निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोहरीच आहे. एकच झाड आहे म्हणून एका फोडणीपुरत्या मोहर्‍या होतीलच. जास्त झाडे असती तर सरसोंका साग झाला असता Happy

दिनेशदा,

मारुती चितमपल्ली ह्यांनी कोल्हाचे एक उदाहरण दिले आहे की कोल्हा हा किती दुष्ट असतो तो चतुर माकडाला देखील फसवतो. माकड एकदा झाडावर चढले की कोल्हाला तिथवर काही पोहचता येत नाही. अशावेळी कोल्हा झाडाभवती गोल गोल फिरतो जेणेकरुन माकड त्याची आपल्या स्वभावानुसार नक्कल करुन वा कोल्हाकडे गोल गोल बघून घेरी येऊन शेवटी खाली पडतो. मग कोल्हा त्याची शिकार करतो.

कधीकधी मला वाटत प्राण्यांना काल काय घडले हे आठवत नसावे. नाहीतर जिथे वाघ सिंहासारखे शिकारी प्राणी आहेत तिथे हरिणे कशी राहिली असती.

सायली मस्त ग.

शशांकजी खरच शांकलीच निरिक्षण एकदम भारी आहे. मला शहाराच आला वाचताना.

मानुषीताई, मस्तच Happy तुळशीचं लग्न पाहून कित्येक वर्षं झाली. आजोळी मागच्या अंगणात वृन्दावनापाशी होत असे. अंगण नव्याने सारवले जाई.

धन्यवाद जागु,,,

बी छान उदा..

मनुषी ताई मी या फोटोची वाटच बघत होती..:)
इकडे तुळशी वॄंदावन / कुंडीवर विवाहा समयी,
बोर भाजी आवळा! कृष्ण देव सावळा!
असे लिहायची पद्धत आहे..

अश्विनीके क्रेडिट गोज टु "धाकटी जाऊ"! आणि अर्थातच शरद( काम करणारा मुलगा).........तो सगळी तयारी करून देतो , रांगोळीसकट!
धाकटी जाऊ हे पिक्चरचं नाव वाटतंय ना...:फिदी:
बोर भाजी आवळा! कृष्ण देव सावळा!
>>>>>>>>>>>>> कित्ती गोड आहे हे ............सायली! पुढील वर्षी शरदला हेच लिहायला सांगीन कुंडीवर!

सायली, आपल्याकडे विदर्भात गेरुनी तुलसी वृंदावनावर हेच लिहितात.. बोर भाजी आवळा कृष्ण देव सावळा. ही
भाजी सांग बघू कुठली असते?

धाकटी जाऊ हे पिक्चरचं नाव वाटतंय ना...>>>> हो ना Lol आणि थोरली जाऊ पायठणीवर उभी/बसून देखरेख करतेय असं पण डोळ्यासमोर येतंय Wink

बी, हरबरा असतो ना..... आणी लग्न लागल्या वर कृष्णाच्या आंगावर बोरं आणि आवळा टाकतात ना! अक्षदांसोबत..

मनुषी ताई Happy

आणि थोरली जाऊ पायठणीवर उभी/बसून देखरेख करतेय असं पण डोळ्यासमोर येतंय डोळा मारा>>>>>>>>>>>>
Biggrin

मला पण तुलसी विवास बघून बरीच वर्षे झाली.. गोव्याला मोठ्या उत्साहात होतो तो सोहळा. सरकारी उत्सव पण असतो. ( तुलसी विवाह नावाचा चित्रपटही होता, त्यात जयश्री गडकर होती बहुतेक )

बी, ते खरे आहेच. आणि प्राण्यांना विस्मरण होते त्यापेक्षा तसे केले नाही तर त्यांना जगणे वावरणेच कठिण होईल. आणि तसेही एकदा वाघाने शिकार केली कि तो उगाचच बाकिच्या प्राण्यांना त्रास देत नाही. एकंदर तो आयुष्याचा भाग म्हणून त्या प्राण्यांनी स्वीकारला असावा,

इस्रायली संत्रे !

माझ्या किचनमधेच आता उन येते. ( ३० सप्टेंबरपासून ) त्याचा फायदा घेत वाढवलेली लसणाची पात.

दिनेश दा संत्रे केवढे रस कोशींनी भरलेले दिसते आहे आणि रंग पण छान नेहमी पेक्षा गडद आहे..
लसुण पात छानच..

दिनेश पोपटी ग्लासतली पोपटी पात आणि तळातली काळी माती चित्र एकदम छान!

सायली, अगदी बरोबर. मला हरबर्‍याची भाजी खायला फार आवडते. ह्या भाजीला मीठ घालावे लागत नाही. ही भाजी धुवावी सुद्धा लागत नाही. म्हणजे कृतीमधे ही भाजी न धुता करा असे जुने माणसे म्हणतात. पण हल्ली बाजारात भाजी विकत मिळते म्हणून धुवावीच लागते. आता ह्या भाजीचा छान हंगाम आहे. मला राजुरची आठवण येते आहे.

दिनेशदा, ह्या पातिचे काय करणाप? पुण्यात ही पात छान बाहेर बाजारात मिळते. मी पुण्याला गेलो की ही पात बाजारात शोधतो.

संत्र्याचा रंग मस्तच गडद आहे. लसुण पातही छान.

आमच्याघरी दरवर्षी तुळशीचे लग्न असते. खर्‍या लग्नात गोंधळ होत नसेल इतका गोंधळ असतो त्या दिवशी आमच्याइथे सासुबाई स्पेशल Lol म्हणजे हे आणल का ते आणल का? अगरबत्ती राहीली, कृष्ण आणा, अरे प्रसाद आणा. अंतरपाट धरा. फटाके वाजवा. माझ्या सा.बा. तेंव्हा भटजीची जागा घेतात. Lol

बी, मी हि पात तोडायचे धाडस केले तर वापरेन ना ? तूमच्याकडचे याचे छान छान पदार्थ माहीत आहेत, पण असे स्वतः लावलेल्या झाडाची पाने खुडणेच माझ्या जीवावर येते.

हरभर्‍याच्या पानावर एक खास आंबट पदार्थ असतो. त्याची चव भाजीत उतरते. शेतातून ताजी ताजी खुडली तर छान. मुंबईत रस्त्यावरच्या धुळीने भरलेली असते हि.
माझ्या आजोळी सुकवूनही ठेवतात भाजी ही, हरभर्‍याचे शेंडे खुडले तर जास्त घाटे लागतात त्याला. म्हणून मुद्दाम खुडतात ही.

हरभर्‍याहुन आठवलं.
लहानपणी एकदा माझ्या आत्याच्या गावी (निफाड, नाशिक) गेलो होतो. आत्याची भरपूर शेती होती. एकदा आम्ही रात्री शेतावर असलेल्या घरात खिचडीचा बेत केला होता. खिचडीची तयारी घरातील महिला मंडळ करत होते. थंडीचे दिवस होते. दिवस मावळुन अंधार पडल्यावर शेतात काम करणार्‍या मुलांनी शेतात जाऊन ताजा हरभरा आणला, एकत्र केला आणि त्याच्याभोवती जाळ लावला. आम्ही त्या शेकोटीच्या भोवती बसलो. थोड्यावेळाने त्यांनी तो जाळ विझवला आणि आम्हाला त्यातील हरभर्‍याचे दाणे निवडुन खायला सांगितले. त्या जाळातले हरभर कसे खायचे म्हणुन मी अडुन बसलो. त्यातील एकाने मला दाणे निवडुन दिले आणि त्याची जी काय अप्रतिम चव लागली ती आजतागायत पुन्हा नाही चाखता आली. नंतर मात्र मी हाततोंड (राखेने Wink ) काळं होईपर्यंत, एक एक दाणा शोधुन शोधुन खात होतो. Proud ते हरभर्‍याचे दाणे आणि रात्री थंडीत गरमागरम दाल खिचडी (शेंगदाणे घातलेली), चुलीवर भाजलेला पापड लोणचं हे कधीच विसरू शकत नाही. Happy

Pages