अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्टोलरेबल क्रुएल्टी मध्ये कॅथरीन जॉर्ज क्लूनी बरोबरचा प्री नप आधी फाडून टाकते तेव्हा क्लूनी खुश होतो पण मग त्याला कळते की आपणच अडकलोय. तसे झाले आर एन सी चे. आता कन्वेह्शन मध्ये गडबड करून ट्रंप ला उमेदवारी दिली नाही तर त्याचे समर्थक खवळून उठणार.

ट्र्न्प प्रेसिडेन्ट झाला तर! ( दहाविच्या मुलाना निबध लिहायला भारी विषय आहे असो!) गॉड ब्लेस अमेरिका बदलुन गॉड हेल्प अमेरिका कराव लागणार.. हा माणुस उडुम धुडुम सत्यानाश पैकी वाटतोय मला, ( ही एक म्हण आहे आम्च्याकडे एखाद्या गोस्टीचा सर्वागिण विचार न करता झट्कन क्रुती करुन मग पस्तावत /निस्तारत बसणार्‍याना अस म्हणतात)

हिलरी ही उमेदवार म्हणून अगदीच सपक आणि निष्प्रभ आहे. ना भाषणात दम ना धोरणात काही चमक. बर्नी आणि ट्रंप ह्या लोकांमुळे मतदारांमधे उत्साह आहे. काहीतरी नवे, वेगळे करुन दाखवणारा नेता (निदान करण्याचा मानस बोलून दाखवणारा तरी) त्यामुळे लोकांमधे एक चैतन्य आहे.
हिलरी म्हणजे सगळेच कसे थंड, आधीचेच कित्ते पुन्हा पुन्हा गिरवण्याचे रटाळ धोरण. केवळ एक स्त्री राष्ट्राध्यक्ष बनणार हे एक नाविन्य. पण स्त्रीत्व हे काही हिलरीने प्रयत्नपूर्वक मिळवलेला गुण नव्हे.

ह्या निष्प्रभपणामुळे दोलायमान राज्यात (स्विंग स्टेट) हिलरीची डाळ शिजणे अवघड वाटते.

डॉक्टर कार्सन यांनी आजवरच्या कारकीर्दीला साजेशा पद्धतीने रजा घेतली. मी माझी राष्ट्राध्यक्षपदाची मोहिम थांबवत आहे असे अन्य उमेदवारांसारखे स्पष्टपणे न म्हणता "मला आता पुढचा मार्ग दिसत नाही आहे" अशा प्रकारचे काहीतरी गूढ विधान केले आहे. लोकांनी त्याचा अर्थ लावला आहे की साहेबांनी आपली मोहिम स्थगित केली असावी. निष्णात मेंदूच्या तज्ञाच्या मेंदूतील उलाढाली सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत असे दिसते!

उद्याच्या डिबेटमधे डॉक्टरसाहेब अनुपस्थित असतील अशी एक आशा!

पण ट्रम्प आहे का डीबेट मधे? मेगन केली मॉडरेटर्स मधे असल्याने विचारतोय.

ट्रम्प व सॅण्डर्सच्या नेहमीच्या राजकारण्यांपेक्षा एकदम वेगळ्या कॅम्पेन्स मुळे हिलरी आता सपक वाटत असेल. नाहीतर ती एरव्ही प्रेसिडेन्शियल वाटते नेहमीच. मी तिचे भाषण सॅन फ्रान्सिस्को मधे ऐकले होते २०१४ मधे. तेव्हा तरी इफेक्टिव्ह वाटली होती.

>> पण ट्रम्प आहे का डीबेट मधे? मेगन केली मॉडरेटर्स मधे असल्याने विचारतोय
प्रश्न गंमतीचा आहे. पण आता केवळ ४ उमेदवार उरले आहेत. त्यातल्या आघाडीच्या उमेदवाराला वगळून अथवा त्याने नकार दिल्यास चर्चेमधे दम राहील का? त्यामुळे बहुधा ट्रंपसाहेब आपली पायधूळ तिथे झाडतील.

नेहमीप्रमाणे रुबियो + क्रुज विरुद्ध ट्रंप असा जंगी कुस्तीचा मुकाबला असणार. जरी रुबियो आणि क्रुज एकजूटीने ट्रंपवर तुटून पडत असले तरी त्यांच्या असण्याचा फायदा ट्रंपलाच होतो आहे! त्या दुक्कलीतला एक जण गळला तर उरलेल्याची बाजू भक्कम होईल पण कुणी तसे करायला तयार नाही.

पण आता केवळ ४ उमेदवार उरले आहेत. त्यातल्या आघाडीच्या उमेदवाराला वगळून अथवा त्याने नकार दिल्यास चर्चेमधे दम राहील का? त्यामुळे बहुधा ट्रंपसाहेब आपली पायधूळ तिथे झाडतील. >>> हो तसेच चित्र दिसत आहे. फॉक्स वर ही ट्रम्प च्या सहभागाबद्दल काही माहिती नाही आलेली.

कालच बातमी होती ना की फॉक्स आणि रूबियो मधले फाटले आहे आता आणि मर्डॉक स्वतः ट्रंपच्या बाजूने बोलतो आहे. त्यामुळे ट्रंप फॉक्स्च्या गोटात सामिल झाला आहे Lol

हिलरी म्हणजे सगळेच कसे थंड, आधीचेच कित्ते पुन्हा पुन्हा गिरवण्याचे रटाळ धोरण. >> परवाचं भाषण ऐकून अगदी असंच वाटलं. काही जोशच नाही, एक वाक्य, मग पंच, मग ठराविक वेळी टाळ्या, ठराविक वेळी ओरडा. बाईसाहेबांची मान डोलावून, डोळ्याने, किंवा जनरल दोन माणसं समोर आली की न हसता ओठ एकमेकांवर किंचित दाबून हम्म करतात तशी अ‍ॅक. हे असंच कितीतरी वेळ चालू होतं.
ट्रम्प कसा मागे क्रिस्टी उभा आहे तर त्याच्यावर जोक कर, पत्रकाराने तोच तोच प्रश्न विचारला तर गप्बे साले करून डाफर. उत्तर नाही द्यायचं तर सरळ पुढचा प्रश्न विचारा करून बारीक हशा. मज्जा.

ट्रम्प कसा मागे क्रिस्टी उभा आहे तर त्याच्यावर जोक कर, पत्रकाराने तोच तोच प्रश्न विचारला तर गप्बे साले करून डाफर. >> Lol
त्या दिवशीच्या क्रिस्टीच्या मख्ख ब्लॅन्क चेहृयावर तर लईच जोक्स होतायत Happy

ट्रंप यांनी गांधीजिंचे म्हणुन कोणते वाक्य वापरले होते ते?
ते तुमहाला हसतील, लढतील, अन तुम्ही जिंकाल अशा कैतरी आशयचे होते, काय होते ते वाक्य?

ट्रम्प ने असे काही वापरल्याचे मी अजून ऐकले नाही. तो वापरणार नाही असे नाही पण आठवत नाही. मार्टिन ल्यूथर किंग व गांधीजींचे उल्लेख इथले राजकारणी वेळोवेळी करत असतात.

Happy अरे तो हजार वेळा पाहिलेला सीन आहे, आणि त्यांनी तेच एक्स्प्रेशन परफेक्ट पकडलेले आहे त्यात, त्यामुळे आठवले. ज्यांनी पाहिली नसेल त्यांनी सगळा सीन पाहा. One of the most hilarious ever.

प्रत्येक उमेदवार आपली गरिबीची/लोअर मिडल क्लास बॅकग्राउण्ड सतत बोलून दाखवत असतो हे आपण कायम पाहतो. ट्रम्प ला ते शक्य नव्हते, आणि त्याने आपली श्रीमंती फ्लॉण्ट करत कॅम्पेन चालवले आहे. त्याबद्दल व आपली गरिबी पार्श्वभूमी दाखवणार्‍या इतर उमेदवारांबद्दल
http://www.nationalreview.com/article/432227/donald-trump-net-worth-rich...

>>प्रत्येक उमेदवार आपली गरिबीची/लोअर मिडल क्लास बॅकग्राउण्ड सतत बोलून दाखवत असतो हे आपण कायम पाहतो.
<<
गेल्या निवडणुकीत अतीश्रीमंत रॉमनीचे गरीबीचे अवसान आणणे हास्यास्पद आणि बेगडी होते.
एका मुलीने गरीबी ह्या विषयावर असा निबंध लिहिला होता त्याची आठवण होते
मी गरीब आहे, माझ्या पाचही बंगल्यात काम करणारे नोकर गरीब आहेत. आमच्या दहा गाड्यांचे ड्रायवर गरीब आहेत. माझ्या बागेतले बारा माळी गरीब आहेत. आमच्या विमानाचा पायलटही गरीब आहे. वगैरे वगैरे.

अर्थातच इथेही ट्रंप आपले वेगळेपण राखून आहे. होय माझ्याकडे भरपूर पैसे आहेत असे ठणकावून सांगणारा उमेदवार काही नाही तरी उठून दिसतो हे नक्की. बाकी उमेदवार ते लपवत असतात.

शेंडेनक्षत्र आणि फा च्या पोस्टी मस्त आहेत Wink

फारेण्डा अरे श्रेय घे की. तो (आणि कार्स ) हे चित्रपट मीपण शंभरेक वेळा तरी पोरांबरोबर पाहिलेत पण आम्हाला ते नेमक्या वेळी आठवलं असतं तर इकडे टीपी कशाला करत बसलो असतो? Lol

मला हिलरी फक्त बायकांना समान पगार वगैरे मुद्दा बरा वाटतो पण ओव्हरऑल बर्नी जास्त रुचतो. त्याचं वय हा इश्यु आहेच पण. ट्रम्पबद्द्ल म्या पामर काय बोलणार. ते एकदा विकु आणि झक्कींची आठवण काढून झालीच आहे Happy
गुगल वर "हाऊ टु मुव्ह टू कॅनडा" हा सर्च य वेळा होतोय हे महामंगळवार नंतरच्या लोकल बातम्यांत सांगत होते. अमितवा, सरका वाईच Wink

Happy

मी माझ्या ऑफीसमध्येही एक दोन मला "इंटेलेक्च्युअल" वाटतात अशा लोकांकडून देश सोडून जायच्या गोष्टी ऐकल्या ट्रम्प निवडून आला तर ..

जोक्स् म्हणून ठीक आहे (त्या दोन लोकांपैकी एक जण उगीच बेसलेस जोक्स् करत नाही खरंतर) पण खरंच लोकांनां वाटतं का की ट्रम्प आल्यावर सगळा अंदाधुंद कारभार करेल असं? Happy

हो सशल. ती इथली ऑलिव्हरची लिंक मी दोन इंटेलेक्च्युअल कलिग्जना पिंग केली आणि मग तेव्हा हाहाहुहु झाल्यावर तो बिचारा इनोसंटली मला विचारतत, तुला काय वाटतं लोकं अमेरिकन्सना एकदम मूर्ख समजत असतील. मी तितक्याच इनोसंटली ते आधी बुशला दुसर्^यांदा निवडून दिलंय तेव्हा वाटून झालंय असं म्हणून टेल मी समथिंग न्यु असं सांगून त्याची टर खेचली Wink

हाहा... हमारा देश बहुत बडा है. कधी पण या. आणि सरकून कशाला बसायचं म्हणतो मी! बसा खेटून. वुई व्हॅल्यु हीट यु क्नो Wink मारा सिक्सर आता.
इकडे पण रेडिओवर अमेरिका मूव्ह इ. विषय निघाले की 'ट्रम्प आला तर!' वर हमखास जोक होतात.
अरे अमेरिकन देशभक्त लोकांना असं म्हणणाऱ्यांना सिरीयाची तिकिटं काढून द्यायची आयड्या द्या. आपल्या पाकिस्तान तिकिटांसारखी. Wink

पण खरंच लोकांनां वाटतं का की ट्रम्प आल्यावर सगळा अंदाधुंद कारभार करेल असं? >> नाहि करणार. त्याने आधीच टोन बदलायला सुरूवात केली आहे. निवडून आला(च) तर तोवर पार्टी बदलली तरी आश्चर्य वाटायला नको Lol

>> हिट

यु मीन "हीट"? Wink (मला एकदम डास मारायचं औषध आठवलं अदरवाईज् ..)

असामी च्या पोस्ट्स बघता कोण जिंकणार ह्यापेक्षा ट्रम्प हरणार की नाही ह्यात त्याला जास्त ईंटरेस्ट असावा असं दिसतंय .. Happy

मी माझ्या ऑफीसमध्येही एक दोन मला "इंटेलेक्च्युअल" वाटतात अशा लोकांकडून देश सोडून जायच्या गोष्टी ऐकल्या ट्रम्प निवडून आला तर ..
>>
मी जिथे काम करतो या मिडवेस्ट/नॉर्थ मिडवेस्टमध्ये ऑफिसमधल्या अनेकांनी ओबामा दुसर्‍यांदा निवडून आला तर देश सोडून जाऊ असे म्हटले होते (मी तेव्हा इथे अमेरिकेत नव्हतो मात्र बरोबरच्या इतर भारतीयांनी सांगितले). ते कोणीही देश सोडून गेलेले नाहीत. ओबामाला मात्र अचाट शिव्या घालतात.
जसे भारतात आता मोदींना शिव्या घालणारे व आधी गांधी घराण्यातल्या लोकांना शिव्या घालणारे, मनापासून तिरस्कार करणारे लोक असतात तसेच वाटते.

>>गेल्या निवडणुकीत अतीश्रीमंत रॉमनीचे गरीबीचे अवसान आणणे हास्यास्पद आणि बेगडी होते.<<

राम्नी इज ए बिग लाफिंंग स्टॉक. २०१२ मध्ये परिस्थिती अगदि अनुकुल असताना याला ओबामाला हरवता आलं नाहि. ट्रंप आता त्याला फाडणार...

ह्यापेक्षा ट्रम्प हरणार की नाही ह्यात त्याला जास्त ईंटरेस्ट असावा >> pure entertainment value बाकी काही काही. कोणीही आला तरी शेवटी तसाच्/तशीच वागणार.

रिप. बिगविग्ज् सपोर्ट तरी नक्की कोणाला करत आहेत? ट्रम्प आउटसाईडर. रुबिओ ला फॉक्स ने डिसओन केले, क्रूज कोणालाच आवडत नाही म्हणे.

Pages