.
.
ऋन्मेषचा धागा बघताच शाहरुख खान चाच विषय असणार या गृहीतकावर चटकन पोहोचलेल्यांसाठी खास हा वरचा बॅनर..
सलमान खान,
‘मैने प्यार किया’ पासूनच ज्याच्या मी प्रेमात पडलो ते ‘मैने प्यार क्यू किया’ पर्यंत आणि त्याच्याही पुढे आजतागायत पडलेलोच आहे. याला कारणीभूत सलमानचा अभिनय, दिसणे, डोल्लेशोल्ले आणि स्टाईल तर आहेच पण त्याहीउपर जाऊन त्याची ‘बॉलीवूडचा दानशूर कर्ण’ अशी असलेली इमेज. लोक त्याच्यावर प्रेमच नाही करत तर मानतात त्याला. जेव्हा एखादा बिगबजेट, बड्या बॅनरचा, भलीमोठी स्टारकास्ट असलेला चित्रपट १०० कोटीच्या घरात गेल्याचा आनंद साजरा करत असतो, तेव्हा आपला सल्लू एखाद्या सौथेंडियन डब केलेल्या बी ग्रेड सिनेमावर २०० कोटी मिळवून जिममध्ये चुपचाप व्यायाम करत बसला असतो.
फक्त नावावर आणि पडद्यावरच्या आपल्या सहज वावरावर बॉक्स ऑफिस हिट करून सोडणारा दुसरा स्टार नसावा बॉलीवूडमध्ये. आणि हे शक्य तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही जनमानसात प्रचंड लोकप्रिय असता. आणि तो ते आहे हे वेगळे सांगायला नकोच. म्हणूनच त्याचे लग्न हि देखील त्याची खाजगी बाब न राहता ती एक राष्ट्रीय समस्या बनते. त्याने ते करूच नये असेच कित्येक तरूणींना वाटते. त्याच्या शर्ट काढत उघडे होण्यातही लोकांना अश्लीलता न दिसता लोक त्याच्या बॉडीवर फिदा होतात. त्याच्या चाहत्यांमध्ये मग स्त्री-पुरुष भेदही मिटतात. सर्वच वयोगटाचे आणि जातीधर्माचे लोक त्याच्यावर निस्सीम प्रेम करतात.
त्याचमुळे जेव्हा जेव्हा त्याच्या शिकार प्रकरणाचे, बेताल वागण्याचे, ऐश्वर्या प्रेमप्रकरणात मद्यप्राशन करत दंगा घालण्याचे किस्से चवीने रंगवले जातात, तेव्हा तेव्हा ‘सल्लू तुने ये क्यू किया’ असे नेहमी मनात येते. जेव्हा त्याच्या फूटपाथवासीयांना चिरडण्याच्या ‘हिट अॅण्ड रन’ केसबद्दल पहिल्यांदा ऐकले तेव्हा कानावर विश्वासच बसला नाही. सलमान हा राजश्री प्रॉडक्शनचा प्रेम होता आणि या प्रेमावर आमचा विश्वास होता. आमचा सल्लू कुठलेही बेजबाबदार आणि गैर कृत्य करूच शकत नाही, हा तो विश्वास!
.... आणि आज अचानक एवढे दिवस ती केस कोर्टात रखडल्यानंतर एक असे सत्य सामोरे आले की आम्हा सर्व चाहत्यांचा आजवरचा विश्वास सार्थ झाला आहे. नव्हे, सलमानबद्दलचा आदर एकंदरीतच दुणावला आहे. गाडी सलमान चालवत नसून त्याचा ड्रायव्हर चालवत होता. हे सत्य आज अखेरीस सलमानने कबूल केले आहे आणि तशी ग्वाही त्याच्या ड्रायव्हरने देखील दिली आहे.
आजवर ऐकले होते की नमकहलाल नोकर असतात जे खाल्या मीठाला जागायला मालकाचा गुन्हा आपल्या शिरावर घेतात. पण आज समजले की एवढे दिवस सलमानने आपल्या गरीब ड्रायव्हरला वाचवायला त्याचा गुन्हा आपल्या नावावर घेतला होता. कारण सलमानला माहीत होते की तो गरीब बिचारा ड्रायव्हर जर यात अडकला असता तर त्याचे आयुष्य उध्वस्त झाले असते, त्याच्या बायकापोरांचे हाल झाले असते. पण हाच गुन्हा जर आपण आपल्या नावावर घेतला तर आपण सेलिब्रेटी असल्याने आणि आपल्या देशातील कायदे सेलिब्रेटींना झुकते माप देत असल्याने आपण कदाचित तारून जाऊ. आणि तेच झाले..
आपल्या नोकरासाठी असा त्याग करणारा हा मालक, असा हा बॉलीवूडचा रिअल सुपर्रस्टार, विरळाच!
जर सैफ अली खानला पद्मश्री पुरस्कार मिळू शकतो, तर सलमान खान नक्कीच भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा हकदार बनतो.
तो पुरस्कार त्याला द्यावा की नाही यावर मी लवकरच वेगळा पोल काढेन,
पण तुर्तास आपल्या सल्लूभाईला तीन तोफांची सलामी !!!
ओहह खान तुस्सी ग्रेट हो !!!
सत्यमेव जयते !! जय हिंद !!!
- ऋन्मेऽऽष
उद्देश, १. >> गामा आपण
उद्देश,
१.
>> गामा आपण ओळखणारच. तुमचे रोजचे काम आहे
आहेच मुळी. कोणाचा लेंगा आणि कोणाचे डोळे ते मात्र विचारू नका.
२.
>> आपले भरकटवण्याचे काम जोमात सुरु राहू द्या.
असं कसं? मी तर ऋन्मेऽऽष यांची वाहवा करतो आहे. कुणाचेही लेंगे आणि डोळे असले, तरी पट्टी उघडून सत्याकडे अचूक अंगुलीनिर्देश करण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत आहे!
आ.न.,
-गा.पै.
खानांच्या लिष्टीत, केआरके चे
खानांच्या लिष्टीत, केआरके चे नाव न टाकल्याने रश्मी यांचा घोर नी गडद निषेध ! (हे दोन शब्द निषेधाची तीव्रता समजावी म्हणुन)
sarcastic वाटणार्यांना असे
sarcastic वाटणार्यांना असे का वाटते हे समजू शकेल का?
@ भारतरत्न
काय गैर आहे त्यात? कला जोपासणारे किंवा खेळात प्रावीण्य दाखवणारे मिळवू शकतात तर यांच्या जोडीने माणूसकी आणि सामाजिक बांधिलकी दाखवणार्याला का नाही मिळावे?
मला कोणी एखादे कारण सांगा जे लता मंगेशकर यांना भारतरत्न देऊ शकतो मात्र सलमान खान त्याला अपात्र ठरतो.
लता मंगेशकर या आपल्या गायन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कलाकार आहेत आणि त्यांनी रसिकांना आपल्या कलेने भरभरून आनंद दिला आहे.
हेच जर सलमान आपल्या क्षेत्रात करत असेल, इतर कोणापेक्षाही सर्वोत्तमरीत्या करत असेल, तर का नाही? नक्की कोणत्या निकषावर इतर भारतरत्न मिळालेले कलाकार त्याच्यापेक्षा सरस ठरतात?
@ भारतरत्न हा धाग्याचा विषय नाही, त्यामागच्या भावना समजून घ्यायला हव्या. लेखात स्पष्ट उल्लेखलेय की सैफ अली ला पद्मश्री मिळत असेल तर सलमानला भारतरत्न हवे. तरीही त्यावर चर्चा करायचीच असेल तर हरकत नाही, कारण माझ्या हातात असते तर मी नक्कीच सलमानला भारतरत्न दिले असते.
सलमानचे व्यक्तीमत्व महाभारतातल्या कर्णासारखे आहे.!
नक्कीच त्याने केलेल्या चुका या गुन्हा व अपराध या सदरात मोडतात, आणि त्याची त्याला शिक्षाही मिळेलच, नव्हे मिळायलाच हवी. पण तरीही त्याच्यात जे चांगले गुण आहे त्याचीही इतिहासाने दखल घ्यायलाच हवी!
ऋन्मेऽऽष तू अस म्हणालास कि ज्या लोकांना वर सलमानला भारतरत्न देण्याच्या विधानात उपहास दिसत नाही त्यांना सलमानला भारतरत्न मिळावे असे कोणाला वाटू शकते यावर विश्वास वाटतो का >>
पण तुझ्या ह्या सगळ्या विधानांवरून तरी अस वाटत नाही कि तू हे उपरोधाने लिहील आहेस
पण तुला एक सवय आहे स्वतःची चूक कधीच मान्य करायची नाही ,
आणि समर्पक उत्तर नसेल तर काहीतरी अतर्क्य बोलून स्वतःच चुकीच म्हणण पुढे रेटत राहायचं
आणि मी कस लॉजिकल उत्तर दिल अस म्हणून स्वतःचीच पाठ थोपटायची
आणि प्लीज अस अजिबातच म्हणू नकोस कि तुझे हे सगळे प्रतिसाद उपरोधिक आहेत
त्यापेक्षा हे कबूल कर कि या धाग्यात तू मांडलेले विचार किती चुकीचे आहेत
आपली चूक मान्य करण्यात मनाचा
आपली चूक मान्य करण्यात मनाचा मोठेपणा असतो, ऋन्मेष तो मोठेपणा फक्त नवीन नवीन धागे काढण्यासाठी वापरतो. बाकी आता नवीन हातभर पोस्ट वाचण्यासाठी सज्ज रहा.
जेम्स बॉन्ड, अहो तो नक्की कोणता कमाल आहे हे न कळल्याने यादीत टाकला नाही. दोन कमाल खान आहेत ना? एक गायक आणी तो दुसरा, मोदी निवडुन आले म्हणून देश सोडुन चाल्ला होता तो?
पण तुला एक सवय आहे स्वतःची
पण तुला एक सवय आहे स्वतःची चूक कधीच मान्य करायची नाही ,
आणि समर्पक उत्तर नसेल तर काहीतरी अतर्क्य बोलून स्वतःच चुकीच म्हणण पुढे रेटत राहायचं
आणि मी कस लॉजिकल उत्तर दिल अस म्हणून स्वतःचीच पाठ थोपटायची
>> किती त्या अवास्तव अपेक्षा मनरंग तुमच्या..
यापेक्षा मायबोलीवरील विखार कायमसाठी संपवणे एकवेळ सोपे असावे.
मग तो गेला का देश सोडून?
मग तो गेला का देश सोडून?
ह्यॅ! कसला जातोय. उगाच फुकटचे
ह्यॅ! कसला जातोय. उगाच फुकटचे फोटो छापुन घेतले पेप्रात. आला परत. पाकीस्तनात कोणी विचारत पण नसेल याला. इथे मात्र कमाल भाइ करुन मखरात बसवतात. खरे कलाकार रहातात बाजूला, असले टिनपाट येतात पुढे.
अश्या तर्हेने या पण धाग्यावर
अश्या तर्हेने या पण धाग्यावर मोदींचे आगमन झाल्यामुळे हा धागा अजरामर, पावन, अमर वगैरे वगैरे झाला असे मी जाहीर करत आहे.
सलमान खानचा फोटो आहे
सलमान खानचा फोटो आहे मोदींबरोबर पतंग उडवताना. ते कधीतरी इथे येणार हे अध्याहृतच होतं. कधी ते फक्त माहित नव्हतं. आता समजलं. तर ते असो.
गिरी
गिरी
मनरंग >>
मनरंग >> +१२३४५६७८९०.....
अगदी मला हेच म्हणायचे होते.
बाकी आता नवीन हातभर पोस्ट वाचण्यासाठी सज्ज रहा.>>
रश्मी, त्यासाठी आणि नवीन मुक्ताफळे ऐकण्यासाठी सुद्धा..
http://zeenews.india.com/mara
http://zeenews.india.com/marathi/news/kallabaji/sreemoyee-piu-kundu-face...
सलमान खानबाबत सोशल मिडियावर सुरू असलेल्या चर्चेत बोलणं श्रीमोयी पीयू कुंडू या लेखिकेला महागात पडलंय. सलमानच्या फॅन्सकडून त्यांना सोशल मिडियावर शिवीगाळ करण्यात आली इतकंच नव्हे तर सलमानच्या शिक्षेविरूद्ध अभियान चालवणाऱ्या सलमानच्या काही उत्साही फॅन्सनी त्यांचं फेसबुक अकाऊंदही बंद पाडलं.
अरे ए किती ट्यारपी वाढवाल या
अरे ए किती ट्यारपी वाढवाल या बेअक्कल धाग्याचा.
जावा आपापल्या घरी, पळा!
सलमान खानबाबत सोशल मिडियावर
सलमान खानबाबत सोशल मिडियावर सुरू असलेल्या चर्चेत बोलणं श्रीमोयी पीयू कुंडू या लेखिकेला महागात पडलंय. सलमानच्या फॅन्सकडून त्यांना सोशल मिडियावर शिवीगाळ करण्यात आली इतकंच नव्हे तर सलमानच्या शिक्षेविरूद्ध अभियान चालवणाऱ्या सलमानच्या काही उत्साही फॅन्सनी त्यांचं फेसबुक अकाऊंदही बंद पाडलं.>>>>>> येडपट लोक आहेत रे देवा. किती ती आन्धळी भक्ती आणी प्रेम.
दक्षु सुटते मी आता इथुन. ( पळणारी बाहुली)
टाटा
टाटा
ऋन्मेऽऽष तुम्ही आजिबात मनावर
ऋन्मेऽऽष
तुम्ही आजिबात मनावर घेऊ नका, सगळे जण तुमच्याबद्दल कौतुकानेच बोलत आहेत, त्यात तुम्ही आजिबात नतद्रष्टं नसल्या कारणाने ऊपहास शोधणार नाहीत हे मला माहिती आहे.
तुम्ही लिहित रहा मी तुम्हाला अनुमोदन देत राहिन. सलमानने जशी कधी कुणाची वा कश्याची पर्वा केली नाही तसेच आपणही करावे.
भारतरत्न पुरस्कार सलमानला द्यावा की नाही यावर मी लवकरच वेगळा पोल काढेन, >> मी वाट पहात आहे ह्या पोलची.
------------------------
काय आहे ना ऋन्मेष, आपल्याला काही मतं नसतांना, आपल्याला विषयाशी काहीही देणघेणं नसतांना, (मला खात्री आहे सलमान विषय तुम्हाला मायबोली सोडून ईतरवेळी शिवतही नसेल) काही तरी विवादास्पद विषयावर धागा काढून, ओळख नसलेल्या आयडीने मुद्दाम असं काहितरी लिहायचं ज्या कारणाने धागा आणि धागाकर्ता चर्चेत राहिल असा तुमचा हेतू असेल आणि त्यात जर तुम्ही फसवा आनंद शोधत असाल तर ह्याची खात्री बाळगा की ईथे माबोकरांची मानसिक गुंतवणूक आहे आणि त्याच्याशी खेळ करणार असाल तर माबोकर जे काही बोलतील त्यावरून तुमच्या ह्या सडलेल्या मानसिकतेबरोबरच ईतर चांगल्या गोष्टीं ज्या तुमच्यात आहेत त्याचेही असे खच्चीकरण होत राहिल की त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तीमत्वावर झाल्याशिवाय रहाणार नाही. तुम्ही मान्य करा अथवा नका करू (धागा ऊघडून सांगण्याचं ढोंग करण्याची तर आजिबात तसदी घेऊ नका) फरक फक्त तुम्हालाच पडणार आहे. जेन्यूईन लिहा, बोला तरंच मायबोलीकर प्रेम करतील आणि तुम्हालाही खराखरा आनंद मिळेल. लवकर सुधराल अशी अपेक्षा.
हायझेनबर्ग कशाला स्वतःची
हायझेनबर्ग कशाला स्वतःची एनर्जी वाया घालवतेस्/तोस?
या माणसात फरक पडणारे का काडीमात्र? अजून काहीतरी फालतू एक्स्प्लेनेशन घेऊन एक मोठी पोस्ट पडेल यावर.
दक्षिणा..तुमच्या टिआरपी च्या
दक्षिणा..तुमच्या टिआरपी च्या पोस्ट ला अगदी अनुमोदन!
धाग्याचे नाव वाचुनच मी हा धागाच वाचला नव्हता पण इतका का पेटला आहे म्हणुन वाचला आणि लक्षात आले कि प्रतिक्रिये वरती पण प्रतिक्रिया दिल्याने उगाचाच चर्चेत येतो धागा. सो याला इग्नोर करणे इष्ट.
@ मनरंग, विविध संदर्भाने
@ मनरंग, विविध संदर्भाने आलेले माझे प्रतिसाद आणि पोस्टी एखाद्याचे एखाद्याला गोंधळात पाडू शकतात हे कबूल करतो.
हा गोंधळ दूर सारायला व्यवस्थित सविस्तर लिहिताही येईल. वेळ काढून ते लिहेनही.
पण जर,
"तुला एक सवय आहे स्वतःची चूक कधीच मान्य करायची नाही ,
आणि समर्पक उत्तर नसेल तर काहीतरी अतर्क्य बोलून स्वतःच चुकीच म्हणण पुढे रेटत राहायचं"
असा निष्कर्श आपण आधीच काढला असेल तर मात्र तो खुलासाही व्यर्थ ठरेल.
..
@ हायझेनबर्ग,
आपण वर "फसवा आनंद" म्हणून एक शब्दप्रयोग योजलात.
आपल्यामते एखाद्याला खरा आनंद कसा मिळतो? तसेच, एखाद्याला राग का येतो हे समजू शकेल का?
सांगितलेच पाहिजे अशी जबरदस्ती नाही,
पण सांगितलेत तर मी माझ्या व्याख्यांशी पडताळून बघेन.
त्या व्याख्या ज्या मला आयुष्यानेच शिकवल्या आहेत.
हा गोंधळ दूर सारायला
हा गोंधळ दूर सारायला व्यवस्थित सविस्तर लिहिताही येईल. वेळ काढून ते लिहेनही.>>
ऋ लिहिच... मला वाचायचय.
हा धागा उपरोधानेच लिहिला
हा धागा उपरोधानेच लिहिला आहे.
यातील सलमानचे मैने प्यार कियापासूनचे हिरो / कलाकार म्हणून आवडणे खरे असले तरी ईतर भाग उपरोधानेच लिहिला आहे.
उपरोधाने लिहिलेले लिखाणात माझ्यामते तरी खाली तशी तळटीप लिहिणे वा प्रतिसादात ते तसे नमूद करण्यात काही मजा नसते.
तरी माझ्या ईतर प्रतिसादांना कोट करत मग यात उपरोध होता की नाही असे प्रत्येकी विचारण्यात काही अर्थ नाही. ते मग त्या त्या मूडने लिहिले होते. ज्याचा जसा समज झाला तसाच तो राहू दिला.
तरीही एखादा लेख उपरोधाने लिहिला आहे हे सुज्ञांना समजावे ईतपत तो सुस्पष्ट असण्याची काळजी घ्यावी लागते, जी माझ्यामते मी घेतली होती.
अगदी पैल्याच आलेल्या प्रतिसादाने त्यावर शिक्कामोर्तबही झाले. पुढेही आणखी काही जणांनी तसे लिहिले. मात्र काही जण गोंधळातच राहिले, त्याचे मी काही करू शकत नाही.
असो!
आता,
यात सलमानला टारगेट करण्यापेक्षा खरे तर मला सिस्टीमवर ताशेरे ओढण्यात जास्त रस होता. जिथे एवढी वर्षे केस चालत राहते आणि मग अचानक कश्यात काही नाही नसताना एखादा नवीन पुरावा उभा केला जातो. साराच न्यायप्रक्रियेच्या नावावर खेळखंडोबा.
सैफ अलीला पद्मश्री तर सलमानला भारतरत्न का नाही? यातला उपरोधही लक्षात येऊ नये. अर्थात यातही टिका पुरस्कार वाटप प्रक्रियेवरच होती.
सत्यमेव जयते! जय हिंद!!... दुर्दैवाने या शेवटच्या ओळींमध्येही उपरोधच होता.
नंतर,
काही दिवसांनी सलमानच्या शिक्षेचा धागा आला.
तिथे मात्र मी दिलेल्या प्रतिसादांत कसलाही ऊपरोध नव्हता.
सलमानला शिक्षा झाली त्यात न्यायालयाचे अभिनंदन वगैरे तर मौजेचा प्रकार होता. एवढ्या वर्षाने एका न्यायालयात निकाल सुनावला. मग पुढच्या न्यायालयात जाणार आणि केस तशीच चालू राहणार. जिथे संजय दत्तसारखा गंभीर गुन्ह्यात अडकलेल्यालाही एवढे वर्षांनी शिक्षा झाली तरी तो जेलमध्ये गेला असे वाटतच नाहीये तिथे सलमानला काही कठोर शिक्षा होईल अश्या आनंदात काही लोक होते. जे होणार नव्हतेच, पुढे झालेही नाहीच.
एक ओळीचा बातमीचा धागा आला आणि आपण सारे चर्चा करायला तुटून पडलो. का? कारण सलमान लोकप्रिय सेलेब्रेटी होता. म्हणून त्याच्यावर टिका करण्यातही आम्हाला सुख. अन्यथा आपल्यासाठी ही न्यूजही नसती. पण एकंदरीत आपली भ्रष्ट सिस्टीम, कछुवाछाप न्यायव्यवस्था, दारू पिऊन गाडी न चालवण्यासारखे नियम धाब्यावर बसवायची वृत्ती हे खरे या समस्येचे कारण सलमानला शिक्षा होवो न होवो तसेच राहणार.
सलमानचा गुन्हा काय, तर दारू पिऊन गाडी चालवली आणि ठोकली. ईथे तिथे ठोकण्याऐवजी त्याच्या आणि मरणार्यांच्या दुर्दैवाने ती फूटपाथवर झोपलेल्यांवर गेली.
यात दारू पिणे आणि दारू पिऊन गाडी चालवण्याचा नियम मोडणे याचा संबंध नाही का?
पण तेच त्या धाग्यावर दारूला दूषणे दिली तर ते कोणाला खपवून घेता आले नाही. का? तर आम्हाला सलमानवरच ताशेरे ओढायचे आहेत. सलमानसारख्या सेलेब्रेटीला शिक्षा झाली तर कुठेतरी आपल्यासारख्या सामान्य माणसांचा ईगो सुखावतो. खूप पैश्याचा माज होता, बसेल आता सडत जेलमध्ये.
पुढे सलमानला वाचवण्याचे जे प्रयत्न झाले. जे यशस्वी प्रयत्न झाले असे म्हणू शकतो. त्याला जबाबदार आपली सडकी सिस्टीमच आहे. ईथे त्या सर्व वाटा तयार आहेत. यात रवींद्र पाटीलशी जे झाले ते दुर्दैवीच होते, पण आज अचानक मिडीयाचा एक गट त्याला हुतात्मा बनवायच्या मागे लागलाय तो एवढे वर्ष कुठे झोपला होता हा प्रश्न नाही पडत आपल्याला? आपला काहीतरी स्वार्थ दिसल्यावरच त्यांना जाग आली आहे. आणि ज्यांना खरेच काही पडलीय त्यांचाही या लोकांमार्फत केवळ फायदाच उचलला जाणार आहे.
उरलो आपण संवेदनशील सामान्य माणसे. तर दोन प्रकारचे मेसेज सोशलसाईटवर तुफान फिरताना दिसत आहेत. एक म्हणजे सलमानची निंदा करणारे, सामान्यजणांच्या भावनांना हात घालणारे आणि दुसरे म्हणजे या हिट-रन प्रकरणावरचे बाष्कळ विनोद. आणि आपण ते दोन्ही फॉर्वड करत एंजॉय करत आहोत.
सलमान गुन्हेगार आहे हे सत्य आहे आणि सत्यच राहणार. त्याला कायद्यानुसार योग्य ती शिक्षा मिळायलाच हवी. पण आपण सलमानचा राग-तिरस्कार नक्की का आणि कोणत्या लेव्हलला करत आहोत याचा प्रत्येकाने प्रामाणिक विचार करावा.
वा! टाळ्या. स्वतःच्या
वा! टाळ्या.
स्वतःच्या मुक्ताफळांची सालपटे जेंव्हा निघायला लागलीत, तेंव्हा सुमडीमधे दुसर्या पार्टीचं कातडं पांघरून पलीकडे जाऊन बसलाय, म्हणे पुर्ण धागाच उपरोधाने लिहीला होता!
हा धागा आधी आलाय स्.खा. ला शिक्षा व्हायच्या,आणि तुला आधीच भारतरत्न वगैरे उपरोध सुचला, कसला हुश्शार ना रे तू?
अरारारा...... अजूनबी पारंच
अरारारा...... अजूनबी पारंच यडे समजू राहयले राव तुम्ही माबोकरांना.... मदारीकडची माकडं बी दिवसाला एवढ्या कोलांट्या ऊड्या मारत न्हाईती.
चल जमुरे ईधरसे कलटी खाने का टाईम आ गयेला है......ईधर पैलेसेही भौत काँपिटिशन है तेरेको.
आशूजी, हा धागा त्याच्या
आशूजी,
हा धागा त्याच्या ड्रायव्हरवर आरोप पडला आणि केसला कलाटणी मिळतेय अशी चिन्हे दिसू लागली तेव्हा आला. त्यामुळे आपला मुद्दा मला नेमका समजला नाही.
असो,
मुळात सलमान खान आवडणे हा देखील गुन्हा म्हणता येणार नाही.
असल्यास गेले कित्येक वर्षे म्हणजे त्याने केलेल्या गुन्ह्यानंतरही आपण सर्वांनीच त्याचे चित्रपट बहिष्कार न टाकता पाहिले आहेत तर आपण सर्वांनीच तो गुन्हा केला आहेच.
पण आज अचानक आपण सर्वांनीच पार्टी चेंज केली आहे.
एवढेच नाही तर आता तो सुटून त्याचा पुढचा चित्रपट येईल तेव्हाही आपण तो बघून त्यावर इथेच मायबोलीवर चर्चा करू आणि पुन्हा एकदा पार्टी चेंज करू.
आणखी एक गंमत सांगतो,
मी कोणत्याही खानाचे चित्रपट बघत नाही असा एक डायलॉग सोशलसाईटवर मी बरेच देशभक्तांकडून ऐकतो.
मात्र एखादा नवा चित्रपट आला की तो सर्वात पहिला बघून, एंजॉय करून, तो कसा खराब आहे हे सांगायची याच लोकांची चढाओढ लागते. हे मी माझ्या ऑर्कुट पासूनच्या अनुभवावरून सांगतोय.
हायझेनबर्ग, आपल्यासाठी वर एक
हायझेनबर्ग,
आपल्यासाठी वर एक प्रश्न आहे. आनंदाबद्दल. उत्तर द्याल तर आवडेल मला
अन्यथा कधीतरी माझा धागा येईलच त्यावर. तेव्हा आपण आपली व्याख्या पडताळून पहा.
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
सलमानचे व्यक्तीमत्व महाभारतातल्या कर्णासारखे आहे.! >>> प्रहचहंडह अनुमोदन.
मी तर पुढे जाऊन असे म्हणेन की सलमानचे व्यक्तीमत्व भीष्मासारखे सुद्धा आहे जसा भीष्म राजसुखात राहूनही आजन्म ब्रम्हचारी राहिला तसा सलमान त्याच्या चहुबाजूंना अतिशय सुंदर ललनांचा कायम वावर असूनही नव्हे भीष्माने राजकन्यांना जिंकून आणले पण कधी स्पर्श केला नाही तसे सलमानने लाखो करोडो तरूणी जिंकल्या पण आपले ब्रम्हचर्य कधी ढळू दिले नाही.
खरं सांगायचं त्याही पुढे जावून मला असं म्हणावं वाटतंय की सलमान तर भगवान श्रीकृष्णासारखा सुद्धा आहे, शिशूपालाचे शंभर अपराध भरताच श्रीकृष्णाने आपले चक्र शिशूपाला वर सोडून त्याचा वध केला. आपल्या सलमानकडे स्टेपनीसहित पाच चक्रे होती जी त्याने शंभर दिवस फुटपाथवर झोपण्याचे अक्षम्य पाप करणार्या पाचांवर सोडून 'विनाशायच दुष्क्रिताम' ऊक्ती साध्य केली.
हँग ऑन...... प्रभू रामचंद्रांचे व्यक्तीमतव पडताळून पहात आहे...त्यांच्यात आणि सलमानमध्ये साम्यस्थळं शोधणारा प्रोग्राम रन केला पण एवढी साम्यथळं सापडेली की प्रोग्राम ईन्फायनाईट लूप मध्ये अडकला आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
ऋन्मेऽऽष , बाबा किती त्या
ऋन्मेऽऽष ,
बाबा किती त्या कोलांट्या उड्या .
माबोकरांच मानसिक वय नक्की किती आहे अस तुला वाटत ?
वर मनरंग यानी बोल्ड केलेल सगळ तूच लिहिलयस ना ?
माबोकरांच मानसिक वय नक्की
माबोकरांच मानसिक वय नक्की किती आहे अस तुला वाटत ?
>>>
माबोकर इथे ते चेक करू शकतील,
http://www.maayboli.com/node/52264
माझे स्वताचे १० आहे
वर मनरंग यानी बोल्ड केलेल सगळ तूच लिहिलयस ना ?
>>>
हो !
पण त्यांनी काढलेला अर्थ चुकीचा आहे
नमस्कार, धागा उपहासात्मक आहे
नमस्कार,
धागा उपहासात्मक आहे यात अजिबात शंका नाही. बर्यापैकी फिरकी घेतली आहे. काही मोजक्या मायबोलीकरांना लेखातले उपहासात्मक व्यंग दिसून आले. बाकीच्यांनी निव्वळ थिल्लरपणा केला आहे. हे प्रतिसाद वाचल्यावर कळून चुकले. व्यंग दिसण्याकरीता तशी दृष्टी आवश्यक असते. बहुसंख्य मायबोलीकरांना ती नाही आहे हे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. बहुदा लेखकाचे पुर्वश्रमीच्या धाग्यांवरुन या धाग्याची योग्यता पडताळून पाहण्यात आल्यामुळे असे घडले असावे.
धन्यवाद
दिनेश्क, >> काही मोजक्या
दिनेश्क,
>> काही मोजक्या मायबोलीकरांना लेखातले उपहासात्मक व्यंग दिसून आले.
>> बाकीच्यांनी निव्वळ थिल्लरपणा केला आहे.
मला उपहासात्मक व्यंग दिसून आलं नाही. तरीपण मी थिल्लरपणा न करता ऋन्मेऽऽष यांची वाहवा केली आहे. त्यामुळे माझ्यासाठी एक वेगळी क्याट्यागिरी काढाच.
आ.न.,
-गा.पै.
Pages