Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मृण्मयी, वाचलं ते आर्टिकल. पण
मृण्मयी, वाचलं ते आर्टिकल. पण वॉल आहे हे सत्यवचन.
ट्रंपचा क्विक विटेड रिप्लाय हा त्याच्या स्वभावाला अनुसरूनच आहे. मला तो अपील झाला पण याच अर्थ असा नाही की मी त्याला मत देणार आहे.
इमिग्रेशन चे रूल्स आणि प्रोसिजर सर्वांना समान असावी असं मला वाटतं. मेक्सिकोमधून पळून आलेल्यांना फ्री पास मिळू नये असं वाटतं.
माझी एक मैत्रिण कलकत्याची आहे , ती तर तिथे बांगलादेशातून येणारे लोंढे पाहून ट्रंप निवडून यावा अशाच मताची आहे.
पोपने कोणाचे रिलिजस बिलिफ जज करावे हेही नाही पटलं/आवडलं. कोण खरा ख्रिस्चन या अर्थाने
असो..
पण लिबरल्स चे याबद्दलचे अनेक
पण लिबरल्स चे याबद्दलचे अनेक पॉइण्ट्स बरोबर आहेत. अनेक मेक्सिकन्स तेथील गरिबीमुळे बॉर्डर क्रॉस करून येतात. ते क्रॉस करून येणे हा एक भयानक प्रकार आहे. अनेकांनी त्याबद्दल वाचले असेल, फिल्म्स पाहिल्या असतील. ते पाहून हे क्लिअर दिसते की हे कोणी कारणाशिवाय करणार नाही. त्यात असे अनेक दशके आलेले व इथेच राहिलेले लोक असंख्य आहेत (१० मिलीयन्स पैकी ४-५ मिलीयन्स तरी?बाकीचे - जे संख्येने जास्त आहेत- ते व्हिसा वर येउन परतच न गेलेले).
यात अनेक असेही आहेत की जे कॅलिफोर्निया पासून टेक्सास पर्यंत अनेक गावांमधे अत्यंत कमी मजूरीवर शेती व तत्सम प्रकारची कामे करतात - जी कामे करायला कोणी अमेरिकन्स तयार होत नाहीत. तेथील लोकही त्यांना कामावर घेतात.
या लोकांना परत पाठवण्याची भाषा न करणे म्हणजे बँकांनी बुडीत गेलेले कर्ज अधिकृतरीत्या माफ करण्यासारखे आहे.
पॉलिटिकोची या आठवड्याची
पॉलिटिकोची या आठवड्याची व्यंगचित्रचीबघायला विसरू नका....
http://www.politico.com/gallery/2016/02/the-nations-cartoonists-on-the-w...
पहिलेच व्यंगचित्र तुफान आहे.
निकी हेलीच्या पाठिंब्याने रुबिओचा फायदा किती होतो यापेक्षा बुशचा तोटा किती होतो हेच बघावे लागेल. गेले २-३ दिवस सर्व प्रसारमाध्यमे तर बुश कॅम्पेनला श्रद्धांजलीच वाहू लागली आहेत.
<<ह्या सगळ्या वॉल्स (इन्क्लुडींग ट्रम्प ला अमेरिका आणि मेक्सिको मध्ये बांधायची आहे ती भिंत) ह्या सगळ्या कम्पेरेबल आहेत का त्यावरून एकमेकांनां टोमणे मारायला आणि त्यावर इतकी हाईप क्रिएट करायला?>>
सशल, जो इश्यु लोकांमध्ये पॉप्युलर तोच उमेदवार उचलणार. रिपब्लिकन्समध्ये इमिग्रेशनइतका 'हॉट' मुद्दा दुसरा कोणताही फारसा नाही. डेमोक्रॅट्समध्ये वॉल स्ट्रीटइतका 'हॉट' मुद्दा दुसरा नाही.
राहिली गोष्ट भिंत बांधायची, तर ती कोणीही बांधू शकेल असे वाटत नाही. आता या सगळ्या भिंती कम्पेरेबल आहेत हा हा सारासार विचार कोण करणार!!!!!! इमिग्रेशससकट सगळे मुद्दे साऊंडबाईटमध्ये बसवण्याचाच सगळा हव्यास बघायला मिळतोय.
ट्रंपची आत्तापर्यंतची जर्नी
ट्रंपची आत्तापर्यंतची जर्नी तुम्हि क्लोजली फाॅलो केली असेल तर खालील मुद्दे तुमच्या लक्शात आले असावेत. नसल्यास, हियर इज माय रीड:
१. सुरुवातीपासुन ट्रंप सो काॅल्ड एस्टॅब्लिशमेंट्सच्या विरोधात आहे. त्याला कल्पना आहे कि हार्डकोर रिपब्लिकन्स बरोबर इतर अमेरिकन्स सध्याच्या परिस्थितीला वैतागलेले आहेत. आपण आउटसायडर, नाॅनपोलिटिशन आहोत असं सांगत त्याने स्वत:ला वेगळं शाबीत केलेलं आहे (तुमच्या पापात मी वाटेकरी नाहि)...
२. चर्चेत इल्लीगल इमिग्रेशनचा इशु त्याने सर्वप्रथम आणला. ड्रग्ज, क्रिमिनल इनफ्लो इ. बाॅर्डर सिक्युरिटीशी रिलेटेड आहेत. हा एक खुप जुना ब्लिडिंग इशु असल्याने, ट्रंपचं भिंत उभारायचं सोलुशन हास्यास्पद असुनहि बर्याच अमेरिकनांची मनं (मतं) त्याने जिंकलेली आहेत...
३. आयसिस, रॅडिकल इस्लाम हे दुसरे बर्निंग इशुज. त्यातहि आक्रमकपणा, जो अमेरिकेचा स्थायीभाव आहे, दाखवुन त्याने विरोधकांना निष्प्रभ केलेलं आहे...
४. कालच्या पोपच्या स्टेटमेंटचा त्याने विरोध केला पण टोन्ड डाउन भाषेत. हि इशुड ए रिसपाॅंस बट मेड श्योर हि डिडंट टिक आॅफ अमेरिकन कॅथलिक्स...
५. आणि आजची त्याची ॲपलवरची प्रतिक्रिया. ॲपलचा स्टॅंड वॅलिड आहे बट सुनर आॅर लेटर, ॲपल विल नील डाउन टु प्रेशर फ्राॅम एफबीआय, विल प्रोवायड ए मॅकेनिज्म टु अनलाॅक फोन्स इन इमर्जंसीज, ॲंड ट्रंप विल गेट द क्रेडिट...
बाॅटमलाइन, हि इज वेरी स्मार्ट, हि नोज विच बटन टु पुश, व्हेन. दॅट इज व्हाय हि इज फ्रंटरनर ॲंड क्रुझिंग टुवर्ड्स विनींग जीओपी नाॅमिनेशन, ॲंड परहॅप्स प्रेसिडेंसी...
<< यात अनेक असेही आहेत की जे
<<
यात अनेक असेही आहेत की जे कॅलिफोर्निया पासून टेक्सास पर्यंत अनेक गावांमधे अत्यंत कमी मजूरीवर शेती व तत्सम प्रकारची कामे करतात - जी कामे करायला कोणी अमेरिकन्स तयार होत नाहीत. तेथील लोकही त्यांना कामावर घेतात.
<<
समजा कुणी अमेरिकन्स करायला तयार नाही अशा कामांची संख्या क्ष आहे. २००० सालापासून सुरवात करु.
तेव्हा ती क्ष संख्येची कामे बेकायदा घुसखोरी करणारे मेक्सिकन करत होते. २००१ सालीही ही संख्या क्षच होती का त्याहून जास्त होती का कमी होती? कुणीही अमेरिकन करणार नाही अशा कामांची संख्या वर्षानुवर्षे बरोब्बर जेवढे घुसखोर येत आहेत तितकीच स्थिर आहे का? अशा नोकर्यांचे प्रमाण बघून तेवढेच बेकायदा घुसखोर अमेरिकेत घुसतील अशी दक्षता घेणारी कुठली यंत्रणा आहे का? कुणीही अमेरिकन करायला तयार नाही अशा कामांची काही आकडेवारी उपलब्ध आहे का? त्यात कशी नि किती वाढ होताना दिसत आहे? घुसखोर मेक्सिकन आजन्म अशी त्याज्य कामेच करत रहातात का ते यथावकाश अशीही कामे करु लागतात जी कदाचित निदान काही अमेरिकन तरी करायला तयार होतील?
>>
अनेक मेक्सिकन्स तेथील गरिबीमुळे बॉर्डर क्रॉस करून येतात. ते क्रॉस करून येणे हा एक भयानक प्रकार आहे. अनेकांनी त्याबद्दल वाचले असेल, फिल्म्स पाहिल्या असतील.
<<
जर हा इतका भयानक, अत्याचारी मार्ग आहे तर तो दुर्लक्षित ठेवून पुढेही अशाच हालअपेष्टा त्या लोकांना भोगायला लावू देणे हे कनवाळूपणाचे आहे का? अनेक गुंड टोळ्या (कार्टेल) अशा बेकायदा घुसखोरीकरता लाच घेऊन मदत करतात. असहाय लोकांना लुटतात, बायकांवर अत्याचारही करतात. घुसखोरीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे अशा टोळ्यांना पोसण्यासारखे नाही का? शिवाय बेकायदा शस्त्रे, अमली पदार्थ हेही ह्या मार्गाने येतात अशी माझी माहिती आहे त्याचे काय? का भूतदया करताना थोडेफार वाईट सहन करायचे?
आणि असले प्रकार?
घुसखोरी चालूच राहावी हे
घुसखोरी चालूच राहावी हे आर्ग्युमेण्ट नाहीये - जे लोक ऑलरेडी अनेक वर्षांपूर्वी आलेले आहेत, त्यांची लहान मुले इथे जन्मलेली आहेत. त्यांचे कुटुंब आता अचानक तोडून त्यांच्यापैकी बेकायदा असलेल्या लोकांना (गुन्हेगारी वगळता) परत पाठवणे हे 'अमेरिकन' नाही असे आर्ग्युमेण्ट आहे. अनेक रिपब्लिकन्सचे ही तेच मत आहे. ट्रम्प, क्रूज व रुबिओ वगळता. जेब बुश वगैरेंचीही सहानुभूती आहे. मला आठवते त्याप्रमाणे जॉर्ज डब्ल्यू बुश ने ही गेस्ट वर्कर प्रोग्रॅम त्याकरता रेकमेन्ड केला होता.
दुसरा पॉइण्ट म्हणजे सरकारला ११ मिलीयन लोकांना परत पाठवायला जी प्रोसेस राबवावी लागेल, त्याला जो खर्च येइल त्यावरूनही हे काम अशक्य आहे असे अनेक जण म्हणतात.
एका बाजूला थोडे 'सर्वांना परत पाठवा' वाले, तर दुसर्या बाजूला महा-लिबरल्स याच्या मधे बहुसंख्य जनता साधारण या वरच्या मताची असेल.
नेवाडा मधे हिलरी जिंकली साउथ
नेवाडा मधे हिलरी जिंकली
साउथ कॅरोलीना मधे ट्रम्प जिंकल्याचे जवळजवळ निश्चित आहे. तेथे म्हणे "डब्ल्यू" चे प्रचंड सपोर्टर्स आहेत (असे लोक आहेत याची कल्पना नव्हती :)). दोन्ही बुश ना न्यू हॅम्पशायर मधे मागे पडल्यावर म्हणे साउथ कॅरोलीनानेच हात दिला होता. अशा बुश च्या विरोधात जोरदार बोलल्यावर - विशेषतः रिपब्लिकन पार्टीमधे पूर्वी कधीही न ऐकलेला (रॉन्/रॅण्ड पॉल सुद्धा इतके थेट बोलले होते का लक्षात नाही) - "खोट्या माहितीवर इराक युद्ध केले" हा आरोप बुश वर करून सुद्धा, आणि काल तर पोप च्या कॉमेण्टवर सुद्धा विरोध करूनही ट्रम्प जिंकतो हे आश्चर्य आहे.
बुशने (फायनली) गाशा गुंडाळला
बुशने (फायनली) गाशा गुंडाळला आहे. कार्सन आणि केसिक अजून नक्की का आहेत रेसमध्ये ते कळलं नाही. ट्रम्पची आपल्याला एंटरटेंनमेंट वाटते पण भाबड्या रिप.सपोर्ट्सना तो आवडायला लागला आहे असं चिन्ह आहे हे ट्रम्प जिंकला म्हणजे. निकी हेलीमुळे मार्कोला बराच बुस्ट मिळालेला दिसतो. अर्थात टेड क्रुज आणि त्याच्यात फार फरक नाही आहे.
जिंकल्यानंतरच्या भाषणात ट्रम्पने त्याच्या नंबर्सबाबत भाषण करणार्^या "पंडित्स"ना पोकळ बांबुचे फटके मारले आहेत. दिस गाय इज अ डार्क हॉर्स असं म्हणायला पाहिजे. फक्त खरंच निवडून वगैरे आला तर कुठेतरी झक्कीं का विकुंनी म्हटलं होतं तसं चला गाशा गुडाळा असं होईल. मला अजूनही त्याची भाषणं म्हणजे मोअर लाइक सिआयओ/सिईओ लोकं बिझनेस मोराल बुस्ट करायल ज्या प्रकारे बोलू शकतात तशीच वाटतात. अमेरिकन्सचा त्याच्याकडे पाहायचा दृष्टीकोन वेगळा असू शकेल.
हिलरीचं आजचं भाषण अजेंड्यामध्ये बर्नी नेहमी ऑर्गुमेंट्स करतो ते मुद्दे म्हणजे वॉल स्ट्रीट वगैरेशी रिलेटेड थोडे टॉपिक्स अॅड करून सर्वगुणसंपन्न राज्यकारभार करणार वगैरे टाइप वाटलं. ही लोकं जनरली जे काही कँपेनच्या वेळेस बोलतात ते सत्तेवर आल्यावर करतात का? (एक अतिअतिशय भाबडा प्रश्न )
केसिक हा उत्तरेकडच्या
केसिक हा उत्तरेकडच्या राज्यांवर जास्त अवलंबून आहे. त्यामुळे सदर्न स्टेट्स मुळे त्याच्या कॅम्पेन वर परिणाम होणार नाही. ही सगळी वाचलेली माहिती.
कुठेतरी झक्कीं का विकुंनी म्हटलं होतं >>> हे म्हणजे एखादे वाक्य मनमोहन सिंगांनी की मोदींनी म्हंटलं होतं असे म्हंटल्यासारखे आहे
दोनदा प्रकाशित झाला. क्षमस्व.
दोनदा प्रकाशित झाला. क्षमस्व.
डॉक्टरसाहेब कुठल्या आशेवर
डॉक्टरसाहेब कुठल्या आशेवर टिकून आहेत ते कळत नाही! अमेरिकन म्हणतात तसे, आपले स्थान गोत्यात आहे हे कळायला ब्रेन सर्जन असायची गरज नाही. इथे तर अक्खा ब्रेन सर्जन हजर आहे!
फा आपले ते हे वगैरे म्हणायला
फा आपले ते हे वगैरे म्हणायला हवं होतं का
अख्खा ब्रेन सर्जन डिबेटमध्ये ते बोलायला लागले की आम्ही आमच्या ब्रेनला थोडा ब्रेक देतो आणि पाणी पिणे वगैरे कामं आटपून घेतो
डोंट वरी गाय्ज, हि इज नाॅट
डोंट वरी गाय्ज, हि इज नाॅट गोइंग एनिव्हेर...
बाकी त्या सगळ्या रीपब्लीकन
बाकी त्या सगळ्या रीपब्लीकन कळपात बेन कार्सन चुकलेलं कोकरू वाटतं.
अंजली
अंजली
बेन कार्सन परमेश्वराच्या
बेन कार्सन परमेश्वराच्या आदेशाची वाट पहात आहे. त्याला सध्या खेळपट्टीवर टिकुन रहाण्याचे आदेश आहेत.
ट्रम्प को रोकना मुश्कील ही
ट्रम्प को रोकना मुश्कील ही नही नामुमकीन है!
तिकडे हिलरी बाईंचे नॉमिनेशन पक्के होतेय तससते बर्नी समर्थक ट्रंप ला मते देऊ पण हिलरीला नाही अशा मूड मध्ये आहेत.
@ सलील, फारेण्ड धन्यवाद. मला
@ सलील, फारेण्ड धन्यवाद.
मला ही कसलाच आगापिछ्छा नसताना (की आहे पण मला माहित नाही?) पोप ने केलेल्या वक्तव्याच आश्चर्य वाटल.
जेब बुश ची कॅम्पेन टर्मिनेशन ची घोषणा बघितली. त्याच जाण अपरिहार्य होत हे खरच. त्याची राजकीय भुमीका पटत नसली तरीही त्याच्या भावना जेन्युईन वाटल्या. अॅटलिस्ट त्याच्या भावापेक्षा हा ज्यास्त विचारी आणि ज्यास्त स.न्तुलित असावा अस वाटत. बिचार्याच्या पोलिटिकल करियरची त्याच्या भावाने वाट लावली.
डॉ. कार्सन का टिकुन आहे हा प्रश्नच आहे.
एक मजेदार विचार मनात आला. जर ट्रम्प वि. हिलरी असा फायनल सामना झाला तर हिलरी नक्कि कुठल्या मुद्द्यावर लढणार? कारण बुश ला खोटारडा म्हणणे, प्लॅन पेरन्टहुड ला पैसे देणे अश्या अनेक बाबी.न्वर ट्र्म्प आणि हिलरी च्या स्टॅन्ड मध्ये फरकच वाटत नाही :).
>> अनेक बाबी.न्वर ट्र्म्प आणि
>> अनेक बाबी.न्वर ट्र्म्प आणि हिलरी च्या स्टॅन्ड मध्ये फरकच वाटत नाही स्मित.
कालच फेसबुकवर एक प्रॉसेस्ड फोटो बघितला, "ट्रम्प्लरी" चा ..
>> एक मजेदार विचार मनात आला.
>>
एक मजेदार विचार मनात आला. जर ट्रम्प वि. हिलरी असा फायनल सामना झाला तर हिलरी नक्कि कुठल्या मुद्द्यावर लढणार?
<<
गोल्डमन सॅक्स सारख्या गरीब वॉल स्ट्रीट वरील कंपन्यांचा हिलरीवर खूप विश्वास आहे. किडूकमिडूक गोळा करून त्यांनी हिलरीच्या उमेदवारीला मदत करण्यात खारीचा वाटा उचलला आहे. अशा तळागाळातील लोकांचे प्रातिनिधित्व ट्रंप काय डोंबल करणार? त्याकरता "पाहिजे जातीचे"! हिलरीला पर्याय नाही.
कमेंटच्या शेवटी स्माइली
कमेंटच्या शेवटी स्माइली टाकायला हात आखडता घेउ नका हो, उगाच गैरसमज होतो...
ट्रंपसाहेबांची घोडदौड चालूच
ट्रंपसाहेबांची घोडदौड चालूच आहे. नेवाडा खिशात घातले आहे.
एकंदरीत ह्या अश्वमेधाच्या घोड्याला कोणता रिपब्लिकन उमेदवार रोखणार हा प्रश्न कठिण होताना दिसत आहे. सगळ्या प्रकारच्या मतदार गटात ट्रंपशेठ आघाडी घेत आहेत.
तिकडे बर्नीबाबा मागे पडतात की काय असे वाटते आहे. डेमोक्रॅटिक पक्षात पैसेवाल्यांची चलती असते असे दिसते आहे.
महामंगळवार अर्थात सुपर ट्युस्डे जवळ येतो आहे!
I just had the "aha" moment
I just had the "aha" moment !! त्या स्टेजवरच्या सगळ्या लोकांमध्ये ट्रंप हा सगळ्यांत सेन्सिबल माणूस वाटला इस्राईल वरच्या उत्तरामध्ये. आणि इतरही फॉरेन स्ट्रॅटेजी प्रश्नांमध्ये ट्रंपचा निगोशिएटर बाणा आणि अमेरिकेकडे पैसे नाहीत आता जगाचा कैवारी बनण्याकरता हे सडेतोड उत्तर बरोबर वाटते.
मी स्वप्नातही विचार केला नसता पण आज त्या स्टेजवर ट्रंप हा चांगला कँडिडेट वाटत होता
कालच्या डिबेटात रुबियो, ट्रंप
कालच्या डिबेटात रुबियो, ट्रंप आणि क्रुझ यांची हातघाईची लढाई चालू होती. केसिक आणि विशेषतः आपले डॉक्टरसाहेब स्टेजवर असून नसल्यासारखे होते. डॉक्टरांनी मधे एकदा "कुणी तरी माझ्यावर टीका करा हो!" अशी आळवणी केली पण कुणी दाद दिली नाही.
त्या त्रिकूटाची भांडणे अगदी गंमतशीर होती. व्यक्तिगत हल्ले, डायलॉगबाजी ह्यांची रेलचेल होती.
ख्रिस्तीने रुबियोला त्याच्या पोपटपंचीवरून पकडले तसे रुबियोने ट्रंपला करायचा प्रयत्न केला.
रुबियो हातघाईची लढाई लढत होता
रुबियो हातघाईची लढाई लढत होता काल. क्रुझ हतबल वाटत होता. ट्रंप ला 'आठव, तु असं म्हणाला होतास, काय, असं तु कधीच म्हटलं नाहीस? अरे काय हे' टाईप्स चालु होतं त्याचं. रुबियो राजकीय वाद घालताना आंतरशालेय वाद-विवाद स्पर्धेत भाग घेतल्यासारखा वाटला.
>>त्या त्रिकूटाची भांडणे अगदी
>>त्या त्रिकूटाची भांडणे अगदी गंमतशीर होती
हो पण ही लोकं हा देश चालवणार? आय मीन कुठे थांबायचं हे आताच कळत नाही तर नंतर कसं होणार असं मला तरी ते "मीच शेवटपर्यंत बोलणार", टाइप प्रकरण पाहताना वाटत होतं. त्यांना माबोवरून "हेमाशेपो" कोड पाठवायला हवा
रुबियो केविलवाणा होत चालला
रुबियो केविलवाणा होत चालला आहे, रुबियोच्या राज्यात, ट्रंपने रुबियोवर २० पाॅइंटनी आघाडी घतलेली आहे. हे कारण त्याच्या हातघाई वर येण्याचं असु शकतं. फ्लोरीडात रुबियो हरला तर दॅट विल बि एंड आॅफ द रोड फॅर हिम...
"आयॅम नाॅट गोइंग टु पे फाॅर द एफिंग वाॅल" हा फुल्टाॅस फाॅक्सने काल ट्रंपला दिला होता. यावर ट्रंपची काय/कशी प्रतिक्रिया असेल हे पहायला मी पाॅपकाॅर्न घेउन बसलो होतो.
"द वाॅल जस्ट गाॅट १० फिट टाॅलर" वरच समाधान मानावं लागलं...
>> हो पण ही लोकं हा देश
>>
हो पण ही लोकं हा देश चालवणार? आय मीन कुठे थांबायचं हे आताच कळत नाही तर नंतर कसं होणार असं मला तरी ते "मीच शेवटपर्यंत बोलणार", टाइप प्रकरण पाहताना वाटत होतं. त्यांना माबोवरून "हेमाशेपो" कोड पाठवायला हवा
<<
मला वाटते असा विचार करण्यात अर्थ नाही. ज्या प्रकारची स्पर्धा आहे ते पाहून तशी तयारी करून आपले धोरण ठरवावे लागते. जेव्हा जाहीर वादविवाद असतो ती एक स्पर्धाच असते. परिस्थिती पाहून आपली कार्यपद्धती ठरवणे ह्यात राजकारणी लोक नक्कीच अनुभवी असतात. साम, दाम, भेद आणि दंड कुठे आणि कसे वापरायचे ते कळत नसेल तर नेता इतका पुढे जाणे अवघड आहे.
अशा प्रकारच्या जाहीर वादात कुणी मवाळ, दुबळा वाटला तर त्याला मिळणार्या मतांवर परिणाम होऊ शकतो. उलट अती आक्रमकपणाही घातक ठरू शकतो त्यामुळे ह्या दोन टोकांना न जाता आपला मुद्दा मांडण्याची तारेवरील कसरत सगळ्या आघाडीच्या उमेदवारांना करावीच लागते.
अमेरिका आणि मेक्सिकोमधली भिंत आता १० फूट जास्त उंच होईल हा ट्रंपचा डायलॉग लक्षात रहाणारा होता. खरोखर अशी भिंत बनेल असे वाटत नाही पण त्याचे बेकायदा घुसखोरीबद्दलचे आक्रमक धोरण सामान्य मतदाराला आवडते आणि लक्षात रहाते. बाकीची किचकट आकडेवारी तर्कशुद्ध मांडणी लक्षात रहात नाही.
जॉन केसिक गेल्या वेळेस रॉमनीऐवजी असता तर जास्त बरे झाले असते. ह्या वर्षी ट्रंप नामक वादळापुढे त्याचे सौम्य पण मुद्देसूद बोलणे फिके पडते आहे.
>> अशा प्रकारच्या जाहीर वादात
>> अशा प्रकारच्या जाहीर वादात कुणी मवाळ, दुबळा वाटला तर त्याला मिळणार्या मतांवर परिणाम होऊ शकतो.
म्हणजे डॉक्टर?
>> ह्या वर्षी ट्रंप नामक वादळापुढे त्याचे सौम्य पण मुद्देसूद बोलणे फिके पडते आहे.
त्या सर्व मुद्द्यांत सारखं सारखं मी बजेट बॅलन्स केलं, ओहायो मध्ये, वॉशिंग्टन मध्ये हे फारच रिपिटिटीव्ह वाटायला लागतं मला तरी .. हे जरा अजून जास्त एलिगंटली मांडायला आलं तर बरं होईल .. म्हणजे माइल्ड रेफरन्स टू हिज एक्स्पिरिअन्स बट फोकसिंग ऑन एक्झॅक्टली हाऊ ही प्लान्स टू डू इट नाऊ ..
कालचे डिबेट हुकले. आज क्लिप्स
कालचे डिबेट हुकले. आज क्लिप्स पाहतो. पण बातम्यांमधून क्रूज व रुबिओ ने ट्रम्प वर जोरदार हल्ला केला असे वाचले. ट्रम्प ने तो कितपत परतवला माहीत नाही. पण सेन्सिबल नाही, तर सेन्सलेस वाक्यांनी का होईना तो परतवला असेल अशीच शक्यता आहे
Pages