मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुग्धटली, अहो मी कधीच खोटे बोलत नाही हो... खरेच ओळखता नै आले की हाच अरुण नलावडे म्हणुन. अन श्वासमधिल चेहराही आठवत नाहीये.... अकरा वर्षे झाली तो बघितल्याला.

काल त्या भैसाटलेल्या जोडीला बघून कधी नव्हे तो मला त्या दाभोळकरांचा स्टँड पटला..... स्वप्नाळू कुठले!.... अरे बिझनेसमन व्हायचय ना तुला मग पैसा हातात यायच्या आत सगळे खर्चाचे प्लॅन्स रेडी Uhoh

आणि एकाच डीलमध्ये सुभा चे पैसे परत, केतकर काकांचे पैसे परत, अण्णांची बायपास आणि मुंबईत ४ BHK फ्लॅट.... असा कुठला बिझनेस करतोयस बाबा?..... तुझा अनुभव काय?..... तुझी पात्रता काय?..... तुझी स्कील्स काय?

अजुन डील झाले नाही तोवर यांचे न घेतलेल्या फ्लॅटमधल्या खोल्यांचे वाटप करुन झाले, भिंतींना रंग लावून झाले, पडदे कुठले ते ठरवून झाले.... "मुंगेरीलाल लेकाचे" Angry

स्वरुप अगदी अगदी.. गेले दोन दिवस मी हेच म्हणतेय की अजुन टोकन अमाउंट किती आहे ते पण म्हैत नै आणि काय काय प्लॅन्स चाल्लेत...

स्वरूप 'राजू बन गया जंटलमनमधे' शाहरुख खान ने पण असच स्वप्न बघीतले होते.

नका रे त्या शाहरुख खानाची आठवण काढू!! तो पोस्टर बॉय स्मोर लाल फड्कं दिसलेल्या... जाऊदे!!

खरच .. कुठेहि फिरवतायेत ही मालिका... अरे .. न बघता .. न भेटता ... डील फायनल करायला दाभोळकर सारखा माणुस असा खिशात चेक घेउन फिरत असेन का...
डिल आवडले तर म्हनेन .. ऑफिस मधे येउन पैसे घेउन जा...

काय तो क्लब ... काय तो मध्यस्थी ... सगळेच अफलातुन आहेत ....कल्पना दारिद्र्य ... सुधरा आता ... एकदाचा होउदे तो जय चा उद्योग आणि सम्पवा ....

स्वरुप + भरपूर घ्या. इतकी माठ व्यक्ती कुणी असेल असे वाटत नाही. बाजारात तूरीचा प्रकार आहे हा. पण अदिती थोडी तरी समन्जस असते याच्याहुन. तिला नाही सान्गता आले का याला की बाबाजी आधी बिझीनेस सुरु होऊ द्या, मग इमले रचा. ती पण बावळटासारखी सामिल या पाचकळपणात. वैताग आला.

ह्या टुरच्या हापिसात आता सगळ्यांना दिवाळी पर्यंत काही क्लायंटस आणायचं टारगेट दिलंय.
एक व्हाईट बोर्ड घेऊन त्यावर प्रत्येकाचं नाव आणि समोर आज किती क्लायंट (फिक्स) केले त्याचा आकडा असं लिहिणारेत नवरे काका, त्या फळ्यावर आज पाहिलं तिलोत्तमा चं नाव चक्क तिलोत्तम्मा असं लिहिलं होतं Uhoh

झी वाले झोपा काढतात का? फायनल एपिसोडचं शूट ऑन एअर येण्याआधी बारकाईने पहात असतील ना?

दक्षिणा... बडी बारीक है नजर तुम्हारी Happy

त्या जयच्या मॉनिटरवर केंव्हाही बघा.... एक वर्ड फाईल (टू पेज व्ह्यू मध्ये) आणि त्या वर्ड फाईल मध्ये एक लॅन्डस्केप डकवलेले हेच दिसते!
अरे तो एव्हढा पीपीटी मास्टर आहे तर गेला बाजार एखादी पीपीटी तरी उघडून ठेवायची Proud

मी ही मालिका नियमित मुळीच पहात नाही. मध्यंतरी काही भाग पाहिले. नंतर खूप दिवसांनी, कालचा भाग पाहिला.. आणि प्रश्न पडला.. का रे बघावा? काहीच्या काही लांबवता आहेत.. पण मग पटेल अस दाखवून,लवकर संपवली तर ती टिपिकल मालिका कसली.!!!

मी ही मालिका नियमित मुळीच पहात नाही. मध्यंतरी काही भाग पाहिले. नंतर खूप दिवसांनी, कालचा भाग पाहिला.. आणि प्रश्न पडला..>>>
अजुन काही वर्षांनी बघीतलीत तरी जिथल्या तिथेच असेल. Proud

रोहिणी हट्टंगडींची मालिका इतक्या लवकर संपत नसते राव..... किमान दहा वर्षांची निश्चिंती आहे!>> ह्यात कुठे रोहिणी हट्टंगडीं आहे?

नताशा गल्ली चुकलेत ते..

त्या ऑफिसमधे ती एक नेत्रा होती ना? ती दिसत नाहीये आता. >>>> हो रिसेप्शनिस्ट. तिच आणि तिच्या बॉफ्रेच फाटलेल नात जयने टाके घालुन दिल होत...

हो.

काल जयराम त्याच्या लग्नाचा वाढदिवस विसरला.....आता तो ऑफिसमध्ये सेलिब्रेट करायचा विचार करतोय. प्रोमो मध्ये पहिले.

.

वाट लागणार जयची असे दिसतेय. कारण अख्ख ऑफिस गट्टुसहीत जयच्या करामती बघत असत. पण कोणी माणुस एवढा गाढव असेल की ऑफिसमधले सगळे घरी गेलेले असतील असे समजून तरीही आपल्या लपवलेल्या लग्नाचा वाढदिवस ऑफिसमध्येच साजरा करेल्?:राग: फुकंणीचा कुठला.

एखादे बर्‍यापैकी हॉटेल किन्वा सुट्टी घेऊन एखाद्या पर्यटन स्थळी वा सिनेमा-नाटकाला तरी गेलेले दाखवायच ना. हा काय विचारान्चा दळभद्रीपणा!

Pages