निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायली, घरात शतावरी ! छानच.. जर मोठ्य कुंडीत लावली तर भरपूर मूळे मिळतील.. तेच औषधात वापरतात.

जागू, तेरडा छानच. हे हायब्रीड तेरडे गुलाबासारखेच दिसतात आणि झाडावर चांगले टिकतातही, देशी तेरडे मात्र अक्षरशः ३ दिवसात कोमेजतात.

घरातली पाने खुडायचा धीर व्हायचा नाही, पण ही पाने खाताही येतात. तूपात परतून भाजी होते. शतावरी चांगले औषध आहे पण बाजारी कल्पात भरपूर साखर असते. त्यापेक्षा शुद्ध शतावरी वापरणे चांगले.

खरच आहे शतावरी कल्पात साखर जास्त असते, तुमची कल्पना आवडली Happy मी चहात पण घालते...

हे आज सकाळी कीचन बालकनीत उमललेत..
4_1.jpg

वॉव्,सायली.. मस्त फ्रेश वाटत असे तुझ्या घरी.. Happy

पनामा ला एका पावसाळी दुपारी आकाशातील ही जादू टिपली..

सर्क्युलर इंद्रधनुष्य..

वर्षू मस्तय गोल इंद्रधनुष्य. प्रथमच पहातेय.
पुण्याच्या घरातल्या बाल्कनीतल्या झाडावरच्या घरट्यातलं बुलबुल पिलू..पण फोटो सेलफोनातला असल्याने स्पष्ट नाही.

थांकु अंजू, मानू

अगा सूर्यबिंब इतकं प्रखर होतं कि कॅमेर्‍याच्या डोळ्यातून पाहणं मुश्किल होतं.. मग अर्जुना सारखे खाली जमिनी कडे पाहात, कॅमेर्‍या चा डोळा वरती रोखला आणी घेतले तीन चार फोटोज.. त्यापैकी हा त्यातल्यात्यात बरा आला..

रच्याकने.. हे गोल इंद्रधनु ,नील ने प्रथम स्पॉट केलं आणी आम्हा सर्वांना सांगितलं ,त्याच्याच मुळे हा अदभुत चमत्कार पाहायला मिळाला.. नाहीतर इतक्या कडक उन्हात आकाशात कोण बघायला जातंय.. Happy

मग अर्जुना सारखे खाली जमिनी कडे पाहात, कॅमेर्‍या चा डोळा वरती रोखला आणी घेतले तीन चार फोटोज.. त्यापैकी हा त्यातल्यात्यात बरा आला.. === हे वाचल्यावर इंद्रधनुष्य पाहायला अजुन मजा आली.:स्मित:

दुपारचे गोल इंद्रधनुष्य छान. याला आपण सूर्याला खळे पडले म्हटतो. असे पोर्णिमेला चंद्रालासुध्दा पडलेले पाहिले आहे. फोटोवाले नशिबवान खरे. बुलबुलबाळ, शतावरी, छान.

गा सूर्यबिंब इतकं प्रखर होतं कि कॅमेर्‍याच्या डोळ्यातून पाहणं मुश्किल होतं.. मग अर्जुना सारखे खाली जमिनी कडे पाहात, कॅमेर्‍या चा डोळा वरती रोखला आणी घेतले तीन चार फोटोज.. त्यापैकी हा त्यातल्यात्यात बरा आला..>>>>>>> काय सांगते वर्षू? ग्रेट!

मॉर्निन्ग वॉकला जातानाचं हे बदामाचं झाड

शेजार्‍यांची मांजरं............मायलेकी.

वर्षु, इंद्रधनुष्य मस्त वाटलं. दुपारच्या वेळी जेंव्हा सूर्य डोक्यावर असतो तेंव्हा जर उन पाऊस असं झालं ना तर असं गोल इंद्रधनुष्य दिसतं. फोटो काढायची युक्ती आवडली.

मानुषी, मनी क्यूट.

खळं पडणे :वातावरणातल्या अगदी वरच्या पाण्याच्या वाफेने सूर्यकिरण विखूरतात आणि थोडे खाली असलेल्या दाट वाफेवर गोल प्रतिबिंब दिसते हे इंद्रधनुष्य आपण विरुध्द दिशेने पाहतो त्यामुळे आणि प्रखरतेने रंग गडद नसतात.
फोटोची प्रिँट काढून ठेवा. डिजिटलचं खरं नाही.
असा प्रखर सूर्याचा फोटो काढतांना कधीकधी चांगल्या कैमऱ्याचा सेन्सर मंद होतो.
डोळ्यांनी फारवेळ पाहू नये. मध्ये पुस्तक वगैरे धरावे.

सुप्रभात...

देवकी, वर्षु दी, एस आर डी... धन्यवाद...
वर्षु दी.. ईंद्रधनुषी रिंगण अमेझिंग... आणि फोटो काढणार्‍याला हाट्स ऑफ!!
मनुषी ताई... बुलबुल बाळं गोंडस आहे...आणि मनी माऊची २ न. चे प्र.ची.सही.. खुपच बोलके हाव भाव
एस आर डी.. खुप छान खुलासा...

एस आर डी, धन्यवाद. नवीन माहिती.
सायली, नवलच वाटलं फोटो बघुन. दुर्मिळ आहे ग हे असं फुल !!

सायली तुझ्याकडची शतावरी मस्तय. आणि ही वरची लिकुरवाळी सुद्धा!
(तिकडचं अ‍ॅस्परॅगस सुद्धा शतावरी कुळातलंच ना? )
साखरयुक्त शतावरी कितपत उपयुक्त? कारण यावर " १० ग्रॅममधे ८ ग्रॅम साखर असं लिहिलेलं असतं.
पुण्याच्या ग्रीन फार्मसीत शुगरलेस शतावरी मिळते. काही दिवस मी तीच घेत होते.

अरे वा, आज सगळ्यांनी दुर्मिळ गोष्टींचे दर्शन दिले कि.. या वर्षी ऑक्टोबर हिट जास्त असेल असे वाटतेय.
आज आमच्याकडचा मध्यम दिवस ( दिवस रात्र समान तासांची ) पण अजुनही थंडी आहे आमच्याकडे. आंब्याच्या
झाडांना भरपूर बाळकैर्‍या लागल्या आहेत.

धन्यवाद हेमा ताई, मनुषी ताई.. शतावरी शुगर फ्री च चांगली.. अ‍ॅस्परॅगस शतावरी कुळातलाच असावा..
त्याला बहुतेक लाल चुटुक्क फळ पण लागतात. दिनेश दा, बाळ कैर्‍यांचे लोणच पण घालतात ना? फोटो दाखवा ना!

सायली, रविवार सकाळचा मी जंगलात फिरायला जातो त्यावेळी काढेन फोटो. सध्या खुप धुके आणि थंडी असल्याने जायचे टाळतोय.
मानुषी, फक्त शतावरीची पावडर मिळते. ती मोठी चिमूटभर दूधातून घ्यायची. साखर आपल्याला चालेल तेवढीच घालायची. तयार शतावरी कल्पातली साखर अति प्रमाणात आहे.

काय मस्त फोटो आहेत.
तेरडा, डब्बलचा तेरडा, जास्वंद तर बाळासहित. धरणी माता तर आहेच शिवाय तो जो सर्वांचा पिता आहे त्या सुर्याच्या किरणांचे धनुष्यपण निगकर्सनी लिलया टिपलेय. Happy
शतावरी काय मस्त आहे.तुळशी सारखी नुसती पाने खाता येतात का?

बाकि मानुषी - पुण्याच्या घरातल्या बाल्कनीतल्या झाडावरच्या घरट्यातलं बुलबुल पिलू..>>>> हे वाचुन लहानपणीचे म्हातारा, म्हातर्‍याची बायको, बायकोची म्हैस, शेपटी, माशी..... ते गाणे आठवले. बघ हे वाचुन -

पुणे पुणे, पुण्यातले घर, घरातली बाल्कनी, बाल्कनीतले झाड, झाडवरचे घरटे, घरट्यातले पील्लू....... Wink

हे वाचुन लहानपणीचे म्हातारा, म्हातर्‍याची बायको, बायकोची म्हैस, शेपटी, माशी..... ते गाणे आठवले. बघ हे वाचुन - >>>>>>>>>.लहानपणी(माझ्या) शेकोटीसाठी गुरुजींनी हे गाणं शिकवल होतं. Lol

Pages