Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
का जानी गरोदर आहे म्हणून
का जानी गरोदर आहे म्हणून जय-आदितीला काही बाही खावेसे वाटतय >>
असू शकेल... या शिरेलींमध्ये काहीही होऊ शकतं..
केका. नी पाघळायलाच
केका. नी पाघळायलाच हवे...त्याशिवाय 'कारेदु' नाव सिद्ध होणार नाही. जे ऑफ़ीस मधे होतय. तिथे रहस्य मेनटेन्ड आहे.
आता...केकान पासुन लपवले हा चॅप्टर बंद.
आदि-गट्टु चॅप्टर सुरु.
मालिकेचे नाव आणि कथा एकत्र असव्यात ..फारच मोठी अपेक्शा
आदि-गट्टु चॅप्टर सुरु.>>>>>
आदि-गट्टु चॅप्टर सुरु.>>>>> मी आधी ते आदि-गट्टु गुटुर गुटुर सुरु असे वाचुन बघीतले.:खोखो:
कुमु कोण ?
कुमु कोण ?
केतकर काकान्ची बालमैत्रिण,
केतकर काकान्ची बालमैत्रिण, गट्टुची आउ ( आई) ( लोलिता धत्तुरे)
गट्टू म्हणजे सुभा का ? आणि आउ
गट्टू म्हणजे सुभा का ?
आणि आउ म्हणजे इभा ?
टीना, हो आणि आऊ म्हणजेच कुमु.
टीना, हो आणि आऊ म्हणजेच कुमु.
केतकरकाकांची उधारी फेडली का
केतकरकाकांची उधारी फेडली का नाही काही कळायला मार्ग नाही.
त्यांना का खाऊ देत नाहीत काय
त्यांना का खाऊ देत नाहीत काय माहित!>>
हे बघा गरोदरपणात वाटत असेल काही बाही खावं>>>
काल काकांच थांबा म्हणजे अगदीच
काल काकांच थांबा म्हणजे अगदीच फुसका बार निघाला... येवढ रहस्यमय थांबा म्हणुन बोलले काय तर डुप्लिकेट चावी परत द्या... श्या!
त्या आदिती ला तिचे पप्पा घरी
त्या आदिती ला तिचे पप्पा घरी घेऊन नै का गेले ?
के काकु डब्बे द्यायच्या म्हणून यांचे खायचे वांदे होत नव्हते.. आता घरातुन हाकललच म्हणतात तर काय होणार .
आणि ती आदिती सयपाक करण इसरली असणार नक्कीच.. सदियो बीत गये ना .
टीना म्हणुन हे दोघ भजीपावावर
टीना म्हणुन हे दोघ भजीपावावर आलेत आता... जणु कै मुंबईच्या डबेवाल्यांनी डबे देण बंद केल आहे.
हे बघा गरोदरपणात वाटत असेल
हे बघा गरोदरपणात वाटत असेल काही बाही खावं>> बाही कशी खावी? तो लांब बाह्यांचा शर्ट घालतो काय? एकेकाची किस्मतीच फुटटी असे दोघे आहेत का ते?
हे बघा गरोदरपणात वाटत असेल
हे बघा गरोदरपणात वाटत असेल काही बाही खावं>> बाही कशी खावी? तो लांब बाह्यांचा शर्ट घालतो काय? एकेकाची किस्मतीच फुटटी असे दोघे आहेत का ते?
अमा माझ्या माहितीत, गोधडीची टोकं कुरतडणारे, माती(काळी स्पेशल) खाणारे, आवळे नी नुसते पेरु पण खाणारे आहेत मग बाही काय चीज आहे ?
जरा वेगळं : काही जणांना बाहीने शेंबुड पुसायची सवय असते, तर मग ती खारट- तुरट चव एखाद्याला आवडत असेल तर ?......इ बबो........भागो.........
काकांनी विचारलं तेव्हा किल्ली
काकांनी विचारलं तेव्हा किल्ली आदितीच्या हातातच होती. ती घेऊन जायचा प्लॅन होता की काय तिचा? आधीच परत द्यायला काय झालं होतं?
खरंच अगदी भिकार्याच्या वरताण दाखवतायत सगळं. भजीपाव म्हणजे हाईट होती.
बरं झालं दोघांना घराबाहेर काढलंय ते. एकंदरीत सगळी मज्जाच चालली होती. काकूंच्या हातचं आयतं जेवण, हातात डबा मिळत होता. डबा विसरलं की काका डबा घेऊनही येत होते. ऑफिसमधून आरामात कुठेतरी बसून गप्पा मारून निवांत घरी गेलेलंही चालत होतं.
अरे थांबा थांबा, त्या दोघांना
अरे थांबा थांबा, त्या दोघांना घर शोधताना वेळ नसेल मिळाला म्हणून भजी आणली असेलं, आणि काका विचार बदलायला हवे असतील तर हे असे टॅक्टिक्स नकोत का वापरायला
काल काका थांबा म्हणाल्यावर जय किती आशेने बघत होता की चला घर शोधायला नशो, तर काय फुसका बार
तो जय इतका विचित्र चेहरा करतो
तो जय इतका विचित्र चेहरा करतो की तो दुखी आहे का चिडला आहे / खुन्नस देतो आहे तेच कळात नाही बर्याच वेळा
पण हे विरारला का नाही जात?
पण हे विरारला का नाही जात? अदितीला तर सवयच आहे विरारची. घरही मिळेल. शोभीला मोलकरीणही मिळेल!
मला वाटतं अरुण नलावडे बिझी झाले आहेत म्हणून त्यांचा ट्रॅक बंद केला. संपवला तो चॅप्टर.
ऑ?? ऑस्कसं ऑस्कसं? कुमुचं काय
ऑ?? ऑस्कसं ऑस्कसं? कुमुचं काय होईल मग?
ऑस्कसं ऑस्कसं>>> मी चुकुन
ऑस्कसं ऑस्कसं>>> मी चुकुन ऑस्कर ऑस्कर वाचले
अत्यंत भिकारी दळण. काल काका
अत्यंत भिकारी दळण.
काल काका 'थांबा' म्हणल्यावर जयचा चेहरा इतका आशाळभूतासारखा दाखवला की हाड दिसल्यावर कसा कुत्र्याच्या तोंडातून लाळेची धार वाहेल तसं आता थांबा म्हणालेत तर जाऊ नका म्हणतात का काय असा चेहरा.
तो जय इतका विचित्र चेहरा करतो
तो जय इतका विचित्र चेहरा करतो की तो दुखी आहे का चिडला आहे / खुन्नस देतो आहे तेच कळात नाही बर्याच वेळा >>>> हो ना.. काल आदितीला चल म्हणताना अशा पद्धतीत म्हणतो की जणु काही चुक नसतानाच याला शिक्षा दिलीय..
काय एक एक कमेंट आहेत ,देवा
काय एक एक कमेंट आहेत ,देवा ....
पण मला आता असे वाटायला लागलेय
पण मला आता असे वाटायला लागलेय की एकतरी असे केतकर काका ( खमके काका ) हवेत, ज्याच्या मुळे न सुधरणारे पण सुधरतील. पण मालिका आहे ना, मग शेवटी काका पण पाघळतील. आज म्हसोबा दोघाना भेटणार आहे, कारण तो म्हणताना दाखवलाय की आलात ना एकदाचे रस्त्यावर. पण त्या चहाच्या ठेल्यावर म्हसोबा का आला? त्याला पण तल्लफ आली का रस्त्यावर चहा प्यायची? की धन्दा बसला?
काय काय येन्थुझियास्टिक
काय काय येन्थुझियास्टिक पब्लीक आहे.
एवढी सिरीयल बघुन वर इथे मोठ्या जोमाने त्यांच वस्त्रहरण करायला शिफ्टवाईज परतुन परतुन हल्ले कर्तात.
ह्याची लिंक त्यांच्या फेसबुकाच्या पानावर का नाही चिकटवत कोणी ? ज्यायला दोन दिवसात शिरेल बंद !
अहो शीरीलवाले हायेत त्ये. पार
अहो शीरीलवाले हायेत त्ये. पार खमके ब्येण असत्यात केतकर काकान्सारखे. त्ये आमाला ऐकतात व्हय? त्या थोपुवर भल्या भल्यानी श्रीबाळ आणी जानुची उडवली, पन शीरील हायेच ना चालू? माजा थोपु अकाउन्ट नाय, तुमचा असल तर त्यानाच हितली लिन्क द्या.:खोखो:
ते बी हायेच म्ह्णां, त्येंच
ते बी हायेच म्ह्णां, त्येंच कातडं जनु गेंड्याच हाय !
जय आदितीला खरंच अगदी भीक
जय आदितीला खरंच अगदी भीक लागलीये की. रहायची सोय होईपर्यंतही हॉटेलमध्ये राहाणं परवडत नाहीये. बसलेत झाडाखाली रात्री.
आणी मग, आणी मग क्काय होत
आणी मग, आणी मग क्काय होत मैतीए का? पोलीशमामा येतात आनी ना त्यान्ची उचलबान्गडी कलतात. अदिती तिच नाव खानोलकल अश शान्गते. आता बगा कोन सोदवत त्याना. केतकल काका येनाल की गट्टु? की लजनी की सुहाश ? की आउ? की कदम्काका? की नन्दिनी? सान्गा बल कोन अशेल ते? मला नाय मैती, मी नाय शान्गनाल ज्या.
Pages