निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
सनईचा सूर कसा वार्याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला
तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.
गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.
वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
शशांक, चंद्रोदय आणि चंद्रास्त
शशांक, चंद्रोदय आणि चंद्रास्त बद्दल खूपच छान माहिती दिली त्याबद्दल धन्स
जिप्सी रांगोळी
जिप्सी रांगोळी सुंदर.
लक्ष्मीची पावले मी कुंकुने काढते.
लक्ष्मीपुजना साठी कमळ विकत घेत असताना,
फुल फुललेले नव्हते.
ते लिलि की कमळ कसे ओळखायचे.
मनुषी ताई मस्त टिपलयस बुलबुल!
मनुषी ताई मस्त टिपलयस बुलबुल!
ते लिलि की कमळ कसे ओळखायचे.
ते लिलि की कमळ कसे ओळखायचे. >>>>
हे पहा - http://www.maayboli.com/node/35684 (कुमुद (वॉटरलिली), कमळ)
सुप्रभात. आज जरा दोन
सुप्रभात.
आज जरा दोन दिवसांनंतर उन पडले आहे. पण थंडी थोड्या प्रमाणात आहेच.
मनुषी ताई मस्त टिपलयस
मनुषी ताई मस्त टिपलयस बुलबुल!>>>>>... ठांकू सायली..........पुण्यात लेकाच्या एस एल आर कॅमेर्यावर जरा हात साफ करत होते.
मानुषी, काय मस्त टिपलाय
मानुषी, काय मस्त टिपलाय बुलबुल..
आता हे बुलबुल माणसांना सोकावलेत. जास्तच धीट झालेत !
काय सांगू दिनेश......या
काय सांगू दिनेश......या बुलबुलांचं.......खरंच खूप धीट आहेत. आणि आम्हा माणसांना पुरते ओळखून आहेत. जर्राही घाबरत नाहीत. या बाल्कनीत कपडे वाळत घालणे इ.इ. प्रोसेस चालते. तरीही अजिबात हलत नाहीत.
पण कबुतरांपेक्षा परवडले.
संपादित.
संपादित.
मस्त माहीती ...बॅक्लॉग भरून
मस्त माहीती ...बॅक्लॉग भरून काढते आहे.
आज काल कॉलनी मधे चिमण्यंपेक्षा लहान दिसणारे पक्षी आले आहेत , गावी असतात हे पक्षी . फोटो काढायला जमत नाहीत कारण अतिशय चपळ आहेत. तुळशीची सगळी पाने खाऊन टाकतात. त्यांचे नाव माहीत आहे का कुणाला?
Srd , छान निरिक्षण.. सामी
Srd , छान निरिक्षण.. सामी सुर्यपक्षी असावेत कदाचीत..
आज काल कॉलनी मधे
आज काल कॉलनी मधे चिमण्यंपेक्षा लहान दिसणारे पक्षी आले आहेत , गावी असतात हे पक्षी . फोटो काढायला जमत नाहीत कारण अतिशय चपळ आहेत. तुळशीची सगळी पाने खाऊन टाकतात. त्यांचे नाव माहीत आहे का कुणाला? >>>> स्पॉटेड मुनिया - (spotted munia) नावाने गुगलून पहा तेच आहेत का हे पक्षी ...
संपादित.
संपादित.
शरदराव (srd) - तुम्ही दिलेली
शरदराव (srd) - तुम्ही दिलेली पक्ष्यांची साईट फारच भारी आहे - मनापासून धन्स.
सामी, ते पक्षी आयुर्वेदीक
सामी, ते पक्षी आयुर्वेदीक औषधे खात असावेत !
पक्ष्यांची साईट फार भारी आहे.
माहितीचा खजिना खूप आहे परंतू
माहितीचा खजिना खूप आहे परंतू पक्षी ,प्राणी, कीटक, साप, वनस्पती ओळखून त्याचे सर्वमान्य शास्त्रिय नाव सांगू शकतात त्यांना फार मागणी आहे.
शशांक, स्पॉटेड मुनिया नाही,
शशांक, स्पॉटेड मुनिया नाही, कारण हे पक्षी काळसर आहेत.
सायली सुर्यपक्षी असावेत असे ने ट वरच्या फोटोंवरून वाटतेय. आता पुन्हा जमल्यास फोटो काढायचा प्रयत्न करते.
धन्यवाद सगळ्यांना.
आज ८-९ दिवसांनी १ चिमणा
आज ८-९ दिवसांनी १ चिमणा ग्रिलवर दिसला.त्याच्यांसाठी लावलेल्या भाताच्या लोंब्या मस्त खाल्ल्या. आज बरेच दिवसांनी पक्षी घरी आला.ती ढोली कबुतरे येतात. पण त्यांचा वीट येतो.
प्रतिसाद २ दा आल्याने
प्रतिसाद २ दा आल्याने संपादित.
सायली सुर्यपक्षी असावेत असे
सायली सुर्यपक्षी असावेत असे ने ट वरच्या फोटोंवरून वाटतेय. आता पुन्हा जमल्यास फोटो काढायचा प्रयत्न करते. >>>> सूर्यपक्षी/ शिंजीर्/सनबर्ड हे फुलातील मध (खरं म्हणजे साखरपाणी) खातात - त्यामुळे ते नसावेत असा माझा एक कयास ...
शशांकजी, तुमचा अंदाज बरोबरच
शशांकजी, तुमचा अंदाज बरोबरच असणार. दुसरे कोणते पक्षी असतील, शिंपी किवा अॅशी असेल का?
आज सकाळी चायना मधल्या
आज सकाळी चायना मधल्या भरतकामासाठी लागणार्या सुया कशा करतात यावरचा माहितीपट बघत होतो. त्या सुयांवरचा गंज घालवण्यासाठी त्या सुया.. पाईनच्या लाकडाचा कोळसा, आंबवलेले सोयाबीन आणि पिवळी माती यांच्या मिश्रणात ठेवतात आणि मग त्या धुतल्या कि त्यावरचा गंज जाऊन त्या चकाकू लागतात..
निसर्गाची करामत !
रायगडवरच्या टकमक टोकावरचा जो वधस्तंभ आहे त्यावर काय प्रक्रिया केली असेल ? आज अनेक शतके तो असा उघड्यावर उन, पाऊस झेलत उभा आहे आणि त्यावर गंज चढलेला नाही.
घरी वापरतो त्या सुया मी
घरी वापरतो त्या सुया मी एखाद्या डबीत टाल्कम पावडर टाकून त्यात घालून ठेवते. वर्षानुवर्षं गंज चढत नाही.
हे अतीअवांतर आहे
श्रावणात येणाऱ्या
श्रावणात येणाऱ्या सोनटक्क्याच्या कळ्यां श्रावणाऐवजी अत्ता येउ लागल्या आहेत.
सगळ्या झाडांवर अत्ताच येत आहेत. अजून फुल यायला नोव्हेम्बर डिसेंबर उजाडेल.
अश्विनी जो, मी अशी कोंब
अश्विनी
जो, मी अशी कोंब माझ्या घरच्या झाडाला यायची खुप आतुरतेने वाट बघते आहे..
खुप छान प्र.ची..
अश्विनी... गोव्यात कुठलिही
अश्विनी... गोव्यात कुठलिही लोखंडी वस्तू धड रहायची नाही.. भयंकर दमट हवा तिथली ! जरा वस्तू उघड्यावर राहिली कि कामातून गेलीच म्हणायची.
जो... या दिवसात सोनटक्क्याला कळ्या ? छानच. या संपूर्ण कुळात पुष्पकोश देखणे असतात. ( आले, हळदी, कर्दळी, केळी... )
दरवर्षी ऒगस्ट ते ऒक्टोबर येत
दरवर्षी ऒगस्ट ते ऒक्टोबर येत असतात सोनट्क्क्याची फुलं
यावेळी काय झालं कळत नाही, खुपच डिले झाला.
हा जुना फोटो
मस्त चाललीय चर्चा. जो_एस
मस्त चाललीय चर्चा.
जो_एस सुंदर आहे सोनटक्का.
जो, आहाहा! काय सुरेख आहेत
जो, आहाहा! काय सुरेख आहेत फुल! पिवळा सोनटक्का इकडे खुप शोधला मिळतच नाहीये...
जो_एस, तुम्ही पुण्यात असतात
जो_एस, तुम्ही पुण्यात असतात कि मुंबईत?
मला पिवळा सोनटक्का पाहिजेच पाहिजे.
Pages