.
.
ऋन्मेषचा धागा बघताच शाहरुख खान चाच विषय असणार या गृहीतकावर चटकन पोहोचलेल्यांसाठी खास हा वरचा बॅनर..
सलमान खान,
‘मैने प्यार किया’ पासूनच ज्याच्या मी प्रेमात पडलो ते ‘मैने प्यार क्यू किया’ पर्यंत आणि त्याच्याही पुढे आजतागायत पडलेलोच आहे. याला कारणीभूत सलमानचा अभिनय, दिसणे, डोल्लेशोल्ले आणि स्टाईल तर आहेच पण त्याहीउपर जाऊन त्याची ‘बॉलीवूडचा दानशूर कर्ण’ अशी असलेली इमेज. लोक त्याच्यावर प्रेमच नाही करत तर मानतात त्याला. जेव्हा एखादा बिगबजेट, बड्या बॅनरचा, भलीमोठी स्टारकास्ट असलेला चित्रपट १०० कोटीच्या घरात गेल्याचा आनंद साजरा करत असतो, तेव्हा आपला सल्लू एखाद्या सौथेंडियन डब केलेल्या बी ग्रेड सिनेमावर २०० कोटी मिळवून जिममध्ये चुपचाप व्यायाम करत बसला असतो.
फक्त नावावर आणि पडद्यावरच्या आपल्या सहज वावरावर बॉक्स ऑफिस हिट करून सोडणारा दुसरा स्टार नसावा बॉलीवूडमध्ये. आणि हे शक्य तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही जनमानसात प्रचंड लोकप्रिय असता. आणि तो ते आहे हे वेगळे सांगायला नकोच. म्हणूनच त्याचे लग्न हि देखील त्याची खाजगी बाब न राहता ती एक राष्ट्रीय समस्या बनते. त्याने ते करूच नये असेच कित्येक तरूणींना वाटते. त्याच्या शर्ट काढत उघडे होण्यातही लोकांना अश्लीलता न दिसता लोक त्याच्या बॉडीवर फिदा होतात. त्याच्या चाहत्यांमध्ये मग स्त्री-पुरुष भेदही मिटतात. सर्वच वयोगटाचे आणि जातीधर्माचे लोक त्याच्यावर निस्सीम प्रेम करतात.
त्याचमुळे जेव्हा जेव्हा त्याच्या शिकार प्रकरणाचे, बेताल वागण्याचे, ऐश्वर्या प्रेमप्रकरणात मद्यप्राशन करत दंगा घालण्याचे किस्से चवीने रंगवले जातात, तेव्हा तेव्हा ‘सल्लू तुने ये क्यू किया’ असे नेहमी मनात येते. जेव्हा त्याच्या फूटपाथवासीयांना चिरडण्याच्या ‘हिट अॅण्ड रन’ केसबद्दल पहिल्यांदा ऐकले तेव्हा कानावर विश्वासच बसला नाही. सलमान हा राजश्री प्रॉडक्शनचा प्रेम होता आणि या प्रेमावर आमचा विश्वास होता. आमचा सल्लू कुठलेही बेजबाबदार आणि गैर कृत्य करूच शकत नाही, हा तो विश्वास!
.... आणि आज अचानक एवढे दिवस ती केस कोर्टात रखडल्यानंतर एक असे सत्य सामोरे आले की आम्हा सर्व चाहत्यांचा आजवरचा विश्वास सार्थ झाला आहे. नव्हे, सलमानबद्दलचा आदर एकंदरीतच दुणावला आहे. गाडी सलमान चालवत नसून त्याचा ड्रायव्हर चालवत होता. हे सत्य आज अखेरीस सलमानने कबूल केले आहे आणि तशी ग्वाही त्याच्या ड्रायव्हरने देखील दिली आहे.
आजवर ऐकले होते की नमकहलाल नोकर असतात जे खाल्या मीठाला जागायला मालकाचा गुन्हा आपल्या शिरावर घेतात. पण आज समजले की एवढे दिवस सलमानने आपल्या गरीब ड्रायव्हरला वाचवायला त्याचा गुन्हा आपल्या नावावर घेतला होता. कारण सलमानला माहीत होते की तो गरीब बिचारा ड्रायव्हर जर यात अडकला असता तर त्याचे आयुष्य उध्वस्त झाले असते, त्याच्या बायकापोरांचे हाल झाले असते. पण हाच गुन्हा जर आपण आपल्या नावावर घेतला तर आपण सेलिब्रेटी असल्याने आणि आपल्या देशातील कायदे सेलिब्रेटींना झुकते माप देत असल्याने आपण कदाचित तारून जाऊ. आणि तेच झाले..
आपल्या नोकरासाठी असा त्याग करणारा हा मालक, असा हा बॉलीवूडचा रिअल सुपर्रस्टार, विरळाच!
जर सैफ अली खानला पद्मश्री पुरस्कार मिळू शकतो, तर सलमान खान नक्कीच भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा हकदार बनतो.
तो पुरस्कार त्याला द्यावा की नाही यावर मी लवकरच वेगळा पोल काढेन,
पण तुर्तास आपल्या सल्लूभाईला तीन तोफांची सलामी !!!
ओहह खान तुस्सी ग्रेट हो !!!
सत्यमेव जयते !! जय हिंद !!!
- ऋन्मेऽऽष
बोलण्यासारखे काही राहीलय का?
बोलण्यासारखे काही राहीलय का?:अओ:
लोल अगं आईग!! फुल्ल टू एम
लोल
अगं आईग!! फुल्ल टू एम टीवी रोडीजची ऑडीशन बघितल्यासारखं वाटतंय. तो रघू समोर बसलेल्याला कायम फकारी -भकारी शब्दांची बाराखडी शिकवत असतो, तू किती लो सेल्फ एस्टीम वाला, लूजर, फेल्युअर, भित्रा, कॅरॅक्टरलेस आहेस हे सारखं पटवून देत असतो आणि समोर बसलेला वानाबे रोडी तुम्हाला तसे वाटते पण हेच तर माझे स्ट्राँग पॉईंट आहेत, मला अजून शिव्या द्या चार हाणा पण रोडी म्हणाच, असे केविलवाण्यासारखे पटवत असतो.
काय?????? :( सलमानला
काय??????
सलमानला भारतरत्न
आतामात्र कहर झाला
अहो तुम्ही काय लिहिताय याच भान आहे का तुम्हाला ?:राग::राग:
तुमच लेखन इथे पोस्ट करण्याआधी एकदा वाचत जा
का समोर कॉम्प्युटर आहे म्हणून उचलली बोट आणि बडवला key board
अर्थात अमिताभ करतो तो अभिनय
अर्थात अमिताभ करतो तो अभिनय आणि चंद्रचूड सिंग करतो तो अभिनय यात फरक असणारच
आता मी पण एक धागा काढणार आहे
आता मी पण एक धागा काढणार आहे ज्यात समस्त खानावळ सामिल असेल. उदा. इम्रान खान, अमीर खान, शाहरुख खान, जावेद खान, कमाल खान आणी जे कोण उरले सुरले असतील ते.:फिदी:
बरं मग
बरं मग
नाही, मग काही नाही. फकस्त
नाही, मग काही नाही. फकस्त धागाच कहाडणार हाय, तुम्हाला आवताण नाय, यायच त या, नाय आलात तरी चालल.
आम्हाला आवताण नाय तर आम्ही पण
आम्हाला आवताण नाय तर आम्ही पण पायताण घेऊन येउशी नाय
रश्मे तुझ्या 'खाना'वळीत फक्त
रश्मे तुझ्या 'खाना'वळीत फक्त एकाचंच पोट भरेल
रश्मी.., त्या खाणावळीत खान
रश्मी..,
त्या खाणावळीत खान अब्दुल गफार खान नको बुवा. भारतवादी असल्याने आधीच बिचाऱ्यांनी ५० वर्षं तुरुंगवास सोसलाय. असल्या पुचाटांच्या संगतीत ठेवून उगीच कशाला डोकेदुखी वाढवताय त्यांची!
आ.न.,
-गा.पै.
तर सलमान खान नक्कीच भारतरत्न
तर सलमान खान नक्कीच भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा हकदार बनतो.
तो पुरस्कार त्याला द्यावा की नाही यावर मी लवकरच वेगळा पोल काढेन,
इतक्या फडतूस विषयावर पोल काढायचा विचार मनात तरी कसा आला तुमच्या ??:अओ:
अवघड आहे
बरोबर आहे गापै. सरहद्द गान्धी
बरोबर आहे गापै. सरहद्द गान्धी म्हणून ओळखले जाणारे हे पठाणी व्यक्तीमत्व फार वेगळे होते. आणी त्यान्च्या विचारान्चे लोक पण पाकीस्तानात १ टक्के सुद्धा नसतील, हे दुर्दैव आहे.
लिहील्यानन्तर जाणवले की बाकी खानावळीत याना बसवुन आपण यान्चा अपमान करीत आहोत, सो पोस्ट एडिट करते.
दक्षिणा
@मनरंग, आपल्यासारख्यांना
@मनरंग, आपल्यासारख्यांना मानसिक त्रास व्हावा ह्या उद्देशानेच हा आयडी इथे हे असे बाष्कळ, बेअक्कल धागे काढून लिहीत असतो. कुणी पु.लंशी उपहासाने तुलना केली तर ते खरे मानून मानभावीपणा करतो. उपहास ह्या शब्दाचा अर्थच ह्या व्यक्तीला माहित नसावा.
ह्याला कम्प्लिट इग्नोर करण्यात यावे
कश्यावरून तो उपहास होता? जर
कश्यावरून तो उपहास होता?
जर कोणी आपले कौतुक करत असेल तर त्यात उपहास शोधून कौतुक करणार्याच्या हेतूवर शंका घ्यायचा नतद्रष्टपणा मला नाही जमत.
याउपर ते स्वत: म्हणाले की तो उपहास होता तर त्याचाही मी तितक्याच विनम्रपणे स्विकार करेन.
ना कोणी केलेल्या कौतुकाने मी मोठा होतो ना कोणी केलेल्या टीकेने मी छोटा होतो.
जर कोणी आपले कौतुक करत असेल
जर कोणी आपले कौतुक करत असेल तर त्यात उपहास शोधून कौतुक करणार्याच्या हेतूवर शंका घ्यायचा नतद्रष्टपणा मला नाही जमत. >>> कौतुक करणारेच नतद्रष्टच आहेत हो, तुम्ही आपले चालू द्या.
ना कोणी केलेल्या कौतुकाने मी मोठा होतो ना कोणी केलेल्या टीकेने मी छोटा होतो.>>> जेब्बात!!! हे आहे खर्या स्थितप्रज्ञाचे लक्षण. मायबोलीचा ईतिहास लिहिला जाईल तेव्हा तुमचे नाव न घेता फक्त 'यू नो हू' असा ऊच्चार सोनेरी अक्षरात कोरला जाईल आणि नुसत्या संदर्भानेच ईतिहास वाचणारे भितीयुक्त रागाने किंवा रागयुक्त भितीने गळपाटून जातील हे असे
ऊपहास शोधू नका मी केलेल्या कौतुकाच्या हेतूवर शंका घेवून नतद्रष्ट पणा करू नका.
अर्रे तुझं लेखन पु.लंशी तुलना
अर्रे तुझं लेखन पु.लंशी तुलना करण्यात तुला उपहास दिसत नाही????
का तुला तुझं लेखन कुणालातरी पु. ल सारखं वाटू शकतं असा विश्वास आहे???
वाचलंयस का तू त्यांच लेखन?
उठा ले रे बाबा...मुझे नही
अर्रे तुझं लेखन पु.लंशी तुलना
अर्रे तुझं लेखन पु.लंशी तुलना करण्यात तुला उपहास दिसत नाही????
का तुला तुझं लेखन कुणालातरी पु. ल सारखं वाटू शकतं असा विश्वास आहे???
>>>>>>
ज्या लोकांना वर सलमानला भारतरत्न देण्याच्या विधानात उपहास दिसत नाही त्यांना सलमानला भारतरत्न मिळावे असे कोणाला वाटू शकते यावर विश्वास वाटतो का?
कोणाला काय वाटेल हे आपल्या हातात नसते ना ..
ह्म्म हे खरंय
ह्म्म हे खरंय
ज्या लोकांना वर सलमानला
ज्या लोकांना वर सलमानला भारतरत्न देण्याच्या विधानात उपहास दिसत नाही त्यांना सलमानला भारतरत्न मिळावे असे कोणाला वाटू शकते यावर विश्वास वाटतो का >>
व्वा काय उत्तर दिले. नुसते नाव दिसले की लोक डोळ्यावर पट्टी बांधून घेतात. अशा लोकांची पट्टी काढण्याचे काम या उत्तराने केले.
उद्देश, तुम्हाला लेंग्याच्या
उद्देश,
तुम्हाला लेंग्याच्या नाडीची पट्टी सोडून ती डोळ्यावर बांधून घेतात असं सुचवायचं होतं ना? मी ओळखलं बघा!
आ.न.,
-गा.पै.
Enforcement Directorate
Enforcement Directorate summons Shah Rukh Khan over forex violation
आपले भरकटवण्याचे काम जोमात
आपले भरकटवण्याचे काम जोमात सुरु राहू द्या.
गामा आपण ओळखणारच. तुमचे रोजचे काम आहे
गामा
गामा
गामा
गामा
ज्या लोकांना वर सलमानला
ज्या लोकांना वर सलमानला भारतरत्न देण्याच्या विधानात उपहास दिसत नाही त्यांना सलमानला भारतरत्न मिळावे असे कोणाला वाटू शकते यावर विश्वास वाटतो का?>>
नक्की काय म्हणायचेय?
जर लेखातील सलमानला भारतरत्न देण्याचे विधान तु उपरोधाने केले असे म्हणत असशील तर प्रतिक्रियांमध्ये सुद्धा तू तेच म्हणत आहेस.
तुला काय म्हणायचेय ते शब्दांचे खेळ न करता स्पष्टपणे सांग.
तुला काय म्हणायचेय ते
तुला काय म्हणायचेय ते शब्दांचे खेळ न करता स्पष्टपणे सांग. >>> Nidhii त्याला काय (आणी कायकाय) म्हणायचे आहे हे त्याच्या लक्षात आले की तो आपल्याला पण सांगेल.
तोपर्यत इथेच रहा लोकहो, कुठेच जाऊ नका. आपण पहात आहात कार्यक्रम "ओह खान तुस्सी ग्रेट हो !!"
गिरी
गिरी
गिरीकंद.
गिरीकंद.
ओ कमाल आर खान तुस्सी ग्रेट हो
ओ कमाल आर खान तुस्सी ग्रेट हो हा धागा निघाला तरी आश्चर्य वाटायला नको
गिरीकन्द
गिरीकन्द
Pages