निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे चेस्टनटस.. >>>>>या अशा आकाराचे/रंगाचे लसुणसुद्धा असतात का? श्रीनगर(काश्मिर)ला पाहिल्याचं आठवतंय.

साधना, सफरचंदाचे फुल कस ग ओळखलसं? आणि माहिती ही सुंदर.
झ्ररबेरा, हॅप्पी बड्डे !
दिनेशदा, सॅलड क्लास.
स्वप्न वेडी छान फोटो

मुंबईचा लोकल प्रवास म्हणजे काही सुखावह गोष्ट नाही अगदी खिडकी मिळाली तरी. बाहेर बघायचय काय तर कचरा आणि झोपडपट्टी. पण ह्या दिवसात विक्रोळी त्ते घाट्कोपर पट्टा अपवाद. ह्याचे कारण म्हणजे गोदरेज कं च्या बाहेर रेल्वे ट्रॅकला समांतर असलेली खूप सारी बहाव्याची झाडे. ओळीने उभी असलेली ही झाडे आता निष्पर्ण झाली आहेत आणि हळूहळू त्यांचे पिवळे घोस झाडावर डुलायला लागले आहेत. ती बघण्यासाठी आता दाराकडे उभे रहावेसे वाटते. सकाळच्या वेळी तिरपी सूर्यकिरणे त्यांच्यावर पडतात तेंव्हा पूर्ण झाड त्याच्या लिंबकांती पिवळ्या रंगात चमकून उठते. ते पाहताना डोळ्यांना आणि मनाला एक प्रकारचा थंडावा मिळतो. असाच एक बहावा

From mayboli

पण ह्या दिवसात विक्रोळी त्ते घाट्कोपर पट्टा अपवाद>>>>अगदी अगदी. मी मागे निगच्या एका भागात याचा उल्लेखदेखील केलेला. विक्रोळी स्टेशन सोडलं कि लगेचच उजव्या बाजुला (व्हिटीकडे जाताना) बहाव्याची झाडे दिसतात. Happy

ममो.....पिवळा मोहोर मस्तय!
दिनेश लिन्क सेव्ह केलीये.
नट्स चा विषय चाललाय.....चिलगोजे म्हण्जे पाइन नट्स का?

झरबेरा, happy birthday.

वरचे सर्व फोटो सुंदर.

दिनेशदा त्या सलाडच्या पानांची कोशिंबीर छान लागते. तुरा मस्त आलाय.

तिथे बहाव्याची झाडे बरीच वर्षे बघतो आहे. एरवी उन्हात एवढा भडक पिवळा रंग असह्य वाटला असता. पण हा मस्त वाटतो. आणि त्या फुलांची रचना.. जणू शॄगांर केलेला राजपुत्र... म्हणून नक्तमाल.

सलाड आवडतं पण आपणच लावलेल्या झाडाची पाने कशी तोडायची असे वाटते आणि तोडलीच जात नाहीत.

नट्स चा विषय चाललाय.....चिलगोजे म्हण्जे पाइन नट्स का?????????

होय मानुषी.. पंण चिलगोजे थोडेसे लांबडे वाटले आणि अमेरिकेत्ले पाइन नट्स थोडे बुटके वाटले.

मी फणसामधे गरे येत नाहीत तर काय करावे हे विचारले होते.
पण आत्ताच आईचा फोन आला चौदा गरे मिळाले म्हणून. आई फोडणार नव्ह्ती. पण उत्सुकतेपोटी फोडला. बहुदा झाडांना माणसांची जाग हवी असावी.कारण २०-२५ वर्षांत पहिल्यांदाच हे गरे मिळत आहेत.

साधना सफरचंदाची नवीच माहिती मिळाली. बरं झालं फोटो टाकला.
माझं गुलाबांचं जनरल (किंवा एकमेव) नॉलेज म्हणजे गुलाबाला काटे असतात इतपत मर्यादित होतं. आता अचानक ते गुलाबाची फळं आपण खातो इथवर आलं Proud

बहावा काय छान आहे. (हे नाव नेमकं तेव्हा कधी आठवायचं नाही आता नाव आठवेल आणि बहावा दिसायचा नाही)

वर्षूदी, मस्त फोटो.
बर्च ट्रीज.. भूर्जपत्र ???>>>>म्हणजे काय आणि याचा उपयोग काय?

हेमा यांच्या गावचे फोटो पाहिले. खुपच सुंदर आहे गावं.
आमच्या मामाचं गाव नसलं म्हणुन काय झाला ताईचं (यात मानुषीताईही आल्या. प्रतिसाद पाहिलाय मी.;-) ) गाव आहे ना. ;-).

तर मग कधी येऊ???? Happy Happy

जिप्सी, नक्की जाऊ या. खूप आवडेल तुम्हाला. प्रत्यक्षात यापेक्षा शतपटीने सुंदर आहे. हॉटेल मध्ये उतरतो तेंव्हा हा फील नाही येत.

धन्यवाद हेमा Happy

वेकाने टाकलेला सफरचंदाच्या फुलांचा फोटो मस्तच. खरंतर मी आधीच ओळखला होता पण म्हटले इतरांना चान्स देवूया. Proud

रच्याकने, त्या फुलांच्या फोटोवरून हे गाणं आठवलेलं Happy
https://www.youtube.com/watch?v=MdSLCHoGzC8

काश.... ये गाना कलरफुल होता. Wink

उद्याच्या गटगचे फायनल झाले आहे. (माझे अर्जंट काम पुढे ढकललंय) Happy

तर रविवारी भल्या पहाटे ९:३०वाजता राणीबागेत भेटण्याचे ठरले आहे.
(सध्याचे कन्फर्म मेंबर्स - साधना, उजु, जागू, जिप्सी)

मनीमोहर, वर्षूदी तुम्हाला जमणार आहे का?

जिप्सी, खूप खूप सॉरी !! उद्या एक कार्यक्रम फिक्स झाला आहे आधीच. मला नक्की आवडलं असतं यायला. पुढच्या वेळी नक्की येईन.

वर्षू... मला वाटतं ही झलकच असावी Happy

अर्जंट काम म्हणजे घरातला माळा साफ करायचे काम असणार Happy

ती बहाव्याची उपमा मी दिलेली नाही, एका संस्कृत श्लोकातली आहे. तशी बरीच नावे आहेत.

दिनेश Happy

तूच सांग बरं बर्च ट्री बद्दल.. म्हंजे मलाही कळल काही नवीन.. आणी जिप्स्यालाही...

जिप्स्या.. जिप्सिणीला भेटवणारेस का आम्हाला????

देखती हूँ कुछ कोशीश करती हूँ .. रात्रीपर्यन्त कन्फर्म करते रे..

वर्षुताई फोटो मस्तच.

जिप्सी, हेमाताईच्या जवळच माझं गाव आहे तिथेपण आवर्जून जा, मी नसले तरी माझे मोठे दीर तुमचे जरूर स्वागत करतील.

Pages