते! थोडाफार आजकाल carpenter प्लायवूड कापायला मशीन वापरतात, त्याचा कसा आवाज असतो, तसा सिकाड्याचा आवाज असतो.

http://www.cicadamania.com/audio/ इथे वेगवेगळे आवाज ऐक.

येल्लो-पर्पल रोझमेरी मस्त!

आभार्स Happy

वर्षु, मी रोझमेरी,बेसिल, ओरेगॅनो इ. गोष्टी लावल्यात. बेसिल दर सिझनला लावावी लागते. ऑरेगॅनो यंदाच ट्राय करतेय. लॅव्हेंडर दोन वेळा माझ्याकडून मेल्यामुळे माहित नाही पुन्हा लावेन का? आणि कोथिंबीर लावायचा विचार आहे. बीयांपासून अगदीच नाजुक आली आणि लवकर गेली मागच्या वर्षी. यंदा रोप आणून पाहिन.

वेका आणि नलिनी चे रोझमेरी सुंदर.
व्हिटी२२ छान माहिती....सिकाडाची. आवाज ऐकले...मग आपण ज्याला रातकिडा म्हणतो तसाच/ तोच का हा?

वेका.. सॅलड्स वर अशी घरची फ्रेश हर्ब्ज चुरडून घालायची... आहाहा.... स्वर्गीय चव येते!!!! Happy

मानुषी.. मस्तं गा..असा ट्रेल असेल तर कोणाला मॉर्निंग / ईव. वॉक टाळावासा वाटणारच न्हाई..

वेका.. सॅलड्स वर अशी घरची फ्रेश हर्ब्ज चुरडून घालायची... आहाहा.... स्वर्गीय चव येते!!!! स्मित+१००
मानुषी ताई, कसला देखणा ट्रेक आहे, मन हिरवं गार झाल बघ..
नलिनी, खुप दिवसांनी!
मस्त झब्बु...

वर्षू पहिला फोटो लोटस स्टेम? ...
काफिर लाइम ...नावाची मज्जा वाटते. थाय करीसाठी , वापरतात?
आणि खरच ट्रेल मस्त आहे पण थंडी आणि भणभण वारं....त्यामुळे बाहेर ट्रेलमधे जाताना जरा विचारच करावा लागतो.

लोटस सीड्स रादर.. मानुषी मखाणे/ मकाणे आहेत हे.. रॉ अवस्थेत

यस्स काफिर लाईम बिना थाय फूड नही... Happy

गुलाबाला खूप ऊन लागते हे सगलीकडे वाचलंय आणि पाहिलाय पण. सांताक्रृझला आईने गॅलरीत मस्त गुलाब फुलवलेलेले. पण इथे नव्या मुंबईत मात्र मी उलटेच पाहिलेय. मी बेलापूरला येताना सोबत दोन गुलाब आणलेले आणि आल्यावर दोन घेतले. सहा महिन्यात बिचारे खुरटून गेले. फुले तर बघायला नको अशी बेकार. मला वाटले माझ्या मूर्खपणामुळे वाट लागली. पण नंतर माझ्या शेजारणीने बोलता बोलता तिची गुलाबेही इथे आल्यावर मेली अशी कमेंट केल्यावर माझी ट्यूब पेटली.

गेली दोन वर्षे बाजूच्या बिल्डिंगमध्यल्या गावठी गुलाबांना बहर आलेला पाहतेय. ती झाडे शेडमध्ये आहेत, सकाळी 11 पर्यंत ऊन असते, नंतर सावली. माझ्या गच्चीवर शेड घातल्यानंतर मी हिम्मत करून 4 5 गुलाब आणलेत. त्यांना दुपारनंतर 4 तास ऊन मिळते. बाकी नेहमीची काळजी घेतेय. फुलेही येताहेत पण विकत घेताना जसे गेन्देदार फुल होते तसे नंतर काही आले नाही. येणारी फुले खूपच लहान येताहेत. एकाने तर रंग पण बदलला. घेतले तेव्हा डार्क मॉव रंग होता, आता चक्क जाम्भळीं फुले येताहेत. एक मिनिएचर गुलाब होते ज्याला घेतले तेव्हा 25 ते 30 गुलाब लागलेले, नंतर जेमतेम 8,9 फुले आली. मी तसेही नियमित कटिंग करायचे पण सध्या आलेल्या सगळ्या कळ्या काढून टाकल्यात आणि झाड मजबूत करण्याकडे लक्ष देतेय.

माझ्या ऑफिसात गेले तीन वर्षे एक ताटवा पाहतेय. डिसेंबरात त्याची फुले डार्क गुलाबी आणि भरगच्चं, भरघोस असतात, एप्रिल उजाडला कि रयाच जाते त्याची. फुले पांढरट होतात, पाकळ्या कमी होतात, वास जातो. बघवत नाही त्याचे हाल.

मी सगल्लीकडे गुलाबाना कडकडीत उन्हात फुलताना पाहिलेय मग आमच्या इथेच काय त्रास आहे कळत नाही.

वर्षू, काफिर लाईमची पाने वापरतात ना फक्त ? त्या लिंबात फारसा रस नसतो.

साधना, बहुतेक कलम नीट झालेले नाही. पण झाडे जोमदार केलीस तर नक्कीच फुले येतील. कडक उन्हात फुले फुलतात ती जास्त सुगंधी असतात आणि थंड हवामानात फुलतात ती रंगाने आणि आकाराने सुंदर असतात पण वासाला कमी. तूझ्याकडची बहुतेक थंड हवामातली जात असावी.

नैरोबीतले गुलाब असा माझा एक लेख होता इथे.

मानुषी, ट्रेल हि कल्पनाच किती सुंदर आहे ना !

मुंबईत पण नॅशनल पार्कात असे सुंदर रस्ते आहेत ( फक्त त्यांना ट्रेल नाही म्हणत !! )

हो वर्षू अ‍ॅकचुअली मखाणे शब्द आठवत नव्हता.
दिनेश...अगदी घरापासून २ मि. अंतरावर ट्रेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही.
आणि नियमही व्यवस्थित पाळ्ले जातात इथे त्यामुळे निसर्ग अबाधित रहातो. गाड्या बाइक्स कुणी दामटत नाहीत.
अगदी ब्लिस ऑफ सॉलिट्यूड!

vt220, छान माहिती.
मानुषी,अतिशय सुरेख फोटो आहेत.

काही महिन्यांपासून एक चिमणा -चिमणीचे जोडपे सतत खिडकीबाहेर असत गेल्या महिन्यापासून फक्त चिमणा एकटाच दिसतोय. ६.१५ पासून ते ऑफिसला जाईपर्यंत न थांबता चिवचिव चालू असते.शेवटी कंटाळून त्यांच्यासाठी आणलेले घर पाहिले.त्यात भरपूर काडया आढळल्या.नंतर कधी हात लावला नाही.काल एक मजेदार गोष्ट पाहिली.दीड सें.मीचे एकपीस चोचीत घेऊन,चिमणा ग्रिलवर ते आपटत होता.अगदी १५ वेळा मी मोजले.अजूनही त्याचे चालूच होते.त्यांच्या चोची साफ कशा करतात तसे ते पीस साफ करत होता.आपटून झाल्यानंतर त्याने ते पीस गिळले आणि त्याच्या घराच्या होलमधे गेला.
बहुधा पीसाचा देठ मऊ करून, लाळेने भिजवून अजूनही मऊ करतात की काय त्याचे त्याला माहित.

वर्षू, कमळाच्या फळांचा फोटो मस्त. असे ताजे मखाणे भारी लागतात एकदम. निखार्‍यावर भाजून तर एकदम बेस्ट.

मानुषी ताई, डांबरी पायवाटेच्या बाजूची फुले बहुतेक गार्लिक मस्टर्ड आहेत. अतिशय चिवट आणि इन्व्हेझिव :रागः

वेली वर पांढर्‍या फुलांचा गुच्छ आहे ते हनी सकल - पांढरी फुले नेटिव्ह्स, लालसर गुलाबी फुले असलेले जॅपनीझ हनी सकल - हे पण इन्व्हेझिव - छान रंग म्हणून बरेच लोक लावतात अन मग आजूबाजूच्या सर्व झाडांवर पसरते ही वेल. फुलांना मंद सुगंध अस्तो

देवकी, हे नवीनच. घरट्यात अंथरायला पीसे आणतात ते बघितले होते. पण गिळताना नव्हते बघितले. ( पुर्वी आमच्या घराच्या खिडक्यांना व्हेंटीलेटर असायचे. त्यात कायम घरटी असत त्यांची, म्हणून माहिती. )

किती दिवसानी लिहीतेय इथे वाचत होते फोटो पहात होते पण लिहायला वेळ नाही झाला.

सगळ्या गप्पा फोटो महिती सुंदर.

पण गिळताना नव्हते बघितले>>>>>> हो दिनेशदा! मलाही नवल वाटले.ते पीस आपटणे पण प्रथमच पाहिले.

मेधा
़ खूप छान माहिती देतेस.
या हनीसकलचा संध्याकाळच्या आसपास फार छान मंद सुगंध येतो.

किती दिवसानंतर आज मी इथे येत आणि खूप काही नवीन माहिती मिळाली. सर्वांनी टाकलेले प्रचि सुंदर आहेत. खरचं निगचे धागे जी व्यक्ती रोज नियमित वाचत असेल त्या व्यक्तीकडे आतापर्यंत किती माहिती जमली असेल Happy

मी कंबोडियामधे कमळबीज भरपुर खाल्ले आहेत. अगदी ताजे कमळबीज विकणार्‍या मुली दिसायच्या. कमळबीजांची चव वाटाण्याच्या चवीसारखी गोडसर असते. त्या तुलनेनी सुकवून भाजलेल्या फुलमखाण्याची चव मात्र इतकी छान लागत नाही. पण नाव भारी गोड आहे - फुलमखाने! युपीकडचे लोक दिवाळीला घरात उधळतात फुलमखाणे (बादवे इथे -- न की ण)?

आणि खरच ट्रेल मस्त आहे पण थंडी आणि भणभण वारं....त्यामुळे बाहेर ट्रेलमधे जाताना जरा विचारच करावा लागतो. >>>

ट्रेल खुप सुंदर! तुम्ही थंडीमुळे जाउ शकत नाही आणि इकडे मुम्बैमधे गर्मी मुळे जाण्याचा विचार नाही करु शकत! Sad
मुंबईमधे आरे कॉलनीत न्युझीलंड हॉस्टेलच्या बाजुने आतमधुन एक रस्ता जातो. आपल्याकडे ट्रेल हा प्रकार प्रचलित नसल्याने तो जाहिर केलेला ट्रेल नाहिय... पण तितकासा रहदारी नसल्याने स्थानिक पावसाळ्यात्/हिवाळ्यात फेरफटका मारायला वापरतात. पावसाळ्यात इतका सुंदर वाटते तिथुन जायला!

मुंबईचा हिवाळा अगदी तोकडा असतो. सिंगापुरमधे तर हिवाळ्याचा मागमुसही नसतो. अमेरिकेत बघाव तर सहा महिने सरता सरत नाही हिवाळा. फ्रान्समधे हिवाळा चार महिने होता. एके दिवशी पाच वाजता घरी बाहेर पडलो तर स्नो फॉल अंगावर पडायला लागला आणि तो अनुभव घेताना चक्क डोळ्यातून धारा वाहायला लागल्या इतका तो स्पर्शून गेला. हिवाळा मला खूप हळवा ऋतु वाटतो. हिमात एकाकी निष्पर्ण उभी झाडी पाहिली की डोळ्यात पाणी दाटलेच समजा. पण हिवाळ्यात चांदण्यांची मस्त काही और असते. मला हिवाळी रात्रीचे प्रहर फार रोमॅन्टीक वाटतात.

शिशिर ऋतुच्या पुनरागमे
का लागले मज रडावया
एकेक पान गळावया!!!!

Pages