अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या करता काल बघितलेला थोडासा रेस टू व्हाईट हाउस चा एब्राहम लिन्कन वरचा एपिसोड आठव ला .. त्याच्या कॅम्पेन ने म्हणे रिपब्लिकन कन्व्हेन्शन चे फेक पासेस डिस्ट्रिब्युट करवून फेक डेलिगेट्स (?) आणले ..

>>पण दोन्घान्नाही सारखेच प्रश्न होते का?<<
हो; आज तोच डाॅक्टर (अमित मज्मुदार) डाॅन लेमनच्या टुनाइट शोमध्ये आला होता. ॲपरंट्ली हि लाइक्ड हिलरीज आन्सर... Happy

पण एक गोष्ट मला त्याच्या बोलण्यात वियर्ड वाटली, ती म्हणजे डानल्ड ट्रंप निवडुन आला तर त्याला आणि त्याच्या आई-वडिलांना इथे रहाणं असुरक्शीत असेल. सिरीयस्ली? वंडरींग इफ हि हॅज लिव्ड लाॅंग इनफ इन धिस कंट्री टु मेक दॅट स्टेटमेंट...

मार्को रुबियो (ऊर्फ छोटू!) ह्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. फ्लोरिडा हे त्याचे शेवटचे आशास्थान होते तेही ट्रंपने काबिज करून त्याच्या उरल्यासुरल्या आशा धुळीस मिळवला. बिचार्‍याने शेवटपर्यंत जीव तोडून प्रयत्न केला पण ट्रंप ह्या वादळापुढे त्याचा निभाव लागला नाही. पण त्याला भविष्यात चान्स आहे.
बाकी हिलरी आणि ट्रंपची वाटचाल अपेक्षेप्रमाणेच चालू आहे.

>>पण त्याला भविष्यात चान्स आहे.<<

शक्यता कमी आहे असं मला वाटतं. पांच-सहा वर्षांपुर्वि रिपब्लिकन पोलिटिकल स्टार म्हणुन त्याचा भरपुर गाजावाजा केला गेला होता, पण सेनेटर म्हणुन त्याची कार्किर्द अजिबात उल्लेखनिय नाहि.

होप हि डझंट फॉलो जान एडवर्ड्स पाथ...

This is what I learned today from my american friend.

रिपब्लिकन उमेदवाराला कमित कमी १२३७ डेलिगेट्स मिळाले पाहिजेत. आजुन १०६१ डेलेगेट्स उपलब्ध आहेत.
जर उरलेल्या स्टेट्स मध्ये ट्रंप ने ५३.१ % किंवा क्रुस ने ७७.८% डेलीगेट्स मिळवले तरच ते बिनविरोध निवडुन येतिल आणि रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार बनतिल. त्यापेक्षा जर कमी डेलीगेट्स मिळाले तर ते आघाडीवर राहु शकातात पण बिनविरोध निवडुन नाही येणार.

केसिकला आतापासुन सगळी मते मिळाली तरी तो १२३७ चा टप्पा पार करु शकत नाही.

जर कोणालाही १२३७ डेलिगेट्स नाही मिळाले तर जुलै मध्ये Cleveland मध्ये GOP आपला उमेदवार निवडेल आणि तो कोणीही असु शकतो अगदी जेब बुश सुध्धा.

म्हणुनच ट्रंप ने आज स्टेट्मेंट दिले की जर त्याला सगळ्यात जास्त डेलिगेट्स मिळाले आणि त्याला जर उमेदवार नाही केले तर दंगल होउ शकते.

साहिल, ब्रोकर्ड कन्वेंशन जीओपीला नविन नाहि, पण या वेळेस परिस्थिती थोडी विचित्र आहे. प्रत्यक्श जीओपीतुनच ट्रंपला नाॅमिनेशन द्यायला विरोध असल्याने, डेलिगेट्स बहुमतात असुनहि त्यांना ट्रंपचा अश्वमेघाचा घोडा अडवायचा आहे. बट इट्स रिटन आॅल ओवर द वाॅल, ॲंड जीओपी स्टालवर्ट्स आर इग्नोरींग दॅट.

दुसरी गोष्ट - समजा जीओपी ने ट्रंपला नाॅमिनेशन न देता तिसर्याच कोणाला दिलं तर ट्रंप पिसाळुन इंडिपेंडंटली निवडणुक लढवेल आणि याचा आयता फायदा हिलरीबाईंना होइल. अर्थात जीओपी हे असं होउ देणार नाहि, आणि याची कल्पना ट्रंपला आहे. या अनुषंगाने त्याने जीओपीवर दबावतंत्र आॅलरेडी सुरु केलेलं आहे; त्याचं "दंगल होइल" हे विधान त्याच्या आर्म ट्विस्टिंग स्ट्रॅटिजीचा भाग असु शकतो...

<<त्याचं "दंगल होइल" हे विधान त्याच्या आर्म ट्विस्टिंग स्ट्रॅटिजीचा भाग असु शकतो...>>
----- ट्रम्पची खास शैली आहे... त्या शैलीला साजेसे वक्तव्य आहे.

ट्रंप ने ओहायो मधुन नॉमिनेशन भरले आहे. ओहायो मध्ये नॉमिनेशन भरताना मी इंडिपेंडंटली निवडणुक लढवणार नाही असे लिहुन द्यावे लागते.(हा कायदा दोन्ही पक्षाला लागु आहे) . जर एखाद्याने तसे केले तर कायद्यानी काय शिक्षा करायची ते मात्र लिहलेले नाही.

इंडिपेंडंट नाहि तर कुठल्याच दुसर्या पक्शाच्या तिकिटावर निवडणुक लढवता (सोर लुझर) येत नाहि. पण त्या कायद्यातहि बर्याच पळवाटा आहेत. हे घ्या एक लाइट रिडिंग, या संदर्भात...

>>बट इट्स रिटन आॅल ओवर द वाॅल, ॲंड जीओपी स्टालवर्ट्स आर इग्नोरींग दॅट.
द मेक्सिकन वॉल दॅट गॉट अ फूट टॉलर ?

ज्ञानेश्वरांनी फार पूर्वी भिंत चालवून एक चमत्कार केला त्याची मोठी प्रसिद्धी झाली होती. ट्रंपसाहेबांचा चमत्कार म्हणजे अस्तित्त्वातच नसलेली भिंत आणखी १० फूट उंच करून दाखवणे!

आता टेड क्रूझ साहेबांचे सेक्स स्कँडल बाहेर आले ! बस कर ऊपरवाले, अब यही एक बाकी रह गयी थी क्या ? लहान मुलांना रिपब्लिकन डिबेट पासून दूरच ठेवलेले बरे.

LOL

lol

Lol

परवाच्या रियल टाईम ह्या कार्यक्रमात बिल मारने कोरी बुकर ह्या सिनेटरची मुलाखत घेतली. देशाच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याकरता बनवलेल्या सिनेटरांच्या एका समितीचा तो सदस्य आहे (senate committee on homeland security). अर्थातच ब्रुसेल्सच्या स्फोटांचा विषय चर्चेत आला. बिल मार असे म्हणाला की "तुम्ही (डेमोक्रॅटिक पक्ष) अशा घटनांचा उल्लेख करताना इस्लामी अतिरेक , इस्लामी दहशतवाद असे शब्द का नाही वापरत? आयसिस व तत्सम संघटनांनी घडवून आणलेल्या कारवायांमागे एक अतिरेकी इस्लामी विचार आहे हे सूर्यप्रकाशाइतके लक्ख आहे पण तुम्ही इस्लामी हा शब्द वापरणे अट्टाहासाने टाळता असे का? अशा आडमुठेपणामुळे तुम्ही पुढची अध्यक्षपदाची निवडणूक हरू शकाल ह्याची तुम्हाला जाणीव आहे का?"

ह्या प्रश्नाला कोरीने बगल द्यायचा प्रयत्न केला. आपला आणि आपल्या पक्षाचा बोटचेपेपणा कमी करण्याचा कुठलाही इरादा नसल्याचे त्याच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. अशा वागण्यामुळे रिपब्लिकनचे पारडे जड होईल असे वाटते. निवडणुकीच्या जवळपास असे अतिरेकी हल्ले झाले तर जनमत अशा बोटचेपेपणाला धुडकावून लावेल.

राज, ते बहुधा मित्राचेच असावे. एकाने ते केले होते शेअर. तसेही त्यावर काही फार क्रेडिट वगैरेचा इशु नाही. Happy

Pages