निसर्गाच्या गप्पा (भाग २२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2014 - 16:20

निसर्गाच्या गप्पांच्या २२ व्या भागाच्या पदार्पणासाठी सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

सनईचा सूर कसा वार्‍याने भरला
ढगांचा ढोल घुमू लागला,
बिजलीचा ताशा कसा कड कड कडाडला,
पाऊस फुलांचा वर्षाव सोबतीला,
आला आला आला आला गणराज आला

तर अशा निसर्गाच्या वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या पाहुणचाराची तयारी निसर्गानेही भरभरून केलेली असते. आषाढ, श्रावण सरींनी तृप्त झालेली, तृप्तीच्या आनंदात बहरणारी धरा पाचूचा हिरवाकंच पदर डोईवर घेऊन बाप्पाच्या स्वागताला दुर्वांच्या पायघड्या घालून तयारीत बसते. जोडीला असतात खास गौरी-गणपतीला लागणारी तेरड्याची फुले, गणेशाची लाडकी जास्वंद, सुगंधाची उधळण करणारा सोनचाफा , जाई, जुई, पारीजातक, गुलाबाची फुले.

गणपतीचे नाव जरी घेतले तरी त्याचे गोंडस रूप नजरेसमोर तरळते. कोणत्यही कलाकाराला भुरळ पाडेल असेच आहे बाप्पाचे रुप. निसर्गही पुढे सरसावून आपली कलाकारी बाप्पाच्या चरणी अर्पण करत असतो. आपणही पर्यावरण स्नेही पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून हा निसर्गाचा ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया.

वरील प्रस्तावना मायबोली नि.ग. प्रेमी आय.डी उजू कडून. तसेच खालील बाप्पाचे चित्र उजूची कन्या इशिका हिने भाज्यांच्या सहाय्याने रंगवले आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रस्तावना अतिशय गोड आणी सुर्रेख झालीये उजू, आणी इशिका चं कौतुक करावं तितकं थोडंच आहे
काय छान रंगकारी जमलीये .. भाज्यांपासून केलेले रंग ..वॉव.. डीटेल रेस्पी मिळणार का ??

वॉव, सुरेख. अभिनंदन जागू.

धन्यवाद उजू. प्रस्तावना अप्रतिम. इशिकाचा बाप्पा खूपच गोड.

गणपतीबाप्पा मोरया.

Colvillea racemosa - म्हणजेच मणीमोहोर, किलबिली - रम्यनगरी प्रवेशद्वार - बिबवेवाडी, पुणे - (सध्या बहरलाय - ज्यांना शक्य आहे त्यांनी जरुर पहाणे... Happy )

1030.jpg1031.jpg1038.jpg1039.jpg

१)
1

२)
2

बाल्कनीत आले भात. गुढी पाडव्याच्या तोरणात भाताच्या लोंब्या होत्या. त्या १मेला पेरल्या. उगवल्यावर रोपे थोडी मोठी झाल्यावर दोन इंच पाणी टबात भरले. डास होऊ नये यासाठी नारळाच्या शेंडीने पाणी झाकले .

छान सुरवात. इशिका च्या बाप्पाला नमस्कार.
शशां़क ... अगदी मनमोहक बहर आहे. जे काय नाव असेल त्याचा!

शशांक मराठी नाव काय आहे ह्या वरील झाडाचे. >>>> हिंदीत "किलबिली" म्हणतात, मराठीत मणिमोहोर. गुलमोहर कुळातीलच आहे हे. Caesalpiniaceae (Gulmohar family). ती फळे नाहीयेत - कळ्या आहेत त्या ... Happy

मस्त झाली प्रस्तावना व सुरुवात! इशिकाचा गणपती खूप त्याबद्दल, तुझं खास अभिनंदन इशिकाला एक जागरुक पर्यावरणप्रेमी नागरिक होण्याचं बालकडू देते आहेस त्याबद्दल!

बाल्कनीत आले भात. >>>> शरदराव - ग्रेट, ग्रेट ... फारच भारी उपक्रम आहे हा.. जरा डिटेल लिहा ना सगळी प्रक्रिया या भातलागवडीमागची.. (आणि फोटोही जरा क्लिअर आले तर बरे होईल ... Happy )

(सध्या बहरलाय - ज्यांना शक्य आहे त्यांनी जरुर पहाणे... ) >>> शशांक, मला पहायला सहज जमेल, आज उद्या कडे नक्की जाऊन पहाते. इथे सांगितल्याबद्द्ल खुप खुप धन्यवाद Happy

उजू, प्रस्तावना आणि इशिकाचा गणपती दोन्ही छान Happy

मस्त सुरवात. उजु, खुप छान गं.. इशिकालाही शाबासकी.

शशांक, फुले मस्तच. मला भाताचे फोटो दिसत नाहीयेत. फ्लिकर असेल तर नाही दिसणार. Sad

वा! नवीन धाग्याबद्दल अभिनन्दन!
भाज्यांनी रंगवलेला गणपती सुंदर.
Colvillea racemosa चे फोटो तर अप्रतिमच. याला 'मणीमोहोर' असेही म्हणतात. जाऊन पहायलाच हवा.

ओहो मणिमोहोर.. राणीबागेत दिनेश नेहमी मणीमोहोराची आठवण काढतात पण तो नेमका पावसाळ्यात फुलत असल्याने आजवर पाहिला नव्हता. जिप्स्या, जायचे काय??

व्वा सुरेख प्रस्तावना आणि बाप्पा पण....
शशांकजी ती मणीमोहर भलतीच गोड आहे बुवा... Happy
असे वाटते आहे की बाप्पा वर वर्षाव करायलाच उमललेत... Happy

शशांकजी मणिमोहर सुरेख.

शरदकाका मस्त आहे बाल्कनीतला प्रयोग. ग्रेट.

छान सुरवात. उजु, खुप छान गं.. इशिकालाही शाबासकी.

शशांक, फुले मस्तच खुप आवडली. पुर्ण बहरल्यावर्ही फोटो द्या.
भाताचे फोटो छान.

जागू नवीन धाग्या बद्दल अभिनंदन.
उजु, प्रस्तावना खूप सुंदर लिहीली आहेस. आणि इशिकाच चित्र तर काय अप्रतिम जमलं आहे ग. खूप टॅलंट आहे ग तिच्यात.

शशांकजी, मणीमोहोर मस्त नाव किती सार्थ वाटतयं फोटो ही सुंदरच आलाय.
बाल्कनीत भाताचं पीक. आयडिया झकास.

अर्रेव्वा... नविन भागाची प्रस्तावना भारीच. बाप्पाही गोड दिसतोय! Happy

शशान्कजी, पहिल्यान्दा बघितल हे मणिमोहोरच झाड आणि फुल! कसली लगडलीत फुल. Happy

जागूने वेळात वेळ काढून हा भाग सुरु केल्याबद्दल, मंडळातर्फे ..... Happy
शशांक, सुंदरच फोटो.
मी मॉरिशियसला एक नवीन पुस्तक घेतले ( आणखी कशावर असणार ? झाडांवरच आहे ) त्यात अनोखी झाडे आहेत. हळूहळू माहिती टाकेत त्यातली इथे.

घरातला भात सुंदरच... केरळमधे घराच्या छतावर भातशेती करतात असे वाचले होते.. फोटो नाही बघितला कधी.

इशिका, सुंदर चित्र.
भाज्यांच्या नैसर्गिक आकारांचा छानच वापर केलाय. आता सुकलेल्या फुलांचा, बियांचा वापर करून कोलाजही करता येईल तूला.

IMG_20140902_085119

IMG_20140902_085102

IMG_20140902_085109

IMG_20140902_085128

हे आमच्या अन्गणात आपोआप आलेल झाड. लहान होत तेव्हा त्याची मोठी पाने पाहुन मी आधी भेन्डीच रोप समजले तर ते उन्चच उन्च वाढत चालले. आणि आता अशी ही छान पिवळी फुले आलीयेत. कशाचे झाड असावे हे???

Pages