ट्रंप
ट्रंपच्या राज्यात...
अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष डानल्ड टृंप यांच्या कामगिरीवर चर्चा करण्यासाठी हा धागा. राष्ट्राध्यक्षाच्या निर्णयाचा परिणाम तळागाळातल्या माणसांपासुन "टू बिग टु फेल" संस्थांवर होत असल्याने इथे अगदि एलिमेंटरी शाळेच्या बाकापासुन ते इमिग्रेशनच्या डाका पर्यंत आणि झालंच तर रशियन कॉल पासुन मेक्सिकन वॉल पर्यंत चर्चा करायला हरकत नाहि.
अमेरिकेतील चालू घडामोडी (राजकीय)
ट्रंप निवडून आल्यानंतर अमेरिकेत राजकीय घडामोडी काय होत आहेत याची माहिती, त्यावर आपले मत इथे नोंदवावे अशी अपेक्षा आहे.
वादविवाद नकोत, मत पटले नसेल तर सोडून द्या. भांडायला उठल्यासारखे नावे ठेवून लिहू नका, नुसते सांगा की माझे बुवा असे मत आहे, किंवा माझ्या मते सत्य हे आहे.
धन्यवाद.
'ट्रम्पणे' म्हणजे काय रे भाऊ? ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो!
आधुनिक शब्दकोशातून:
ट्र्म्पणे!
क्रियापद.
अर्थ:
१. बोलताना आय (I) व माय (My) ह्याच्याशिवाय दुसरे काही न बोलणे.
२. दुस-याविषयी बोललेच तर त्याची किंवा तिची आयमाय काढतच बोलणे.
३. सार्वजनिक नळावरील भांडणात एखाद्याने ‘ठेव तर कळशी पुढे… मग तुझं काय करीन सांगता येणार नाही!’ असे म्हणावे, त्याच चालीवर जागतिक दहशतवादाशी लढायला अत्यंत संदिग्ध व दिशाहीन बोलणे. वैतागून कुणी विचारलेच ‘म्हणजे नक्की काय कराल?’ तर ‘ओह, यू डोन्ट वॉन्ट टू नो!’ असे लाडीक उत्तर देणे.
(अर्थछटा: मूलतत्ववाद्यांशी लढायला स्वत: ‘मूल’तत्ववादी होऊन पोरकट उपाय सुचवणे)
शंभर अपराध
शिशुपाल. कुंतीच्या बहिणीचा मुलगा, श्रीकृष्णाचा आत्तेभाऊ; जेव्हा जन्मला तेव्हा त्याला ३ डोळे आणि चार हात होते. सकाळी सकाळी त्याचा जन्म झाल्यावर त्याचे आई वडील त्याला सोडूनच देणार होते इतक्यात ‘प्रेस स्टार सिक्स टू म्युट, प्रेस पाउंड सिक्स टू अनम्युट’ असली रोजची दरबारातली उभ्या उभ्या बैठकीची अनाउन्समेंट चालू झाली. ‘मै समय हू’ आपल्या धीर गंभीर आवाजात बोलू लागला. म्हणाला की 'याच्या मरणाची वेळ अजून आलेली नाही. कुणा एका व्यक्तीने याला मांडीवर घेतल्यावर याचे जास्तीचे अवयव नाहीसे होतील, पण त्याच व्यक्तीकडून याचा मृत्यूही होईल.'
अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.