निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील फोटो दिनेशदांकडून.
रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
जो, फोटो असतील तर टाका ना!...
जो, फोटो असतील तर टाका ना!...
पुण्यात मधेच ढगाळ हवा होते पण
पुण्यात मधेच ढगाळ हवा होते पण पाउस नाही फारसा पडत. कोकणात पडला तर अंब्यांचं नुकसानच आहे. पुणे सोडून इतरत्र पडतोय मधेच.
जो_एस, मी पण फोटोच विचारणार
जो_एस, मी पण फोटोच विचारणार होते. मस्त एन्जॉय केलंत तुम्ही.
हा जवळून फोटो या फुलाचा
हा जवळून फोटो या फुलाचा
जागुले मस्त आहेत ताडगोळे...
जागुले मस्त आहेत ताडगोळे...
वर्षू, हे कांचनाचे फुल आहे.
वर्षू, हे कांचनाचे फुल आहे.
फोटो काढलेत पण मधे काटक्या
फोटो काढलेत पण मधे काटक्या फार होत्या, मस्त पिसारा फुलवला होता
जागू, ताजेताजे ताडगोळे छान व
जागू, ताजेताजे ताडगोळे छान व माहिती उपयोगी.मी मात्र अजून त्यांची चव घेतली नाहीये!
जांभळे तर माझी अत्यंत आवडती.
इनडोअर केळीचे हिरवेगार रोप मस्त.त्याला घरातला सूर्यप्रकाश पुरतो का?
कांचनाची फुले व मोराचे फोटो अगदी नैसर्गिक.
145 pratisad vachun
145 pratisad vachun kadhale..
kokan mhatla tari kiti chan vatat na..fanas gav majha aajol
काय जो, नाचर्या मोराला मागून
काय जो, नाचर्या मोराला मागून बघू नये
नाचरा मोर समोरुन बघायला
नाचरा मोर समोरुन बघायला काटक्यांमुळे व्यत्यय येतोय, तरीपण छान आहेत फोटो.
कांचनच्या फुलाचा कलर मस्त आहे वर्षुताई. आमच्या गावाला जास्त पांढ-या रंगाची आहेत.
अरे, तो कांचन होता का ? कच्ची
अरे, तो कांचन होता का ?
कच्ची कली कचनार की, क्या समझेगी बातें प्यार की.. हा संदर्भ वर्षूला लवकर समजेल !
कांचन मस्त! काल एका नर्सरीत
कांचन मस्त!
काल एका नर्सरीत गेले होते. आत शिरणारा शहाणा माणूस कम्प्लेट्च येडा होऊन बाहेर पडेल. पुराव्यानिशी शाबीत करीन!
बागेशी रिलेटेड कोणती गोष्ट नव्हती ते विचारा!
.
.
मानुषी... मला जायचंय तिथे.
मानुषी... मला जायचंय तिथे. मला तो धोका नाही अजिब्बात.. ( आता आणखी काय वेड लागणारै मला ?)
दिनेश कांचन .. ओह थांकु
दिनेश
कांचन .. ओह थांकु साधना..कार मधून जाताना पाहिले होते मैलोमैल ही झाडे फुलांनी भर्रून उभी होती... दुसर्या दिवशी परत येऊन अजून फोटो काढीन असं मनात म्हटलं.. पण त्याच रात्री तुफान वारं, पाऊस इतक्या जोरात आला ( प्रूफ आहे जागु च्या व्हॉट्सॅप वर )आणी तिसर्या दिवशी जाऊन पाहते तो ही नाजुक साजुक फुलं ९०% गळून झाडांच्या पायाशी कार्पेट बनून गेली होती..
बाप्रे.. मानु तू ठीकैस ना
जो पिसारा नाही दिसते नीट.. पण
जो पिसारा नाही दिसते नीट.. पण मोराचा मोरपंखी रंग अगदी झळाळता आहे..
जो, धन्यवाद... लांडोर भारी
जो, धन्यवाद... लांडोर भारी आहे हं..
दिनेश....अगदी सहमत! वर्षू
दिनेश....अगदी सहमत!
वर्षू
हं....चेरी ब्लॉसमचंही असंच झालं. तरी थोडा तरी ब्लॉसम मिळाला.
कचनार किंवा कांचन.. गुगलून
कचनार किंवा कांचन.. गुगलून पाहता समजलं कि अॅस्ट्रिंजंट मधे , लेप्रसी सारखे त्वचारोग बरे करण्याकरता या झाडाच्या च्या बार्क (साल?)चा उपयोग केला जातो. या सालींचा काढा डिसेंट्री वर उपयोगी पडतो तर वाळलेल्या कळ्यांचा काढा डायरिया बरा करण्याकरता . या झाडांच्या मुळा चा काढा , स्थूलता कमी करण्या करता तर कळ्यांचे इन्फ्यूजन ( मराठी शब्द प्लीज!! ) खोकला बरा करण्याकरता उपयोगात येतो.
वॉव.. मुळा पासून फुलांपर्यन्त औषधी आहे कचनार..
हे फूल मला अनमोड्च्या जंगलात
हे फूल मला अनमोड्च्या जंगलात दिसलं. अगदी एकाकी झाड , एकामोठ्या झाडाच्या बुंध्यात ४ फुटाचं हे झाड होतं. नाव कुणाला माहित आहे कां?
हे फोटो थोडे जास्त एक्स्पोज झालेत.
हुश्श.... फोटो लोड करायला
हुश्श.... फोटो लोड करायला जमलं एकदाचं
अंजली, आपली दुसरी अंजली
अंजली, आपली दुसरी अंजली म्हणजे शांकली खात्रीने सांगेल.. मला हे थोडेसे वाघाटीच्या फुलासारखे दिसतेय. पण तो वेल असतो.
वर्षू, कांचनाच्या कोवळ्या पानांची, कळ्यांची आणि शेंगांची पण भाजी करतात. ( मला खादाडीच सूचणार ना ? )
या नर्सरीत बागकामाचं सगळं
या नर्सरीत बागकामाचं सगळं साहित्य तेही अगदी मस्त कलरफुल! आणि या नर्सरीचे विनम्र तत्पर मदतनीस. तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करायला उत्सुक!
वॉ>>>>>>व ही
वॉ>>>>>>व ही नर्सरी????????????
खरंच वेड लावणारी... काय काय घेतलंस तू इथून?? काहीच ना घेणार्याला ही मोह झाला असेल खरेदीचा
अगं इथून सिमला मिरची,टोमॅटो,
अगं इथून सिमला मिरची,टोमॅटो, आणि काही शोभेची झाडं घेतली. लेक जावयांनी परवाच बाग कामाचं साहित्य आणलं.
कुन्ड्या आणि कुंड्याखाली ठेवण्याचे चाक' असलेले लोखंडी स्टॅन्ड असलंही काय काय आण्लं होतं त्यांनी.
आता इथे सगळे अगदी स्प्रिन्गाळ्लेले आहेत. बाल्कन्या मधे रंगित खुर्च्या दिसताहेत. पोरी बाळी हातात ग्लोव्ज घालून छोट्या कुन्ड्यामधे झाडं लावताहेत.
मानुषी मस्तच ग. आमच्या
मानुषी मस्तच ग.
आमच्या झुंबरावर पुन्हा बाळंतपण होणार. घरटे विणताना बुलबुल.
आंब्याच्या झाडावरचे कावळ्याचे घरटे.
अरे, कालच्या दिवसात इथे
अरे, कालच्या दिवसात इथे फिरकलो नाही तर ६०+ पोस्टी
सगळेच फोटो/माहिती मस्त.
काल आमच्या येथे रात्री विजांच्या कडकडासहित १० मिनिटे जोरदार पाऊस.
काल पुण्याहुन दौंडला जाऊन आलो. शिवाजीनगर जवळ दिवाणी न्यायालयाच्या परीसरात सोनबहावा मस्तपैकी बहरला आहे. खंडाळा ते पळसदरी दरम्यान पांढरा कुडा अगदी बहरलाय.
डाळिंबाची फुले १. २. ३. ४
डाळिंबाची फुले
१.
२.
३.
४
मस्त फोटो,सरीवा. माझी आवडती
मस्त फोटो,सरीवा.
माझी आवडती फुले.
Pages