भाई निर्दोष सुटले !! ओह खान तुस्सी ग्रेट हो !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 March, 2015 - 12:31

.

"" खानो मे खान, सलमान खान !! ""

.

ऋन्मेषचा धागा बघताच शाहरुख खान चाच विषय असणार या गृहीतकावर चटकन पोहोचलेल्यांसाठी खास हा वरचा बॅनर..

सलमान खान,
‘मैने प्यार किया’ पासूनच ज्याच्या मी प्रेमात पडलो ते ‘मैने प्यार क्यू किया’ पर्यंत आणि त्याच्याही पुढे आजतागायत पडलेलोच आहे. याला कारणीभूत सलमानचा अभिनय, दिसणे, डोल्लेशोल्ले आणि स्टाईल तर आहेच पण त्याहीउपर जाऊन त्याची ‘बॉलीवूडचा दानशूर कर्ण’ अशी असलेली इमेज. लोक त्याच्यावर प्रेमच नाही करत तर मानतात त्याला. जेव्हा एखादा बिगबजेट, बड्या बॅनरचा, भलीमोठी स्टारकास्ट असलेला चित्रपट १०० कोटीच्या घरात गेल्याचा आनंद साजरा करत असतो, तेव्हा आपला सल्लू एखाद्या सौथेंडियन डब केलेल्या बी ग्रेड सिनेमावर २०० कोटी मिळवून जिममध्ये चुपचाप व्यायाम करत बसला असतो.

फक्त नावावर आणि पडद्यावरच्या आपल्या सहज वावरावर बॉक्स ऑफिस हिट करून सोडणारा दुसरा स्टार नसावा बॉलीवूडमध्ये. आणि हे शक्य तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही जनमानसात प्रचंड लोकप्रिय असता. आणि तो ते आहे हे वेगळे सांगायला नकोच. म्हणूनच त्याचे लग्न हि देखील त्याची खाजगी बाब न राहता ती एक राष्ट्रीय समस्या बनते. त्याने ते करूच नये असेच कित्येक तरूणींना वाटते. त्याच्या शर्ट काढत उघडे होण्यातही लोकांना अश्लीलता न दिसता लोक त्याच्या बॉडीवर फिदा होतात. त्याच्या चाहत्यांमध्ये मग स्त्री-पुरुष भेदही मिटतात. सर्वच वयोगटाचे आणि जातीधर्माचे लोक त्याच्यावर निस्सीम प्रेम करतात.

त्याचमुळे जेव्हा जेव्हा त्याच्या शिकार प्रकरणाचे, बेताल वागण्याचे, ऐश्वर्या प्रेमप्रकरणात मद्यप्राशन करत दंगा घालण्याचे किस्से चवीने रंगवले जातात, तेव्हा तेव्हा ‘सल्लू तुने ये क्यू किया’ असे नेहमी मनात येते. जेव्हा त्याच्या फूटपाथवासीयांना चिरडण्याच्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ केसबद्दल पहिल्यांदा ऐकले तेव्हा कानावर विश्वासच बसला नाही. सलमान हा राजश्री प्रॉडक्शनचा प्रेम होता आणि या प्रेमावर आमचा विश्वास होता. आमचा सल्लू कुठलेही बेजबाबदार आणि गैर कृत्य करूच शकत नाही, हा तो विश्वास!

.... आणि आज अचानक एवढे दिवस ती केस कोर्टात रखडल्यानंतर एक असे सत्य सामोरे आले की आम्हा सर्व चाहत्यांचा आजवरचा विश्वास सार्थ झाला आहे. नव्हे, सलमानबद्दलचा आदर एकंदरीतच दुणावला आहे. गाडी सलमान चालवत नसून त्याचा ड्रायव्हर चालवत होता. हे सत्य आज अखेरीस सलमानने कबूल केले आहे आणि तशी ग्वाही त्याच्या ड्रायव्हरने देखील दिली आहे.

आजवर ऐकले होते की नमकहलाल नोकर असतात जे खाल्या मीठाला जागायला मालकाचा गुन्हा आपल्या शिरावर घेतात. पण आज समजले की एवढे दिवस सलमानने आपल्या गरीब ड्रायव्हरला वाचवायला त्याचा गुन्हा आपल्या नावावर घेतला होता. कारण सलमानला माहीत होते की तो गरीब बिचारा ड्रायव्हर जर यात अडकला असता तर त्याचे आयुष्य उध्वस्त झाले असते, त्याच्या बायकापोरांचे हाल झाले असते. पण हाच गुन्हा जर आपण आपल्या नावावर घेतला तर आपण सेलिब्रेटी असल्याने आणि आपल्या देशातील कायदे सेलिब्रेटींना झुकते माप देत असल्याने आपण कदाचित तारून जाऊ. आणि तेच झाले..

आपल्या नोकरासाठी असा त्याग करणारा हा मालक, असा हा बॉलीवूडचा रिअल सुपर्रस्टार, विरळाच!
जर सैफ अली खानला पद्मश्री पुरस्कार मिळू शकतो, तर सलमान खान नक्कीच भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा हकदार बनतो.
तो पुरस्कार त्याला द्यावा की नाही यावर मी लवकरच वेगळा पोल काढेन,
पण तुर्तास आपल्या सल्लूभाईला तीन तोफांची सलामी !!!
ओहह खान तुस्सी ग्रेट हो !!!

सत्यमेव जयते !! जय हिंद !!!

- ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहृदय अशी एका घटनेत नाहिशी होत नाही किव्वा केवळ एकाच घटनेत दिसत नाही. अपघाताची झळ पोहोचलेल्या जिवान्ना किव्वा त्या सुरक्षा रक्षक रविन्द्र पाटिल ज्यान्नी FIR नोन्दवला त्यान्ची नन्तर वाताहत का लावली ? त्यान्च्या साठी एक अब्जान्श सहृदयता या भित्र्या खानाला का नाही दाखवता आली.>>
हे सर्व नजरेआड करण्यासाठीच त्याच्या चांगुलपणाचे किस्से बनवून ते सोशल साईटस् वर फाॅर्वर्ड केले जातायत.. त्याची प्रतिमा चांगली बनवण्यासाठी.

चांगला, सहृदय, बीईंग हुमन, मदत करणारा, सुपरस्टार ह्यासाठी पद्मश्री, मॅगेसेसे, भारतरत्न, नोबेल, ऑस्कर सगळे पुरस्कार घाऊकमध्ये एकदाच देऊन टाका वर गिनिज बुकात नोंदही करून टाका, बॉडी बिल्डिंगसाठी एक खास ऑलिंपिक प्लॅटिनम मेडल तयार करून तेही देऊन टाका , शाळेच्या पाठ्यपुस्तकात सलमान वर धडासुद्धा घाला, गांधी नेहरूंबरोबर कचेर्‍यांमध्ये सलमानचा फोटोसुद्धा लावण्याची सक्ती करा, चलनातल्या नोटेवरही सलमान फोटो छापा, अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर सलमानचे मंदीर बांधा...... पण दहा सेकंदांची का असेना जेलची शिक्षा द्याच बुवा.

ओहह खान तुस्सी ग्रेट हो !!! >>> १००००००००००+ अनुमोदन..... जयललिता ताईंना जिथे २१ दिवस लागले जामीन घेऊन तुरुंगातून बाहेर यायला (ते सुद्धा कुठल्या जिवित हानीसाठी सजा झालेली नसतांना) तिथे भाईंना १ मिनिटही लागला नाही जामीन ऊभा करायला.

डोक्यात जाऊ लागलाय आता सलमान खान!!

पैशाच्या जोरावर काहिही करु शकतो तो.
उद्या त्याला शांततेसाठी नोबेल मिळाले तरी आश्चर्य वाटणार नाही.

Arpita was adopted by salmans father and not salman khan
>>>>>>

हो, अर्थातच, अन्यथा ती सलमनाची बहीण न होता मुलगी झाली असती.

असो, तरीही तिला बहीण समजून भावासारखेच प्रेम देणे, तिच्याप्रती आपले कर्तव्य निभावणे, त्यातही हिंदू-मुस्लिम असा भेद न करता (हे आपल्याकडे भल्याभल्यांना जमत नाही हा), यात सलमानची जी चांगली बाजू दिसून येते ती नाकारता येत नाही.

एखादी चांगली गोष्ट केल्याने इतर वाईट गोष्टींवर पडदा पडत नाही, त्याचप्रकारे एखादी वाईट गोष्ट केली म्हणून चांगल्या गोष्टींचेही मोल कमी होत नाही.

पापपुण्याचा हिशोब करताना ते वेगळ्या रकान्यात लिहायचे असते, त्यांची बेरीज वजाबाकी करायची नसते.

जरी इतरांसाठी त्याने केलेला दानधर्म फार काही मोठी कामगिरी नसेल, पण ज्यांच्यासाठी केले त्यांच्यासाठी ती फार मोठी गोष्ट असू शकते.

सलमानचे व्यक्तीमत्व महाभारतातल्या कर्णासारखे आहे.!

नक्कीच त्याने केलेल्या चुका या गुन्हा व अपराध या सदरात मोडतात, आणि त्याची त्याला शिक्षाही मिळेलच, नव्हे मिळायलाच हवी. पण तरीही त्याच्यात जे चांगले गुण आहे त्याचीही इतिहासाने दखल घ्यायलाच हवी!

<<<जरी इतरांसाठी त्याने केलेला दानधर्म फार काही मोठी कामगिरी नसेल, पण ज्यांच्यासाठी केले त्यांच्यासाठी ती फार मोठी गोष्ट असू शकते.>>>
------ त्याच न्यायाने जरी इतरांसाठी त्याने केलेला वाहन अपघात, अपघात स्थाना पासुन जखमी व्यक्तीन्ना तसेच मरायला सोडुन केलेले पलायन, घटने नन्तर शेकडो वेळा अपराध झाकण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न, पिडीतान्ना व्यक्तीन्ना दिलेला त्रास, FIR नोन्दवण्याचे कर्तव्य बजावणार्‍या सुरक्षा रक्षक रविन्द्र पाटिल यान्च्यावर आणलेला अतोनात दबाव या सर्व घटना मिळुन मोठा अपराध नसेलही, पण त्याच्या मुर्खपणाची, माजोरडेपणाची आजन्म शिक्षा ज्या निरपराध नागरिकान्ना, त्यान्च्या आप्तस्वकियान्ना मिळालेली आहे, अजुनही मिळत आहे त्यान्च्या साठी या सर्व गोष्टी अत्यन्त मोठा अपराध असू शकतात.

सलमानचे व्यक्तीमत्व महाभारतातल्या कर्णासारखे आहे.! >>> प्रहचहंडह अनुमोदन.

मी तर पुढे जाऊन असे म्हणेन की सलमानचे व्यक्तीमत्व भीष्मासारखे सुद्धा आहे जसा भीष्म राजसुखात राहूनही आजन्म ब्रम्हचारी राहिला तसा सलमान त्याच्या चहुबाजूंना अतिशय सुंदर ललनांचा कायम वावर असूनही नव्हे भीष्माने राजकन्यांना जिंकून आणले पण कधी स्पर्श केला नाही तसे सलमानने लाखो करोडो तरूणी जिंकल्या पण आपले ब्रम्हचर्य कधी ढळू दिले नाही.
खरं सांगायचं त्याही पुढे जावून मला असं म्हणावं वाटतंय की सलमान तर भगवान श्रीकृष्णासारखा सुद्धा आहे, शिशूपालाचे शंभर अपराध भरताच श्रीकृष्णाने आपले चक्र शिशूपाला वर सोडून त्याचा वध केला. आपल्या सलमानकडे स्टेपनीसहित पाच चक्रे होती जी त्याने शंभर दिवस फुटपाथवर झोपण्याचे अक्षम्य पाप करणार्‍या पाचांवर सोडून 'विनाशायच दुष्क्रिताम' ऊक्ती साध्य केली.

हँग ऑन...... प्रभू रामचंद्रांचे व्यक्तीमतव पडताळून पहात आहे...त्यांच्यात आणि सलमानमध्ये साम्यस्थळं शोधणारा प्रोग्राम रन केला पण एवढी साम्यथळं सापडेली की प्रोग्राम ईन्फायनाईट लूप मध्ये अडकला आहे.

सलमानचे व्यक्तीमत्व महाभारतातल्या कर्णासारखे आहे.!<<<

हो! आणि येथील काहीजणांचे धृतराष्ट्रासारखे!

Wink

मी तर पुढे जाऊन असे म्हणेन की सलमानचे व्यक्तीमत्व भीष्मासारखे सुद्धा आहे जसा भीष्म राजसुखात राहूनही आजन्म ब्रम्हचारी राहिला तसा सलमान त्याच्या चहुबाजूंना अतिशय सुंदर ललनांचा कायम वावर असूनही नव्हे भीष्माने राजकन्यांना जिंकून आणले पण कधी स्पर्श केला नाही तसे सलमानने लाखो करोडो तरूणी जिंकल्या पण आपले ब्रम्हचर्य कधी ढळू दिले नाही.
>>>>>>>

असहमत,
सलमानच्या ब्रह्मचर्याबद्दल तसे खात्रीने सांगणे कठीण आहे.
भीष्मांबद्दल खरेखोटे तेव्हाचेच लोक जाणे.

सलमानचे लग्न न करणे हे देखील आपल्याला जेलमध्ये जावे लागेल तर का एका तरुणीचे आयुष्य एकाकी अन उध्वस्त करा या उदात्त विचारातूनच आले आहे.

ऋन्मेऽऽष,

>> सलमानचे लग्न न करणे हे देखील आपल्याला जेलमध्ये जावे लागेल तर का एका तरुणीचे आयुष्य एकाकी अन
>> उध्वस्त करा या उदात्त विचारातूनच आले आहे.

हात्तिच्या. त्या नूरिया हवेलीवालाशी कर म्हणावं लग्न. तिनेही दारूच्या नशेत गाडी एका पोलीस हवालदारावर घालून त्याला ठार मारलं होतं. दोघांनी मिळून सजा एकत्र भोगायची की. बक्कळ पैका आहे दोघांकडेही.

आ.न.,
-गा.पै.

सलमानच्या ब्रह्मचर्याबद्दल तसे खात्रीने सांगणे कठीण आहे.>>>

अहो तोच म्हणालाय तो व्हर्जिन आहे मग खरंच असणार Proud

सलमानच्या ब्रह्मचर्याबद्दल तसे खात्रीने सांगणे कठीण आहे.<<<

मराठी साहित्यात पुलंनंतर निर्माण झालेली भीषण पोकळी आपण चांगली भरत आहात.

मराठी साहित्यात पुलंनंतर निर्माण झालेली भीषण पोकळी आपण चांगली भरत आहात.

>> हे वाचुन मी खाली पडायचेच बाकी होते. ऋ च्या पोस्ट्सपेक्षा या कमेंटने हसवले.

बेफीजी हा आपला मोठेपणा आहे,
पुलंच्या आसपास जायलाही मला अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे, वा आयुष्य संपले तरी गाठू शकणार नाही.

बाळ ऋन्मेष...

एक मित्रत्वाचा सल्ला....

तु जे काही इथे टंकतोस, ते टंकण्यापूर्वी १ ते १० आकडे म्हण आणि पुन्हा एकदा त्यावर विचार कर. तसेच टंकल्यानंतरही पुन्हा १ ते १० आकडे म्हण आणि विचार कर.

मी तुला खात्रीने सांगतो, की तुझ्यात फार फरक पडणार नाही पण इथल्या निर्बुद्ध पोस्टींची संख्या तरी निश्चित कमी होईल...

बघ विचार करून

बेफीजी हा आपला मोठेपणा आहे,
पुलंच्या आसपास जायलाही मला अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे, वा आयुष्य संपले तरी गाठू शकणार नाही.>>> ऋन्मेऽऽष Angry बापरे तुला खरच वाटले बेफ़िकीर असे सिरिअसली म्हणाले Uhoh

आशु तु कोणाकडून अपेक्षा करतोस अरे? ह्या माणसात कधीच फरक पडणार नाही.
हागल्या पादल्या मुतल्या गोष्टींचे बीबी काढतो हा. मी माबोवर येऊन १२ वर्ष झाली त्या सर्व वर्षात मी जेवढे बीबी काढले नसतील तेव्हढे बीबी या माणसाने जॉईन झाल्या झाल्या काढले असतील. बरं त्यात काय अर्थ?
आज काय सलमान, उद्या काय शाहरूख, परवा सई.... बाकी बी बी त्यांची धुणी धुवायला....
२० पैकी एखाद धागाच याचा बरा वाचण्याजोगा असेल. बाकी सगळे तद्दन फालतू.... भंपक...

चिल दक्षिणा...एवढी हायपर होऊ नको...तो आता यावर एक हातभर पोस्ट टाकेल बघ....आणि तीदेखील वरच्या पोस्टइतकीच उबग आणणारी असेल.
त्याला बहुदा अटेन्शन सिकिंग चा त्रास असावा. त्यामुळे त्याचे नाव घेऊन, न घेत, त्याच्या बाजून, त्याच्या विरुद्ध, कसेही काहीही बोलले तरी त्याला चालणार आहे.
इनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी फॉर हीम. बस्स नाव चर्चेत राहीले पाहिजे...हे आणि एवढेच एकमात्र ध्येय आहे.

त्यामुळे मी सहसा त्याच्या धाग्यांवर लिहायचे टाळतोच. पण आता पुलंबाबतचे त्याचे विचार ऐकून हरलोच. आणि राहवले नाही म्हणून लिहीले...

Pages