मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी हा धागा फॉलो करतो,परंतु इथले स्त्री आय्डी फक्त चेष्टा मस्करी करण्यातच धन्यता मानत आहेत.माझ्यासारख्या या मालिकेच्या डाय हार्ट फॅन्स्ना याचा त्रास होतो ,क्रुपया समजून घ्या दक्षिणा, रश्मी, मुग्धटली प्लीज प्लीज

मी हा धागा फॉलो करतो,परंतु इथले स्त्री आय्डी फक्त चेष्टा मस्करी करण्यातच धन्यता मानत आहेत.माझ्यासारख्या या मालिकेच्या डाय हार्ट फॅन्स्ना याचा त्रास होतो ,क्रुपया समजून घ्या दक्षिणा, रश्मी, मुग्धटली प्लीज प्लीज

मंदार मी याच्यावरचा उपाय तुम्हाला सांगितलाय कालच.. तुम्हाला त्रास होतो तर तुम्ही धाग्यावर येत जाउ नका.. पण म्हणुन शिरेलीत जे काही घडतय त्यावर चर्चा करण आम्ही का थांबवाव? मी सुद्धा ही मालिका आवडीने बघते पण ती त्या कथानकासाठी नव्हे तर त्यातल्या काही कलाकारांच्या अभिनयासाठी.. उदा. सुबोध भावे, अरुण नलावडे, मानसी मागीकर.

बॉन्ड, फक्त ऑफीसमध्ये ते दोघ नवरा-बायको म्हणुन वागत नाहीयेत, बाकी सर्व ठिकाणी ते नवरा-बायको म्हणुनच वावरत आहेत

जेम्स बाँड Lol गूड वन!

मुग्धटली, तुम्ही कृपया इग्नोरास्त्र वापराल का? कृपा होईल.
आणि जेम्स बाँडची पोस्ट विनोदी अंगाने/ उपरोधाने वाचा, मजा येईल तुम्हाला.

मंजुडी आज त्यांना लिहीलय ते फायनल आहे.. याच्यापुढे माबोवरच ब्रह्मास्त्र.. हेमाशेपो लिहायला विसरले.. कामाच्या घाईत..

@मुग्धटली & मंजुडी,
सध्या ही सुटीसाठी गावी गेल्या कारणाने सिरेलीचे अत्याचार बंद आहेत. Proud Proud Proud
मला त्या सिरेलीच्या फक्त जाहिरातीच आवडल्या होत्या.

मी अ‍ॅडमिनच्या विपुत ऑलरेडी तक्रार केली आहे. मंजूडे तू म्हणतेस तसं मी तर इग्नोरास्त्र वापरायला कधीपासूनच सुरूवात केली आहे.

आणि तिने जयलाही ओळखलं. हो ना? की ते तिचं स्वप्न होतं? मी नेहमीप्रमाणेच हा भाग ओझरता पाहिला-ऐकला.

ते दोघेही एकमेकांशी चॅलेंज चॅलेंज खेळत होते. माझी चूक... नाही रे..माझी दुप्पट चूक.. अगं नाही गं, माझंच चुकलं. नाही रे नाही... माझं चुकलं.

काल पाहिलेली शिरेल आणि इथला संवाद यावरून मी असा अंदाज बांधतो, की म्हसोबा आत्ताच आदितीला बाळंतपणासाठी तिच्या माहेरी घेऊन जाईल ........ Happy

अरे वा आदिती लवकर शुद्धीवर आली म्हणायची Wink , सुभा गेला महत्वाच्या मीटींगला का एंप्लॉयीच्या उशाशी बसलायं ?

ते दोघेही एकमेकांशी चॅलेंज चॅलेंज खेळत होते. माझी चूक... नाही रे..माझी दुप्पट चूक.. अगं नाही गं, माझंच चुकलं. नाही रे नाही... माझं चुकलं. >>>>>>>>>>>>>>>> ++++++१
Lol

अरे बापरेऽऽ... आता बाळतंपणात ९ महिने माहेरवाशिणीचा "दुरावा" अरेरे कारे करीत दाखवित बसणार की काय? अन खरोखरचे ९ महिने म्हणजे यांचे तिप्पट तरी होणार.

अरे चावट लोकानो, काल तसे काही नाही दाखवले.:फिदी: हो, एकमेकाना दोष देत बसले होते हातात हात घेऊन. जय म्हणाला की वहिनीने त्रास देऊनही तू सगळे काही सोसुन काम करतेस, काही बोलत नाहीस, नेमके हेच म्हसोबाने ऐकले वाटत. कारण त्याला कल्पना आली असेल की शोभडी अदितीला राबवुन घेत असेल म्हणून. म्हसोबाने ठरवलेय की अदितीला आता जय बरोबर राहु द्यायचे नाही.

मग? मग अदिती हाफिसात कशी जाणार? राजीनामा देणार का? की माहेरुनच जाणार? शोभडीला हाताखाली कोण मिळणार? रजनी की जुई? रजनी असेल तर मस्त मज्जा येईल. जाम वचावचा बोलतील आणी कडाकडा भान्डतील दोघी.:खोखो: गट्टु ( अडाणतट्टु) चे काय होईल? जुई आणी अमितची जोडी लावावी का? नन्दिनी दोन दिवस कुठे गेली? लय म्हणजे लयच प्रश्न पडलेत मला.:फिदी:

रश्मी Rofl

इललॉजीकल प्रश्नांची उत्तरे जानने के लीये बघा मालिका (का?) कारेदु
आणि लॉजीकल प्रश्नांची उत्तरे जानने केलीये पढीयें माबो चा बाफ़/बीबी

पण शोभडी आणि रजनी एकदम रामबाण .. भारी मज्जा येईल!

मग? मग अदिती हाफिसात कशी जाणार? राजीनामा देणार का? की माहेरुनच जाणार? शोभडीला हाताखाली कोण मिळणार? रजनी की जुई? रजनी असेल तर मस्त मज्जा येईल. जाम वचावचा बोलतील आणी कडाकडा भान्डतील दोघी. गट्टु ( अडाणतट्टु) चे काय होईल? जुई आणी अमितची जोडी लावावी का? नन्दिनी दोन दिवस कुठे गेली? लय म्हणजे लयच प्रश्न पडलेत मला.>> Lol आता मला पण शिरेल बघताना पिडणार हे प्रश्न.

कालच्या भागातला सर्वात भिषण डायलॉग कोणता होता तर तो चपलेचा.
जय म्हणतो एक टाका घातला असता तर चाललं असतं हे सगळं झालं नस्तं.
त्यावर अदिती म्हणते की अरे मीच नाही म्हणाले ना तुला Uhoh

आदल्या दिवशी रात्री तुटलेली चप्पल घालून ही मुलगी तशीच दाभो कडे फाईल द्यायला येते? Uhoh आणि तुटलेली चप्पल न शिवण्यामागचं नक्की लॉजिक काय? सेफ्टिपिन लावली होती का इतका वेळ?

आदल्या दिवशी रात्री तुटलेली चप्पल घालून ही मुलगी तशीच दाभो कडे फाईल द्यायला येते?>>>>> तिला लन्गडी घालत येऊन फाईल द्यायची असेल.:खोखो: बाय द वे, मला लन्गडी म्हणले की शम्मी कपूरचे जानवर सिनेमातले तुमसे अच्छा कौन है हे गाणे आठवते.:फिदी: आणी भयानक हसू येते.

खरय पण कितीही वाद झाले तरी तुटलेली चप्पल घालुन कोण बाहेर बाजारात/ ऑफिसला किन्वा आणखीन कुठे जाऊ शकेल?:अओ: फुकट आपल्याच इज्जतीचा आणी कद्रुपणाचा पन्चनामा होईल. आणी हे खरे कारण तिने म्हसोबाला सान्गावेच, म्हणजे त्याला पण कळेल की आपली मुलगी कशी आपल्याच ( बापाच्या ) स्वभावावर गेली आहे ते. पण हे होणार नाही, सिरीयल मात्र ताणतील.

राज कपूरच्या जागी आदितीला ठेवून (हा हंत हंत!) खालील गाणे मेरा जूता ह जापानी च्या चालीवर म्हणावे.

माझी चप्पल तुटलेली
विरार लोकल चुकलेली
जयची मी सिक्रेट पत्नी
तरी मागे लागली रजनी...

टिं.. टिणीणी णी.. णी णी.. णिणिणी..

शोभावैनींचा स्वैपाक करूनी
गोळीसह देते आण्णांना पाणी..
कुणाला काय थाप मारलेली
असते सदैव माझ्या ध्यानी...

टि...टिणीणि ...

नवरा नशीबी भोळा सांब
बापाला आहे पैशाचा दंभ..
ओ....ओओओ
केतकरकाका उपटसुंभ
माझी नेहमी बोलती बंद!

टि..टिणीणीणि णी...

आण्णा कायम दुःखात मग्न
नंदिनी-काका करतील लग्न
जुई रजनीची स्वप्नं भग्न
गट्टूचा होणार प्रेमभंग..
टि.. टिणीणी णी टिणीणि णी णि णी..

जय आणि आदिती कायम कोणाच्या तेराव्याला जेवायला जायचं असल्यासारखे किंवा नुकतेच तेराव्याचं जेवून आल्यासारखे भाव चेहर्‍यावर घेऊन का फिरतात?>>+१००

Pages