Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>> ट्रंपच्या बाबतीत वज्रादपि
>>> ट्रंपच्या बाबतीत वज्रादपि कठोराणि असलेली माध्यमे हिलरीच्या बाबतीत मृदूनि कुसुमादपि असतात असे मला ठाम वाटते.
--- असहमत आहे, पण हे तुमचे मत असल्याने लेट्स अॅग्री टू डिसअॅग्री.
>>> मात्र ट्रंपचे एक चुकीचे उत्तर हे प्रचंड उत्पात असल्यासारखे मिरवले जाते.
--- गर्भपाताबद्दल स्त्रियांना दोषी ठरवून काहीतरी शिक्षा ठोठावली पाहिजे, हे उत्तर भले स्लिप ऑफ टंग असो वा बिनडोक आत्मविश्वासाने दिलेलं उत्तर असो - जर असं विधान अध्यक्ष होण्याची शक्यता असणारी व्यक्ती करत असेल; आणि त्यात १% जरी तथ्य असेल, तर एका स्वतंत्र, लोकशाही व्यवस्थेत ते गंभीरपणे घ्यायला नको का?
न्यू जर्सीत ९/११ नंतर विजयोत्सव साजर्या करणार्या हजारो (थाऊजंड्स अँड थाऊजंड्स) मुस्लिमांचा काल्पनिक 'व्हिडिओ'; दरमहा दोन लाखांहून अधिक जॉब्ज्सची भर पडत असताना अजूनही ओबामाकेअर जॉब किलिंग आहे असं म्हणत राहणं; 'नॉक द क्रॅप आऊट ऑफ हिम'/'दे विल बी कॅरिड आऊट ऑन स्ट्रेचर फोक्स, आय वुड लाईक टू पंच दॅट गाय इन फेस' अशा चिथावण्या देणं; ओबामा एक्झिक्युटिव्ह ऑर्डरने तुमच्या बंदुका जप्त करणार आहे अशा अफवा पसरवणं - या सगळ्या गोष्टीही मीडियाने केलेला पराचा कावळा आहेत का?
>>--- गर्भपाताबद्दल
>>--- गर्भपाताबद्दल स्त्रियांना दोषी ठरवून काहीतरी शिक्षा ठोठावली पाहिजे, हे उत्तर भले स्लिप ऑफ टंग असो वा बिनडोक आत्मविश्वासाने दिलेलं उत्तर असो - जर असं विधान अध्यक्ष होण्याची शक्यता असणारी व्यक्ती करत असेल; आणि त्यात १% जरी तथ्य असेल, तर एका स्वतंत्र, लोकशाही व्यवस्थेत ते गंभीरपणे घ्यायला नको का?
<<
ज्या पद्धतीने हा कबुलीजबाब ट्रंपच्या तोंडून वदवून घेतला तो प्रसंग पाहिला आहे का? एखाद्या आरोपीला मारहाण करुन वा दबाव आणुन खुनाची कबुली घेतात त्याची आठवण होते. इतका आक्रमक पत्रकार असेल तर एखाद्याच्या बोलण्यात चूक होऊ शकते. त्यात १% सुद्धा तथ्य असेल असे वाटत नाही. तो एक जबरदस्तीने वदवून घेतलेला जवाब आहे. ट्रंपने दुबळेपणा दाखवला हीच काय ती चूक. पण त्यावरून तो अध्यक्ष झाल्यावरही तेच करेल असा निष्कर्ष काढणे आततायीपणाचे आहे असे माझे मत.
एखादा मुरलेला राजकारणी इथे अर्धसत्य वा पूर्ण असत्य सांगून निसटू शकला असता. ट्रंप मुरलेला राजकारणी नाही. कदाचित त्याचे हे चुकणे, आदर्शपणाचा देखावा निर्माण न करु शकणे लोकांना जास्त भावत असेल. निबर, हवे तसे सफाईदार खोटे बोलणारे राजकारण्यांना कदाचित अमेरिकन जनता कंटाळली असेल म्हणून ट्रंपचे पारडे जड होत असेल.
शेंडेनक्षत्र, ते द यंग टर्क
शेंडेनक्षत्र, ते द यंग टर्क वगैरे लोक तर ट्रम्प ला कसा मीडिया बायस्ड आहे म्हणुन लिवतात. ते तर म्हणतात सी एन एन पण ट्रम्पला सोपे प्रश्न विचारतात टाऊन हॉल मध्ये तर डेम्सना एकदम अवघड. काय समजूनच राहिले नाही या अमेरिकी निवडणुकीचे. पर्गत राष्ट्र आहे म्हणतात न्हवे
>>> ज्या पद्धतीने हा
>>> ज्या पद्धतीने हा कबुलीजबाब ट्रंपच्या तोंडून वदवून घेतला तो प्रसंग पाहिला आहे का? एखाद्या आरोपीला मारहाण करुन वा दबाव आणुन खुनाची कबुली घेतात त्याची आठवण होते. इतका आक्रमक पत्रकार असेल तर एखाद्याच्या बोलण्यात चूक होऊ शकते.
--- पाहिला आहे. ख्रिस मॅथ्युज आक्रमक आणि ट्रम्प दुबळा? ट्रम्पने मॅथ्युजला तू कॅथलिक आहेस का इ. विचारून उत्तर टाळायचा प्रयत्न केला, पण त्याने शांतपणे, नेमके प्रश्न विचारले. यात कबुली आणि मारहाण कुठे आली?
>>> पण त्यावरून तो अध्यक्ष झाल्यावरही तेच करेल असा निष्कर्ष काढणे आततायीपणाचे आहे असे माझे मत.
--- अहो, पण हे एकच विधान नाही. मी वर यादी दिली आहेच ट्रम्पच्या आततायी विधानांची. ती तर कोणी ट्रम्पला बुकलून, कबुलीजबाब म्हणून वदवून घेतली नव्हती ना?
>>> कदाचित त्याचे हे चुकणे, आदर्शपणाचा देखावा निर्माण न करु शकणे लोकांना जास्त भावत असेल. निबर, हवे तसे सफाईदार खोटे बोलणारे राजकारण्यांना कदाचित अमेरिकन जनता कंटाळली असेल म्हणून ट्रंपचे पारडे जड होत असेल.
--- किंवा कदाचित रेसिस्ट लोकांना त्याचं बोलणं भावत असेल. शिवाय ट्रम्प सफाईदारपणे खोटं बोलत नाही? - http://www.factcheck.org/2015/12/the-king-of-whoppers-donald-trump/
शिवाय ट्रम्प सफाईदारपणे खोटं
शिवाय ट्रम्प सफाईदारपणे खोटं बोलत नाही? - >> ह्या बाबतीमधे बहुधा असे म्हणता येईल, कि तो सफाई पणे खोटे बोलत नाही तर फक्त विषय टाळतो.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>कि तो सफाई पणे खोटे बोलत
>>कि तो सफाई पणे खोटे बोलत नाही तर फक्त विषय टाळतो<<
दरवेळेस विषयाला धरुन बोलणारा उमेदवार दाखवा आणि $१०० जिंका...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आजची डीबेट बघताय का कोणी?
आजची डीबेट बघताय का कोणी?
फाॅर मी, सॅंडर्स बाॅडी
फाॅर मी, सॅंडर्स बाॅडी लॅंग्वेज व्हेन हि सिक्स परमिशन टु रिबट (स्पीक) इज मोर एंटरटेनिंग दॅन हिज ॲक्चुअल रिस्पाॅंसेस...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोल्डमन सॅक्स ह्या
गोल्डमन सॅक्स ह्या वित्तउद्योगाने हिलरीला तीन भाषणाकरता जवळपास सात लाख डॉलर दिले होते. ही रक्कम मोठी आहे. त्या भाषणाच्या लेखी प्रती (ट्रान्स्क्रिप्ट्स) लोकांसमोर उघड करणार का? ह्याचे उत्तर तिने असे दिले की रिपब्लिकन पक्षातही असे लोक आहेत. त्यांनी खुल्या केल्या तर मीही करीन असे धाडसी, तत्त्वनिष्ठ उत्तर देऊन आपण कसे नि:स्पृह आहोत. हे लोकांवर ठसवण्यात हिलरीबाई यशस्वी झाल्या असे म्हणावे लागेल!
बाकी कुठल्या कुठल्या गोष्टी रिपब्लिकन पक्षातील लोकांनी केल्या तर (आणि तरच) हिलरी करेल ते नीट कळलेले नाही!
ट्रम्प ने ९/११ चा उल्लेख
ट्रम्प ने ९/११ चा उल्लेख चुकून ७/११ केला
http://www.huffingtonpost.com/entry/donald-trump-911-711_us_571592bee4b0...
तर दुसरीकडे क्रूज चे अफलातून
तर दुसरीकडे क्रूज चे अफलातून उत्तर एका गे रिपब्लिकन च्या प्रश्नाला. "धार्मिक स्वातंत्र्य"!!!
http://www.huffingtonpost.com/entry/ted-cruz-gay-republican-good-morning...
परवा बिल माहर वर आरियाना
परवा बिल माहर वर आरियाना हफिंग्टन आली होती तीने ट्रम्प ला गब्बर करून टाकलं.
तर दुसरीकडे क्रूज चे अफलातून
तर दुसरीकडे क्रूज चे अफलातून उत्तर एका गे रिपब्लिकन च्या प्रश्नाला. "धार्मिक स्वातंत्र्य"!!! >> त्याच्या उत्तराचा शेवटचा भाग एकाच वेळी interesting नि धोकादायक आहे. Different states can have different laws.
Different states can have
Different states can have different laws. >> ऐकलं ते. तसे असेल तर तुम्ही आमच्या राज्यात राहू नका असे म्हणायचे आहे की काय असे वाटते.
Different states can have
Different states can have different laws. >>> यात काही नविन आहे का? सदर्न स्टेट्स हेच तर शेकडो वर्षे म्हणत आली आहेत !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मैत्रेयी presidential
मैत्रेयी presidential candidate उघड उघड बोलतो हा फरक आहे. I'm constitutional म्हणत हे लोक सरळ सरळ गैर फायदा घेतात राव![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
जेव्हा हे प्रत्येक राज्याला
जेव्हा हे प्रत्येक राज्याला वेगळे कायदे करायचे स्वातंत्र्य वापरुन काही शहरे स्वतःला सँक्चुअरी सिटी घोषित करतात तेव्हा हे स्वातंत्र्य खटकत नाही. मात्र समलिंगी लग्नाबाबत जर कुठल्या राज्याने वेगळे नियम केले तर मात्र हे खटकते असे का?
अमेरिका बनले तेव्हा प्रत्येक राज्याला काही प्रमाणात स्वातंत्र्य होते. ते आता बदलून भारताप्रमाणे केंद्राची सत्ता जास्त असावी असे सगळ्यांना वाटते का? त्याकरता अमेरिकन संविधानात काही मूलभूत बदल करायला लागतील असे वाटत नाही का?
अहो तसे स्वातंत्र्य घेऊन
अहो तसे स्वातंत्र्य घेऊन शॉर्लेट नी डिस्क्रिमिनेशन च्या विरोधात रूल्स केले तर राज्याने त्यात हस्तक्षेप करून वेगळे कायदे पास केले घाई गडबडीने. कायदे करायला ना नाही पण जी हिपोक्रसी केली जाते त्याला ना आहे !
न्यु योर्क ट्र्म्प्च्या
न्यु योर्क ट्र्म्प्च्या खिशात.
सध्या तरी दुसर्या नंबरवर केसिक आहे
आजच्या युती बद्दलच्या
आजच्या युती बद्दलच्या बातमीबद्दल इथे काही चर्चा नाही का अजून?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इंटरेस्टिंग डेव्हलपमेण्ट.
इंटरेस्टिंग डेव्हलपमेण्ट. वाचले नव्हते. बघू पुढच्या प्रायमरीज मधे काय होते. या दोघांचे मतदार मिळून ट्रम्पला हरवतात की त्याचे समर्थक पेटून घाउक मतदान करतात ते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फनी (किंवा फोनी) अलायंस.
फनी (किंवा फोनी) अलायंस. केसीक म्हणतो इंडियानात कॅंपेनींग करणार नाहि पण माझ्या सपोटर्सनी मलाच मत द्यावं. धिस इज वर्स दॅन रुबियोज प्लीड टु वोट केसीक इन ओहायो; हि ॲट लिस्ट आस्क्ड हिज सपोटर्स टु वोट केसीक...
कोक बंधूंपैकी एकाने हिलरीला
कोक बंधूंपैकी एकाने हिलरीला समर्थन देऊन तिची पंचाईत केली आहे! (निदान निवडणूक होईपर्यंत अशी स्तुतीसुमने उधळायला नको होती!) गब्बर, धनाढ्य लोकांच्या खिशात असणारी उमेदवार म्हणून हिलरीचा आधीच लौकिक आहे. गोल्डमन सॅक्स सारख्या अमाप श्रीमंत कंपन्या लाखो डॉलर देऊन तिला भाषणाचे आमंत्रण देतात ते काही भूतदयेच्या दृष्टीने नाही! तशात कोक बंधूंची भर पडली आहे. कोक बंधू हे पर्यावरणवाद्यांचे खंदे विरोधक आहेत. त्यांनी अनेक सिनेटर्स विकत घेऊन त्यांना पर्यावरणविरोधी, हवामान बदल विरोधी भूमिका मांडायला भाग पाडले होते. हे डेमोक्रॅटिक पक्षाच्या धोरणाच्या पूर्ण विरोधी आहे.
सँडर्ससारखे पुरोगामी, समाजवादी विचारांचे लोक हिलरीला समाजवादाकडे झुकायला भाग पाडत आहेत. परंतु अशा प्रकारे बड्या बड्या पैसेवाल्या लोकांनी तिला पाठिंबा देऊन तिचे खरे रुप उघडे केले आहे. प्रस्थापित मतदारांना खूश करायला वरवर प्रगतीशील, पुरोगामी असे कातडे पांघरलेली परंतु आतमधे पक्की भांडवलशाही विचारांची, बड्या उद्योगांचे हितसंबंध जपणारी उमेदवार आहे हे दिसत आहे.
पण बहुधा आता उशीर झाला आहे. तिची उमेदवारी जवळजवळ पक्की झालेली आहे.
क्रुझ पिक्स फियोरिना ॲज रनिंग
क्रुझ पिक्स फियोरिना ॲज रनिंग मेट - होप धिस इज नाॅट अनदर हेल मेरी राइट आफ्टर क्रुझ-केसिक अलायंस...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
I wonder if this is as epic
I wonder if this is as epic fail as HP-Compaq merger![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
कालच्या व्हाहाकडि चा हायलाइट
कालच्या व्हाहाकडि चा हायलाइट शेवटची बेनर सोबतची विडियो क्लिप (काउच कमांडर) होता. ओबामाने ट्रंप, हिलरी, सॅंडर्स, क्रुझ, केसिक इ. वर पंचेस/जॅब्स फेकले पण दरवर्षीसारखी मजा आली नाहि. त्याचा शेवटचा इवेंट म्हणुन कदाचित जास्त अपेक्शा होती.
असो, फाॅर दोज हु मिस्ड इट - हियर यु गो...
ट्रंप परवाच्या शुक्रवारी सॅन
ट्रंप परवाच्या शुक्रवारी सॅन फ्रॅन्सिस्को भागात आला होता. तेव्हा अतिरेकी डाव्या संघटनांनी अत्यंत आक्रमक होत त्याची वाट अडवली. त्याला बोलू न देण्याचा त्यांनी चंग बांधला होता. मेक्सिकोचे झेंडे फडकवले. अमेरिकेच्या सीमा सर्वांना खुल्या असाव्यात वगैरे क्रांतिकारी विचार मांडले (हे हिलरी तरी मान्य करेल का?).
ट्रंपला कुठल्यातरी आडवाटेने, कंपाउंडच्या तारेखालून वगैरे वाट शोधून मगच कसेबसे सभागृहात शिरता आले.
विरोधकांना आपले विचारही मांडू न देणे हे फासिस्ट मनोवृत्तीचे नाही का? लोकशाहीत विचारांचा विरोध विचाराने करण्यावर ह्या ब्लॅक लाइव्हज मॅटर, कोड पिंक प्रभृती संघटनांचा विश्वास का नाही? आणि असल्या संतापजनक उन्मादाला सॅन फ्रानचे पोलिस निष्ठूरपणे चिरडत का नाहीत? अशा प्रकारे ट्रंपची गळचेपी केल्यामुळे त्याला मिळणारी सहानुभुती वाढेलच असे मला वाटते.
क्रुझ हॅज ड्रॉप्ड आऊट!
क्रुझ हॅज ड्रॉप्ड आऊट!
इंडियाना लाॅस वाज द लास्ट
इंडियाना लाॅस वाज द लास्ट स्ट्राॅ ड्राॅप्ड आॅन क्रुझ कॅंपेन. प्रिबस ने सुद्धा ट्विट करुन ट्रंपला प्रिझंप्टिव नामिनी म्हणुन डिक्लेर केलं. ट्रंप एक्स्प्रेस धडाडत चालली आहे, व्हाइट हाऊसला...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दुसरीकडे, सॅंडर्स इंडियानात जिंकला. टफ रोड अहेड फाॅर हिलरी?..
Wow! बिग न्यूज! मला वाटले
Wow! बिग न्यूज! मला वाटले नव्हते इतक्या लौकर तो बाहेर पडेल, किंवा मुळातच कन्वेन्शन च्या आधी बाहेर पडेल. कारण चर्चा अशी होती की ट्रम्प ला डावलून दुसरा उमेदवार पार्टी चे लोक निवडतील.
Pages