अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ट्रम्प निवडून येणार. बुश येऊ शकतो तर ट्रम्पदेखील का नाही? रिपब्लिकन लोकं मठ्ठ आहेत.

शिवाय ह्यावेळी अ‍ॅन्टी इंक्म्बसी वोट होणार असे वाटते. इकॉनॉमि इन टॉयलेट खूपदा वापरला गेला आहे. सो लेटस मेक अमेरिका ग्रेट अगेनचाच पर्याय राहिला आहे.

"Unless the Democrats Run Sanders, A Trump Nomination Means a Trump Presidency"

http://static.currentaffairs.org/2016/02/unless-the-democrats-nominate-s...

हे आर्टिकल वाचा. बराच सेन्स आहे.

"Sanders supporters have lately been arguing that their candidate is more electable than people think, and they have some support from the available polling. In a number of hypotheticals, Sanders does better than Clinton at beating Trump, and his “unfavorable” ratings among voters are a good deal lower than Clinton’s. In response to this, however, Clinton supporters insist that polling at this stage means very little, and since Bernie is not well known and there has not been a national attack campaign directed at him from the right yet, his supporters do not account for the drop in support that will occur when voters realize he is on the fringes. Imagine, they say, how viciously the right will attack Sanders’s liberal record.

Clinton’s people are right to point out that these polls mean very little; after all, Sanders’s entire campaign success is a caution against placing too much weight on early polling. And they are especially right to emphasize that we should visualize how the campaign by conservatives will realistically play out, rather than attempting to divine the future from highly fallible polling numbers. But it’s precisely when we try to envision how the real dynamics of the campaign will transpire that we see just how disastrous a Clinton-Trump fight will be for Clinton.

Her supporters insist that she has already been “tried and tested” against all the attacks that can be thrown at her. But this is not the case; she has never been subjected to the full brunt of attacks that come in a general presidential election. Bernie Sanders has ignored most tabloid dirt, treating it as a sensationalist distraction from real issues (“Enough with the damned emails!”) But for Donald Trump, sensationalist distractions are the whole game. He will attempt to crucify her. And it is very, very likely that he will succeed.

Trump’s political dominance is highly dependent on his idiosyncratic, audacious method of campaigning. He deals almost entirely in amusing, outrageous, below-the-belt personal attacks, and is skilled at turning public discussions away from the issues and toward personalities (He/she’s a “loser,” “phony,” “nervous,” “hypocrite,” “incompetent.”) If Trump does have to speak about the issues, he makes himself sound foolish, because he doesn’t know very much. Thus he requires the media not to ask him difficult questions, and depends on his opponents’ having personal weaknesses and scandals that he can merrily, mercilessly exploit.

This campaigning style makes Hillary Clinton Donald Trump’s dream opponent. She gives him an endless amount to work with. The emails, Benghazi, Whitewater, Iraq, the Lewinsky scandal, Chinagate, Travelgate, the missing law firm records, Jeffrey Epstein, Kissinger, Marc Rich, Haiti, Clinton Foundation tax errors, Clinton Foundation conflicts of interest, “We were broke when we left the White House,” Goldman Sachs… There is enough material in Hillary Clinton’s background for Donald Trump to run with six times over."

(लोकांना वाचायचा आळस असेल तर म्हणून जरा जास्त मोठे क्वोट केले.)

हिलरीचा सावध प्रचार आणि ट्रंप/सँडर्स यांच्या आश्वासनांचा धडाका, यांच्यातली तुलना वाचून मारिओ कोमोचे "You campaign in poetry; you govern in prose"*, हे वाक्य आठवलं.

*संभाव्य कोट्या: प्रोज अँड कॉन्स, प्रचाराचे कवित्व इत्यादी Wink

हिलरीबाईंच्या एका एडने इम्युनिटी मिळवली, ज्याने पुर्वि फिप्थ घेतलेली, चौकशी दरम्यान. सॅंडर्सचे ग्रह जोरात असतील तर हिलरीबाईंचं व्हाईट हाऊसचं स्वप्न भंगेल...

९ इस्टर्न्स, फॉक्स.

रिप. पार्टीचा कोऑर्डिनेटेड अ‍ॅटॅक प्लान असणार आहे म्हणजे ट्रम्प विरोधात.

अरे देवा ! प्रेसिडेन्शियल डिबेट मध्ये पांचट जोक ? सहावी सातवीतली मुलेही असला जोक करत नाहीत आजकाल.

"माझे हात लहान नाहीत , अन इतर काहीही लहान नाही" अर्गुय्मेन्ट ही हाइट होती. ट्रम्प कसला सेल्फ ऑब्सेस्ड आहे !!
योगा, लिटल बॉय , सगळाच आनंदी आनंद !!
बायदवे हा जिमी किमेल चा "गुड नाइट बेन " व्हिडिओ मस्ट मस्ट वॉच आहे!!
https://www.youtube.com/watch?v=otMg99MhuoY
Lol जबरा पर्फेक्ट जमलाय !!

बर्नीबाबा अजून तग धरून आहेत. मिशिगनमधे अनपेक्षित यश मिळाले. बर्नीची आकडेवारी सुधारली नसली तरी मनोबल नक्कीच उंचावले असणार. कॅलिफोर्निया आणि न्यू यॉर्कसारखी राज्ये बर्नीच्या मागे जातील असे वाटते.

ट्रंपचा वेग थोडा मंदावला असावा असे वाटते. त्याचे बोलणेही जास्त राजकारण्यासारखे वाटू लागले आहे. तिकडे रिपब्लिकन पक्षातले बडे लोक ट्रंपच्या विरुद्ध आक्रमक बनत आहेत. रॉमनीसाहेबांनी ट्रंपविरोधी राग आळवायला घेतला आहे. कार्लीबाईंनी क्रुझला पाठिंबा दिला आहे. मार्को आणि केसिक ह्यांच्यापैकी जे माघार घेतील ते क्रुझच्याच मागे जातील असे मला वाटते.

क्रूझने असे विधान केले की ट्रंपचे सगळे समर्थक अर्धशिक्षित आणि मठ्ठ आहेत! त्यांना वस्तुस्थितीची पुरेशी माहितीच नसते वगैरे.

ह्या मंगळवारी रुबियो आणि केसिक ह्यांचा निर्णायक लढा असेल.

आज अजून एक रिपब्लिकन डिबेट आहे.

<< मार्को आणि केसिक ह्यांच्यापैकी जे माघार घेतील ते क्रुझच्याच मागे जातील असे मला वाटते.>>
----- होय अशी शक्यता जास्त आहे.

बुशचा पाठिम्बा पण महत्वाचा आहे. आजच्या डिबेटनन्तर बुश पाठिम्बा जाहिर करेल (बहुधा क्रुझ).

बुशसारखे Ex-candidate जेव्हा पाठिंबा देतात तेव्हा त्यांना मिळालेले डेलिगेट्स पण देता येतात का?

>>बुशसारखे Ex-candidate जेव्हा पाठिंबा देतात तेव्हा त्यांना मिळालेले डेलिगेट्स पण देता येतात का?<<

थिअरेटिकली, येस. पण बर्याचदा हे डेलिगेट्स कन्वेंशनला अनकमिटेड म्हणुन जातात आणि त्याच्या आवडीच्या उमेदवाराला मतदान करतात...

क्रूझने असे विधान केले की ट्रंपचे सगळे समर्थक अर्धशिक्षित आणि मठ्ठ आहेत! त्यांना वस्तुस्थितीची पुरेशी माहितीच नसते वगैरे. >> हे असे प्रसंग नि विशेषतः त्यानंतर उधळलेली मुक्ताफळे बघितल्यावर अशी विधाने आश्चर्यकारक वाटत नाहीत. जनरलायझेशन चुकीचे असले तरी असे प्रसंग ट्रंप रॅलीमधे होतात हे नाकराता येत नाही
http://www.huffingtonpost.com/entry/trump-supporter-punches-protester-in...

आजची डिबेट बरीच सभ्य भाषेत होती. इतकी की ट्रंपसाहेबही चकित झाले! आक्रस्ताळेपणा आणि कंबरेखालचे वार फारसे परिणाम करत नाहीत असे जाणवले असावे लोकांना.
h1b व्हिसा १-२ वर्षापुरता बंद करावा असे सांगून ट्रंपने एक बाँब टाकला. त्याचे "इस्लामला आपला (म्हणजे अमेरिकेचा) तिटकारा वाटतो" हे विधान वादग्रस्त ठरणार.
ट्रंपने एक डायलॉग मारला की अनेक पोल मला हिलरीपेक्षा वरचढ दाखवत आहेत आणि अजून मी हिलरीवर हल्ला करायला सुरवातही केलेली नाही म्हणजे आता बघा!

>>> ट्रंपचा वेग थोडा मंदावला असावा असे वाटते. त्याचे बोलणेही जास्त राजकारण्यासारखे वाटू लागले आहे.
--- +१, काही बाबतींत रॉमनीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून फ्लिप-फ्लॉपही केलं. एकंदरीत, अपेक्षेप्रमाणे जनरल इलेक्शननुसार धोरण बदलणे चालू आहे.

बाकी नेमक्या एका एच-१धारी ट्रम्पभक्तासोबतच डिबेट पाहत होतो. बिचार्‍याची वाईट ओढाताण झाली. काही महिन्यांपूर्वी विरोध, मग गेल्या आठवड्यात 'I'm Changing; I'm Changing' आणि आज परत 'ग्रीनकार्ड पॉज + वी शुड एन्ड एच१'. बहुतेक पुढच्या आठवड्यात 'आय विल हॅव इंडियन गव्हर्नमेंट पे फॉर इट!' असा तोडगा निघेल! =))

H1B वर बंदी हा मते मिळवण्याकरता केलेला चुनावी जुमला असावा! आणि त्या व्हिसावर येणारे आणि त्याचे समर्थन करणारे मूठभरच मतदार असल्यामुळे ट्रंपच्या मतांवर फार परिणाम होणार नाही. मोठ्या हायटेक कंपन्या अशा प्रकाराला विरोध करतील.

अशी आशा करू या की H1B विरुद्ध बडगा उगारायच्या आधी ट्रंपसाहेबांची बेकायदा घुसखोरीकडे वक्रदृष्टी वळेल.

आजवर ह्या व्हिशाच्या नावाखाली अनेक गैरप्रकार होत आले आहेत हेही नाकारता येत नाही त्यामुळे अमेरिकन मतदार H1B ह्या प्रकाराच्या विरोधातच असतील बहुधा.

भारत सरकारला ह्या व्हिशाकरता खर्च करायला भाग पाडणे हा एक अफलातून विनोद आहे. पण ट्रंपसाहेबांच्या बाबतीत विनोद आणि विचार यामधील सीमा धूसर आहेत त्यामुळे उद्या तो तसे म्हणणारच नाही ह्याची खात्री नाही!

बहुतेक पुढच्या आठवड्यात 'आय विल हॅव इंडियन गव्हर्नमेंट पे फॉर इट!' असा तोडगा निघेल! >> Lol उद्या अ‍ॅटलांटीक नि पॅसिफिक वर भिंती उभारायची घोषणा होण्याचीही शक्यता आहे Wink

ट्रंपसाहेबांच्या बाबतीत विनोद आणि विचार यामधील सीमा धूसर आहेत >> विचार ? Wink विनोदाची गोष्ट खरी हि आहे कि ट्रंप च्या कँपेनला social media tracking and campaigning साठी सपोर्ट देणारी कंपनी एका डेमोक्रटिकची आहे. तीच कंपनी डेमोक्रसी टिकावी म्हणून इतर उमेदवारांना पण ती सर्व्हिस देत आहे. (अधिक माहितीसाठी ह्या वेळचा ब्लूमबर्ग बघावा) शेवटी इथून काय नितिथून काय, सबसे बडा रुपय्या !

ट्रंप साहेब हिलरीबाईंना भेटण्याआधी तरी आपल्या पॉलिसी नक्की कधी विस्तार करून सांगतील का ?

बहुतेक पुढच्या आठवड्यात 'आय विल हॅव इंडियन गव्हर्नमेंट पे फॉर इट!' असा तोडगा निघेल! >> हाहा उद्या अ‍ॅटलांटीक नि पॅसिफिक वर भिंती उभारायची घोषणा होण्याचीही शक्यता आहे >> Rofl

रिपब्लिकनना NAFTA, ट्रान्स पॅसिफिक ट्रीटी सगळं सगळं रीपील करायचय. क्युबा, सिरीया, इराक इतर मध्य पूर्वीचे देश, चीन, भारत सगळे प्रस्थापित संबंध तोडून नव्याने त्यांचं हित जपणारे (?) करार परत करायचेत. हे सगळं का? तर उन्माद, अमेरिकन ग्लोरी आणि आम्ही कसे ग्रेट.
खूप दिवसांनी कालची डिबेट थोडावेळ बघितली, पुढे नाही बघू शकलो.

>>h1b व्हिसा १-२ वर्षापुरता बंद करावा असे सांगून ट्रंपने एक बाँब टाकला<<
आणि तिकडे हिलरीबाईं म्हणाल्या कि "आय विल हॅव पाथ टु सिटिझनशिप फाॅर अनडाॅक्युमेंटेड इमिग्रंट्स";

घ्या, म्हणजे एच१, फॅमिली बेस्ड ग्रीनकार्ड वाल्यांनी एव्हढी वर्षं इमानदारीत नॅचरलायझेशनची प्रोसेस पाळली तो शुद्ध मुर्खपणा होता/आहे...

व्हिसावर बंदी, घुसखोरांना नागरिकत्व वगैरे दोन विरुद्ध टोकाचे मुद्दे आणि आश्वासने दोन्ही बाजूंचे नेते देत आहेत. पण हे सगळे करायला राष्ट्रपती समर्थ असतो का त्याला सिनेट व हाऊसचा पाठिंबा आवश्यक आहे?

क्यूबाबद्दलचा रिपब्लिकन पक्षातील लोकांचा आकस अनाकलनीय आहे. म्हणे तिथे मानवी हक्क पायदळी तुडवले जातात. पण सौदी अरेबिया जिथे स्त्रियांना दुय्यम किंवा तिय्यम दर्जाची वागणूक मिळते, जिथे ब्लॉगर्सची डोकी उडवली जातात, जिथे जाहीर शिरच्छेद, फटके मारणे वगैरे आनंददायी कार्यक्रम होत असतात तो देश जवळचा मित्र समजायचा आणि शेजारचा क्युबा मात्र महाभयंकर शत्रू. हा काय प्रकार आहे? कम्युनिस्टांशी दुष्मनी म्हणायची तर तिकडे चीनशी जोरदार व्यापार चालू आहे.
निदान हे दोन क्युबन आई/बापांच्या पोटी जन्मलेले उमेदवार तरी क्युबाबद्दल इतका तिरस्कार बाळगून नसतील अशी आशा.

Pages