हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
१५२: स ग म म म म ग क प प त प
१५२:
स ग म म म म
ग क प प त प ख
मराठी
मला हे 'वेळ झाली घरमाश्यानं,
मला हे 'वेळ झाली घरमाश्यानं, माझ्यावर कळ ठेवुन' असे वाटायचे
१५२ स ग म म म म ग क प प त प
१५२
स ग म म म म
ग क प प त प ख
सखी गं मुरलीमोहन मोही मना
गाऊ किती पुन्हा पुन्हा त्याच्या गुणा
अक्षरे चुकलीत का माझे उत्तर?
१५२ सखी ग, मुरली मोहन मोही
१५२
सखी ग, मुरली मोहन मोही मना
गाऊ किती पुन्हापुन्हा, त्याच्या गुणा
ते शेवट्च प ख जमत नाहीये
सॉरी लोक्स, तुमची उत्तरं
सॉरी लोक्स,
तुमची उत्तरं बरोबर आहेत, अक्षरं चुकलीयेत.
१५३ स ह स स न म ज ह क क ख ह क
१५३
स ह स स न म ज ह
क क ख ह क ह
ह द द म ज ह
हिन्दी
१५३ समा है सुहाना सुहाना
१५३
समा है सुहाना सुहाना नशेमें जहां है
किसी को किसी की खबर भी कहां है
हर दिल में देखो मोहोब्बत जवां है
१५४ घ अ क घ म घ अ क घ म स क अ
१५४
घ अ क घ म
घ अ क घ म
स क अ ब र
हिंदी
कुलु द्या काही तरी..
कुलु द्या काही तरी..
१५४: घिर आयी कारी घटा
१५४:
घिर आयी कारी घटा मतवारी
घिर आयी कारी घटा मतवारी
सावन की आयी बहार रे
इश्श, जबरीच! तुम्ही सुद्धा
इश्श, जबरीच! तुम्ही सुद्धा महारथी आहात. _/\_
धन्यवाद मानव. कधी कधी कठीण
कधी कधी कठीण गाणं लगेच ओळखता येतं पण सोप्पं गाणं आठवता आठवत नाही.
१५५: घ ड घ क स प न न र मराठी
१५५:
घ ड घ क
स प न न र
मराठी
१५५. घट डोईवर घट कमरेवर सोडी
१५५.
घट डोईवर घट कमरेवर
सोडी पदरा नंदलाला रे, नंदलाला
१५५ घट डोईवर, घट कमरेवर सोडी
१५५
घट डोईवर, घट कमरेवर
सोडी पदरा नंदलाला, नंदलाला रे
१५६. मराठी ग स र त त च क ह स
१५६.
मराठी
ग स र त त च
क ह स श य य ज
दादा, मराठी का हिंदी?
दादा, मराठी का हिंदी?
ओ! सॉरी. ते विसरलोच लिहायचे.
ओ! सॉरी. ते विसरलोच लिहायचे.
१५६ गर्द सभोंती रानसाजणी तू
१५६
गर्द सभोंती रानसाजणी तू तर चाफेकळी
काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी
१५७. मराठी स य ग स स स ज स
१५७. मराठी
स य ग स स
स ज स
१५७. सांज ये गोकुळी सावळी
१५७.
सांज ये गोकुळी सावळी सावली
सावळ्याची जणू सावली.
१५८. मराठी य च प फ घ अ ज त
१५८.
मराठी
य च प फ
घ अ ज त
गजानन भाऊ जोमात
गजानन भाऊ जोमात
१५८. मराठी य च प फ घ अ ज त या
१५८.
मराठी
य च प फ
घ अ ज त
या चिमण्यानो परत फिरा
घराकडे आपुल्या
जाहल्या तिन्हीसांजा
१५८ या चिमण्यांनो परत फिरा
१५८
या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या
१५९. मराठी र प म अ द ग अ स उ
१५९.
मराठी
र प म अ द ग
अ स उ घ क
१५९ रंध्रात पेरिली मी आषाढ
१५९
रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी
उन्मादल्या सरींची उमजून घे कहाणी
वॉव सुपरफास्ट हं
वॉव सुपरफास्ट हं स्निग्धा.
एका F5 मध्ये कोडं आणि उत्तर पण.
गजानन, कृष्णा फार छान छान
गजानन, कृष्णा फार छान छान गाणी..... आता घरी जाईपर्यंत कदाचित रात्री उशीरापर्यंत डोक्यात घोळत राहातील आता
१६०. मराठी घ घ घ र प व द अ श
१६०. मराठी
घ घ घ र प व द
अ श श ग म ल द
Pages