भाई निर्दोष सुटले !! ओह खान तुस्सी ग्रेट हो !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 March, 2015 - 12:31

.

"" खानो मे खान, सलमान खान !! ""

.

ऋन्मेषचा धागा बघताच शाहरुख खान चाच विषय असणार या गृहीतकावर चटकन पोहोचलेल्यांसाठी खास हा वरचा बॅनर..

सलमान खान,
‘मैने प्यार किया’ पासूनच ज्याच्या मी प्रेमात पडलो ते ‘मैने प्यार क्यू किया’ पर्यंत आणि त्याच्याही पुढे आजतागायत पडलेलोच आहे. याला कारणीभूत सलमानचा अभिनय, दिसणे, डोल्लेशोल्ले आणि स्टाईल तर आहेच पण त्याहीउपर जाऊन त्याची ‘बॉलीवूडचा दानशूर कर्ण’ अशी असलेली इमेज. लोक त्याच्यावर प्रेमच नाही करत तर मानतात त्याला. जेव्हा एखादा बिगबजेट, बड्या बॅनरचा, भलीमोठी स्टारकास्ट असलेला चित्रपट १०० कोटीच्या घरात गेल्याचा आनंद साजरा करत असतो, तेव्हा आपला सल्लू एखाद्या सौथेंडियन डब केलेल्या बी ग्रेड सिनेमावर २०० कोटी मिळवून जिममध्ये चुपचाप व्यायाम करत बसला असतो.

फक्त नावावर आणि पडद्यावरच्या आपल्या सहज वावरावर बॉक्स ऑफिस हिट करून सोडणारा दुसरा स्टार नसावा बॉलीवूडमध्ये. आणि हे शक्य तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही जनमानसात प्रचंड लोकप्रिय असता. आणि तो ते आहे हे वेगळे सांगायला नकोच. म्हणूनच त्याचे लग्न हि देखील त्याची खाजगी बाब न राहता ती एक राष्ट्रीय समस्या बनते. त्याने ते करूच नये असेच कित्येक तरूणींना वाटते. त्याच्या शर्ट काढत उघडे होण्यातही लोकांना अश्लीलता न दिसता लोक त्याच्या बॉडीवर फिदा होतात. त्याच्या चाहत्यांमध्ये मग स्त्री-पुरुष भेदही मिटतात. सर्वच वयोगटाचे आणि जातीधर्माचे लोक त्याच्यावर निस्सीम प्रेम करतात.

त्याचमुळे जेव्हा जेव्हा त्याच्या शिकार प्रकरणाचे, बेताल वागण्याचे, ऐश्वर्या प्रेमप्रकरणात मद्यप्राशन करत दंगा घालण्याचे किस्से चवीने रंगवले जातात, तेव्हा तेव्हा ‘सल्लू तुने ये क्यू किया’ असे नेहमी मनात येते. जेव्हा त्याच्या फूटपाथवासीयांना चिरडण्याच्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ केसबद्दल पहिल्यांदा ऐकले तेव्हा कानावर विश्वासच बसला नाही. सलमान हा राजश्री प्रॉडक्शनचा प्रेम होता आणि या प्रेमावर आमचा विश्वास होता. आमचा सल्लू कुठलेही बेजबाबदार आणि गैर कृत्य करूच शकत नाही, हा तो विश्वास!

.... आणि आज अचानक एवढे दिवस ती केस कोर्टात रखडल्यानंतर एक असे सत्य सामोरे आले की आम्हा सर्व चाहत्यांचा आजवरचा विश्वास सार्थ झाला आहे. नव्हे, सलमानबद्दलचा आदर एकंदरीतच दुणावला आहे. गाडी सलमान चालवत नसून त्याचा ड्रायव्हर चालवत होता. हे सत्य आज अखेरीस सलमानने कबूल केले आहे आणि तशी ग्वाही त्याच्या ड्रायव्हरने देखील दिली आहे.

आजवर ऐकले होते की नमकहलाल नोकर असतात जे खाल्या मीठाला जागायला मालकाचा गुन्हा आपल्या शिरावर घेतात. पण आज समजले की एवढे दिवस सलमानने आपल्या गरीब ड्रायव्हरला वाचवायला त्याचा गुन्हा आपल्या नावावर घेतला होता. कारण सलमानला माहीत होते की तो गरीब बिचारा ड्रायव्हर जर यात अडकला असता तर त्याचे आयुष्य उध्वस्त झाले असते, त्याच्या बायकापोरांचे हाल झाले असते. पण हाच गुन्हा जर आपण आपल्या नावावर घेतला तर आपण सेलिब्रेटी असल्याने आणि आपल्या देशातील कायदे सेलिब्रेटींना झुकते माप देत असल्याने आपण कदाचित तारून जाऊ. आणि तेच झाले..

आपल्या नोकरासाठी असा त्याग करणारा हा मालक, असा हा बॉलीवूडचा रिअल सुपर्रस्टार, विरळाच!
जर सैफ अली खानला पद्मश्री पुरस्कार मिळू शकतो, तर सलमान खान नक्कीच भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा हकदार बनतो.
तो पुरस्कार त्याला द्यावा की नाही यावर मी लवकरच वेगळा पोल काढेन,
पण तुर्तास आपल्या सल्लूभाईला तीन तोफांची सलामी !!!
ओहह खान तुस्सी ग्रेट हो !!!

सत्यमेव जयते !! जय हिंद !!!

- ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त एप्रिल फुल केलेस ऋन्मेश सर्वांना. Happy

निष्पाप्जीवाचा प्रतिसाद हसवुन हसवुन खुर्चीवरुन पाडुन गेला. आणी रश्मीचा पण.

सलमानचे हॉट असणे आणि सनीचे हॉट असणे यात फरक आहे, जसे बर्फाचे थंड असणे आणि स्वभावाचे थंड असणे यात असतो >>> Lol ऋ , मित्रा , किल्ला लढवणे तुझ्याकडून शिकावं .

विमानात मारहाण केल्याप्रकरणी सलमान खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश - विमानात मारहाण केल्याप्रकरणी सलमान खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
http://newshunt.com/share/38190938
Source: Loksatta

अभिनंदन ऋन्मेऽऽष. अजून एका शतकी धाग्याकडे वाटचाल.
मला वाटते ऋन्मेऽऽषला सचिनचा शतकांचा विक्रम मोडायचा आहे. Happy

ऋन्मेऽऽष बद्दल थोडेसे
सदस्य कालावधी: ३९ आठवडे
एकूण लेखन: ७५ धागे
शतकी धागे: १८

  1. गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का? गुलमोहर - ललितलेखन 107
  2. "इट्स ओके ! हो जाता है यार" .... पण इथे सो कॉलड स्त्री-पुरुष समानता गंडली ! गुलमोहर - ललितलेखन 103
  3. विधानसभेत भाजपा विरुद्ध शिवसेना झाल्यास कोण मारेल बाजी? चालू घडामोडी 319
  4. सई मला आवडते - पोल, निकाल आणि निष्कर्ष !! चित्रपट 133
  5. भारताच्या पंतप्रधानांनी विधानसभेच्या प्रचारांत उतरणे योग्य कि अयोग्य ? चालू घडामोडी 251
  6. मला मुलगीच हवी .. गुलमोहर - ललितलेखन 138
  7. भाजप सरकारचा शपथविधी सोहळा - राजेशाही आणि वादग्रस्त? चालू घडामोडी 186
  8. चित्रपटातील अजरामर संवाद !! चित्रपट 172
  9. जेन्टस रुमाल घ्यायचा आहे .. (ब्रांडेड) माहिती हवी आहे 103
  10. कोण आहे मराठी चित्रपटसृष्टीचा खर्राखुरा सुपर्रस्टार ?? चित्रपट 243
  11. मराठी चित्रपटसृष्टीचा उगवता सुप्परस्टार - स्वप्निल जोशी ! चित्रपट 318
  12. नाही जरी ‘सई’ तरी ... चित्रपट 185
  13. चित्रपटातील मला खटकलेली आक्षेपार्ह द्रुष्ये. चित्रपट 175
  14. घरात लहान मुलांसमोर मद्यप्राशन करणे बरोबर की चूक ? गुलमोहर - ललितलेखन 102
  15. अॅक्टींग तोडली ! चित्रपट 226
  16. AIB पोल चित्रपट 112
  17. AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी. चालू घडामोडी 489
  18. माय चॉईस "दिपीका" Happy चित्रपट 206

AND IT SAYS ALL !!
ऋन्मेऽऽष हलके घ्या Happy

नावात काय, मनापासून धन्यवाद, आपण हे मेहनत घेत संकलित केल्याबद्दल Happy
आता हि पोस्ट ग'फ्रेंडला व्हॉटसप करतो, आणि सांगतो, तुझा रिशी फुकट नाही गेलाय, तर चांगल्या लोकांच्या संगतीत आहे Happy

सलमानने १८ वर्षांपूर्वी एका अनाथ मुलीला रस्त्यावरून घरी आणले, आश्रय दिला, नव्हे आपली बहिणच बनवले, नव्हे बहिणीचा दर्जा देत तिचे धूमधडाक्यात लग्नही लाऊन दिले.
ती मुलगी हिंदू असल्याने तिचे नावही त्याने अर्पिता असे हिंदूच ठेवले.

सदर मेसेज मला आज व्हॉटसपवर आलाय.

हे खरे आहे का? कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा !

हे खरे आहे का? हो. काही महिन्यांपुर्वीच तिचे लग्न झाले तेव्हा १०० कोटी खर्च केला त्याने. हि न्युजपण सगळीकडे फिरत होती. तिच्या लग्नाचे कि संगीतचे व्हिडियो पण आहेत तुनळीवर.

सलमानने १८ वर्षांपूर्वी एका अनाथ मुलीला रस्त्यावरून घरी आणले, >> मला आलेल्या न्युज मध्ये सलीम खान हे मॉर्निंग वॉकला जात असताना रस्त्यात एका भिकारीणीचा मृत्यु झाला होता व तिच्या शेजारी तिची लहान मुलगी रडत बसली होती तेव्हा सलीम खान यांनी त्या मुलीला घरी आणले होते तिच ही अर्पिता.

ओके नक्की काय कुठून हे आता गूगाळावे लागेल, मात्र असे काहीसे आहे हे खरे तर..

म्हणजे त्या दिवशी कोणीतरी म्हटलेले की सलमान खानचा दानशूरपणा ही व्यवस्थित केलेली ब्रांडीग आहे, तर ते तितकेसे खरे नाही. दानशूरपणा हा गुणधर्म त्यांच्यात उपजत आहे. हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणाच्या आधीपासून आहे.

याला म्हणतात दैव देत आणी कर्म नेत. या बाबाजीची फॅमिली तशी चान्गली. आजोबा कडक, शिस्तप्रिय कमिशनर ( इन्दौरला ) होते. बाप चान्गला सुशिक्षीत. चान्गला लेखक. असे असतानाही नडला तो निव्वळ माज. पैशाने सगळे काही होत नाही. सलमान ची पत्रिका ( कृपया ज्योतिश्याचा आणी भविष्याचा राग करणार्‍यानी या पोस्टपासुन दूर रहावे) काही वर्षापूर्वी लोकप्रभा की देशदूत वर्तमान पत्राच्या पुरवणीत आली होती.

या बाबाजीच्या पत्रिकेत मेष लग्न, लग्नेश मन्गळ ( लग्नेश म्हणजे पहिल्या स्थानात असलेल्या राशी चा मालक ग्रह ) दशमात ( १० व्या स्थानी ) शुक्राबरोबर. शुक्र मन्गळ युतीत असले की असले बाया माणस फार रोमॅन्टीक आणी रसीक असतात. नशीब जोरावर असेल तर अशान्चे लव्ह मॅरेज पण होऊ शकते.. पण शुक्र दशमात मकर राशीत, मन्गळ तिथेच मकर राशीत उच्चीचा. ( प्रत्येक ग्रहाची उच्च राशी असते. उच्च म्हणजे तो ग्रह त्याच्या फेवरीट राशीत असेल तर चान्गली फळे देतो ) शुक्रामुळे त्याला फिल्मव्यवसायात येता आले, तर मन्गळामुळे यश मिळाले. पण लग्नेश मन्गळच असल्याने ( लग्नी म्हणजे पहिल्या स्थानी मेष रास, फार तापट स्वभाव ) हा बहकत गेला.

बाकी पत्रिका माझ्या लक्षात नाही. ही पत्रिका मी वाचली तेव्हा सलमान चे ऐश्वर्या बरोबर नुकतेच वाद-तमाशे झाले होते, त्याच दरम्यान अमीरची पत्रिका पण आली होती. पण ज्योतिष्याचा काही अभ्यास नसल्याने त्या लिहुन घेतल्या नव्हत्या. आता हे प्रकरण उद्भवले तेव्हा सहज आठवण झाली.

बाय द वे, ज्यान्च्या पत्रिकेत ( लहान मुलान्च्या देखील ) १० व्या स्थानी शुक्र असतो असे लोक कला किन्वा त्या क्षेत्राशी निगडीत असतात. नुसताच फिल्म व्यवसाय नाही तर आर्किटेक्चर, इन्टेरीअर डेकोरेशन, सन्गीत, नृत्य या क्षेत्रात पण आपोआप शिक्षण घेतात. याना सन्गावे लागत नाही अमुक एक शिक्षण घे म्हणून.

अवान्तराबद्दल क्षमस्व.

फार पूर्वी म. टा. ला वाचलं की सलीम ह्यांच्या बंगल्याचा आसपास एक भिकारीण होती तिची मुलगी सलीम ह्यांनी adopt केली आणि तिच्या आईला पैशाची मदत देऊन गावाला पाठवले तीच अर्पिता.

म्हणजे त्या दिवशी कोणीतरी म्हटलेले की सलमान खानचा दानशूरपणा ही व्यवस्थित केलेली ब्रांडीग आहे, तर ते तितकेसे खरे नाही. दानशूरपणा हा गुणधर्म त्यांच्यात उपजत आहे. हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणाच्या आधीपासून आहे.
----- अर्पिता खानच्या जन्माची गोष्ट माहित नाही. पण अर्पिताला आणण्यात जो मनाचा मोठेपणा दाखवला त्याच्या ०.०००००१ % मोठेपणा स्वत: च्या गाडीने उडवलेल्या अभागान्ना का नाही मिळाला ?

सलमानचा अत्यन्त भित्रा नायक. या भित्रेपणामुळेच १३ वर्षे (आणि अजुन किती हे माहित नाही) तो सतत पळतच आहे... घडलेल्या घटनेची जबाबदारी घेतली असती तर पळण्याची वेळच आली नसती... अर्थात साळवे दिवसाच्या ३०-५० लाखाला रु मुकले असते.

एग्झॅक्टली उदय! उलट आतापर्यन्त सलमान शिक्षा भोगुन बाहेर पण आला असता. आज त्याच्या प्रतिमेला जो तडा गेलाय तो भरुन निघणेच शक्य नाही.

नमस्कार,
आता पर्यंत लग्न होउन मुल बाळ देखील झाली असते. १३ वर्ष वाया तर घालवलीच आता पन्नाशीत बाशिंग बांधून तयार झालायं

धन्यवाद

Arpita was adopted by salmans father and not salman khan>>
आत्ता सलमान किती सहृदय आहे हे दर्शविण्यासाठी हे पुण्याचं बिल त्याच्या नावावर तयार केल गेलय.

<<आत्ता सलमान किती सहृदय आहे हे दर्शविण्यासाठी हे पुण्याचं बिल त्याच्या नावावर तयार केल गेलय.>>
----- सहृदय अशी एका घटनेत नाहिशी होत नाही किव्वा केवळ एकाच घटनेत दिसत नाही. अपघाताची झळ पोहोचलेल्या जिवान्ना किव्वा त्या सुरक्षा रक्षक रविन्द्र पाटिल ज्यान्नी FIR नोन्दवला त्यान्ची नन्तर वाताहत का लावली ? त्यान्च्या साठी एक अब्जान्श सहृदयता या भित्र्या खानाला का नाही दाखवता आली.

<<पुण्याचं बिल की पुण्यचं बिल ?>>
--- पुण्ण्याचे.... ण ला ण असे असेल

पुण्यचं हा शब्द बरोबर वाटत आहे. " त्याने बरीच पुण्यं केली आहे" या वाक्यावरुन असे दिसून येते की अनेकवचनीसाठी वेगळा शब्द योजण्यात आला नाही.

धन्यवाद

Pages