निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

न्यू झीलंड चे राष्ट्रीय झाड एक नेचे आहे. त्यांच्याकडच्या सगळ्या यूनिफॉर्म्स वर ते असतेच. पण ते खुप मोठे झाड असते. झाड असले तरी पानांतच बिया करायची सवय मात्र सोडलेली नाही.

दिनेशदा, कोकिळ अंजिरावर ताव मारतोय. या दिवसात येणारी अंजिरे रंगरूप व चवीला यथातथाच असतात. पक्षी मात्र ती आवडीने खातात.

जिप्सी, नेच्याचा फोटो नेत्रसुखद!

शांकली, ओघवती वर्णनशैली खूप आवडली.

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.

शांकली किती छान वर्णन केलंस!
माझ्या सिटाउट मधे साधारण सकाळी ११ ,१२ च्या आसपास गेले २/३ दिवस ३ फुलपाखरं येतात. दोन मोठी १ छोटं. आई बाबा बाळ असे असतील का ते? तेही अत्यंत अस्थिरपणे एकमेकांमागे उडत असतात. त्यामुळे फोटो नाही घेता आले. मोठ्या जोडीतल्या एकाचे पंख जरा फाटके आहेत. आपले नेहेमीचे काळे व पंखांवर पिवळे ठिपके असलेले.

मागील पानावर शांकलीने ज्यांचे वर्णन केले होते ते तगरीवरील सारे पक्षी - काही जमलेले फोटो - तर काही हुकलेले Happy

bulbul.jpggrey tit.jpgsun bird_0.jpgwhite eye.jpg

ही एवढी सारी पक्षीमंडळी जमल्यावर आमची "मनी" कशी शांत राहील मग ??? Happy
mani.jpg

मानुषी, फुलपाखरांमधे कुटुंबसंस्था नसते. पिल्ले आईबाबांना बघतही नसावीत.

शशांक... यापेक्षा शांकलीचे वर्णनच जास्त चित्रदर्शी होते बरं का !

शांकलीताई अप्रतिम वर्णन, तुमच्या नजरेला सलाम. ही दृष्टी माझ्याकडे असेल असं वाटत नाही मला.

शशांकजी फोटो छान.

शांकली चा शब्दचित्रपट+१

असेच निरीक्षण लिहित जा. फोटोग्राफित हे सगळे सुटून जाते .मला-पक्षी-दिसला यापुढे जात नाही आपल्याकडे तीनचार कवी आणि तीनचार मोर-पोपट-हंस च्यापलीकडे ग्रंथातून वर्णनेच (निरिक्षणे) नाहीत. संस्कृत काव्य फार थोड्यांच्या हातात म्हणूनही असेल.

लोक्स.. ते बघून माझ्याजागी कुणीही असतं तरी असंच वर्णन केलं असतं. Happy
बाय द वे, फोटो मोठ्या लेकीने काढलेत; ही सगळी मंडळी इतकी नाचत होती ना, की तिला नीटपणे फोटो घेऊन देत नव्हती! शेवटी तिला पटलं की माणसांमधे आणि या माणुसेतरांमधे हा फरक आहे की त्यांना फोटो काढून घेण्याची मुळीच गरज नसते!

आसपास गेले २/३ दिवस ३ फुलपाखरं येतात. दोन मोठी १ छोटं.>>> फुलपाखरांचे आयुष्य १५ तासाचेच असते ना Uhoh

शांकली मस्त वर्णन. शशांकची फोटोंची जोड पण Happy

जिप्सी मी पण शेवटच्या फोटोत पक्षी शोधत होते. मग ते लबाड डोळे दिसले. Wink

फुलपाखरांमधे कुटुंबसंस्था नसते. पिल्ले आईबाबांना बघतही नसावीत.+++ हे नविनच कळले... Happy
शशांकजी सुरेख फोटो.. ते बुलबुल केवढं बाळसलय!:) आणि प्र.ची. ४ मधे चष्मेवाला आहे का? तुमच्या लेकीचे धन्यवाद, प्र.ची बद्द्ल...
Srd छान प्रतिसाद.....

नमस्कार! खूप दिवसांनी इथे फिरकले. सावकाशीने वाचीन. शांकलीच्या वर्णनाची खूप तारीफ झाली म्हणून मागच्या पानावर जाऊन वाचली का सुरेख वर्णन केलंय गं सगला सीन नजरेसमोर उभा राहिला. शशाक फोटो सुरेख! दिनेशदांची माहिती नेहमीप्रमाणेच द्न्यानात भर टाकणारी...

शांकली तुझ्यासकट तुझ्या कुटूंबाला सलाम. Happy

मी मागे पण लिहील होत. माझ्या बेडरुमच्या मागे एक शेत आहे व त्यातच पाणी जाण्यासाठी मोठा नाला आहे. हे पाणी जवळ जवळ एप्रिल मार्च पर्यंत असते. ह्या पाण्यामुळे तिथे मस्त झाडी झालेली आहे. आणि झाडी आणि पाण्यामुळे अनेक पक्षांची येथे रेलचेल असते. हल्ली सकाळचा थोडा वेळ माझा खिडकित उभे राहून कोण कोण आले हे पाहण्यात जातो. रोज खंड्या, कोकिळा, हळद्या, कोतवाल, दयाळ, फुलचुख्या, कावळे हे नेहमीच हजेरी लावतात तर कधी कधी खाटक, साळुंख्या तांबट, हॉर्नबिल पण येतात. पाणकोंबड्यांची तर वस्तीच आहे तेथिल एका झाडावर. त्या पाणकोंबड्यांची पिल्लेही मस्त बागडत असतात मागे. बगळे, फ्लेमिंगो सारखे मोठे बगळे पण येतात. खारी तर नुसत्या फिरतच असतात इथे तिथे.

आपण म्हणतो पक्षी उद्याचा विचार करत नाहीत पण बुलबुल आणि कोकिळा नक्कीच करतात. हे दोघेही आपल्याकडे स्थलांतर करून येतात. स्थलांतर करणारे पक्षी आधी काही दिवस अधाश्यासारखे खाऊन चरबी जमा करतात. ती त्यांच्या लांब अंतराच्या उड्डाणासाठी आवश्यक असते.
त्यांचा जो काय ठरवलेला दिवस असतो जायचा, तोपर्यंत पिल्लांनाही उडण्यासाठी तयार करायचे असते. बहुदा हि उड्डाणे नॉन स्टॉप असतात.

जागु काय मस्त पक्षी येतात तुझ्याकडे... मस्त व्हिव असेल ना! पहिला पक्षी कोणता ग?
दिनेश दा तुमच्या मुळे खरच रोजच काही ना काही नविन माहिती मिळते..

दासबोधात रामदासांनी बाग प्रकरणात पावसाळ्याचे छान वर्णन केले आहे. {ज्ञानेशवरीत बहुतेक}एक किडा {कुंभारीण}एका अळीला मातीच्या तिच्या घरात कोंडून ठेवतो आणि ती अळी परमात्म्याच्या चिंतनाने कुंभारीण किडा होते !गमतीदार वर्णन.
इतके पक्षी मागच्या अंगणात त्यांना नको जायला कुठे माथेरान/भरतपूर.

त्या अळीला मुक्तीच मिळते की. कुंभारीण माशी तिच्या शरीरातच अंडी घालते. ती पिल्ले त्या अळीवरच पोसतात. मग अर्थातच त्या पिल्लांची कुंभारीण होते.

फुलपाखरांचे आयुष्य १५ तासाचेच असते ना>>>>>>
फुलपाखरांमधे कुटुंबसंस्था नसते. पिल्ले आईबाबांना बघतही नसावीत.>>>>>>>>>
हं...........!
जागू काय मस्त पक्षी येतात तुझ्या बागेत! लगेच जाऊन फोटो काढतेस हे कौतुक!
आता नगर न्यूज..........हमारे नगरमे शामके समय गरजके साथ पहले बूंदाबांदी हुवी और बादमे घमासान बौछारे !
ऐसा लग रहा है जैसे फिरसे मॉन्सून आया हो!
त्यामुळे २/३ तासात सहा वेळा "लाइटी गेल्या" आणि ४ वेळा आल्या! Proud

सो स्वीट 'लाईटी गेल्या', किती वर्षांनी ऐकला तो जिल्हा सोडल्यानंतर. कारण आमच्याकडे लाईटस जातात.

पुण्याला पण पडला पाऊस. आमच्याकडे नाही.

आजच्या लोकसत्तातल्या अग्रलेखाचा काही भाग...

http://www.loksatta.com/sampadkiya-news/california-farmers-need-help-fro...

आणखी कोणी विद्वान दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खासच तिसऱ्या जगाचा रोग म्हणून तुच्छतेची एक िपक टाकील. हे सत्य आहेच. ते कोणालाही नाकारता येणार नाही. पण ते अध्रे सत्य आहे. तसे नसते तर आज अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशातील एका राज्याला दुष्काळाने त्राही माम् केले नसते.
मुळात अमेरिका आणि दुष्काळ हे समीकरणच आपणांस पचायला अवघड आहे. याला कारण हॉलीवूडचे चित्रपट आणि रंगीबेरंगी वृत्तमाध्यमे. त्यांतून अमेरिकेची जी प्रतिमा आपल्यासमोर येते ती अगदी इस्टमनकलर आणि सिनेमास्कोपच असते. काश्मीरबाबत एक शेर सांगितला जातो. गर फिरदौस बर-रू-ए-जमीं अस्त, हमीं अस्तो हमी अस्तो हमी अस्त. हेच आज अमेरिकेला म्हटले जाते. धरतीवरचा स्वर्ग कोठे असेल तर तो अमेरिकेतच असे मानल्यामुळे मग माध्यमांचाही कल अमेरिकेतील वंगाळ सारे लपविण्याकडेच असतो. परिणामी कॅलिफोर्नियासारखे राज्य सलग तीन वष्रे दुष्काळाच्या खाईत पडलेले आहे आणि तरीही माध्यमांतून ते बेदखलच आहे. दुष्काळ अलाबामा, ओक्लाहामा या राज्यांतही आहे. पण कॅलिफोर्नियातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तेथील अनेक गावांत पाण्याचे दुर्भिक्ष आहे. नळाला पाण्याचे टिपूस नाही. तळी, विहिरी आटल्या आहेत. हिरव्याकंच शेतांची माळराने बनली आहेत. जनावरे मरत आहेत. पण अजून कोठे सरकारने चाराछावण्या उभारल्याच्या बातम्या नाहीत. गोरगरिबांकडे पाणी विकत घ्यायलाही पसे नाहीत. ज्यांच्याकडे आहेत त्यांना विकत घ्यायला पाणी नाही. शहरांमधून पाणीकपात करण्यात आली आहे. कॅलिफोíनयातील सांता बार्बरा तहसिलातील मॉन्टेसिटो म्हणजे अतिश्रीमंतांचा भाग. माध्यमसम्राज्ञी ओप्रा विन्फ्रे, अभिनेता टॉम क्रूझ, दूरचित्रवाणी वाहिन्यांचा निर्माता-विनोदवीर एलेन डीजेनेरेस यांसारखे मातब्बर तेथे राहतात. तेथे पाण्याचे रेशिनग सुरू आहे आणि जास्त पाणी वापरणाऱ्यांना भरभक्कम दंड केला जात आहे. या दुष्काळाचा परिणाम अमेरिकेतल्या सणासुदीवरही झाला आहे. दरवर्षी ३१ ऑक्टोबरला तेथे हॅलोविन हा एक दिवसाचा पितृपाट साजरा केला जातो. त्यात भोपळ्याला फार महत्त्व. अमेरिकेतील इलिनॉयनंतर सर्वाधिक भोपळा पिकतो तो कॅलिफोíनयात. पण दुष्काळाने त्या पिकालाही मार दिला आहे. यंदा अमेरिकन नागरिकांना त्यांचा पितृपाट भलताच महागात जाणार आहे. हे सगळे सुरू असताना ओबामांचे सरकार झोपले आहे का? जगावर सत्ता गाजविणारी अमेरिका या दुष्काळातून नागरिकांना दिलासा देऊ शकत नाही काय? सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. नवनव्या पाणीपुरवठा, सिंचन योजना आखल्या जात आहेत. गावांना, शहरांना त्यासाठी अनुदाने दिली जात आहेत. ओबामा सत्तेवर आल्यापासून एकटय़ा कॅलिफोíनयाच्या ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांसाठी ३१० दशलक्ष डॉलर एवढी प्रचंड रक्कम खर्च करण्यात आली आहे आणि तरीही तेथील अनेक भाग कोरडे आहेत. केवळ अमेरिकेतच अशी परिस्थिती आहे असे नाही. त्या खंडातील पनामा, कोलंबा, व्हेनेझ्युएला, ब्राझील, बोलेव्हिया अशा अनेक देशांत अवर्षण आहे. याचा परिणाम सर्वात आधी भोगावा लागतो तो शेतकऱ्यांनाच. सहा महिन्यांपूर्वी 'न्यूजवीक'ने एक मुखपृष्ठकथा केली होती. तिचे नाव होते शिवारातले मृत्यू. अवर्षणातून येणारा कर्जबाजारीपणा आणि वैफल्य यांचा पहिला आणि खरे तर अखेरचाही बळी असतो तो बळीराजाच. हे चित्र जसे महाराष्ट्रात दिसते तसेच ते समृद्धीचे आगार असलेल्या अमेरिकेतही असते हेच त्या वृत्तलेखाने स्पष्ट केले.

Pages