निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
सनईचा सूर कसा वार्याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला
तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.
गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.
वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
दिनेशदा तुम्ही लोकसत्ता मध्ये
दिनेशदा तुम्ही लोकसत्ता मध्ये माझा लेख नाही पाहीला. (दु:खी बाहुली.)
आजच्या लोकसत्ताच्या वास्तुरंग मध्ये माझा दिवाळी वरचा लेख आहे.
जागू, पक्षी मस्तच! तो हळद्या
जागू, पक्षी मस्तच! तो हळद्या काय सह्ही आलाय! आणि तो वंचक का बरं असा 'नाही मी बोलत....' अशी पोझ घेऊन बसलाय???? {तो (वंचक) आणि तू तुम्ही दोघेही मासेखाऊ!!!!! म्हणजे बहीण भाऊ!! }
आमच्याकडे शनीवारचा लोकसत्ता येतो पण हल्ली त्याबरोबर वास्तुरंग पुरवणी येत नाहीये त्यामुळे तो लेख नाही वाचता येणार. पण ई लोकसत्ता उघडून वाचेन.
दा, पोस्ट खूप आवडली.
शांकली त्याला मासे नाही
शांकली त्याला मासे नाही मिळाले म्हणून असा फुगुन बसलाय
वंचक नाव छान आहे. ही घे लिंक. http://www.loksatta.com/vasturang-news/diwali-enthusiasm-and-joy-around-...
जागू आत्ता वाचला. छानच आहे.
जागू आत्ता वाचला. छानच आहे.
खरं तर तूझं जागू नावच डो़क्यात फिट्ट बसलंय. खरं नाव पटकन आठवतच नाही
लोकसत्ताचा लेख छान
लोकसत्ताचा लेख छान जागू.पक्षांचे फोटोही छान.
सुदुपार... दिनेश दा ती निळ
सुदुपार... दिनेश दा ती निळ लिंक ओपन नाही होत आहे.. यु ट्युब मुळे..
जागु काय सुररेख लिहितेस ग! एक दम दर्जेदार ...:) मनापासुन अभिनंदन!!
सुदुपार! जागू , लेख आवडला.
सुदुपार! जागू , लेख आवडला.
वा जागू अभिनंदन. सुरेख लेख.
वा जागू अभिनंदन. सुरेख लेख. जुन्या खूप आठवणी जाग्या झाल्या.
जागू, लेख मस्त लिहिला आहेस!
जागू, लेख मस्त लिहिला आहेस! खूप आवडला.
जागू, लेख मस्त लिहिला आहेस!
जागू, लेख मस्त लिहिला आहेस! खूप आवडला.
सर्रव वाचले.. किती बॅकलॉग
सर्रव वाचले.. किती बॅकलॉग झाला होता जमा........
पलक चं अभिनंदन.. निग वर येऊन गप्पा मारता येत नव्हत्या म्हणून चैन नव्हतं पडत ..
हो जागू मी सकाळीच वाचला होता
हो जागू मी सकाळीच वाचला होता तुझा लेख. मस्त एकदम. अभिनंदन. बरोबरचं रंगीत चित्र पण छान आहे.
संध्याकाळी माझ्याच नादात
संध्याकाळी माझ्याच नादात चालले होते आणि अचानक तो पुढ्यात ठाकला.
त्याच्या अनपेक्षित भेटीनी मी जरा गडबडलेच आणि रस्त्याच्या कडेला जाऊन थांबले.
घाईघाईनी घरी परत निघालाय असं वाटत होतं ! डोळे पाण्यानी भरून आले त्याचेही आणि माझेही !
गुड्बाय पण करणार नाहीस का ?
पुनःश्च भेटीचं वचन घेऊन मी त्याला निरोप दिला.
.
.
.
.
ओळखा बरं कोण भेटलं मला ?
मला इतकं हळवं करणारा दुसरा कोण असणार. ?............तो होता 'परतीचा पाऊस'
जागू , लेख मस्त जमला आहे. पण
जागू , लेख मस्त जमला आहे. पण आधी कुठे तरी वाचल्यासारखा वाटतो आहे.
बरोबर आहे माझ्ं . आली
बरोबर आहे माझ्ं . आली दिवाळी धागा वाचला ग.
जागूला, वाढदिवसाच्या हार्दिक
जागूला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!
— आम्हा सर्वांकडुन
जागूला यांच्यातर्फे हि
जागूला यांच्यातर्फे हि शुभेच्छा!!!!
जागू, वाढदिवसाच्या हार्दिक
जागू, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जागू इथेही वास्तुरंग आला का
जागू इथेही वास्तुरंग आला का पाहिलं पाहिजे. कारण लोकसत्ता आम्ही घेतोच.
जागू तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
जागू, तुला वाढदिवसाच्या खूप
जागू, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! >>>>>> येस्स ....
जागू, वाढदिवसाच्या हार्दिक
जागू, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
खरं तर तूझं जागू नावच डो़क्यात फिट्ट बसलंय. खरं नाव पटकन आठवतच नाही >>>>+१ चूली वर लिहिलेला लेख वाचताना ,अरे ही लेखन शैली जागूसारखी आहे असं वाटत राहिलं होतं.नंतर मा.बो.वरून नाव कळलं.
जागू तुझा लेख मस्त .
जागू तुझा लेख मस्त . अभिनंदन.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Loks, mala bird food mumbai
Loks, mala bird food mumbai madhe kuthe milel? Basically bird food
/feed mhanje kay? Mixture of grains/seeds na? Ghari karta yeil ka? Koni guide karu shakel ka?
जागु, वाढदिवसाच्या हार्दिक
जागु, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जागुले.. वाढदिवसाच्या भरभरून
जागुले.. वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा!!!!!!!!!!
गेले ३-४ महिन्यांपासून
गेले ३-४ महिन्यांपासून हॉलच्या खिडकीबाहेरच्या कोपर्यात चिमणा-चिमणीची ये-जा चालू होती..आधी प्लॉटची टेहळणी चालू होती. नंतर चोचीत काड्या इ.दिसू लागल्या.कुठे बांधले घरटे त्यांनाच माहित. पण त्यांनी बिचकू नये म्हणून झाडांना पाणी जपून घालणे सुरू ठेवले. अंडी घालून झाली असावीत,त्यानंतर चोचीत अळ्या इ.दिसत होत्या.मधे एकदा झाडांची वाळली पाने काढायला, बाहेर डोकावले तर चिमणा शूर सरदाराप्रमाणे तिकडे ठाण मांडून राहिला.मग मीच माघार घेतली.इतके दिवस त्यांचे बागडणे ,त्यांची वेगवेगळी मंजूळ चिवचिव चालू होती,क्वचित लडिवाळही भासत होती..आज मुद्दाम भाताच्या लोंब्या ग्रिलला बांधल्या.पण आज त्यांची चाहूलही नाही.बहुदा त्यांचे काम संपले असावे. खूपखूप रिकामी वाटतंय.
जागुले, वादिहाशु गं. गेल्या
जागुले, वादिहाशु गं.
गेल्या एप्रिलमध्ये आमचा एस सोडुन गेला, त्यानंतर एस जुनिअर आणि रॉबिन घरी आले. आमचा एस संत होता पण या मांजरांना मवाली आणि टपोरी हीच नावे शोभतील असे त्यांचे वागणे होते. तुमचा विश्वास बसणार नाही पण ही जोडी आमच्या शेजा-यांच्या जर्मन शेफर्डला वाकुल्या दाखवायची, आम्ही मुक्त तर तु पिंज-यात असे म्हणुन. हे रोजचे होते त्यांचे. तो केवढा, ही केवढी, पण यांच्या अंगात माज किती..
घरात तर दोघांचाही पाय टिकायचा नाही. पोट भरले की सुटली बाहेर. शेवटी अशीच कुत्र्यांशी पंगा घेताना रॉबीन गेली. आणि ती गेल्यावर एकटा पडलेला एस गेल्या आठवड्यात घर सोडून कुठे निघुन गेला. तो तसाही डोक्यावर पडलेलाच होता, प्रचंड मुर्ख. इतके दिवस दोघे एकत्र फिरायची तेव्हा रॉबीन त्याची काळजी घ्याय्ची. ती गेल्यावर हा बाहेर जात नसे, घरीच पडुन असे. गेल्या आठवड्यात न सांगता गेला आणि परतीचा रस्ता अजुन सापडलाच नाहीय त्याला. आम्ही आजही तो परतेल या आशेवर आहोत.
आता परत मांजराचा शोध सुरू. नेहमीसारखे आता मांजरे बिंजरे काहीच नकोत या भुमिकेवरुन घसरत घसरत ऐशु आता फक्त मांजरीच घेऊया या भुमिकेवर आलीय. परत मांजरशोध सुरू. आता बोके नाही आणणार, फक्त मांजरच म्हणजे ती घरीच बसुन राहिल.
देवकी छान अनुभव टिपलाय!!
देवकी छान अनुभव टिपलाय!!
साधना, अगं सेम हियर!!!! आमची मनी अश्शीच आहे... आमच्या एका शेजार्यांकडे कुत्री आहे; तिला बहुतेक वेळा बांधूनच ठेवलेलं असतं. आणि जेव्हा तिला खायला दिलेलं असतं तेव्हा ही ढमी खुशाल तिच्या ताटलीतलं पेडिग्री, तिची जेली चोरून खाते आणि वर तिच्याकडे 'बघ तू काही करू शकत नाहीस!' असा आविर्भाव दाखवते... त्या वहिनी ह्या आमच्या बयेची तक्रार करत होत्या.... मला ऐकताना असं वाटलं की आपल्याच मुलीबद्दल शाळेतल्या बाई किंवा इतर कुणीतरी खोड्या काढल्याबद्दल तक्रार करताहेत. हे कमी की काय ह्या बाईसाहेब मागच्या वहिनींच्या कडे त्यांच्या नातवंडांच्या रूममधे जी सॉफ्ट टॉईज ठेवलीयेत त्यांत जाऊन झोपतात. दोन तीन दिवस मासे आणले नाहीत हिला' तर दारात उभ्या राहणार्या प्रत्येक कार मधे, रिक्षात जाऊन किंवा कुणी बाईकवाला थांबला तर त्याच्यापाशी जाऊन 'मला मासे आणलेत का?' असं विचारल्या सारखं करत जाते! आणि मग हताश होऊन काहीतरी बडबड करत अंगणात येऊन पसरते. घरी येणार्या प्रत्येकाने हिच्यासाठी मासे आणलेच असले पाहिजेत असा हिचा काहीतरी समज झालाय! कारण प्रत्येकाच्या पायात घोटाळून अगदी जीव काढल्यासारखी ओरडत असते!......
जागु उ.वा. दि हा.शु... जिप्सी
जागु उ.वा. दि हा.शु...
जिप्सी
देवकी छान अनुभव...
लहान मुलं कीती निरागस असतात नाही!
सोनचाफा आईला आवडतो... ती सारखी बरळत असते की खुप फुलं येऊ देत म्हणुन माझ्या छकुल्यानी (सुखद, वय वर्ष ५)चक्क बाप्पाला च कुंडीत बसवले...:)
हॅप्पी बड्डे जागू ! साधना /
हॅप्पी बड्डे जागू !
साधना / शांकली... आमच्या घरी एक पामेरीयन होती. तिचे नाव डींपल. आमच्या सोसायटीतली मुले माझ्या आईला, डींपल कि मम्मी असे म्हणत असत. तसे तूम्हा दोघींचे होणार आहे.
Pages