मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल कहर केला

चायला भिकाऱ्या सारखी भजी पाव खायची वेळ आलेली दाखव्लीये , त्यातही ती म्हणते मी दुपारी थोडे खाल्लेय आता तू खा , चायला इतकेही पैसे नसावेत माणसाकडे कि निदान पोळी भाजी केंद्रातून १०० रुपयांचे जेवण आणून खावे

दोघेही नोकरी करतात , मोठ्या पोस्त वर

त्या तांगडेने मग उपाशी मरायला हवे

अति करतात

गट्टू १, २, ३ कथा म्हणजे मला आधी सु.भा. किंवा या सिरीयलवरच आहे की काय असे वाटले. >> +१

म्हणून मी ती ओपनही नाही केली अजून.

चायला भिकाऱ्या सारखी भजी पाव खायची वेळ आलेली दाखव्लीये , त्यातही ती म्हणते मी दुपारी थोडे खाल्लेय आता तू खा , चायला इतकेही पैसे नसावेत माणसाकडे कि निदान पोळी भाजी केंद्रातून १०० रुपयांचे जेवण आणून खावे>>

रु. ५०,०००/- पगार घेतात तरीही. Uhoh

रच्याकने त्यांच घर गेलयं ना मग नोकरी गेल्यासारखी परिस्थिती का दाखवतायत.?

बांद्रा ते घाटकोपर बाय रिक्षा जाता येत? >>>> मुंबईत रस्ता तिथे रीक्षा/ टॅक्सी हो मुग्धटली. तेवढा अभ्यास केलाय लेखकाने.

बांद्रा घा टकोपर मेट्रोने २१ मिनिर्‍टा त जाता येते कि. एसीतून. आटोची गरजच नाही. ४० रु तिकीट आहे.>> बांद्र्याला कधी झालं मेट्रो स्टेशन?

बाकी सध्या काय चालू आहे मालिकेत?

काकांना कळलं ऑफिसमध्ये आदिजय नवराबायको नसल्याचं नाटक करतायत ते. आणि कुमुला पण जाणिवपूर्वक काकांपासून दूर ठेवलं ते. त्यामुळे दुखावलेल्या काकांनी त्यांना घर सोडून जाण्यास फर्मावले.

अग मंजुडी काय झाल ना.. एक ठिकाण सेंट्रल वरच आणि एक वेस्टर्न वरच त्यामुळे एक भा.शं आली बापडी मला.. असो ती आदिती कशी का जाईना मला काय त्याच.

बाकी बन्याच्या पोस्टीला अनुमोदन..

पण मेट्रो, रिक्षा, taxi परवडते का कारण बऱ्याच गोष्टी त्यांना परवडत नाहीत असं इथल्या पोस्ट्स वाचून वाटते.

शेअरने परवडत असेल बहुतेक.

काल शेवटी शेवटी बघितल की ते दोघ बाहेर पडत असताना काका त्यांना थांबवतात.. न्हेमीप्रमाणे पाघळले भौतेक

त्यांचं जेवणखाण पण बंद केलं का? भजीपाव खाताना दाखवलं काल...

स्वत:च्या अज्ञानापायी शासनाच्या स्वस्त झुणकाभाकर योजनेपासून लेखकाने वंचित ठेवले या दोघांना... यांना आपलं म्हणा!

काल शेवटी शेवटी बघितल की ते दोघ बाहेर पडत असताना काका त्यांना थांबवतात.. न्हेमीप्रमाणे पाघळले भौतेक>> ते बहुतेक अट घालतील की कुमुला तुमचं लग्न झाल्याचं सांगा तर घरात थारा देईन. त्याच टायमाला सुभा आऊला सांगेल की त्याला अदिती आवडते.. मग आऊची द्विधा मनःस्थिती. त्या नंदिनीकडे मन मोकळं करतील. ती काहीतरी नवस बिवस बोलेल. पँटवाले तिला रोखतील. मध्येच रजनीला हाताशी धरून दाभोळकर काहीतरी षडयंत्र रचतील.
आई ग्गं! हे फारच लॉजिकल झालं सगळं... मालिकेत हे असं काहीतरी दाखवायला परवानगी मिळायची नाही झीची. नव्याने स्टोरी लिहायला घ्यावी झालं.

बांद्र्याला कधी झालं मेट्रो स्टेशन? >> नाही नाही. डी एन नगर. तिथ परेन्त आटोने यायलाच लागेल. ते परवडायचे नाही त्यांना. त्यात मेट्रोचेही तिकीट वाढले. आहे.

असं काहीही होणार नाहीये हे माहितेय ना मंजूडी? Happy

मी केव्हाच लिहिलं होतं- जय अदिती कधीही पोटभर खाताना दाखवत नाहीत. काल आऊंबरोबरही कसाबसा घास गिळताना दाखवली एक. त्यांना का खाऊ देत नाहीत काय माहित!

मन्जूडी Lol माझे डोके गरगरलेय. पण का कोण जाणे लग्न झाले आहे हे ऑफिसमध्ये लपवलय याबद्दल काकुना सान्गतात, मग काकाना पण त्याच वेळी का नाही सान्गीतले देव जाणे. माझे सुरुवाती चे भाग चूकलेय त्यामुळे हे कळलेच नाही. पण मग सिरीयल कशी चालली असती? आता रजनी ने किडा सोडुन दिलाय अदितीच्या लग्नाचा. नवरेना सान्गत होती माहिती काढा म्हणून.

अचानक घर गेल काय किंवा नोकरी गेली काय भाजी,पोळी,भात्,आमटी सोडुन नुसत भजी पाव खाण्याची वेळ इतक्या चट्टकन कधीच कुणावर येत नाही..

मला नाही वाटत काका पाघळलेत.
ते काही तरी कामासाठी किंवा वस्तू परत द्या म्हणून किंवा डिपॉसिटचे पैसे परत द्यायला वगैरे थांबवत असतील
(एक मिनिटासाठीच)

नटसम्राटमधला कुणी घर देता का घर...हा संवाद त्या रडक्या जयला म्हणायला द्या....

आजूबाजूची चार लोकं येऊन त्याला म्हणतील, पाहिजे तर आमच्या घरात रहा पण असे संवाद नको म्हणू

हे बघा गरोदरपणात वाटत असेल काही बाही खावं.
का...का...का त्यांच्या जेवणावर उठलात सगळे.
(खरतरं मॅगी खाताना दाखवणार होते पण सध्या चालु असलेल्या मैगी/मॅगी/मेगी जांगडगुत्त्यामुळे बोंबलले)

Pages