.
.
ऋन्मेषचा धागा बघताच शाहरुख खान चाच विषय असणार या गृहीतकावर चटकन पोहोचलेल्यांसाठी खास हा वरचा बॅनर..
सलमान खान,
‘मैने प्यार किया’ पासूनच ज्याच्या मी प्रेमात पडलो ते ‘मैने प्यार क्यू किया’ पर्यंत आणि त्याच्याही पुढे आजतागायत पडलेलोच आहे. याला कारणीभूत सलमानचा अभिनय, दिसणे, डोल्लेशोल्ले आणि स्टाईल तर आहेच पण त्याहीउपर जाऊन त्याची ‘बॉलीवूडचा दानशूर कर्ण’ अशी असलेली इमेज. लोक त्याच्यावर प्रेमच नाही करत तर मानतात त्याला. जेव्हा एखादा बिगबजेट, बड्या बॅनरचा, भलीमोठी स्टारकास्ट असलेला चित्रपट १०० कोटीच्या घरात गेल्याचा आनंद साजरा करत असतो, तेव्हा आपला सल्लू एखाद्या सौथेंडियन डब केलेल्या बी ग्रेड सिनेमावर २०० कोटी मिळवून जिममध्ये चुपचाप व्यायाम करत बसला असतो.
फक्त नावावर आणि पडद्यावरच्या आपल्या सहज वावरावर बॉक्स ऑफिस हिट करून सोडणारा दुसरा स्टार नसावा बॉलीवूडमध्ये. आणि हे शक्य तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही जनमानसात प्रचंड लोकप्रिय असता. आणि तो ते आहे हे वेगळे सांगायला नकोच. म्हणूनच त्याचे लग्न हि देखील त्याची खाजगी बाब न राहता ती एक राष्ट्रीय समस्या बनते. त्याने ते करूच नये असेच कित्येक तरूणींना वाटते. त्याच्या शर्ट काढत उघडे होण्यातही लोकांना अश्लीलता न दिसता लोक त्याच्या बॉडीवर फिदा होतात. त्याच्या चाहत्यांमध्ये मग स्त्री-पुरुष भेदही मिटतात. सर्वच वयोगटाचे आणि जातीधर्माचे लोक त्याच्यावर निस्सीम प्रेम करतात.
त्याचमुळे जेव्हा जेव्हा त्याच्या शिकार प्रकरणाचे, बेताल वागण्याचे, ऐश्वर्या प्रेमप्रकरणात मद्यप्राशन करत दंगा घालण्याचे किस्से चवीने रंगवले जातात, तेव्हा तेव्हा ‘सल्लू तुने ये क्यू किया’ असे नेहमी मनात येते. जेव्हा त्याच्या फूटपाथवासीयांना चिरडण्याच्या ‘हिट अॅण्ड रन’ केसबद्दल पहिल्यांदा ऐकले तेव्हा कानावर विश्वासच बसला नाही. सलमान हा राजश्री प्रॉडक्शनचा प्रेम होता आणि या प्रेमावर आमचा विश्वास होता. आमचा सल्लू कुठलेही बेजबाबदार आणि गैर कृत्य करूच शकत नाही, हा तो विश्वास!
.... आणि आज अचानक एवढे दिवस ती केस कोर्टात रखडल्यानंतर एक असे सत्य सामोरे आले की आम्हा सर्व चाहत्यांचा आजवरचा विश्वास सार्थ झाला आहे. नव्हे, सलमानबद्दलचा आदर एकंदरीतच दुणावला आहे. गाडी सलमान चालवत नसून त्याचा ड्रायव्हर चालवत होता. हे सत्य आज अखेरीस सलमानने कबूल केले आहे आणि तशी ग्वाही त्याच्या ड्रायव्हरने देखील दिली आहे.
आजवर ऐकले होते की नमकहलाल नोकर असतात जे खाल्या मीठाला जागायला मालकाचा गुन्हा आपल्या शिरावर घेतात. पण आज समजले की एवढे दिवस सलमानने आपल्या गरीब ड्रायव्हरला वाचवायला त्याचा गुन्हा आपल्या नावावर घेतला होता. कारण सलमानला माहीत होते की तो गरीब बिचारा ड्रायव्हर जर यात अडकला असता तर त्याचे आयुष्य उध्वस्त झाले असते, त्याच्या बायकापोरांचे हाल झाले असते. पण हाच गुन्हा जर आपण आपल्या नावावर घेतला तर आपण सेलिब्रेटी असल्याने आणि आपल्या देशातील कायदे सेलिब्रेटींना झुकते माप देत असल्याने आपण कदाचित तारून जाऊ. आणि तेच झाले..
आपल्या नोकरासाठी असा त्याग करणारा हा मालक, असा हा बॉलीवूडचा रिअल सुपर्रस्टार, विरळाच!
जर सैफ अली खानला पद्मश्री पुरस्कार मिळू शकतो, तर सलमान खान नक्कीच भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा हकदार बनतो.
तो पुरस्कार त्याला द्यावा की नाही यावर मी लवकरच वेगळा पोल काढेन,
पण तुर्तास आपल्या सल्लूभाईला तीन तोफांची सलामी !!!
ओहह खान तुस्सी ग्रेट हो !!!
सत्यमेव जयते !! जय हिंद !!!
- ऋन्मेऽऽष
@ मनरंग, सॉरी फॉर लेट
@ मनरंग,
सॉरी फॉर लेट रिप्लाय, पण एक शंका आता सुचली.
आपण माझ्या कोट केलेल्या वाक्यांमध्ये मी सलमानची कर्णाशी तुलना केलेली ते वाक्य कोट केलेले.
तर माझी शंका अशी आहे की ते आपण सलमानचे कौतुक या अर्थाने घेतले की सलमान वर केलेली टिका या अर्थाने घेतले.
कारण कर्ण हा महाभारतातील असा पात्र आहे की काही लोक त्याला देव समजतात तर काही दानव.
अजुन हा तेच दळण दळतोय. ए
अजुन हा तेच दळण दळतोय.
ए चक्कीवाला...............:P
@ मनरंग, सॉरी फॉर लेट
@ मनरंग,
सॉरी फॉर लेट रिप्लाय, पण एक शंका आता सुचली.
आपण माझ्या कोट केलेल्या वाक्यांमध्ये मी सलमानची कर्णाशी तुलना केलेली ते वाक्य कोट केलेले.
तर माझी शंका अशी आहे की ते आपण सलमानचे कौतुक या अर्थाने घेतले की सलमान वर केलेली टिका या अर्थाने घेतले.
कारण कर्ण हा महाभारतातील असा पात्र आहे की काही लोक त्याला देव समजतात तर काही दानव.
मी कर्णाला ना देव समजते ना दानव
मी त्याला एक मानव समजते एक असा मानव ज्याच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला
आणि तू सलमानची आणि कर्णाची केलेली तुलना मला पटली नाही म्हणून मी ते वाक्य कोट केल
कारण माझ्यासाठी कर्ण हा सलमानपेक्षा खूप चांगला आहे .
तू ते वाक्य तुझ मत म्हणून लिहिलयस की उपरोधिक म्हणून हे जाणून घेण्यात मला काडीचही स्वारस्य नाही
कारण मी जर अस म्हणाले की तू कर्णाची आणि सलमानची खरोखर तुलना केली तर तू म्हणणार
की तो उपरोध होता
आणि मी जर अस म्हणाले की ते वाक्य उपरोधिक होत तर तू म्हणणार की तो उपरोध नसून तू खरच कर्ण आणि सलमानची तुलना केली आहेस
बाकी तू सलमानची तुलना कर्णाशी करून त्याच कौतुक केल आहेस का टीका केली आहेस ह्याच्याशी मला काही देण घेण नाहीये
थोडक्यात काय मी काहीही लिहील तरी तू त्यातून तुला जो हवा तोच अर्थ काढणार आणि मला खोडून काढणार
कारण स्वतःची चूक मान्य करण्यापेक्षा एक्सक्यूज देण हा तुझा फंडा आहे
आणि माझ्या ह्या प्रतिसादावर तुझ कसलंही उत्तर वाचण्यात मला इंटरेस्ट नाही
तुझ्या लेखावर प्रतिक्रिया दिली हीच माझी चूक झाली त्याबद्दल माफ करा
गुन्हा केल्यावर सलमान पळून
गुन्हा केल्यावर सलमान पळून गेला याचाच अर्थ त्याने तो गुन्हा स्वतःशी कबूल केला.
>>>>
हा काही युक्तीवाद होऊ शकत नाही. कुठल्याही कोर्टात चालत नसावा. आपल्यावर आळ येईल अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्या भितीनेही लोक पळतात. उलट साधी माणसंच अश्या परिस्थितीत जास्त घाबरतात.
लोकप्रिय असल्याने लोकांचा रोष ओढवून घेण्यापेक्षा परिस्थितीपासून पलायन करण्याचा त्याचा निर्णय मानव्य सुलभ आहे.
>>>>>>>
एक्झॅक्टली, जी गोष्ट मानव्य सुलभ आहे त्यासाठी एखाद्याचा तिरस्कार करणे कितपत योग्य.
गुन्हा सिद्ध झाला आहे कोर्टात. आणि कोर्ट काय मुर्ख आहे का सलमानला उगिचच अडकवायला? आग असल्याशिवाय धूर निघत नाही.
>>>>>>>
एका कोर्टात सिद्ध झाला आहे पण केस वरच्या कोर्टात गेली आहे, याचा अर्थ अजूनही अंतिम निकाल लागला नाहीये.
आपण म्हणालात त्याच धर्तीवर असेही म्हणू शकतो की गुन्हा सिंद्ध झाला आहे तर कोर्ट काय मुर्ख आहे का जे त्याला अजूनही मोकळे सोडलेय?
btw कोर्टाने त्याला फक्त जामीन दिलाय ,त्याची केसमधून मुक्तता नाही केली
तुझा हा प्रतिसाद खरा असेल तर काही बोलण्यात अर्थच नाही
आणि तुझ्या मते उपरोधिक असेल तर उपरोध अजिबात जमला नाही
अर्थात तू आधी तुझ नक्की मत काय आहे ते ठरव कारण तुझी मत बदलत असतात
मी तर म्हणते सगळ जग मूर्ख आहे फक्त तू सोडून
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ही माझी ह्या धाग्यावरची शेवटची पोस्ट
मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण
मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा
मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण
मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा
ओ अप्पा गल्ली चुकल की राव
ओ अप्पा गल्ली चुकल की राव तुमी. घ्या, आता ऋन्मेष भावला नवीन विषय मिळाला. क्या खोया क्या पाया!:खोखो:
अर्रर्र चुक्याच
अर्रर्र चुक्याच
क्या खोया क्या
क्या खोया क्या पाया!>>>>>>>>>> नविन राडेबाज आणि विखारयुक्त पोस्टींचा धागा येत आहे हो.....................:P
नमस्कार, आंतरराष्ट्रीय
नमस्कार,
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कमी असुन देखील पेट्रोल डिझेल यांचे भाव मोदीसरकारने वाढवले याचा तीव्र निषेध.
धन्यवाद
ऋन्मेष ह्या आयडीला समजूतेच्या
ऋन्मेष ह्या आयडीला समजूतेच्या गोष्टी सागणार्या आणि त्याच्या ऊद्धट न बोलण्याची भलामण करणार्या लोकांना अजूनही हा आयडी जेन्यूईन वाटतो आहे का?
जिथं आपलं बूड ऊघडं पडलेलं आहे त्या प्रतिसादांना टाळून, थंड डोक्याने प्लॅन करून निरागस भासतील अशी चीड आणणारी मूर्ख विधाने करून 'अरे ह्याला थोडे सांगावे' ह्या लोकांच्या चांगल्या भावनेचा गैरफायदा घेवून त्यावर फीड होणारा ट्रोल आहे हा आयडी आणि लोकांना हे अजूनही ध्यानात येत नाहीये म्हणजे कमालच आहे. सल्ल्या द्यायला आलेले भलेभले जुने नवे सदस्य गप्प गार केले की, आणि अजूनही लोकांना ह्या आयडीच्या धाग्यावर लिह्याची हौस आहे.
अहो जेयुइन असो किंवा डू. वात
अहो जेयुइन असो किंवा डू. वात आणला आहे हे खरं.
त्या आयडीचे ईंटेशन्स जेन्यूईन
त्या आयडीचे ईंटेशन्स जेन्यूईन नाहीत असे मह्णायचे होते.लोकांच्या चांगूलपणाची नस पकडून त्यांना मूर्ख बनवणे हेच काम हा आयडी मागचे कैक महिने करीत आहे.
ह्याला इग्नोर का नाही करत
ह्याला इग्नोर का नाही करत लोक?![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
मी करतो बुवा...
मी करतो बुवा...
या धाग्यावरुन एक जुनी ऐकलेली
या धाग्यावरुन एक जुनी ऐकलेली ग़ोष्ट आठवली.
एका कुस्तीयोध्याला एक किरकोळ माणुस अव्हान देतो आणि कुस्ती खेळण्यासाठी आमंत्रण देतो. कुस्तीयोध्याला आश्चर्य वाटत तरी तो ते स्विकारतो.
कुस्तीच्या दिवशी दोघेही रिंगणात उतरतात. पहिल्या फ़टक्यात कुस्तीयोद्धा त्या माणसाला धरुन जमिनीवर लोळवतो आणि त्याची पाठ जनिनीला लावतो आणि म्हणतो मी जिंकलो. माणुस हसतो आणि म्हणतो पाठ लावलिस पण पोट कुठे लावलस?
कुस्तीयोद्धा क्षणात त्याला फ़िरवतो आणि त्याच पोट जमिनीला लावतो
.माणुस परत हसतो आणि कुस्तीयोध्याला म्हणतो पोट लावलस पण पाठ कुठे लावलिस? यावर कुस्तीयोद्धा परत त्या माणसाची पाठ जमिनीला लावतो. तो माणुस परत हसतो आणि म्हणतो पाठ लावलिस पोट कुठे लावलस.
हे ४-५ वेळेला घडल्यावर कुस्तीयोद्धा म्हणतो अरे तुझी पाठ आणि पोट दोन्ही मी जमिनिला लावल तु हरल्याच मान्य का करत नाहिस?
तो मा मणुस कुस्तीयोध्याला सांगतो जेव्हा तु माझ पोट आणि पाठ एकच वेळी जमिनीला लावशिल तेव्हाच तू जिंकलास तो पर्यंत नाही.
हे ऐकल्यावर कुस्तीयोद्धा कुस्ती चा नाद सोडतो आणि आपली हार मान्य करुन तिथुन निघुन जातो.>>>>>>
ही वर यूरो या आय डीने लिहीलेली गोष्ट आहे. तीच ऋन्मेषला लागु होते. कुस्तीगीर म्हणजे प्रत्येक मायबोलीकर आणी किरकोळ माणुस म्हणजे ऋन्मेष, थाम्बा थाम्बा अजून एक हट्टी आय डी आहे की किरकोळ माणसासारखा. कळले असेलच कोण ते, नसेल कळले तर? मला नका विचारु.:फिदी:
इतके ओरडणे चालू आहे तरी या
इतके ओरडणे चालू आहे तरी या धाग्यावर येउन काही आयडी स्वतःची मुक्ताफळे उधळत आहे. अशा आयडींची मानसिक स्थिती समजणे मला तरी कठीण आहे. नाही आवडत ना मग कशाला त्याच त्याच धाग्यांवर येउन दंगा करायचा भलते सलते बोलून विषय भरकटवायचा? नंतर ते ही खापर धागाकर्त्यांच्याच माथी फोडायचे हेच मागील ४-५ पाने उद्योग काही विशिष्ट आयडींचे चालु आहे. त्यावर धागाकर्त्याने प्रतिवाद केला तर हेटाळणी करायचे आणि मुळ मुद्द्यावर लिहिले तर "**गिरी, लूज कॅरेक्टर" या शब्दात ऐकवले जाते. समोरचा शांततेत थट्टा म्हणुन ऐकून घेतोय म्हणुन काही विशिष्ट आयडी स्वतःच्या अकलेची दिवाळी साजरी करायला सुरुवात केली.
दोष धागाकर्त्यांचा नाही तर अशा आयडींचा आहे.
अति झाले आणि हसू आले अशी काहींची परिस्थिती इथे दिसून येत आहे.
उदेश, >> अति झाले आणि हसू आले
उदेश,
>> अति झाले आणि हसू आले अशी काहींची परिस्थिती इथे दिसून येत आहे.
तरीपण तुमच्या एकाही संदेशात हास्याकृती (=स्मायली) दिसंत नाही!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आ.न.,
-गा.पै.
लाज वाटते , जगातील यच्चयावत
लाज वाटते , जगातील यच्चयावत शिव्या द्याव्याशा वाटतात सल्लु आणि त्याच्या समर्थकाना
ॠन्मेश जी स्पष्ट करा की हा धागा औपहासिक आहे किंवा कसे //// ?
उद्देश यांच्याशी १००% सहमत
उद्देश यांच्याशी १००% सहमत आहे.
पब्लिकने इथे झोडल्यामुळे अजून
पब्लिकने इथे झोडल्यामुळे अजून नवीन बीबी आला नाहिये![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नवा विषय मिळाला नसेल हो.
नवा विषय मिळाला नसेल हो.
कशाला खाजवून खरूज काढताय?
कशाला खाजवून खरूज काढताय?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
धक्कादायक: सलमानच्या 'हिट अँड
धक्कादायक: सलमानच्या 'हिट अँड रन'च्या महत्त्वाच्या फाईल्स मंत्रालयात आगीत खाक
मुंबई: सलमान खान 'हिट अँड रन' प्रकरणात एक धक्कादायक बाब पुढे आलीय. आरटीआय अंतर्गत गृह विभागानं दिलेल्या माहितीनुसार सलमान खान हिट अँड रन प्रकरणातील महत्त्वाच्या फाईल मंत्रालय आगीत जळून खाक झाल्या आहेत.
आरटीआय कार्यकर्ता मंसूर दर्वेश यांनी या केसबद्दल माहिती देण्यास नकार देत सरकारी विभागानं लिहिलंय की, २००२च्या सलमान खान हिट अँड रन प्रकरणात अनेक कागदपत्र २०१२च्या मंत्रालय आगीत जळून खाक झालेत म्हणून माहिती देऊ शकत नाही.
मंसूर यांनी सरकारच्या दोन्ही विभागांना आरटीआय अंतर्गत विचारलं होतं की, अभिनेता सलमान प्रकरणी राज्य सरकारकडून केस लढण्यासाठी आतापर्यंत किती काऊंसल, अॅडव्होकेट, सॉलिसिटर, लीगल अॅडवायझर आणि पब्लिक प्रॉसिक्युटर नियुक्त केले गेलेत. मंसूर यांनी या सर्वांच्या नावासह प्रकरणाची शिक्षा सुनावली त्या दिवशी म्हणजे ६ मे रोजी एकूण किती खर्च झाला याची संपूर्ण माहिती मागविली होती.
आरटीआयच्या उत्तरादाखल गृह विभागानं लिहिलं, २१ जून २०१२ ला मंत्रालयात लागलेल्या आगीत कागदपत्र आणि रेकॉर्ड जळून खाक झाले होते. ज्यात या केससंबंधीत कागदपत्र पण होते. म्हणून ही माहिती मिळू शकत नाही.
२८ डिसेंबर २००२ला रात्री सलमान खानच्या लँड क्रूझर एसयूव्ही वांद्रे इथं फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या अंगावर चढवली होती. यात ४ जण जखमी आणि एकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी १२ वर्षांनंतर ६ मे २०१५ला मुंबई सेशन्स कोर्टानं सलमानला दोषी मानत पाच वर्षांची शिक्षा सुनावलीय. मात्र मुंबई हायकोर्टात आता हे प्रकरण आहे आणि सलमान सध्या जामीनावर बाहेर आहे.
२००२च्या सलमान खान हिट अँड रन
२००२च्या सलमान खान हिट अँड रन प्रकरणात अनेक कागदपत्र २०१२च्या मंत्रालय आगीत जळून खाक झालेत म्हणून माहिती देऊ शकत नाही. >>
मस्त. म्हणजे जर कागदपत्र जळली देखील नसेल तरी २०१२च्या आगीत जळले म्हणून ठोकून दिले तरी आता चालू शकणार.
अजबच सरकार
आणि गम्मत म्हणजे <<< मंसूर यांनी या सर्वांच्या नावासह प्रकरणाची शिक्षा सुनावली त्या दिवशी म्हणजे ६ मे रोजी एकूण किती खर्च झाला याची संपूर्ण माहिती मागविली होती.>>> ६ मे २०१५ ची माहीती मागितली होती त्याला उत्तर म्हणून २०१२ला लागलेल्या आगीचा अहवाल दिला गेला
पुरु राजकुमार आठवतोय का
पुरु राजकुमार आठवतोय का कोणाला?
हो.
हो.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आज खरा आनंद झाला. भारतात
आज खरा आनंद झाला. भारतात सर्वत्र असहिष्णुतेचे वातावरणाची अफवा जी पसरली होती तिला खाली खेचण्याचे काम आजच्या सलमानच्या निकालाने केले. एक माणूस काहीही गुन्हा नसताना निव्वळ प्रसिद्ध आहे म्हणून तब्बल १३ वर्ष मनस्ताप सहन करत होता. भारतीय न्यायालयाने आज त्या बिचार्याचा मनस्ताप दुर केला. देशात न्याय आहे कायदा आहे. या वाक्यावर नितांत श्रध्दा होती आहे आणि आजपासून सदैव राहणार. आज आनंदाचा दिवस आहे. काही मुद्दे न्यायालयात मांडले गेले ते असे:-
१. सरकारी साक्षिदार रविंद्र पाटील यांच्या वक्तव्यावर विश्वास नाही :-
२. सलमान गाडी चालवत होता याचा पुरावा नाही :-
३. त्यावेळी गाडीचा स्पीड किती होता त्याबाबत ठाम पुरावा नाही
४. अपघातानंतर टायर फुटला होता ही गोष्ट खोटी निघाली
५. सलमानसाहेब नशेत होते हे सुध्दा सिध्द झाले
६. सरकारी पक्ष आरोप सिध्द करण्यात अपयशी ठरला
७. खालच्या कोर्टात सुध्दा केसमधे कच्चे दुवे ठेवले गेले
८. गायक कमाल खान यांची तपासणी करायला हवी होती पण केली नाही
तसे पतंग उडवताना लक्षात आले होते साहेब खुश आहे म्हणजे यांनी काहीच गुन्हा केला नसेल निर्दोष सुटका होईल. अतिशय निर्मळ स्वच्छ मनाने पतंग उडवताना बघितले होते. इतका निरागसपणा लहान मुलाच्या चेहर्यावर सुध्दा नसेल. खरच मनात काही पाप नसेल ना तर ते चेहर्यावर उठून दिसते.
१३ वर्ष त्याचे चाहत्यांनाच सत्य ठाऊक होते पण आज सर्व जगाला कळले. न्यायव्यवस्था हळु आहे पण अचूक आहे. खरच आज फार आनंद झाला आहे.
पुढचा भाईजानचा चित्रपट ५०० कोटीचा गल्ला घ्यायलाच पाहिजे. देशाचे नाव अश्यालोकांमुळेच जगभरात उज्ज्वल होते. आणि ही बातमी मोठ्या गर्वाने बाहेरच्या देशांमधे सांगा याने देशाची बदनामी होणार नाही.
जय हो.
भाई सुटले .. भाई सुटले .. भाई
भाई सुटले .. भाई सुटले .. भाई सुटले ... व्हॉटसपवरची नाचणारी मुलगी.. व्हॉटसपवरची नाचणारी मुलगी.. व्हॉटसपवरची नाचणारी मुलगी..
ऋन्मेष, लाज , लाज वाटते सलमान
ऋन्मेष, लाज , लाज वाटते सलमान निर्दोष सुटला असे म्हणताना.
अर्थात तो सुटणार हे माहित होतेच.
सत्तेत कोणीही असो, हा मोठमोठ्या पदावरिल व्यक्तींच्या निकट असायचा.
कुठल्याही सरकारच्या शपथविधीत दिसायचा.
तो कसा न्यायप्रिय, कसा गरिबांचा मसिहा सांगणारे चित्रपट यायचे.
तेव्हाच कळलं होतं.
त्या गाडीखाली मेलेल्यांचे नातेवाईक किंवा रवींद्र पाटलांची मुले सलमानचे सिनेमे एंजॉय करतील का कधी!
अनुपम खेर आदी चमच्यांना सलमानला १३ वर्षे रखडलेला न्याय मिळाला असे म्हणताना काहीच वाटत नाही?
Pages