निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रभात लोक्स Happy

गेल्या दोन दिवसात ईकडे कोणी फिरकलेच नाही का?>>>>> सगळेजण मजा करताहेत.उद्यापरवा सगळे उगवतील. >>>>अगदी अगदी, देवकी Happy मी सुद्धा आज आलोच. Wink

यावर्षीच्या दिवाळीतील माझी लुडबुड Happy

दरवर्षीप्रमाणेच दिवाळीत लवकर उठुन दादरला फुलबाजारात जाऊन फुलं घेऊन आलो. यावेळेस फुलबाजारात ताजी ताजी गुलाबी कण्हेर मिळाली. त्याचेच भरगच्च हार बनवले. Happy हार बनवून, पूजेला फुलं ठेवून उरलेल्या फुलातुन हे उद्योग केले. Happy यावर पाण्याचा स्प्रे करत होतो चांगली दोन दिवस टिकली फुलं. Happy

अर्रे व्वा.. जिप्स्या.. सुं>>दर >>
गेल्या वर्षीपास्न जिप्स्याने फोटोग्राफी व्यतिरिक्त बर्‍याच विविध कलांत फर्स्ट क्लास प्रगती केलीये नै?? Wink Proud

आज पहाटे पूर्व क्षितिजावर चतुर्दशीची अति नाजुक चंद्रकोर इतकी सुरेख दिसत होती की बस्स ...>>>>
शशांक, काही चुकते आहे का? कारण मी हीच चंद्रकोर पश्चिम दिशेला पाहिले. चंद्रकोर नक्की कुठल्या दिशेला उगवते? खूपच बेसिक प्रश्न विचारला आहे Happy पण खरच माझ्याकडे मी चन्द्रकोर पश्चिम दिशेच्या क्षितिजावर पाहिली आहे Happy

मला लसून आणि कोंथिंबीरचा वास तेवढा नाही आवडत पण हो कढीपत्त्याचा वास आणि लिंबाचा वास हुंगतच रहावासा वाटतो.

सुप्रभात...
जिप्सी, अप्रतिम रांगोळी, मस्त ब्राईट कलर्स आहेत..
मनुषी ताई त्या तगरीला इकडे दुध मोगरा म्हणतात... छान टवटवीत आहे..

ही दिवाळीत मी काढलेली रांगोळी...

diwali_0.jpgdiwali 3_0.jpg

.

आज पहाटे पूर्व क्षितिजावर चतुर्दशीची अति नाजुक चंद्रकोर इतकी सुरेख दिसत होती की बस्स ...>>>>
शशांक, काही चुकते आहे का? कारण मी हीच चंद्रकोर पश्चिम दिशेला पाहिले. चंद्रकोर नक्की कुठल्या दिशेला उगवते? >>>>
१] हे पहाणे - यावरुन मुंबईला चंद्रोदय व अस्त यांच्या वेळा कळून येतील http://www.timeanddate.com/moon/india/mumbai
२] २२ ऑक्टोबर २०१४ - पहाटे ०५:०४ ला चंद्रोदय - यानंतर साधारणतः अर्ध्या तासाने मी ही कोर पूर्व क्षितिजावर पाहिली. (नरकचतुर्दशी - वद्य किंवा कृष्ण पक्ष ) सूर्य उगवल्यावर सहाजिकच आपण ही कोर पाहू शकणारच नाही. पण ही कोर सायंकाळी १७:१२ ला पश्चिम क्षितिजावर मावळली - त्यावेळेसही सूर्य असल्याने आपण ती पाहू शकणार नाही.
३] अमावस्येनंतर जी चंद्रकोर दिसते ती आपण सायंकाळी पहातो व ती पश्चिम क्षितीजाच्या जवळ असते - जी लगेच मावळते. पण ही पूर्व क्षितीजावर केव्हा उगवते ते त्या वरील लिंकवरुन लक्षात येईल.
आपण जेव्हा आकाशात कोर पहातो ती आपल्याला दृष्य केव्हा होते ती वेळ आपल्या लक्षात रहाते. पण चंद्र हा दररोज पूर्व क्षितीजावर केव्हा उदय पावतो व केव्हा पश्चिम क्षितीजावर मावळतो ते सारे त्या वरील लिंकवरुन लक्षात येईल.
बी - तुम्ही सिंगापूरला रहात असल्याने त्या लिंकद्वारा तेथील चंद्राचा उदय व अस्त काढू शकाल व आकाशात जेव्हा आपल्याला चंद्र दृष्य असतो तेव्हा त्याच्या वेळा लक्षात घेऊ शकाल.
आय होप आय हॅव नॉट कन्फ्यूज्ड यू ... Happy Wink

सायली तू दिलेल्या तेरड्याच्या बिया मी एकाच कुंडीत लावल्या आणि ती कुंडी अशी काही दिवस बहरत होती.

आता त्या फुलांच्या जागी तेरड्याची फळे आली आहेत. त्या फळांची किड होण्याची गंमत मी माझ्या दोन्ही मुलींना दाखवल्याने त्या रोज येता-जाता फळ फोडून किड्-किड खेळतात.

जो, अप्रतिम कविता... आणि सोबतचा देखावा पण... अभिनंदन!

अश्विनी, जागु धन्स! Happy

हे शेंद्रीला आलेले पहिले वहिले फुल...

मला आवडत म्हणुन सासु बाईंनी त्यांच्या मैत्रीणी कडुन बिया आणुन दिल्या होत्या Happy
त्या रुजल्या, छोटस रोप तयार झालं, कळ्या आल्या आणि मग एक फुलं उमललं
हे सगळ बघतांना खुप छान वाटत होत...:)

shendri2.jpgshendri3.jpgshendri fower.jpg

जिप्स्या, सुंदर रांगोळ्या, तो गोंड्याचा जांभळा रंग माझ्या खास आवडीचा. आणि फुल सुकले तरी रंग तसाच राहतो.

जागू, तेरड्याची किड.. माझ्याही लहानपणीचा खेळ. आता अबोलीचे फटाके पण दाखव.

सायली, मस्त फूल आहे.

जिप्सी, सायली,
रांगोळ्या सुंदर!
जिप्सी, गोल रांगोळीच्या मध्यभागी काय वापरले आहे?
जांभळी फुले फारच सुंदर दिसताहेत. आत्ता दिवाळीत भीमाशंकरला गेले होते, तिथे या फुलांचे वर्षभर टिकणारे हार मिळतात. खूपच छान दिसतात. मीही एक घेतला आहे आणि त्याचे तोरण दरवाजावर बांधले आहे Happy

जिप्स्याने लक्ष्मीची पावले कशी चितारलीत ?
आमची लहानपणीची ट्रीक. मूठ वळून तिचा करंगळीचा भाग रंगात बुडवायचा आणि त्याचा ठसा उमटवायचा. मग पाचही बोटांची नुसती टोके रंगात बुडवून पाच बोटे काढायची. खडूच्या चूर्‍याचा वापर करून शाळेच्या फळ्यावर असे केले होते.

आदिजो धन्यवाद..
जिप्स्याने लक्ष्मीची पावले कशी चितारलीत ?++++ तुम्ही सांगत आहात तशीच काढलेली दिसतायत जिप्सी ह्यांनी...

धन्यवाद लोक्स Happy
खरंतर मला रांगोळी बिंगोळी काढायची बिलकुल हौस नाही Wink दसर्‍याला सहजच काढलेली रांगोळी सगळ्यांना आवडली म्हणुन दिवाळीतही केला उद्योग. Happy

जिप्सी, गोल रांगोळीच्या मध्यभागी काय वापरले आहे?>>>>>>अदिजो, ते भाताच्या लोंब्यामधील दाणे आहेत. Happy दारावरचे तोरण बनवून उरलेले इथे वापरले. Happy रांगोळी विस्कटल्यानंतर ते चिमण्यांना खाऊ घातले. काहीवेळातच भाताचे दाणे गायब होऊन त्याचे तुस उरले. Happy

जिप्स्याने लक्ष्मीची पावले कशी चितारलीत ?++++ तुम्ही सांगत आहात तशीच काढलेली दिसतायत जिप्सी ह्यांनी...>>>>>होय दिनेशदा, तुम्ही वर सांगितलं आहे तशीच काढलीत. Happy फक्त खडुच्या ऐवजी चुना वापरला आहे. Happy

लक्ष्मीच्या पावलांची आयड्या भारी.
पुण्याच्या घराच्या बाल्कनीतला बुलबुल . पिलांसाठी आणलेला खाऊ दिसतोय चोचीत............

Pages