.
.
ऋन्मेषचा धागा बघताच शाहरुख खान चाच विषय असणार या गृहीतकावर चटकन पोहोचलेल्यांसाठी खास हा वरचा बॅनर..
सलमान खान,
‘मैने प्यार किया’ पासूनच ज्याच्या मी प्रेमात पडलो ते ‘मैने प्यार क्यू किया’ पर्यंत आणि त्याच्याही पुढे आजतागायत पडलेलोच आहे. याला कारणीभूत सलमानचा अभिनय, दिसणे, डोल्लेशोल्ले आणि स्टाईल तर आहेच पण त्याहीउपर जाऊन त्याची ‘बॉलीवूडचा दानशूर कर्ण’ अशी असलेली इमेज. लोक त्याच्यावर प्रेमच नाही करत तर मानतात त्याला. जेव्हा एखादा बिगबजेट, बड्या बॅनरचा, भलीमोठी स्टारकास्ट असलेला चित्रपट १०० कोटीच्या घरात गेल्याचा आनंद साजरा करत असतो, तेव्हा आपला सल्लू एखाद्या सौथेंडियन डब केलेल्या बी ग्रेड सिनेमावर २०० कोटी मिळवून जिममध्ये चुपचाप व्यायाम करत बसला असतो.
फक्त नावावर आणि पडद्यावरच्या आपल्या सहज वावरावर बॉक्स ऑफिस हिट करून सोडणारा दुसरा स्टार नसावा बॉलीवूडमध्ये. आणि हे शक्य तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही जनमानसात प्रचंड लोकप्रिय असता. आणि तो ते आहे हे वेगळे सांगायला नकोच. म्हणूनच त्याचे लग्न हि देखील त्याची खाजगी बाब न राहता ती एक राष्ट्रीय समस्या बनते. त्याने ते करूच नये असेच कित्येक तरूणींना वाटते. त्याच्या शर्ट काढत उघडे होण्यातही लोकांना अश्लीलता न दिसता लोक त्याच्या बॉडीवर फिदा होतात. त्याच्या चाहत्यांमध्ये मग स्त्री-पुरुष भेदही मिटतात. सर्वच वयोगटाचे आणि जातीधर्माचे लोक त्याच्यावर निस्सीम प्रेम करतात.
त्याचमुळे जेव्हा जेव्हा त्याच्या शिकार प्रकरणाचे, बेताल वागण्याचे, ऐश्वर्या प्रेमप्रकरणात मद्यप्राशन करत दंगा घालण्याचे किस्से चवीने रंगवले जातात, तेव्हा तेव्हा ‘सल्लू तुने ये क्यू किया’ असे नेहमी मनात येते. जेव्हा त्याच्या फूटपाथवासीयांना चिरडण्याच्या ‘हिट अॅण्ड रन’ केसबद्दल पहिल्यांदा ऐकले तेव्हा कानावर विश्वासच बसला नाही. सलमान हा राजश्री प्रॉडक्शनचा प्रेम होता आणि या प्रेमावर आमचा विश्वास होता. आमचा सल्लू कुठलेही बेजबाबदार आणि गैर कृत्य करूच शकत नाही, हा तो विश्वास!
.... आणि आज अचानक एवढे दिवस ती केस कोर्टात रखडल्यानंतर एक असे सत्य सामोरे आले की आम्हा सर्व चाहत्यांचा आजवरचा विश्वास सार्थ झाला आहे. नव्हे, सलमानबद्दलचा आदर एकंदरीतच दुणावला आहे. गाडी सलमान चालवत नसून त्याचा ड्रायव्हर चालवत होता. हे सत्य आज अखेरीस सलमानने कबूल केले आहे आणि तशी ग्वाही त्याच्या ड्रायव्हरने देखील दिली आहे.
आजवर ऐकले होते की नमकहलाल नोकर असतात जे खाल्या मीठाला जागायला मालकाचा गुन्हा आपल्या शिरावर घेतात. पण आज समजले की एवढे दिवस सलमानने आपल्या गरीब ड्रायव्हरला वाचवायला त्याचा गुन्हा आपल्या नावावर घेतला होता. कारण सलमानला माहीत होते की तो गरीब बिचारा ड्रायव्हर जर यात अडकला असता तर त्याचे आयुष्य उध्वस्त झाले असते, त्याच्या बायकापोरांचे हाल झाले असते. पण हाच गुन्हा जर आपण आपल्या नावावर घेतला तर आपण सेलिब्रेटी असल्याने आणि आपल्या देशातील कायदे सेलिब्रेटींना झुकते माप देत असल्याने आपण कदाचित तारून जाऊ. आणि तेच झाले..
आपल्या नोकरासाठी असा त्याग करणारा हा मालक, असा हा बॉलीवूडचा रिअल सुपर्रस्टार, विरळाच!
जर सैफ अली खानला पद्मश्री पुरस्कार मिळू शकतो, तर सलमान खान नक्कीच भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा हकदार बनतो.
तो पुरस्कार त्याला द्यावा की नाही यावर मी लवकरच वेगळा पोल काढेन,
पण तुर्तास आपल्या सल्लूभाईला तीन तोफांची सलामी !!!
ओहह खान तुस्सी ग्रेट हो !!!
सत्यमेव जयते !! जय हिंद !!!
- ऋन्मेऽऽष
सलमान खानचे आवडते गाणे कोणते
सलमान खानचे आवडते गाणे कोणते ?
" गं बाई मी पतंग उडवित होते गं बाई मी पतंग उड्वित होते"
तुमचे लग्न २००२ साली झाले
तुमचे लग्न २००२ साली झाले असल्यास तुम्ही सुध्दा निर्दोष सुटू शकतात.
एक प्रयत्न करून बघा
साती.. अगदी सहमत. काळवीटाचा
साती.. अगदी सहमत. काळवीटाचा खटला तरी का चालवायचा आता ?
जयललिता पण अशीच सुटली आणि आता सुनबाई पण सुटतील !
तो सायनी आहुजा पण असाच सुटला
तो सायनी आहुजा पण असाच सुटला ना..
माझा ह्या देशावरील विश्वास
माझा ह्या देशावरील विश्वास दृढ झाला
नशिब नाहीतर पाकिस्तानात
नशिब नाहीतर पाकिस्तानात पाठवले असते
कारमधे डिझेल ऐवजी दारू टाकली
कारमधे डिझेल ऐवजी दारू टाकली असेल असे मला ठामपणे वाटत आहे. म्हणूनच ती झिंगत चालत होती.
भाईको अगर गलतीसे सजा हो जाती
भाईको अगर गलतीसे सजा हो जाती तो मेरा पैसेसे विश्वास उठ जाता!
द होल थिंग इस दैट के भैया सबसे बडा रुपय्या!
अवै, सहमत!
अवै, सहमत!
हीच सलमानची कार असावी.
हीच सलमानची कार असावी. माझ्याकडे हिच्या विरुध्द पुरावे म्हणून अख्खा चित्रपटच आहे.
People get VERDICT in Courts
People get VERDICT in Courts , NOT JUSTICE !
न्यायालयात निकाल मिळतो , न्याय नव्हे !!!
Very good decision
Very good decision ......sabse bada rupayya * tech khare .....paise bharun kes firavli nasel kashavarn ....chala Ata sagle RICH lok drink karun drive karayla n garibana marayla mokle.
साती +१. अगदी वाईट झाले.
साती +१. अगदी वाईट झाले.
न्यायालयात निकाल मिळतो , न्याय नव्हे !!! >> कात्रे सहमत.
सलमान सुटलाय तो पैश्याच्या जोरावर पण या घटनेला काहीजण उगाचच धर्माचा संबंध जोडत आहेत ते जास्त चीड आणणारे आहे.
साती सहमत... न्याय
साती सहमत...
न्याय सर्वान्नाच सारखा मिळत नसतो काहीन्साठी तो वेगळा असतो. पैशाच्या जोरावर तुम्ही काय वाट्टेल ते करु शकता असे वाटायला लागले आहे... नैराश्य आहे.
हम्म्म.
हम्म्म.
I remember nandini once wrote
I remember nandini once wrote that Salman will not be convicted in this case but that hunting case. I'm waiting for next result.
काँग्रेस असती तर .... लिंब्या
काँग्रेस असती तर ....
लिंब्या :
काँग्रेसमुळे अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन होऊन तो मोघलांप्रमाणे उन्मत्त झाला आहे. ब्रिगेडीही या प्रकरणात त्याना खाण्याजोगे काही नसल्याने गप्प आहेत. हिंदु सहृद्ञ प्रजेवरचे हे संकट आता सनातनच्या नामस्मरणानेच टळेल.
मंदार जोशी :
ही अफजलखानी हिरवी औलाद भर रस्त्यावर आम हिंदुंचे प्राण घेते आणि दाउदच्या या हस्तकांचे सिनेमे आपण खुशाल पहातो. महाराजांची व पेशव्यांची आण आहे आम्हाला आम्ही खानावळीचे शिनेमे बघणार नाही.
बेफिकिर :
सरळ रस्ता असताना तो सोडून फूटपाथावर गाडी नेणे हा साक्षात वृत्तभंग आहे. दारुडा मनुष्य हा रदीफ असल्याने त्याने ड्रायव्हरच्या जागी एकटेच बसून ड्राइव्ह करु नये. दारु न प्यालेला एखादा ड्रायव्हर म्हणजेच काफिया असल्याशिवाय अशी गाडी म्हणजे उंट चालवु देऊ नये
साती + १
साती + १
मला वाटते जेव्हा हा धागा आला
मला वाटते जेव्हा हा धागा आला त्या बातमीतच त्याचे सुटायचे संकेत होते, आता बस्स औपचारीकता पुर्ण झाली.
आणि हो, प्रॅक्टीकली विचार केला तर सलमान हा सेलिब्रेटी असल्याने केस चर्चेत होती ईतकेच, अन्यथा देशभरात कित्येक हिट अँड रन केसेस घडत असतील ज्यात वाहन चालक कोणी बडी असामी आहे की साधारण ट्रक ड्रायव्हर आहे तसेच मृत व्यक्तींची काही पोहोच आहे की ते सामान्यजनच आहेत, यावरून निकाल ठरत असतील, जे कधी आपल्यापर्यंत पोहोचतही नसतील.
श्रीमंत माणसांनी कधी जेल भरत नाहीत हे आपण स्विकारलेले एक सत्य आहे. त्यामुळे कोणाची उत्स्फुर्त संतापाची प्रतिक्रिया आली तरी हे धक्कादायक नसावे.. किंबहुना त्याला शिक्षा झाली अशी बातमी आली असती तर कदाचित आपण हायला खरंच का म्हणत रिअॅक्ट झालो असतो ..
किंबहुना त्याला शिक्षा झाली
किंबहुना त्याला शिक्षा झाली अशी बातमी आली असती तर कदाचित आपण हायला खरंच का म्हणत रिअॅक्ट झालो असतो ..>> सहमत !
योगायोग म्हणजे आज जागतिक मानवाधिकार दिवस आहे!
शेम ऑन यू. यू म्हणजे
शेम ऑन यू.
यू म्हणजे न्यायव्यवस्था, यू म्हणजे पैशाने खरेदी करता येणारी यंत्रणा, यू म्हणजे रुन्मेश सारखे अंध फँन्स!
शी! होपलेस!
खरं काय आहे ते सगळ्या जगाला
खरं काय आहे ते सगळ्या जगाला माहित आहे. आमच्या ऑस्ट्रेलियातले पेपरने पण कुत्सितपणे ही बातमी पहिल्या पानावर दिली. लाज वाटली आपल्या न्यायव्यवस्थेची.
प्लीज, कोर्टास काही म्हणू
प्लीज, कोर्टास काही म्हणू नका. तपासयंत्रणेने तपास नीट केला नाही तर कोर्ट काहीही करू शकत नाही. त्यात रवींद्र पाटलांनी कैकदा साक्ष फिरवली, असे हायकोर्टाने नमूद केले.
तेव्हा, हे आपले दुर्दैव असे समजून चला
इट्स नॉट जॉन्नी एलएलबी.
<<<<<<<<यू म्हणजे रुन्मेश
<<<<<<<<यू म्हणजे रुन्मेश सारखे अंध फँन्स!>>>>>>>>>>>
रुन्मेश आणि "शेम" ह्यांचा एकमेकांशी संबंध काय?
त्याला स्वप्नील जोशी प्रचंड आवडतो, बर आवडतो तर आवडतो, पण इतकी लाजीरवाणी गोष्ट एखादा माणुस लपवुन ठेवेल ना. पण रुंमेश मात्र ते सर्वांसमोर सांगतो., त्यामुळे त्याचा "शेम" शी थोडातरी संबंध असू शकेल का?
न्यायालयात निकाल मिळतो ,
न्यायालयात निकाल मिळतो , न्याय नव्हे !!! >> कात्रे सहमत
भाऊ, ऋन्मेषने वरचा लेख
भाऊ, ऋन्मेषने वरचा लेख सार्कॅस्टिकली लिहिला आहे.
हे तरी समजून घ्या.
<शेम ऑन
<शेम ऑन यू.
..................... यू म्हणजे रुन्मेश सारखे अंध फँन्स!>
अंध वाचक अशी नवी कॅटेगरी निघालीय वाटतं.
काल इंडिया टिव्हीवर सलमान
काल इंडिया टिव्हीवर सलमान खानची आपकी अदालत मधले काही शॉट्स दाखवत होते. त्यात सत्य बाहेर आले.
खरच न्याय आंधळा असतो.
थोड्यावेळेत लिहितो
न्यायालयात निकाल मिळतो ,
न्यायालयात निकाल मिळतो , न्याय नव्हे !!!>>>>>>+११११.....
छान उपरोधात्मक लेख>>>>>>
हा लेख उपरोधात्मकच आहे ना नक्की?? मी अजूनही संभ्रमात आहे.
मला या आमिर आणि सलमान खान दोन लोकांच आश्चर्य वाट्त!
ह्यांनी काहीही केल ना तरी सगळे त्यांचे सिनेमे थिएटर मध्ये जाउन पाहतातच.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=8Uqk23DvYjA
इथे सलमान खान स्वतः म्हणतोय मी आणि कमाल मागे बसलेलो ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि बाजुला हवालदार बसलेला.
आता ड्रायव्हर शेजारी बसून कोणी झोपेल का?
सलमानच्या बाजुचा दरवाजा लॉक झाला असेल तर त्याने कमाल खानच्या बाजुने उतरायला हवे होते?
ड्रायव्हरच्या दरवाजातून का बाहेर पडला?
कमाल खान सुध्दा ड्रायव्हरच्या बाजुने उतरला का?
जर तो ड्रायव्हरच्या शेजारी बसला असेल तरच तो ड्राय्व्हरच्या बाजूने उतरणार.
ज्याने स्वतःहून तक्रार केली त्याचे म्हणणे कुठल्या आधाराने गृहित धरले नाही.? हे कुठे ही स्पष्ट झाले नाही.
सलमानखान टायर फुटलेले असा खोटे बोलला हे सिध्द झाले यावर त्याला २५००० रुपये दंड लावला उलट तपासणी झाली नाही याची जवाबदारी कुणाची ती का केली नाही यावर काय अॅक्शन घेण्यात आली?
कधी म्हणतात हवालदार मागे बसलेला झोपलेला उठल्यावर मी त्याबाजूने उतरताना बघितले म्हणून बोलत असेल. जर असे असेल तर हवालदार ३ लोक गाडीत होती असे ही म्हणालेला. जर ड्रायव्हर गाडीत असेल तर तो तीनच लोक का म्हणेल ?
या प्रश्नाची उत्तरे कधीच मिळणार नाही
Pages