पुण्यात घर घ्यायचय?

Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33

ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्‍यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टू बीएचके हवाय का ? साठ हे बजेट जऽरा कमी आहे टू बीएचके साठी. स्टँड अलोन बिल्डिंगमध्ये कदाचित मिळून जाईल पण सगळ्या सोयीसुविधा असलेल्या सोसायटीत मिळणे कठीण जाईल..

Robin hood - ek in progress project ahe. Cassia , बनेर९९२२१३६६०७

नुकतीच नांदेड सिटीची जाहिरात पाहिली.
१ बी एच के - ३७ लाख
२ बी एच के - ६४ लाख
तिथे मंथली मेंटेनन्स नाही.टाउनशिपच्या सुविधा पाहता डील जरा बरे वाटत आहे.

लोकहो..
सध्या रीअल इस्टेट्ची मंदी सुरु आहे. बिल्डर्स आपली इन्वेटरी संपवण्याच्या मागे आहेत. चांगल्या तर्‍हेने निगोशिएट केले तर २० ते ३०% खाली येतात असे ऐकले आहे (उदा. जास्त डाउन पेमेंट्ची तयारी दाखवली तर इ.).
आणखी एक गोष्ट..
मंदीच्या दिवसात बिल्डर्स एजंट्स च्या थ्रु चांगले डील्स देउ शकतात. अशा एखाद्या एजंट कडे चौकशी केल्यास चांगल्या काँप्लेक्स मधे एखादा राहिलेला फ्लॅट मिळु शकतो (कमी दरात)

सध्या रीअल इस्टेट्ची मंदी सुरु आहे

>> हे खरे वाटत नाही. हे गेले ८-९ वर्षे ऐकतो आहे. कधीही भाव निगोशिएट झालेले नाहीत. घायचं असलं तर घ्या नाहीतर चालू पडा असे आहे. याच महिन्यात नव्या १०-१२ प्रोजेक्टच्या घोषना झालेल्या आहेत. त्यामुळे मंदी बिन्दी काही नाही. इट इज अ सेलर्स मार्केट इन पुणे...

Robinhood, have you seen all adv. while coming to Hinjewadi?
They are actually saying "this waived off" "that waived off", "price including registration stamp duty".. I feel, real estate is seeing low tide..
better to wait.
The builder I said above said he was ready to negotiate (I am not looking for house though). Small project with 16 flats.

आमच्या आठ ते अकरा वर्षं जुन्या असलेल्या सोसायटीत आत्ताच एक फ्लॅट रजिस्ट्रेशन वगैरे सगळे खर्च धरुन एकाहत्तरला गेला आहे. गेल्या दोन वर्षांत पासष्ट, सदुसष्ट, सत्तर अशी एकदम सिस्टिमॅटिक ग्रोथ आहे. आजूबाजूच्या काही सोसायट्यांतून ह्याहीपेक्षा जास्त भाव आहेत.

नानबा हे मोठे गिमिक आहे. अगदी लक्षात येणार नाही अशा पद्धतीने फ्लॅटचे कारपेट घटवले आहे. पूर्वी २ बी एच के म्हणजे ८००-९०० कार्पेट आरामात असे. आता ६५०च्या वर एरिया मिळत नाही. ग्यालरीचा दर १०० टक्के केलाय काही बांधकाम नसताना. ज्या गोष्ती ते सवलतीत देतो असे दाखवतात त्याचे खर्च आधीच स्क्वेअर फुटावर कारपेट वर लोड केलेला असतो. इकडे ६००० ऐवजी ६५०० दर सांगायचा आणि तिकडे सवलत द्यायचा निगोशियेशनचा देखावा करायचा....

पुण्यात प्राईम लोकेशन्स ला रेट कमी जरी झाले नसले तरी वाढत नाहीयेत. कोथरुड, प्रभात रोड, एरंडवणे मधले भाव गेले १ वर्ष तेच आहेत. नामांकित बिल्डर्सच्या प्रोजेक्ट मधे पण उपलब्धता बर्‍यापैकी आहेत.

असे बर्‍याच वर्षामधे झाले नव्हते (साधारण २००४ पासुन). पुण्याच्या मध्य भागामधील भाव दरवर्षी ५०० ते १००० ने तरी वाढत होते. मार्केट मधे पैसा बराच असल्याने भाव कोसळत नाहीयेत बहुतेक. शिवाय मोठ्या बिल्डर्स ची होल्डींग कॅपॅसिटी बरीच आहे. पण वर लिहिल्याप्रमाणे छोटे छोटे बिल्डर्स जर तुमच्याकडुन पेमेंटची हमी असेल तर निगोसिएशन्स करायला तयार आहेत. जर अशीच परिस्थिती अजुन अर्धा ते एक वर्ष राहिली तर भाव नक्कि कोसळतील असे वाटते. जर घर घेण्याची घाई नसेल तर वाट पहायला हरकत नाही.

नानबा आणि रॉबीनहूड यांनी लिहिलेल्या ट्रिक पुण्या-मुंबईच्या बाह्यपरिघामधे कॉमन आहेत. पण शेवटी या ना त्या प्रकारे आपल्या खिशाला चटका बसायचा तो बसतोच.

रेट वाढत नाहीयेत इतके नक्की.... आंबेगावतले रेट गेले दोन वर्ष ४५०० ते ५००० मध्येच घुटमळतायत

बाणेरमध्ये (ऑर्किड शाळेपाशी) सोसायटीमध्ये असलेल्या प्लॉट्चे भाव सध्या काय आहेत हे कोणाला माहिती आहे का?
विकायचा असेल तर आत्ता विकावा की २-३ वर्षे थांबलं तर चालेल?

३५०० ते ४०००.

प्लॉटच्या आकारावर आणि लोकेशनवर कमी जास्त होतात. बंगलो सोसायटी आहे कि नाही यावर पण थोडेफार अवलंबून आहे.

.

रॉबीनहुड मला यशविन (विलास जावडेकर यांची) मधे बरे डिल वाटले. संपर्क करा सविस्तर बोलु. मी फो नंबर दिला होता तुम्हाला. नसल्यास परत देतो.

हे रवी करंदीकर नावाचे गृहस्थ सगळ्याच प्रोजेक्टवर टीकाच करीत असतात . मात्र रेकमेंड कोणाला करीत नाहीत . त्यामुळे कोठे बनवाबनवी आहे ते कळते पण कोठे घ्यावे त्याचे मार्गदर्शन मिळत नाही . त्यासाठी त्यांची पेड कन्सल्टन्सी घ्यावी लागते असे दिसते. यांचा कोणाला काही अनुभव?

http://ravikarandeekarsblog.blogspot.in/

मी फोन केला होता. लोन घेऊन दुसरा फ्लॅट घ्यायची इच्छा आहे म्हणल्यावर त्यांनी आधी माझ्यावरच टिकास्त्र सोडले. पुढे अनुभव घ्यावासा वाटला नाही. Proud

२ बीएचके (कारपेट एरिया ९००+), दुसरा किंवा फारतर तिसरा मजला, लिफ्ट विथ बॅकअप, रिजर्व्ह्ड कार पार्किन्ग, बर्‍यापैकी चांगली सोसायटी आणि कोअर सिटीपासुन खुप लांब नाही असा फ्लॅट हवा आहे. बजेट ६० ते ७० लाख.
मला माहिती आहे की सद्ध्या कुठेच असे मिळत नाहीये, तरीही विचारायचे धाडस करतोय, येथे काही माहिती मिळेल या आशेने.

रिसेल मिळू शकेल.
किंवा नवा आंबेगाव, वडगाव बुद्रुक इथे.
(किंम्वा ७० लाखात पिंपळे सौदागरला पण ते तुम्हाला चालणार नाही कारण तुम्हाला एम एच १२ मध्ये हवा असेल.)

Ethe bibwewadit 900 built up carpet nahi javal javal 70-80 lakh rate chalu aahe resale flat cha ( 2bhk)

Pages