आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -१

Submitted by मानव पृथ्वीकर on 5 March, 2016 - 09:41

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गजानन, कृष्णा फार छान छान गाणी...>>>.

स्निग्धा, काही काही गाणी खरोखरी अप्रतिम असतात कायम मनाच्या कोपर्‍यात असलेली अशी.. त्या पैकी अभिषेकी बुवांचे रंध्रात पेरीली...

इश्श, मस्त ओळखलंत गाणं. ते ही क्लू शिवाय Happy

सावन की आयी बहार रे... कुणी ऐकलं नसेल तर नक्की ऐका. आशा भोसले आणि त्यांची कन्या वर्षा भोसले ह्यांनी एकत्र गायलं आहे. वर्षा भोसलेंचा आवाज अगदी आशाताईंच्या जातकुळीतला, दमदार ! मंगेशकरांच्या पुढच्या पिढीत वर्षा भोसले ह्या एकमेव प्रॉमिसिंग वाटत आल्या आहेत कायमच.
अवांतराबद्दल क्षमस्व.

अगो, नक्की ऐकतो. धन्यवाद.

वर्षा भोसले गात होत्या हे पहिल्यांदाच कळलं.

परवाच आशा भोसले यांची नात - जनाईची - कोणत्यातरी गाण्याच्या रेकॉर्डींगच्या वेळेची बातमी वाचायला मिळाली.

मॅगी, हो Sad

गजानन, जनाई सध्यातरी फार कच्ची वाटली गाण्यात. मंगेशकरांच्या इतर मुलांसारखंच तिचं कौतुक वाटतंय आत्ता.
वर्षा भोसलेंनी कुण्या राजानं राजानं गायलं आहे की जैत रे जैत मधलं. व्हिडियो भलताच आहे युट्युबवर. पण गाणं ऐकता येईल. मायलेकीचा आवाज वेगळा लगेच ओळखू येईल Happy

अगो, खरेच काय!! "कुण्या राजानं राजानं" हे गाणं त्यातल्या सुरेलपणामुळं माझं आवडतं आहे. पण त्यात वर्षा भोसले आहेत हे माहीत नव्हतं. ते हायलाईट केल्याबद्दल धन्यवाद. Happy

जनाईचं गाणं अजून काही ऐकलं नाही.

अगो, खरेच काय!! "कुण्या राजानं राजानं" हे गाणं त्यातल्या सुरेलपणामुळं माझं आवडतं आहे. पण त्यात वर्षा भोसले आहेत हे माहीत नव्हतं.>>>>>>गजाभाऊ, "संसार" चित्रपटात सुद्धा वर्षा भोसलेने सुरेश वाडकरांसोबत गायलेले गाणे आहे "गीत होऊनी आले सुख आले साजणा, स्वप्न कल्पनेत होते सूर ताल तेच झाले" आणि "हस तु हरदम खुशिया या गम" हे "लूटमार" मधलं गाणं सुद्धा त्यांनीच गायलं आहे. :-). पहिलं गाण पाहिजे असेल तर व्हॉट्सअप कर Wink

वर्षा भोसलेंचा आवाज अगदी आशाताईंच्या जातकुळीतला, दमदार ! मंगेशकरांच्या पुढच्या पिढीत वर्षा भोसले ह्या एकमेव प्रॉमिसिंग वाटत आल्या आहेत कायमच.>>>>>>अगो +१०००००० Happy

अवांतराबद्दल क्षमस्व.

गाण्याचाच धागा आहे हा. त्याबद्दलची चर्चा अवांतर नाही. चांगली माहिती मिळतेय.

मी 'घुमूदे' हा एक शब्द धरला होता. चुकल का काही ? अरेरे >>>>

ओके. घुमु दे वेगळे असावे असे वाटते, असो. इट्स ओके!.
क्लु दिल्यावर तर सोपेच झाले.

काही काही शब्द एकत्र की वेगळे यात दुमत असु शकते. एवढे चालायचेच.
मी दिलेल्या वरच्या गाण्यात सुद्धा कदाचित असे होऊ शकते.

Pages