निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही जी साल आहे त्यात एक रेझिन असते त्यामूळे हे सडत नाही. त्यामूळे त्याचा पेपर म्हणून वापर होत आलाय.
याच्या पल्प पासून केलेला पेपरही चांगला असते.

आपल्याकडे अर्जून आणि कांडोळ यांची साल पण अशी निघत असते. आगर ( धूप ) चे झाड असते त्याचीही अशी निघत असते. अगदी परीचयाचे म्हणजे पेरूचे झाड त्याचीपण अशी साल कायम निघत असते.
अर्जूना पासून अर्जूनारिष्ट हे औषध करतात तर कांडोळाचा गोंड औषधी गोळ्या बांधण्यासाठी वापरतात.

वर्षू.. पण तू हसली कशाला.. माळा साफ करायच्या कामाला अर्जंट काम म्हणालो, म्हणूनच ना !

वॉव भूर्जपत्र आणि बर्च ट्री उच्चारात काहीसं साम्य ?
मस्त फोटो वर्षू.
आणि खरंच आमच्या गावी आता कनकादित्य मंदिर भक्त निवासात रहाण्या जेवण्याची पण सोय आहे. अगदी ५ स्टार नाही पण छान आहे. तिथून आमच्या ( नवरोबांचे मामा) घरी जायला फक्त चालतच जाता येते. १५ मि. लागतात.
पण वाटेत जंगल, चढ उतार, दुतर्फा भातशेती....नजर जाईल तिथपर्यंत....आणि पावसाळयात या हिरवाईतून एक दगडी फरसबंदी आहे त्यावरून चालायचं. दुतर्फा पाण्यातली भातशेती.
कधी अंधारात जायची वेळ आली तर नवीन मनुष्याला घामच फुटेल. आम्हाला सवय आहे त्या मुळे रात्रीची अंधारातून चालत मजा पण वेगळीच! अर्थात एक टॉर्च पाहिजेच.
हो.....आणि माळा साफ करायचं काम अर्जन्ट नाही कोण म्हण्तय? Proud

हुश्श!!! आमच्या घराला माळाच नाही. Happy करा आता मस्करी Proud Wink

रच्याकने, मी फेसबुकवर कढीपत्याच्या फुलोर्‍याचा फोटो टाकलाय. मी पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिला.
फुलाला मंदसा सुगंधही आहे. Happy

दिनेश दा, झाडावरचे शिंगाडे प्रथमच बघते आहे...
मनिमोहर, ते पिवळे झुंबर माला पण भारी आवडते... दिनेशदा नी खरच खुप छान उपमा दिली आहे...

वर्षु निल, बर्च ट्रीज.. भूर्जपत्र मस्त... आत्ता पर्यंंत ऐकीवात होते... आज प्रथमच पाहिले...

जागु साठी संदेश------------ काही अपरिहार्य कारणामुळे राणी च्या बागेत जायचा उद्या चा कार्यक्रम पोस्टपोन करण्यात आलाय..

पुढच्या प्लॅन करता जिप्सी ला फोन कर

आमच्या घरातल्या कुंडीतल्या कढीलिंबाला सुद्धा छान तुरे आले होते वीस दिवसांपूर्वी. तेव्हा फोटो काढले होते. इथे चिकटवायचे राहून गेले. आता थेट चिकटवता येत नाहीयेत. इथे लिंक देत आहे.

कढीपत्याला करवंदाएवढी फळे पण लागतात. पण त्यांना स्वाद नसतो. पक्षी मात्र खातात. त्या झाडाचा प्रसार त्या मार्फत होत असावा. शिवाय झाडाखाली बरीच पिल्ले आपोआप उगवतात. अगदी जंगल माजते.

हीरा, किती क्यूट आहे कढीलिंबाचा तुरा.. पहिल्यांदाच पाहिला.. आणी त्याला फळं लागतात हे ही पहिल्यांदाच कळलं..

हुश्श!!! आमच्या घराला माळाच नाही. करा आता मस्करी... Lol Rofl

चायनीज आंबा.. गोड रसाने टम्म भरलेला, गुबगुबीत, आपल्याकडील ,' बादाम' आंब्याची फ्लेवर असलेला असतो

पण कोय मात्र कागदासारखी पात्तळ .. केसाळ ही फारशी नसते.. इतकी सपाट, पातळ कोय पाहून मनात आलं इथल्या मुलींना लोकल भाषेत या कोयी ची च उपमा देत असावेत.. Happy

या फळाचं नाव शेवटपर्यन्त कळ्ळं नाही. हे चवीला आंबट गोड असून आतील बी टुमटुमीत होती,

चेरी पेक्षा मोठ्या आकाराचे गोडमिट्ट अंगूर

माझं आवडतं,' लोंगान" ही गोल ,वाटोळी , लहान कंच्याच्या आकाराची असून बाहेरील कवच वाळकं असतं. लिची फॅमिलीतलं वाटतं, आतील बी सुद्धा मोट्ठी .. नाकापेक्षा मोती जड असल्या सारखी..

सोललेलं

बी..

रस्त्या च्या कडेला एक जण फळांचा ठेला लावून बसला होता..

आंबे, संत्री, शहतूत इ.इ.

याच ठेल्यावर ही फळं दिसली. चकचकीत रुबी रेड कलर ची, लहानश्या बोरांच्या आकाराची गोल , चवीला ही गोड होती.. यांच नाव ही नाही कळ्ळं..

फळांच्या जोडीला , उत्तम प्रतीचा सुका मेवा ही मिळत होता

अशी वॉकिंग - शॉपिंग स्ट्रीट असेल तर कुणाला येणारे कंटाळा वॉकिंग शॉपिंग चा???

दमला तर बसायला मधील चौकात मुद्दाम मांडून ठेवलेल्या बेंचेस वर आईसक्रीम खात आराम करावा.. आजूबाजूला कंपनी द्यायला सुरेख फुलं आहेतच

जागोजागी ठेवलेले बिन्स, सतत हातात लांब दांड्यांचे खराटेवजा झाडू घेऊन झाडत असलेले सफाई कामगार बघून आपसूकच जनतेला स्वच्छते चे धडे लहानपणापासूनच मिळत असतात..

सचमुच पिक्चर अभी बाकी है... Happy

वर्षु दी, ते वळण, वॉकिंग - शॉपिंग स्ट्रीट , तो फळांचा ठेला सगळ कसल सह्ही आहे.आणि लोंगान आपल्या लिचीचा भाऊ वाटतोय अगदी. ती भुर्जपत्राची झाड काश्मिरला पण आहेत ना बरीच.
दिनेशदा, लहानपणी आमच शेत होत घराच्या बाजूलाच, त्यामुळे भरपूर (आंबा, पेरू, सिताफळ, बोर्,जांभूळ्,तूती,पपई,आवळा-डोंगरी न राय दोन्ही )फळझाड होती आमच्याकडे. माझा काका आम्हा लहान भावंडांना सांगायचा की तुम्ही कच्चेबच्चे, लहान पेरू तोडता त्याच वाईट वाटत झाडाला आणि ते रडत राहत रात्रभर बिचार अन मग त्याच्या अश्रुंनी त्याची साल अशी निघते. म्हणून तुम्ही कच्चे पेरू तोडत नका जाऊ, झाडाला दगड नका मारत जाऊ पेरू पाडण्यासाठी.त्यावेळी ते सगळ खर वाटायच आम्हाला, मग आम्ही कधीच तयार झाल्याशिवाय कोणतच फळ तोडत नसू.तुम्ही पेरूच्या सालाबद्दल लिहलत ते वाचून माझ बालपण आठवल मला, खूप मस्त वाटल.
सलाद लीव्हज्च झाड सुंदर दिसतय एकदम.
मनीमोहर, अमलताशचा फोटो फार छान आलाय. रणरणत्या उन्हात त्याची झुंबर बघितली की डोळे निवतात अगदी.
मानुषी ताई, अन्जु,हेमा, ऑल ऑफ यू सो लक्की. मस्त गावं आहेत तुमची.

वॉव वर्षुताई, मस्त मस्त फळं आणि फुलं. Happy

ती रुबी रेड गोल गोल फळं म्हणजे क्रॅनबेरीज आहेत. आताशा इथेही लोंगान, लाल मोठी द्राक्षं, ब्लुबेरीज, क्रॅनबेरीज, डुरीयन वगैरे आमच्या फिनिक्स मॉलमधल्या फुडहॉलमध्ये मिळतं. पण प्र चं ड महाग. सातशे रुपयाला एक छोटासा पॅक वगैरे अशा चावट किंमती असतात. असो. होतील हळूहळू स्वस्त!

ओह हाँ क्रेनबेरीज.. मामे धन्स गा!!! Happy ते दुसर्‍या नंबराच्या फळाचं नाव ही सांग ना
वर्षा, अन्जू,ममो,देवकी... थांकु

ते नाही गं कळत आहे. Sad

एकतर तू ते फळ बाहेरून दाखवलंस, मग आम्हाला टुकटुक करून स्वत:च खाऊन फक्त आतली बी दाखवलीस. कसं ओळखायचं आम्ही? आँ?

उजु थांकु ग, कोकणातल्या गावाबद्द्ल. माझं माहेरपण कोकणात चिपळूणजवळ आहे आणि तिथेपण माहेरचं घर आहे.

पण कोय मात्र कागदासारखी पात्तळ .. केसाळ ही फारशी नसते.. इतकी सपाट, पातळ कोय पाहून मनात आलं इथल्या मुलींना लोकल भाषेत या कोयी ची च उपमा देत असावेत..
>>>>>>>>>>>>>>>>>. येस वर्षू आय कॅन इमॅजिन. इथल्या आमच्याकम्युनिटीत निम्मे लोक चायनीज आहेत.
वर्षू फोटो मस्त! लोंगान लिचीसारखंच वाट्तय खरं.
क्रॅनबेरीज....येस मामी इज म्हणिन्ग द राइट, मी स्वाती आंबोळेच्या रेस्पीने २/३ वेळा क्रॅनबेरी चा मेथांबा केला होता.
इथे तो इतका हिट झालाय....फार चविष्ट लागतो.
आणि कढिलिंबाची फळे इतकी गॉर्जस दिसतात.....मी इथे फोटो डकवला होता का आठवत नाही. शोधून डकवते. फेबुवर आहेत.

वर्षू.. फळं म्हणजे माझा विक पॉईंट ना.. आता मी कधी खाणार ही ?
आपल्या आंब्यापेक्षा ( इंडीका ) एक वेगळी जात असते. थायलंड मधे चाखली होती आणि आपल्याकडे पण "रत्ना" नावाची एक नवीन जात आलीय, तिच्यातली कोयही अशीच असते.

मी पण आज एक नवीन फळ खाल्ले.. नाव फेजीओहा... पण त्याची पूर्ण कहाणी लिहायला हवी.. ११ वर्षे लागली मला हे फळ मिळवायला.

साधना, अंबोलीला पाऊस पडला म्हणजे या वर्षी पावसाळा वेळेवर येणार तर. सगळ्यांनी एखाद्या विक डे ला गेलं पाहिजे, म्हणजे ती टिपीकल गर्दी टाळता येईल. सगळ्या नॉन कोकणी माणसांना आधी अंबोली दाखवावे.

मानुषी.. कढीलिंबाच्या फळाचा फोटो इथेच होता. ( मी ओळखला होता. )

चायना आणि थायलंड मधेही फळे सुकवण्याची वेगवेगळी तंत्रे वापरतात. रंग, चव सर्व टिकून असते. ते तंत्र अजून आपल्याकडे आलेले नाही. आले तर फार छान.

उजू, कच्चे फळ न तोडायचे संस्कार आफ्रिकन देशांतही आहेत. फळाला पक्ष्याने चोच लावल्याशिवाय ते तोडायचे नाही हा दंडक. कच्चे फळ खाल्ले तर मलेरिया होतो, हा पण सार्वजनिक समज.

इथे अंगोलात आंबा आणि चिंचा खुप लोकप्रिय आहेत. झाडेही खुप आहेत. पण कच्चे आंबे आणि हिरव्या चिंचा कधीच बाजारात येत नाहीत. अगदी रस्त्याच्या कडेला झाड असले तरी कुणी तोडत नाही.

कढीलिंबाची फळं मस्त. मी पहिल्यांदाच बघते आहे. रंग अपतिम.

मी पण आज एक नवीन फळ खाल्ले.. नाव फेजीओहा... पण त्याची पूर्ण कहाणी लिहायला हवी.. ११ वर्षे लागली मला हे फळ मिळवायला.>> वाट बघते आहे कहाणीची

Pages