भाई निर्दोष सुटले !! ओह खान तुस्सी ग्रेट हो !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 March, 2015 - 12:31

.

"" खानो मे खान, सलमान खान !! ""

.

ऋन्मेषचा धागा बघताच शाहरुख खान चाच विषय असणार या गृहीतकावर चटकन पोहोचलेल्यांसाठी खास हा वरचा बॅनर..

सलमान खान,
‘मैने प्यार किया’ पासूनच ज्याच्या मी प्रेमात पडलो ते ‘मैने प्यार क्यू किया’ पर्यंत आणि त्याच्याही पुढे आजतागायत पडलेलोच आहे. याला कारणीभूत सलमानचा अभिनय, दिसणे, डोल्लेशोल्ले आणि स्टाईल तर आहेच पण त्याहीउपर जाऊन त्याची ‘बॉलीवूडचा दानशूर कर्ण’ अशी असलेली इमेज. लोक त्याच्यावर प्रेमच नाही करत तर मानतात त्याला. जेव्हा एखादा बिगबजेट, बड्या बॅनरचा, भलीमोठी स्टारकास्ट असलेला चित्रपट १०० कोटीच्या घरात गेल्याचा आनंद साजरा करत असतो, तेव्हा आपला सल्लू एखाद्या सौथेंडियन डब केलेल्या बी ग्रेड सिनेमावर २०० कोटी मिळवून जिममध्ये चुपचाप व्यायाम करत बसला असतो.

फक्त नावावर आणि पडद्यावरच्या आपल्या सहज वावरावर बॉक्स ऑफिस हिट करून सोडणारा दुसरा स्टार नसावा बॉलीवूडमध्ये. आणि हे शक्य तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही जनमानसात प्रचंड लोकप्रिय असता. आणि तो ते आहे हे वेगळे सांगायला नकोच. म्हणूनच त्याचे लग्न हि देखील त्याची खाजगी बाब न राहता ती एक राष्ट्रीय समस्या बनते. त्याने ते करूच नये असेच कित्येक तरूणींना वाटते. त्याच्या शर्ट काढत उघडे होण्यातही लोकांना अश्लीलता न दिसता लोक त्याच्या बॉडीवर फिदा होतात. त्याच्या चाहत्यांमध्ये मग स्त्री-पुरुष भेदही मिटतात. सर्वच वयोगटाचे आणि जातीधर्माचे लोक त्याच्यावर निस्सीम प्रेम करतात.

त्याचमुळे जेव्हा जेव्हा त्याच्या शिकार प्रकरणाचे, बेताल वागण्याचे, ऐश्वर्या प्रेमप्रकरणात मद्यप्राशन करत दंगा घालण्याचे किस्से चवीने रंगवले जातात, तेव्हा तेव्हा ‘सल्लू तुने ये क्यू किया’ असे नेहमी मनात येते. जेव्हा त्याच्या फूटपाथवासीयांना चिरडण्याच्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ केसबद्दल पहिल्यांदा ऐकले तेव्हा कानावर विश्वासच बसला नाही. सलमान हा राजश्री प्रॉडक्शनचा प्रेम होता आणि या प्रेमावर आमचा विश्वास होता. आमचा सल्लू कुठलेही बेजबाबदार आणि गैर कृत्य करूच शकत नाही, हा तो विश्वास!

.... आणि आज अचानक एवढे दिवस ती केस कोर्टात रखडल्यानंतर एक असे सत्य सामोरे आले की आम्हा सर्व चाहत्यांचा आजवरचा विश्वास सार्थ झाला आहे. नव्हे, सलमानबद्दलचा आदर एकंदरीतच दुणावला आहे. गाडी सलमान चालवत नसून त्याचा ड्रायव्हर चालवत होता. हे सत्य आज अखेरीस सलमानने कबूल केले आहे आणि तशी ग्वाही त्याच्या ड्रायव्हरने देखील दिली आहे.

आजवर ऐकले होते की नमकहलाल नोकर असतात जे खाल्या मीठाला जागायला मालकाचा गुन्हा आपल्या शिरावर घेतात. पण आज समजले की एवढे दिवस सलमानने आपल्या गरीब ड्रायव्हरला वाचवायला त्याचा गुन्हा आपल्या नावावर घेतला होता. कारण सलमानला माहीत होते की तो गरीब बिचारा ड्रायव्हर जर यात अडकला असता तर त्याचे आयुष्य उध्वस्त झाले असते, त्याच्या बायकापोरांचे हाल झाले असते. पण हाच गुन्हा जर आपण आपल्या नावावर घेतला तर आपण सेलिब्रेटी असल्याने आणि आपल्या देशातील कायदे सेलिब्रेटींना झुकते माप देत असल्याने आपण कदाचित तारून जाऊ. आणि तेच झाले..

आपल्या नोकरासाठी असा त्याग करणारा हा मालक, असा हा बॉलीवूडचा रिअल सुपर्रस्टार, विरळाच!
जर सैफ अली खानला पद्मश्री पुरस्कार मिळू शकतो, तर सलमान खान नक्कीच भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा हकदार बनतो.
तो पुरस्कार त्याला द्यावा की नाही यावर मी लवकरच वेगळा पोल काढेन,
पण तुर्तास आपल्या सल्लूभाईला तीन तोफांची सलामी !!!
ओहह खान तुस्सी ग्रेट हो !!!

सत्यमेव जयते !! जय हिंद !!!

- ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर : तर मुलांनो, सांगा तुम्हाला सगळ्यांना सलमान खान का आवडतो..??
सांगा बरे एकेकानी.
१. फूटपाथवर वर झोपणे हे चुकीचेच असते. तो अशा लोकांना धडा शिकवतो.
२. तो भारतातील गरीब नष्ट करून गरीबी घालवतो.
३. जंगलामध्ये उनाडक्या करणाऱ्या प्राण्यांनासुद्धा तो धडा शिकवतो.
४. अनेक वकील आणि तत्सम लोकांना तो श्रीमंत बनवतो.
५. मीडियाला तो भरपूर बातम्यारूपी खाद्य पुरवतो.
६. बिग बॉस, दसका दम अशा अनेक दर्जेदार आणि संस्कारक्षम मालिकांमधून भारताची पुढची पिढी घडवतो.
७. लोकशाही म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य...!!, हे तो त्याच्या प्रत्येक कृतीतून पटवून देतो.
८. या सर्व गोष्टी बघून थक्क झालेल्या लोकांना तो "सहिष्णू" बनवतो.
९. आपल्या या कोणत्याही गोष्टींमुळे किरण वहिनींना आणि त्यांच्या मुलांना भीती वाटू नये म्हणून तो बीइंग ह्युमनचे टी-शर्ट पण घालतो.
१०. आणि एवढे सगळे करून उरलेल्या वेळात, तो खूप वैचारीक फिल्म्स तयार करून त्यात अत्यंत सेंसिबल अभिनय करतो.
सर : बरोब्बर मुलांनो, शाब्बास...!!!!
खरे तर, त्या गरीब लोकांचा देशाला काहीही फायदा नव्हता. त्यामुळे त्याच्या रूपाने देवच धावला. त्यामुळे सरकारने यापूढचे गरीबी हटावचे काँट्रॅक्ट त्यालाच दिले पाहिजे. म्हणजे फार कमी वेळात हे सगळे भिकारी नष्ट होतील.
चला, तर आजपासून आपण त्याचे अनुकरण करून हे राष्ट्र बलशाली बनवू या.
चला शर्ट काढा सगळ्या मुलांनी..!!
--
फेसबूक फॉरवर्ड

बिग बॉस, दसका दम अशा अनेक दर्जेदार आणि संस्कारक्षम मालिकांमधून ....
>>>
सिरीअसली? या दर्जेदार, संस्कारक्षम मालिका आहेत ???

हो Wink

तुम्हाला नाही का दिसले त्यात असलेले संस्कार? त्यात आल्यानंतरच सनी लिओन सुधरली ना. अहो असे संस्कारक्षम कार्यक्रम जगात कुठे नसेल.

सलमानखान एक स्टार म्हणून तो आवडता असेल तर त्याचा अर्थ त्याच्या गुन्हेगारी कृत्यांचं समर्थन केलं असा काढण्याचा जमाना जाऊनही अनेक वर्षं झाली आता. असं जर असतं तर अक्षयकुमारचे सर्व फॅन्स चॅरीटी मधे पैसे घालवत असतील. शाहरूख खानने एक करोड रु पूरग्रस्तांना दिल्यानंतर त्याच्या फॅन्सने किमान १०० कोटी पाठवायला हवे होते. सचिनचे सर्व फॅन्स आपापल्या क्षेत्रात नंबर वन झाले असते.

फिल्म स्टार्स कडून लोक प्रेरित होत असतील तर सन्नी लिऑन सर्वात क्रांतीकारी स्त्री म्हटली पाहीजे. तेव्हां अशा प्रतिक्रिया आवरा.

<<आता किती लोक त्याचा सिनेमा पहाणं सोडून देतील?>>
----- मी सोडले... >>>>>>>>

मी पण
>>
+१

त्याची पर्सनल लाईफ आणि अभिनय या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत खर्‍या पण त्या माणसाबद्दलचा आदरच संपला आता.

सलमानच्या चित्रपटांवर फार परीणाम होणार नाही.
जसे नुकतेच असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून आमीर बाबत झाले, म्हणजे अगदी तो प्रमोट करत असलेले प्रॉडक्ट्सवर सुद्धा बहिष्कार टाकणे वगैरे, हे एका ठराविक लॉबीने पुढाकार घेत लोकांच्या भावना पद्धतशीर भडकावून त्यांना एक केले होते. सलमानबाबत असा कोणाचा राजकीय फायदा नसल्याने काही लोक आपापल्यापुरते निषेध नोंदवतील वा आपल्यापुरते ठरवतील. मात्र एकजूट होऊन त्याला काही फटका बसावा इतपत कृती होणार नाही.
पण खरे तर असे व्हायला हवे. यातून एक संदेश जाईल.

माझ्यापुरते बोलायचे झाल्यास त्याचे चित्रपट असेही मी थिएटरला बघायचो नाही. आणि एकदा समजले बंडल आहे की मोबाईलवर सुद्धा बघायला टाळतो.

अपवाद
हम आप के है कौन - तो माधुरीचा होता.
पार्टनर - तो गोविंदाचा होता.

त्याच्या कडे २५ कोटी नसते तर तो दोषी ठरला असता का?
<<
तर ह्या खटल्याला इतकी प्रसिद्धी मिळालीच नसती. किंबहुना खटला उभा राहिला की नाही इथपासून सुरुवात झाली असती.

दर रोज या देशात किती हिट अँड रन होतात, किती पकडले जातात अन कितिंना शिक्षा होते याचा हिशोब केला, तरी पुरे. प्लस, कायद्यानुसार खून व सदोष मनुष्यवध अशी दोन वेगळी कलमे, व कारणमीमांसा आहेत.

<<सलमानच्या चित्रपटांवर फार परीणाम होणार नाही.>>
-------- माझ्या एका मुळे त्याला काहीच फरक पडणार नाही हे माहित आहे. पण त्याला पडद्यावर पाहिल्यावर...
रविन्द्र पाटिल आणि त्यान्ची झालेली हेळसान्ड आठवते... अजुन एका साक्षिदाराचे अकस्मित (सन्शयास्पद) निधन झाले असे वाचल्याचे 'स्मरते'.

<<कायद्यानुसार खून व सदोष मनुष्यवध अशी दोन वेगळी कलमे, व कारणमीमांसा आहेत.>>
------- चुक होणे समजतो, दारुच्या नशेत लोकान्ना कुचलणे हे पण मला समजते.... या चुका अनवधानाने, दारुच्या नशेत झाल्या... आता त्या केलेल्या चुका मान्य करुन कायद्यानुसर योग्य शिक्षा भोगायची आणि सुटायचे, अपघातग्रस्तान्ना मदत करायची.
तर हे महाशय सापळे रचत बसले, अत्यन्त थन्ड डोक्याने त्यान्नी अनेक वर्षे अनेक साक्षिदारान्ना त्रास दिला... काही साक्षिदारान्ना तर प्रामाणिकपणाची मोठीच शिक्षा मिळालेली आहे. ह्या सर्व झाका झाकी करण्यात कोट्यावधी रुपये उधळले...
पुरावे नष्ट करणे, साक्षिदारान्ना धमकावणे, जगातुनच नाहिसे करणे... स्वत: केलेल्या चुका लपवण्यासाठी थन्ड डोक्याने केलेले हे खुनच आहेत. असो.

बहिष्कार मी माझ्या समाधानासाठी टाकलेला आहे.... काही फरक पडावा अथवा नाही ह्या उद्देशाने नाही.

सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी एका बड्या राजकीय नेत्याविरुद्धचा खटला त्याच्या भावाने जिवाच्या भीतीने काढून घेतला. या घटनेला फारशी प्रसिद्धी मिळालेली नाही. या नेत्यावर किंवा पक्षावर असाच बहीष्कार टाकला जाईल का ?
http://www.thehindu.com/news/cities/mumbai/sohrabuddins-brother-wants-to...

केस विथड्रॉ केल्याची गेल्या आठवड्यात इंडीयन एक्सप्रेस मधील बातमी आता आढळत नाही.
सलमानच्या कृत्याला पाठिंबा नाही हे पहिल्या पोस्टमधेच लिहीले आहे. (ही तिसरी पोस्ट आहे Proud )

कापोचे , तुमचा मुद्दा समजला .
पण पटल तर बघा . मला सलमानचा राग त्याच्यामुळे चुकून अपघातात कुणी मेला यासाठी नाहीच आहे .
आता त्याने दारू प्याली होती की पाणी हे मी काय सांगणार ?
पण ही केस दाबण्यासाठी त्याने / त्याच्या फॅमिलीने जे काही केले अन रविंद्र पाटील चे जे काही झाले त्यासाठी आहे Sad

आता तुम्ही याचे उत्तर म्हणून दुसर्या केस देत असाल तर मग त्याला अंत नाहीच ना ? उद्या दुसरा चोरी करतो ते चालल म्हणून माझ्या मित्रानेही चोरी केली तर चालते याला काय अर्थ आहे .

आता किती लोक त्याचा सिनेमा पहाणं सोडून देतील?>> मी खूप आधीच सोडले.

@रिया, तो उपरोध नसून १० फुट वरून कोसळल्यावर पडून हाडे मोडल्यानंतर ची रीअ‍ॅक्शन आहे!
नेहमीच कुठली पोस्ट अनेक लोकांना पटली नाहि की ती उपरोधिक आहे/होती, तुम्हांस ती कळली नाहि असा बकवास दावा उर्फ काडी हा रुन्मेस करत असतो.
ह्याच्या एकूण एक पोस्टी तद्दन बेकार सेन्सलेस असतात्,आणि उपरोध शिकायचाच असेल तर तो त्याने साती आणि सिमंतिनी ह्यांच्याकडून नीटच शिकावा Wink

<<ह्याच्या एकूण एक पोस्टी तद्दन बेकार सेन्सलेस असतात्, >>
----- पोरगा अगदी निरागस आहे... जास्त मनावर नका घेऊ... Happy

केदार जाधव
पहिली पोस्ट वाचा माझी. सलमान खान या व्यक्तीवर आरोप सिद्ध झाले आणि शिक्षा झाली तर वाईट वाटण्याचे कारण नाही. सलमान आवडता स्टार आहे असेही नाही. पण त्याला शिक्षा झाली नाही आणि त्याचे सिनेमे येत राहीले, त्यातला एखादा चांगला असेल तर तो मी पाहणार. पडद्यावरील नायक आणि सलमान ही व्यक्ती यात फरक आहे. तुम्ही नका पाहू.

तुम्ही ज्याला उदाहरण म्हणत आहात ते समर्थन नसून जो तर्क इथ लावलाय त्याच तर्काच्या आधारे प्रश्न विचारला आहे. खरे म्हणजे राजकारणात तर आपण त्या माणसालाच मत देतो, त्याच्या पडद्यावरील छबीला नाही, नाही का? सोहराबुद्दीनचा एन्काऊंटर फेक होते हे एव्हाना सिद्धच झालेले आहे. बेस्ट बेकरी प्रकरणात माणसे जळून मेली याबद्दलही शंकेला वाव नसावा.

क्लिअर झाले असावे अशी आशा करतो. तुम्हाला अन्य उदाहरणे द्यायची असतील तर तो तुमचा हक्क आहे.पण त्याने काय निष्पन्न होईल हे कळाले नाही. उलट माझा मुद्दा सिद्ध होईल ना?

उदय,
तुमच्या एकामुळे फरक पडणार नाही असे म्हणायचे नव्हते मला. मी ते जनरल स्टेटमेंट मांडले होते की ओवरऑल या प्रकरणामुळे त्याच्या प्रसिद्धीला वा चित्रपटांच्या कमाईला फार मोठा फरक पडणार नाही.
गैरसमज नसावा, आपल्या भावनांचा आणि मताचा आदर आहे.

हिट अॅंड रन प्रकरणी सलमानविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय
http://nhunt.in/NjQP
via NewsHunt.com

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त Happy

सलमान खान ने किती हि human being पणा दाखवला तरी तो कश्या साठी दाखवत होता ते सगळ्यांना माहित आहे फक्त कोर्टात सहानभूती मिळवण्या साठी... तो एक गुन्हेगार आहे????
आणि त्याला सजा भेटणार यात काहीच शंका नाही....
बाकी सगळे जागे होते दारू पिउन आणि फक्त हवालदार झोपला होता ????

कमाल आहे न लोकांची काहीही बोलतात आणि यांचा विश्वास बसतो????

थोडा रिलीफ मिळाला वाचून की, राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जातय असं!

शायद भगवान के घर देर है, अंधेर नही...

कालचा अदालतचा एपिसोड

https://www.youtube.com/watch?v=nFc69vSrhqI

सुपरस्टारच्या कारखाली चिरडले जाणारे दोन जण आणि त्या कृत्याची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेणारा वाहनचालक. वाहनचालक हे असं का करतो ते रहस्य शेवटपर्यंत छान राखलंय.

व्हॉट्सपसाभारa

द्वापार की त्रेता युगात उंच हिमालयातील जंगलात एक गंधर्व आपल्या राण्यांसोबत क्लोरिनेटेड वॉटर तळ्यात जलक्रिडा करण्यात मग्न होता.
जवळुन एक वृद्ध मुनी जात असताना गंधर्वाने आपल्या मस्तीत त्यांच्या अंगावर ते क्लोरिनेटेड पाणी उडवले.

मुनी कर्टसी न दाखवता वरुन अपमान केल्यामुळे त्यांनी चिडुन त्याला शाप दिला.
ज्या मस्तीत तु आमच्यावर पाणी उडवलंस तुला मी शाप देतो की तु पाण्याची कमी असलेल्या मरू भुमीत अनेक युगं एक काळवीट होउन राहशील!
चल काळं कर तोंड इथुन!

मुनींच्या शापामुळे भानावर आलेला गंधर्व माफी मागत म्हटला "मुनीवर या शापावर काही उतारा असेल ना!"

मुनीवर त्याच्याकडे पाहत उच्चारले "प्रथम तर शापावर उतारा नसतो उ:शाप असतो!!"

मग उ:शापावर बरंच बार्गेनिंग झाल्यावर शेवटी शापाची सिविएरिटी कमी करत ते बोलले "ज्या प्रकारे कृष्णाने बैलासुराचा..बगळासुराचा अंत करत त्यांना मुक्ती प्रदान केली.त्याचप्रकारे एक साक्षात #प्रेममुर्ती.. स्त्रीवर्गाला #मदनाचा_पुतळा भासत असलले ..पुरूष वर्गाचे बंधू द्याट इज #भाई ;स्त्रीयांचा अतीव आदर करणारे; ज्यांचे #ब्रम्हचर्य वादातीत आहे अशा प्रेममुर्तीकडुन तुला मुक्ती मिळेल.

अनेक वर्षांनंतर मरू भुमीतील जंगलात एक प्रेममुर्ती आपल्या शिष्या #नीलमणी, महाराष्ट्र देशीची कन्या आणि तत्कालीन #चवळीची_शेंग सोनाली बेंद्रे
;कुठलाही taboo नसलेली तब्बु सोबत ती प्रेममुर्ती ..भाई सलमाण निसर्गाचा आस्वाद घेत असत ; " यत्र नार्एस्तु पुज्यन्ते तत्र रमन्ते देवत:".."#स्त्री_शिकली_प्रगती_झाली..#जिच्या_हाती_पाळण्याची_दोरी_ती_जग_उद्धारी..असे नवनवीन वाक्प्रचार प्रथमच सांगत ते "स्त्री सशक्तीकरणावर" प्रबोधन करत असतानाच एक खुंखार काळवीट ..चिंकारा त्या बालीकांवर आपले शिंग उगारत धावुन आला!

"#त्राहिमाम्_सलमान.. त्राहिमाम् सलमान.."
म्हणत काळवीटापासुन वाचवण्यासाठी बालीकांनी हंबरडा फोडला.

प्रेममुर्तीने चिंकाऱ्याकडे बघुन स्मित केले..त्यांनी ओळखले होते यांस मुक्ती देणे ही तर श्रींची इच्छा!
तो समय येउन ठेपलाय!

काळवीट आता जवळ आले .संत सलमान यांनी आपले दुनळीचे ऑंग्ल शस्त्र उचलत नेम धरला आणि "#ठो" केले. काळवीट मरून पडले.त्याजागी एक तरूण तेजस्वी पुरूष प्रकटला.आणि मुक्ती दिल्याबद्दल थँक्स म्हणुन परत आपल्या राज्यात परतला.

पण इकडे कलियुगीन मानवी कायद्यानुसार संत सलमान यांस अटक आणि त्यांच्यावर केस झाली.आणि संत सलमान तर बिइंग ग्रेट माणुस होत.त्यांनी सत्य कोणासही प्रकट केले नाही.बदनामी सहन केलीत.

शेवटी १८ वर्षानंतर ते काळवीट स्वत: जजसाहेब आणि वकिल साहेबांच्या स्वप्नात जाउन त्यांस सारी सच्चाई बयाँ की!
न्यायाधीशांना भडभडुन आले आणि त्यांनी तमाम सबुतो और दस्तुरखुद काळवीट के बयानों को मद्दे नजर रखते हुए प्रेममुर्तींना निर्दोष सोडले.

माझ्यापुरते बोलायचे झाल्यास त्याचे चित्रपट असेही मी थिएटरला बघायचो नाही. आणि एकदा समजले बंडल आहे की मोबाईलवर सुद्धा बघायला टाळतो.
अपवाद
हम आप के है कौन - तो माधुरीचा होता.
पार्टनर - तो गोविंदाचा होता.
Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2015 - 08:07

लब्बादा... सुल्तान पहिला होतस कि रे?

  च्रप्स 
तो कोर्टाने त्याला निर्दोष ठरवल्यावर पाहिला.

आणि आता तर काय विचारायलाच नको, त्याच्या लग्नाचे जेवायलाही जाणार..

Pages