हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
कृष्णा ...द्या पुढचे कोडे
कृष्णा ...द्या पुढचे कोडे आता.
मानव, हिंदीमध्ये किसको असे न
मानव, हिंदीमध्ये
किसको असे न लिहिता किस को;
तुमको --> तुम को
हमको --> हम को
तुमसे --> तुम से
असे लिहितात. तेंव्हा तसे त्यानुसार को, से, का इ. साठी वेगळे अक्षर देण्यात यावे अशा अर्थाचा एक नियम वर घालता येईल का?
१६८ हिंदी अ स म स ब ग स ब क
१६८
हिंदी
अ स म स ब ग
स ब क त ग
य स म द य ब म द
ज ग क ल क
कुलु हवा असेल तर सांगा
कुलु हवा असेल तर सांगा
गजानन, हो हिंदीत विभक्ती
गजानन, हो हिंदीत विभक्ती वेगळी लिहिली जाते.
तसा नियम करता येईल,
पण त्यांचा गाणे ओळखायला कितीसा उपयोग होतो?
सगळेच तो नियम वाचतील असे नाही.
तेव्हा विभक्ती वेगळी लिहिले असेल अथवा नसेलही असे दोन्ही गृहीत धरावे लागेल.
हिंदीत विभक्ती वेगळी
हिंदीत विभक्ती वेगळी लिहिण्याचा नियम घातला आहे.
कृपया यापुढे नोंद घ्यावी.
कृष्णा, द्या क्लु.
कृष्णा, द्या क्लु.
बहुदा ह्या दादासाहेब फाळके
बहुदा ह्या दादासाहेब फाळके विजेत्या अभिनेत्यासाठी ह्या गायकाने क्वचितच गाणे गायलयं कदाचित हे एकमेव! अजुन काही कुणाला ठाऊक असतील तर आवडेल ऐकायल पहायला!
मानवा, सगळे पत्ते ओपन केले आता! सोप्पे झाले!
अरेच्चा! शांत इथे सर्वजण!!
अरेच्चा! शांत इथे सर्वजण!! ???
लिहु का गाणे मीच??
आज सुटीवर का सगळे?
आज सुटीवर का सगळे?
क्लिक होत नाहीय. अजून क्लुज
क्लिक होत नाहीय.
अजून क्लुज देत जावा, सुटे पर्यंत.
कधी कधी असे होते, तेव्हा मी तेच करतो.
आत क्ल्यु द्यायचा म्हणजे गाणे
आत क्ल्यु द्यायचा म्हणजे गाणे सांगितल्या सारखेच!
ह्या अभिनेत्याला दादासाहेब अवॉर्ड २० एक वर्षापुर्वी मिळालेले. नुकतेक अजुन एक राष्ट्रिय अवॉर्ड मिळाले....
माझ पास.
माझ पास.
माझ पास.>>>> एखादा अंदाज तरी?
माझ पास.>>>>
एखादा अंदाज तरी?
दिलीप कुमार व्यतिरिक्त कसलाही
दिलीप कुमार व्यतिरिक्त कसलाही अंदाज नाही:( गायक कळला नाही.
हा अंदाज बरोबर!
हा अंदाज बरोबर!
फोडा गाणं.
फोडा गाणं.
168 अरे साला मैतो साब बन
168
अरे साला मैतो साब बन गया
साब बनके कैसा तन गया
ये सूट मेरा देखो
ये बूट मेरा देखो
जैसे गोरा कोई लंडन का
ओह! मस्त साधना यात सुरवातीला
ओह! मस्त साधना
यात सुरवातीला अरे आहे हे लक्षातच नव्हते.
साधना, भारी!!!
साधना, भारी!!!
किशोर कुमार यांनी दिलीप कुमार
किशोर कुमार यांनी दिलीप कुमार साठी बहुदा एवढेच एक गाणे गायलंय. अजून कुठले आहे का कुणाला ठाऊक??
१६९ हिंदी स म स ह अ अ म अ छ
१६९ हिंदी
स म स ह अ अ म अ छ ह
य अ त द स ह त क ल अ ह
(नोंद: नविन नियमाप्रमाणे हिंदी विभक्ती वेगळे आद्याक्षर म्हणुन दिल्या आहेत).
१६९. सीने में सुलगते हैं
१६९.
सीने में सुलगते हैं अरमान
आँखों में उदासी छायी हैं
ये आज तेरी दुनियाँ से हमें
तकदीर कहा ले आई हैं
अरे वा कृष्णा, जबरी, कसल्याही
अरे वा कृष्णा, जबरी, कसल्याही क्लु शिवाय
पुढची आद्याक्षरे द्या की.
१७०. अ म द क च च अ म द क द
१७०.
अ म द क च
च अ म द क द क
हिंदी
१७० ए मेरे दिल के चैन चैन आये
१७०
ए मेरे दिल के चैन
चैन आये मेरे दिल को दुआ किजीये
वा! एकदम बरोबर! सुरुवात फक्त
वा!
एकदम बरोबर!
सुरुवात फक्त 'ए' ऐवजी 'ओ' आहे!
१७१: अ भ ज न त प भ ज न त ज भ
१७१:
अ भ ज न त
प भ ज न त
ज भ ह ब य अ प ह
हिंदी
आगे भी जाने ना तू पिछे भी
आगे भी जाने ना तू
पिछे भी जाने ना तू
जो भी है बस यही एक पल है
कृष्णा...हो, ते नंतर लक्षात
कृष्णा...हो, ते नंतर लक्षात आलं पण एडिट करायचा कंटाळा केला :ड
Pages