मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'प्रेझेन्टेशन' शब्दाच्या पुढे यांची गाडी जातच नाही>> आणि मागच्या महिन्याचे अकाऊंट्स!!! >>>> आणि दाभोळकरांव्यतिरीक्त क्लायंट

जय चे बाबा आणि जानुचे बाबा एकाच इस्पितळात शस्त्रक्रियेसाठी असले तर किती भारी होईल ना !

दाभोळकर , शशिकलाबाई आणि केतकरकाका यांची चांगली जुंपेल....

ती रजनी मस्त आहे .
कशी बोलते ती
" ओ नवरे , काय बोलतय काय ? "
जाम जरब आहे तिच्या आवाजात Happy
बाकीच्या मुळुमुळु - आउ सुद्धा

आणि काल ती आऊ त्या निकम कडे कसल्या तरी टुर चे डिटेल्स मागत होती.
तो अकांऊंटंट आहे ना? का टुर ऑपरेटर? का हरकाम्या?
आणि मारे मध्ये जे लॅपटॉप वापरणार नाहीत त्याना कामावरून कमी करणार असं जोरदार ठासून सांगत होते, खु अटापिटा करून त्या जय आणि अदिती ने त्या आडाणढेंग्याला कंपुटर शिकवला.
आता कोणीच लॅपटॉप वापरताना दिसत नाही. Uhoh

आडाणढेंग्याला>>>>:हहगलो: अग ते निकम नाही कदम आहे की. आणी अकाऊन्टचेच डिटेल्स मागत होती. मेल पाठवा म्हणाली. आणी अडाणढेन्ग्या जय आहे. साधे स्वतचे एनव्हलप साम्भाळता/ मागता येत नाही, येडपट कुठला.

अकलेचे अनाथालय >> Lol पण टेक्निकली, याचा अर्थ अक्कल खूप आहे सिरीयलमधे पण तिला हक्काचं घर, / डोकं नाही असा होईल ना? अकलेचे स्मारक पण नाही म्हणता येणार कारण त्यामुळे कोणे एके काळी ती तिथे होती हे सिध्द होईल. "अकलेचा अभाव आणि जय चा स्व (अ)भाव" असे नाव पाहिजे.

>>> आता कोणीच लॅपटॉप वापरताना दिसत नाही. <<<<
अहो अस काय करताय, प्रॉपर्टीखर्चाच्या बजेट मधे भाड्याने लॅपटॉप आणणे परवडत नसेल.
अन उसने तरी कितीकांचे कितीवेळा आणणार?
हां, मला सांगितल अस्त तर मी पुठ्ठ्याचे बनवुन दिले अस्ते... माझे क्राफ्ट लई भारी आहे! Proud

हापिसातुन दमुनभागुन घरी गेल्यापासुन ते रात्री "आहट" लागेस्तोवर अकरा/साडेअकरा वाजेस्तोवर मला सर्व सेरियली सक्तिने बघायला लागतात. अगदी डोक्यावरुन्/कानावरुन मफलर/टॉवेल गुंडाळून पांघरुन घेऊन झोपु पाहिले तरी ऐकायला येतेच!... अन्याव आहे हा माझ्यावर....
गेल्या गेल्या कोणती सेरियल लागलेली अस्ते बरे?... जौदे, सिक्वेन्स नै लक्षात, पण झीमराठी च्या सलग तिन की चार, होसुत्याघ, कारेदु, अजुन कोणतीतरी एक नविन आहे, गुप्तहेर अस्मितेची, हवा येऊद्या, इतना ना करो प्यार .... मग मी इकडची नटी तिकडे, अन तिकडची स्टोरी इकडे करुन काही तरी प्रश्न बावळटा सारखा विचारतो. मग धुमश्चक्री. मला काहिच कसे कळत नाही वगैरे वगैरे....
कोतबो मधे धागा काढावा का यावर? "बिचार्‍या पुरुषांना" टीव्ही बघायलाच कसा मिळत नाही इत्यादी इत्यादी.... ?

हापिसातुन दमुनभागुन घरी गेल्यापासुन ते रात्री "आहट" लागेस्तोवर अकरा/साडेअकरा वाजेस्तोवर मला सर्व सेरियली सक्तिने बघायला लागतात. अगदी डोक्यावरुन्/कानावरुन मफलर/टॉवेल गुंडाळून पांघरुन घेऊन झोपु पाहिले तरी ऐकायला येतेच!... अन्याव आहे हा माझ्यावर....>>>>>:हहगलो:

कोतबो मधे धागा काढावा का यावर? "बिचार्‍या पुरुषांना" टीव्ही बघायलाच कसा मिळत नाही इत्यादी इत्यादी.... ?>>>> काढा, काढा. माझा नवरा पण तुम्हाला सामिल होईल.:डोमा: हॉलमध्ये माझे साबु आलटुन पालटुन कलर्स आणी झी बघतात. आणी बेडरुममध्ये माझी मुलगी नोबिता लावुन बसते. नवरा बिचारा हताश होऊन कम्युटरवर डाऊनलोड केलेले हाणामारीचे सिनेमे बघतो, आणी मी कशातच नसते.:फिदी:

रश्मी , Happy .

हॉलमध्ये माझे साबु आलटुन पालटुन कलर्स आणी झी बघतात. आणी बेडरुममध्ये माझी मुलगी नोबिता लावुन बसते. नवरा बिचारा हताश होऊन कम्युटरवर डाऊनलोड केलेले हाणामारीचे सिनेमे बघतो, आणी मी कशातच नसते>>>>>

आमच्याकडे नशिबाने कोणाला सिरियल्सचे वेड नाही .
पण , मुलगा - नोबिता लावून बसतो आणि

नवरा बिचारा हताश होऊन कम्युटरवर डाऊनलोड केलेले हाणामारीचे सिनेमे बघतो, आणी मी कशातच नसते >>> या वाक्याला + १०००००००००००००००००००००००००० Wink

गोगा Proud आम्ही नाही बघीतले तर झीला टीआर्पी कसा मिळणार? आमच्याच तर जीवावर चाल्लेय हे सगळे.:फिदी:

स्वस्ति Happy

नशिबाने आमच्या घरात रिमोट माझ्या हातात असतो तरीही आमचा टीव्ही जास्त बंदच असतो. नवरा उशिराच येतो घरी. अगदी लिमिटेड बघते मी. बाकी उडया मारते सर्व channelवर.

नवऱ्यावर उपकार करत देते कधीतरी रिमोट मग तो विंग्रजी action मुवीज नाहीतर अगम्य सोथ इंडिअन dubbed movies बघत बसतो.

.

कोतबो मधे धागा काढावा का यावर? "बिचार्‍या पुरुषांना" टीव्ही बघायलाच कसा मिळत नाही इत्यादी इत्यादी.... ?>>>> नक्की काढा. माझा नवरा तुम्हाला सामील होईल अत्यानंदाने,.....

अगम्य सोथ इंडिअन dubbed movies बघत बसतो>>> 'कॉमेडी' टॅगखाली येणार्‍या सिनेमांपेक्षा या dubbed movies बघण्यात जास्त मजा येते. इकदा मनोभावे 'यींद्रा-द ठायगर' वगैरे बघा मग कळेल Biggrin

तो आऊ शब्द ऐकला / वाचला की मला एकदम शक्ती कपुरची आठवण येते. आजच्या जमान्यात कोण आऊ वगैरे शब्द वापरतात का ? Uhoh

आजच्या जमान्यात कोण आऊ वगैरे शब्द वापरतात का ? अ ओ, आता काय करायचं >>> आणि ते फक्त त्यान्चा मुलगा नाही तर कम्पनीतले सगळे जण .

माझी मुलगी वव ६ पुढच्या महिन्यात ७ पुर्ण,
जेव्हा टी व्ही लावेल तेव्हा, डोरेमॉन, निंजा हतोडी, पोकेंमॉन, नाय तर शिंच्यान (लै अगाव कार्ट)
बायको वव( जावुदे-बोंबलायची माझ्या नावाने)
जेव्हा टी व्ही लावेल तेव्हा, होम मोनिस्टर, परिपुर्ण किचन, लाईफ ओके, हिंदी सिरेली, सध्या एपिक(हे बाकी छान आहे).
मी पोरीबरोबर मी मस्त्पैकी कार्टुन पहातो मज्जा येते, सध्या तिला डिस्कव्हरीवरची मॅन व्हर्सेस वाईल्ड ची चटक लावलीय, निदान तेव्हढेच काही वेगळे बघायला मिळते Wink

काल जाहीरात बघितली रजनी आदितीचं सगळं पितळं उघड पाडते. खर की काय Uhoh का स्वप्न वगेरे काही Angry

खरे खरे एकदम खरे. आजच्या भागात अदिती सगळ्यान्समोर सान्गते की ज्याना ती वडिल म्हणते, ते तिचे सासरे अण्णा आहेत. आता सासरे म्हणल्यावर नवरा आलाच, मग त्याचे नाव तिला घ्यावे लागणार.:डोमा: पण मग ते नाव ( नवर्‍याचे ) ऐकल्यावर रजनीचा चेहेरा कसा होईल ते मला बघायच्चेच आहे.:फिदी: कारण मी रजनीवर जाम खार खाऊन आहे.

बाकी एक खोटे बोलले की त्यातुन कशी खोट्यान्ची मालीका तयार होते ( ही मालीका नव्हे) ते यातुन कळते. थोडक्यात काय तर खोटे बोलु नका. पण खरे आहे, इतके दिवस यानी हे लपवल्यावर ते कधी न कधी बाहेर यायचे होतेच. हे सगळे बोलत असताना म्हसोबा (दाभोळकर ) मागे उभे राहुन ऐकत असल्याचे दाखवलेय. त्या बाबाजीला हे लग्न कसेही करुन तोडायचे आहेच. मग आता जय-अदितीची नोकरी पण जाणार.

तो नविन साईप्रसाद आला आहे ना , मला जाम आवडला Happy
त्या रजनीला एक्दम फाट्यावर मारतो , बहुतेक त्याच आणि जुईचा टाका भिडणार .

तो साईप्रसाद कुठल्यातरी सिरीयलमध्ये होता, आठवेना आता. पण सिरीयल आता सम्पतीय की काय ते पण कळेना. गट्टुला कळले तर काय होईल? कारण मग तो या दोघाना हाकलेल. मग यान्च्या कर्जाचे काय? ते केतकर काका फेडणार की दाभोळकर?

काल मी रिपीट थोडं बघितलं. आदिती नवरा म्हणून जयचे नाव बहुतेक सांगणार नाही, एकाची नोकरी टिकायला हवीना.

Pages