भाई निर्दोष सुटले !! ओह खान तुस्सी ग्रेट हो !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 March, 2015 - 12:31

.

"" खानो मे खान, सलमान खान !! ""

.

ऋन्मेषचा धागा बघताच शाहरुख खान चाच विषय असणार या गृहीतकावर चटकन पोहोचलेल्यांसाठी खास हा वरचा बॅनर..

सलमान खान,
‘मैने प्यार किया’ पासूनच ज्याच्या मी प्रेमात पडलो ते ‘मैने प्यार क्यू किया’ पर्यंत आणि त्याच्याही पुढे आजतागायत पडलेलोच आहे. याला कारणीभूत सलमानचा अभिनय, दिसणे, डोल्लेशोल्ले आणि स्टाईल तर आहेच पण त्याहीउपर जाऊन त्याची ‘बॉलीवूडचा दानशूर कर्ण’ अशी असलेली इमेज. लोक त्याच्यावर प्रेमच नाही करत तर मानतात त्याला. जेव्हा एखादा बिगबजेट, बड्या बॅनरचा, भलीमोठी स्टारकास्ट असलेला चित्रपट १०० कोटीच्या घरात गेल्याचा आनंद साजरा करत असतो, तेव्हा आपला सल्लू एखाद्या सौथेंडियन डब केलेल्या बी ग्रेड सिनेमावर २०० कोटी मिळवून जिममध्ये चुपचाप व्यायाम करत बसला असतो.

फक्त नावावर आणि पडद्यावरच्या आपल्या सहज वावरावर बॉक्स ऑफिस हिट करून सोडणारा दुसरा स्टार नसावा बॉलीवूडमध्ये. आणि हे शक्य तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही जनमानसात प्रचंड लोकप्रिय असता. आणि तो ते आहे हे वेगळे सांगायला नकोच. म्हणूनच त्याचे लग्न हि देखील त्याची खाजगी बाब न राहता ती एक राष्ट्रीय समस्या बनते. त्याने ते करूच नये असेच कित्येक तरूणींना वाटते. त्याच्या शर्ट काढत उघडे होण्यातही लोकांना अश्लीलता न दिसता लोक त्याच्या बॉडीवर फिदा होतात. त्याच्या चाहत्यांमध्ये मग स्त्री-पुरुष भेदही मिटतात. सर्वच वयोगटाचे आणि जातीधर्माचे लोक त्याच्यावर निस्सीम प्रेम करतात.

त्याचमुळे जेव्हा जेव्हा त्याच्या शिकार प्रकरणाचे, बेताल वागण्याचे, ऐश्वर्या प्रेमप्रकरणात मद्यप्राशन करत दंगा घालण्याचे किस्से चवीने रंगवले जातात, तेव्हा तेव्हा ‘सल्लू तुने ये क्यू किया’ असे नेहमी मनात येते. जेव्हा त्याच्या फूटपाथवासीयांना चिरडण्याच्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ केसबद्दल पहिल्यांदा ऐकले तेव्हा कानावर विश्वासच बसला नाही. सलमान हा राजश्री प्रॉडक्शनचा प्रेम होता आणि या प्रेमावर आमचा विश्वास होता. आमचा सल्लू कुठलेही बेजबाबदार आणि गैर कृत्य करूच शकत नाही, हा तो विश्वास!

.... आणि आज अचानक एवढे दिवस ती केस कोर्टात रखडल्यानंतर एक असे सत्य सामोरे आले की आम्हा सर्व चाहत्यांचा आजवरचा विश्वास सार्थ झाला आहे. नव्हे, सलमानबद्दलचा आदर एकंदरीतच दुणावला आहे. गाडी सलमान चालवत नसून त्याचा ड्रायव्हर चालवत होता. हे सत्य आज अखेरीस सलमानने कबूल केले आहे आणि तशी ग्वाही त्याच्या ड्रायव्हरने देखील दिली आहे.

आजवर ऐकले होते की नमकहलाल नोकर असतात जे खाल्या मीठाला जागायला मालकाचा गुन्हा आपल्या शिरावर घेतात. पण आज समजले की एवढे दिवस सलमानने आपल्या गरीब ड्रायव्हरला वाचवायला त्याचा गुन्हा आपल्या नावावर घेतला होता. कारण सलमानला माहीत होते की तो गरीब बिचारा ड्रायव्हर जर यात अडकला असता तर त्याचे आयुष्य उध्वस्त झाले असते, त्याच्या बायकापोरांचे हाल झाले असते. पण हाच गुन्हा जर आपण आपल्या नावावर घेतला तर आपण सेलिब्रेटी असल्याने आणि आपल्या देशातील कायदे सेलिब्रेटींना झुकते माप देत असल्याने आपण कदाचित तारून जाऊ. आणि तेच झाले..

आपल्या नोकरासाठी असा त्याग करणारा हा मालक, असा हा बॉलीवूडचा रिअल सुपर्रस्टार, विरळाच!
जर सैफ अली खानला पद्मश्री पुरस्कार मिळू शकतो, तर सलमान खान नक्कीच भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा हकदार बनतो.
तो पुरस्कार त्याला द्यावा की नाही यावर मी लवकरच वेगळा पोल काढेन,
पण तुर्तास आपल्या सल्लूभाईला तीन तोफांची सलामी !!!
ओहह खान तुस्सी ग्रेट हो !!!

सत्यमेव जयते !! जय हिंद !!!

- ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेषला अंध वगैरे म्हणणार्‍यांनो किमान उपरोध तरी समजून घ्या.
तो नेहमीच दोषी नसतो

लेखात उपरोध नाहीये असे समजा, काही हरकत नाही.

आपले काम लिहायचे, कोणाला शंका वाटल्यास क्लीअर करायचे, पण त्यानंतर कोणी काय समजायचे हा ज्याचा त्याचा हक्क आहे आणि लिहिणार्‍याने याचा सन्मान केला पाहिजे. Happy

काही काही लोकांना 'कधीच' उपरोध कळत नाही, कधी कधी सांगूनही कळत नाही, त्याला काय करणार?
>> मयेकर मग माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. याच धाग्याकर्त्याला "नहमीच" हे सांगायची वेळ का येते की हा लेख / प्रतिसाद उपरोधिक होता?
आत वाचणारा मी एकटाच असेल तर तुमचे बरोबर आहे. पण तसे नाही आहे.

ऋन्मेशचे मन मोठे आहे नुसते भाषणबाजीच करायची . विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची नाही धागा सोडून मधूनच निघून जायचे असे फक्त एकच व्यक्ती करतो आंणि तो ऋन्मेष नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. Wink

मयेकर. ही केस आधीपासूनच टेक्निकली फार वीक होती. त्याचे नमुने आधीपासून पहायला मिळत होतेच. पण काळवीट केसमध्ये त्याला शिक्षा नक्की होणार. आमेन.

सलमान निर्दोष सुटला कारण सरकारी तपासव्यवस्थेनं बरेच घोळ घातलेत. ते तसे का घातलेत यात मला शिरायचं नाही, पण आज ज्यांना न्यायव्यवस्थेचा अपमान आणि चीड आणि बरंच काही काही झालेलं वाटत आहे अशांपैकी प्रत्येकानं थोडेफार पैसे घालून पीडीतांसाठी एखादा तगडा वकील नेमला असता तर... कदाचित चित्र वेगळे असते का? पीडीत गरीब होते म्हणून त्यांना न्याय मिळाला नाही यएजाशी जास्त भयप्रद ते एकाकी पडले म्हनून त्यांना न्याय मिळाला नाही! असे एकाकी पडनारे पीडीत जेव्हा समोर सलमान खान असतो तेव्हा (सेलीब्रीटी) तेव्हा मीडीया किमान लक्ष तरी घालतं अन्यथा गडकर आणि अंबानी केसचं नक्की काय चालू आहे ते कळणारसुद्धा नाही.

(ता. क. सलमान खान माझा आवडता स्टार आहे. पण त्याच्या कुठल्याही गुन्हेगारी वर्तनाचं मी समर्थन करत नाही. करणार नाही, पण म्हणून तो माझा नावडता स्टारदेखील होणार नाही. माझ्या दृष्टीनं दोन्ही गोष्टी भिन्न आहेत.)

बहुतेक आम्ही सरकारला पिडितांच्या वतीने तगडा वकील द्यायलाच टॅक्स किंवा इतर रूपाने पैसे दिलेले असतात.
सरकार फक्त कसाब, दाऊद, गवळी यांच्या विरुद्धच तगडे वकील देण्याकरिता नेमलेले नसते.

उद्या कुठल्याही सरकारने न केलेल्या किंवा चुकीच्या केलेल्या गोष्टीवर टिका केली की 'मग तेव्हाच तुम्ही काँट्री काढून हे काम नीट का नाही केलं ' असा युक्तीवाद होईल.
जो फार घातक आहे.
म्हणजे हे सगळं सामान्य लोकांनी करायचं तर सरकारने काय करायचं?

आज लोकसत्ता आणि इंडियन एक्स्प्रेस यांनी ५-६ मुद्द्यांवर सेशन्स कोर्ट आणि हायकोर्टाने घेतलेल्या वेगवेग़ळ्या भूमिकां यांचा तुलनात्मक तक्ता (!) मांडला आहे. ते वाचल्यावर बोलण्यासारखं काही राहत नाही. अगदी तपासयंत्रणेनं घातलेला घोळ लक्षात घेतला तरी.
--------------
वर नंदिनी म्हणताहेत त्या सेलिब्रिटी असल्याने मीडियाने लक्ष देण्याबाबतच्या मुद्दयाला अनुमोदन. सलमानखानला मागच्या वेळी शिक्षा सुनावली गेली पण काही तासात जामीन मिळाला त्यावरून तावातावाने दोन-तीन दिवस व्हॉट्सॅप भरून टाकणारा एक परिचित जान्हवी गडकर प्रकरणी काय म्हणाला असेल? :जान्हवी गडकरच्या मोटारीत एअर बॅग्ज इत्यादी सुरक्षायंत्रणा होत्या. त्या टॅक्सीत नव्हत्या. यावरून मोटारीत अशा सुरक्षायंत्रणा असणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं." गडकरबाईसुद्धा दारू पिऊन आणि तेही चुकीच्या दिशेने मोटार चालवत होत्या हे त्याच्या गावीही नव्हतं.

गंमत म्हणजे त्याचं आणि गडकरबाईंचं प्रोफेशन एकच : लॉयर.( सबफील्ड्स वेगळी)
---------
काल एन्डीटीव्हीवर शायना एन्सी म्हणाल्या : या तेरा वर्षांत सलमाननेसुद्धा खूप सहन केलं आहे. तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर एक हास्य होतं ते छद्मी होतं का कळलं नाही.

शायना अतिशय बाळाबोध बोलत होत्या. ते विजय नामक दुसरे वकिल यांनी अतिशय अचुक मुद्दे मांडलेले

आपले निकमसाहेब सुध्दा या निर्णयाला आव्हान द्यावे म्हणतात. बघू. सोमवार लांब नाही

आज ज्यांना न्यायव्यवस्थेचा अपमान आणि चीड आणि बरंच काही काही झालेलं वाटत आहे अशांपैकी प्रत्येकानं थोडेफार पैसे घालून पीडीतांसाठी एखादा तगडा वकील नेमला असता तर...

>>>>
पीडीतांनी सलमानकडेच मदत मागितली असती तर त्याने केली असती. भाई दर्यादिल आहेत.

- यात कुठलाही उपरोध नाही. भाई खरेच दर्यादिल आहेत.

साती | 11 December, 2015 - 18:29
बहुतेक आम्ही सरकारला पिडितांच्या वतीने तगडा वकील द्यायलाच टॅक्स किंवा इतर रूपाने पैसे दिलेले असतात.
सरकार फक्त कसाब, दाऊद, गवळी यांच्या विरुद्धच तगडे वकील देण्याकरिता नेमलेले नसते.
*
उद्या कुठल्याही सरकारने न केलेल्या किंवा चुकीच्या केलेल्या गोष्टीवर टिका केली की 'मग तेव्हाच तुम्ही काँट्री काढून हे काम नीट का नाही केलं ' असा युक्तीवाद होईल.
जो फार घातक आहे.
म्हणजे हे सगळं सामान्य लोकांनी करायचं तर सरकारने काय करायचं?
<<

अक्का, शंभर टक्के सहमत.

नंदिनी यांच्या सेंटिमेंट्स चांगल्या असल्या, तरी साती यांचेशी सरकारच्या कर्तव्यांबद्दल व काळ सोकावतो बद्दल जास्त सहमत.

पीडीतांनी सलमानकडेच मदत मागितली असती तर त्याने केली असती. भाई दर्यादिल आहेत.>> तस compensation मिळाल आहे पिडिताना न्युजअवर मधे सान्गितल गेल.

तस compensation सलमानलाही मिळायला हवे. निर्दोष असून एवढ्या वर्षाची कोर्टकेस, दगदग, मनस्ताप, पैसा, आणि त्याच्यासारख्या स्टारचा अमूल्य वेळ खर्च झाला. सोशलसाईटवर बदनामी झाली. भले निगेटीव्ह पब्लिसिटी पण त्याच्या बॉलीवूड क्षेत्रात चांगली का समजली जात असेना, खराब झालेले नाव कधी भरून येत नाही..

तस compensation सलमानलाही मिळायला हवे>> कुणाकडुन? ओह सरकारकडून!! वर् पिडिताना कूणि दिले असेल compensation अस तुला वाटतय रुन्म्या?

प्रत्यक्ष घटना काय होती हे कधीच कळणे शक्य नाही. पण माणसं मेलीत हे तर खरं आहे.
रवींद्र पाटील यांचं काय झालं ते लपून राहीलेलं नाही. आपल्याच खात्याचा मनुष्य कुठल्या अवस्थेत आहे हे पोलीस खात्याला माहीत नसेल तर गुन्हेगारांची पाळंमुळं खणून काढण्याचे काम कुठल्या संस्थेला द्यायचे ?

सलमान खान खरंच दोषी होता का हे आता कधीच कळणार नाही. पण एका पोलीसाचे जे हाल झाले ते संशयास्पद आहेत. हा मामला केव्हांच रफादफा झाला असता पण कुठल्यातरी एका सामाजिक कार्यकर्तीने हा खटला लावून धरला होता. त्यांचं काय झालं ? त्यांचं सध्या काय म्हणणं आहे ?

काँग्रेसच्या राज्यात तपास झाला आणि भाजपच्या राज्यात तो सुटला. त्याची दोन्हीकडे जवळीक होती.
न्यायपालिकेकडे तीन तीन पिढ्यांचे खटले पडीक आहेत. लोक चकरा मारून थकले, काहींनी तर जगाचा निरोपही घेतला तरी खटले निकाली निघत नाहीत आणि एकीकडे सलमानला १३ वर्षे सहन करावे लागले म्हणून गळे काढणारेही आहेत.

या घटनेवरून केलं जाणारं स्कोर सेटलिंग हे मूळ घटनेइतकंच निषेधार्ह आहे.

@@Runmesh- salman nirdosh ahe asa dava karu naka plz...tyachya against saksh denara constable aaj jivant nahi....n tyachya bajune saksh denara la aaj achanak uparti zali ....he sarvana distey.....

And rahila prashn tyachya amulya vel vaya janyacha tar evdya years madhe khup pictures aale tyache n karodo rupee kamavle ....tyala nasel jast farak padla

आर्च, का बरे सोडायचे?
उलट सलमानला झालेले आर्थिक , मानसिक नुकसान भरून काढण्यासाठी (शायनाबाईंना किती वाईट वाटले बघितलेत ना!) यापुढचे त्याचे चित्रपट किमान पाचवेळा थिएटरात जाऊन पहावेत असा आम्हा सल्लूफॅन्सचा संकल्प आहे.
Happy

साती यान्च्या मताशी सहमत...

<<आता किती लोक त्याचा सिनेमा पहाणं सोडून देतील?>>
----- मी सोडले... रविन्द्र पाटिल यान्च्यासारख्या कर्तव्य कठोर पोलिस अधिकार्‍याला ज्या परिस्थिती मधुन जावे लागले, काय चुक होती त्यान्ची ? त्यान्नी त्यान्चे कर्त्यव्य बजावले आणि म्हणुन त्यान्ना नोकरी गमवावी लागली, पुढे आरोग्य बिघडले आणि अत्यन्त हलाखीच्या परिस्थितीत त्यान्चा अन्त झाला.

हा खुनी नराधम आज मोकाट आहे. सर्व यन्त्रणा पैशाने विकत घेता येते हेच मला या प्रकरणातुन दिसते.

Ashoke Pandit ‏@ashokepandit Dec 10

Will all those, who till now haunted, humiliated, abused @BeingSalmanKhan, apologize to him & his family after this verdict?#SalmanWalksFree

Ashoke Pandit ‏@ashokepandit Dec 10

Heartiest Congratulations to @SalimKhanSaid @BeingSalmanKhan for being acquitted for the crime U didnt commit.Thank U #Judiciary.

ऋ, एक माफीनामा तयार करा. सगळ्यांच्या सह्या घ्या आणि पाठवा.

सलिम खान म्हणाले हिट अँड रन केस मधे तब्बल २५ करोड खर्च झाले Uhoh

http://movies.ndtv.com/bollywood/salim-khan-on-salman-walking-away-what-...

या २५ कोटींपैकी मृत आणि जखमींना किती पैसा मिळाला यावर सुजाण नागरिकांनी नक्की विचार करावा.

Pages