निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुतेक करतात. शिवाय त्याचे पाणी काढुन ते काही पदार्थांमध्ये वापरतात अशी ऐकिव माहिती आहे.>>>>ओके. कोलकाताला करतात बहुतेक. कारण भाजी मार्केटमध्ये विकायला ठेवलं होत. Happy

रच्याकने, सायली पांढरी आणि पिवळी कोरांटी मस्तच Happy

१५ सप्टेंबरनंतर मला माझ्या एका बाल्कनीतल्या कुंड्या दुसर्‍या बाल्कनीत न्याव्या लागतात. रविवारी रिकाम्या केलेल्या बाल्कनीत बघितले तर एका लोखंडाच्या पाईपला "पालवी" फुटलेली दिसली..

केळीच्या गाभ्याच्या बाहेरच्या भागात पोटॅशियमचे क्षार असतात. त्याचे पाणी पापडाचे पिठ भिजवायला वापरतात.
आतल्या गाभ्याची भाजी करतात. बंगालीच नव्हे तर दक्षिणेकडेही करतात. तो कापणे कौशल्याचे काम असते कारण त्याला खुप तारा सुटतात. चण्याची डाळ घालून करतात भाजी. चवीला खास नसते पण किडनी साठी चांगली म्हणून आवर्जून खातात.

अरे वा, घरची मोसंबी.

अ‍ॅनिमल प्लॅनेटवर अ‍ॅनिमल ब्रेन्स नावाचा एक कार्यक्रम होता. त्यात मजेशीर प्रकार दाखवले. काही माकडांच्या मागे बिबळ्या लागला. ती माकडे सरसर एका कड्यावर चढली. बिबळ्या खालून डरकाळ्या फोडू लागला. त्या माकडांनी वरुन मोठेमोठे दगड लोटून द्यायला सुरवात केली. फेकले नाहीत नुसते लोटून दिले.. आणि बिबळ्याला पळवून लावले.

पण बिबळ्या फारच वस्ताद. तो एका झाडावर जाऊन गुपचुप बसला. झाडाखाली हरणे आल्यावर त्याने वरून एका हरणावरच थेट उडी मारून शिकार साधली.. अशी कौशल्ये त्यांच्या पिढीत कायम राहणार.. असेच प्राणी शिकत
जातात...
मग दुसरे प्राणीही त्यावर उपाय शोधतात. हि प्रक्रिया अव्याहत चालूच राहते.

धन्यवाद दा, जागु...
हो खुप रसाळ आहेत मोसंबी..
दिनेश दा छान माहिती.
जागु मेल चेक करशील प्लीज..

वर्षूदी Proud

अरे हो, एक सांगायच राहुन गेलं. यंदाच्या "मुशफिरी"च्या दिवाळी अंकात आपल्या वर्षूदीचा चायनावर लेख आला आहे. Happy फोटो आणि लेख दोन्ही झक्कास Happy

मस्त मोसंबी आहेत
आणि पानासारखा कीडा खासच

केळीच्या गाभ्याच्या बाहेरच्या भागात पोटॅशियमचे क्षार असतात. त्याचे पाणी पापडाचे पिठ भिजवायला वापरतात.
आतल्या गाभ्याची भाजी करतात.>>>>लहानपणी घरी केळीची झाडं होती तेव्हा पाहिलय
आता फारस कुणाला माहित नसेल

जो-एस. माझ्याकडे पण आत्ताच सोनटक्याला कळ्या धरत आहेत. स्मित पावसाळ्यात आल्या नाहीत.>>>
जागू मला वटत निसर्गानी त्याच वेळापत्रक बदललय
माणसाची ढ़वळाढवळ सहन करत...

ho jo.s. barobar.

varshudi. aaj librarit jaun baghate mushafiri milato ka te. congrats.

यंदाच्या "मुशफिरी"च्या दिवाळी अंकात आपल्या वर्षूदीचा चायनावर लेख आला आहे. स्मित फोटो आणि लेख दोन्ही झक्कास स्मित >>>>> अरे वा, वर्षुदी - इथे मा बो वर टाकणार का ?

दिनेशदांनी टाकलेला पर्णकीटक मस्तचे ... Happy एवढ्या जवळ असले कीटक वगैरे बघून शांकलीने (कीटकप्रिय) पी सी झटक्यात बंद केलेला दिसतोय ... Happy Wink

Need to read the backlog...

Towar nehmichya laal pivlya rangaaiwaji yandachi orangish shade.

rang.jpg

वेका मस्तच.

नविन धागा आज किंवा उद्या काढते. तोपर्यंत इथेही छान छान माहीती साठू द्या.

वेका मस्त छटा आहेत..

हा पण सोनटक्काच ना!
जि़जर लीली म्हणुन सर्च केला तर दिसतो आहे..
फोटो अंतरजालाहुन सभार..
ginger lily_0.jpg

आणि या इटुकल्या पिटुकल्या चांदण्या... (बिशॉप वीड्स)
bishop weeds.jpg

Pages