निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या सोसायटीच्या आवारात काही झाडे आहेत त्यातून पातळ प्लॅस्टिक रॅपसारखे छोटे तुकडे उडतात. त्यात चक्क एक बी असते. प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेल्या शेकडो बिया हल्ली वार्‍यावर उडत असतात. आधी आम्हाला वाटलं की प्लॅस्टिकच पण नीट निरखून पाहिल्यावर कळले की तसे नाही. कुठले झाड आहे हे ? फारच कुतूहल वाटतेय.

अनारकली.... मस्तच.

आज जागतिक वसुंधरा दिन... जपायला हवं !

http://www.loksatta.com/navneet-news/is-chewing-paan-cause-of-cancer-454...

इथली माहिती...

विडय़ाची पद्धत पार पूर्वापारपासून चालत आलेली आहे. आजही समाजात अनेक रीतीरिवाजांत विडय़ाचं स्थान अबाधित आहे.
पानाचा विडा तयार करण्यासाठी नागवेलीचं पान वापरलं जातं. या पानावर चुना आणि काथ लावला जातो. त्यावर सुपारी ठेवून पानाची पुडी केली जाते. यात आवडीनुसार लवंग, वेलची, गुंजेची पानं, गुलकंद, तंबाखू इत्यादी पदार्थ टाकतात. पण विडय़ात नागवेलीच्या पानाबरोबर काथ, चुना आणि सुपारी हे पदार्थ मात्र हवेतच. पानात जे इतर पदार्थ टाकले जातात, तसंच पान कोणत्या प्रदेशातलं आहे, त्यावरून त्या विडय़ाला नाव दिलं जातं. उदा. मघई, बनारसी, कलकत्ता, पूना इत्यादी.
नागवेली ही वनस्पती पायपरेसी म्हणजे मिरीच्या कुलातील आहे. नागवेलीच्या पानांतील बाष्पनशील तेल उत्तेजक व कृमिनाशक आहे. बाष्पनशील तेलामुळे विडय़ाला त्याचा तिखट-तुरटपणा आणि सुवास आलेला असतो. यामुळेच विडा खाल्ल्यावर तोंडाची दरुगधी जाते. प्रदेशानुसार, जातीनुसार पानातील रसायनांचे प्रमाण कमी-अधिक असते. पानांतील बाष्पनशील तेल, शर्करा व चोथ्याचं प्रमाण यांच्या प्रमाणावरून पानाची प्रत ठरते.
पानात व्यसन लागेल असं कोणतंही रसायन नाही. पण पानाचं व्यसन लागतं ते सुपारी आणि तंबाखूमुळे. जेव्हा सुपारी कच्ची असते तेव्हा सुपारीमध्ये अल्कलॉइड्स जास्त असतात. त्यामुळे ओली ताजी सुपारी खाल्ल्याने गरगरू लागतं. सुपारी वाळत जाते तसतसे सुपारीच्या आतल्या पांढऱ्या गाभ्यात अल्कलॉइड्स जमा होत जातात. या गाभ्याप्रमाणे सुपारीची प्रतवारी ठरवली जाते. पांढरा गाभा जेवढा जास्त तेवढी सुपारीची प्रत वरची समजली जाते. प्रथमच सुपारी-चुन्यासह पान खाणाऱ्या व्यक्तीला मळमळू, गरगरू लागते. सुपारीत क्रियाशील अल्कॉइडस् उदा. अर्कोलिन, अरेकाइडाइन, गावासाइन, गावाकोसाइन असतात. त्यांच्यामुळे सौम्य नशा येते. यात चुना मिसळला की त्यांची परिणामकारकता वाढते. विशेषत: अर्कोलिन मृदू स्नायूंवर परिणाम करते. जसजसं चावत जावं, तसतसं पानातून बाहेर पडणाऱ्या बाष्पनशील तेलामुळे व निर्माण होणाऱ्या रसायनांमुळे उत्साही वाटू लागतं. सततच्या खाण्यामुळे त्याची सवय लागते. नागवेलीच्या पानामुळे नव्हे तर तंबाखू आणि सुपारीच्या सततच्या खाण्यामुळे गालाचा-जिभेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.
चारुशीला जुईकर (मुंबई)-office@mavipamumbai.org

अगो... अनेक झाडांच्या बियांना असे पंख असतात. त्यांच्या मदतीने बिया वार्‍यावर स्वार होऊन लांबवर उडत जातात, बियांचे वजन लक्षात घेऊन हे डीझाईन अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर फायनल झालेले असते. प्रत्येक झाडाचे डीझाईन वेगळे.
कुठलेही इंधन न वापरता, आतील वस्तूंना ( बीला ) नुकसान न पोहोचवता, योग्य त्या स्थळी सुरक्षित रित्या उतरणार्‍या विमानाचे डीझाईन मानवाला मात्र तयार करता आलेले नाही.

सरिवा, मस्त फोटो. अनारकली नाव किती यथार्थ.
जागू, तू किती नशीबवान आहेस तुमच्याकडे बुलबुल घरात येऊन घरटी वगैरे बांधतात. आमच्याकडे चिमण्या सुध्दा फिरकत नाहित अलीकडे.

आमच्या सोसायटीच्या आवारात काही झाडे आहेत त्यातून पातळ प्लॅस्टिक रॅपसारखे छोटे तुकडे उडतात. त्यात चक्क एक बी असते>>>>अगो, बहुतेक त्या "वावळाच्या" बिया असाव्यात.

सरिवा, अनारकली चा रंग भलताच मनमोहक आहे..

जागु तुझ्या बुलबुल ला पॉश जागीच घरटं बांधायला आवडतं, टिपिकल झाडाबिडा वर असं ओल्ड फॅशन्ड नाही बर्का.. Happy

न जाणो त्याच्या भाषेत घरट्या ऐवजी अपार्टमेंट म्हणत असेल ..

मानु ,' स्प्रिंगाळलेला' हा शब्द प्रयोग तुफान आवडला..

दिनेश, आता पान खाल्लं कि ( अजुन कुणी... कारण मला मुळ्ळीच आवडत नाही!!) खाणार्‍याला या सर्व गोष्टी

सांगून भाव खाईन.. जीके बढानेका शुक्रिया..

ती कच्ची सुपारी तायवान मधे तिला पिनांग म्हणतात.. खाऊन पाहिलीये.. कायच्या कैच फील येतो ती खाऊन, गरगरतं सुद्धा..

आपल्याकडे असम मधे पण अशी संस्कारीत सुपारी खातात. तिचा एक कणही आपण खाऊ शकत नाही.
माझ्या तर एरवीही साधी सुपारी खाल्ली तर घश्यात बसते. त्या मानाने मद्रासी चिकनी सुपारी बरी लागते.

पण आपल्याकडे बाळाच्या घुटीत सुपारी असते. एखादाच वळसा उगाळतात. बहुतेक झोप यावी म्हणून असेल.

वरचे सर्व फोटो सुंदर. मानुषीताई मज्जा, मज्जा चाललीय. मस्तच.

दिनेशदा पानाचा लेख शेअर केल्याबद्दल धन्यवाद. ओली सुपारी मीपण खाऊ शकत नाही. सुपारी आमच्या घरची येते आम्हाला पण तुरट असते, गोडीला नसते एवढी. मी असं ऐकलंय की श्रीवर्धन पट्यातील सुपारी जास्त चांगली असते आणि थोडी गोडसर असते.

उफ्फ! मला आधी भाजकी सुपारी चघळायची खुप सवय होती. ती व्यवस्थीत भाजलेली असेल तर ठीक. पण चुकुन एखादी कच्च्या सुपारीचा तुकडा आला तर फार गरगरायचे.

जिप्स्या, तुला उगीच वेळ जात नाही म्हणुन भटकंती करायचे व्यसन आहे, उगीच कॅमेरा हातात आहे म्हणुन फोटो काढायचे व्यसन आहे, उगीच समोर इंटरनेट आहे म्हणुन फोटो अपलोड करायचे व्यसन आहे, उगीच खादाडीचे (आणि इतरही) फोटो (चुकुनच) चांगले येतात म्हणुन ते इथे टाकुन इतरांना जळवायचे व्यसन आहे... तू मुकूटमणि आहेस व्यसनी माणसांमधला.

जिप्स्या, तुला उगीच वेळ जात नाही म्हणुन भटकंती करायचे व्यसन आहे, उगीच कॅमेरा हातात आहे म्हणुन फोटो काढायचे व्यसन आहे, उगीच समोर इंटरनेट आहे म्हणुन फोटो अपलोड करायचे व्यसन आहे, उगीच खादाडीचे (आणि इतरही) फोटो (चुकुनच) चांगले येतात म्हणुन ते इथे टाकुन इतरांना जळवायचे व्यसन आहे... तू मुकूटमणि आहेस व्यसनी माणसांमधला.<<< Lol

मुकूटमणि>>>>:हहगलो:

अगो, वरच्या लिंकवर दिसतेय तशा आहेत का शेंगा आणि त्यातल्ये प्लॅस्टिक?? असेल तर मग तो स्पॅथेडिया.>>>>>हो, स्पॅथोडियाच असेल. वावळाच्या बिया अशा वार्‍याने इथे तिथे उडत नाही.

जागु, तु आंब्याच्या झाडावरच्या कावळ्याच्या घरट्याचा उल्लेख केलास म्हणुन ही लिंक.
मागच्या वर्षी मारुती चितमपल्ली यांचा एक लेख लोकसत्ता मधे आला होता. त्यात पक्ष्यांची वागणुक आणि पावसाचे आराखडे दिले होते. त्यात कावळ्याने आंब्याच्या झाडावर घरटे केले तर पाऊस समाधानकारक पडतो असे लिहीले आहे.
http://www.loksatta.com/lokrang-news/maruti-chitampallis-article-on-natu...

बाकीही बर्‍याच गोष्टी आहेत वाचनीय. यावर्षी पावसाआधी हे बदल निरखुन बघता येतील. वेगवेगळ्या प्रांतातले लोक इथे असल्याने सगळीकडचे बदल टिपता येतील.

अजुन एकाने यावरच्याच लेखातल्या निरिक्षांना प्रमाण मानुन २०१३ ची निरिक्षणे केली होती त्याबद्दलचा लेख इथे वाचा

ऑस्ट्रेलियन बाभुळ परदेशी झाड असल्याने पक्षी त्यावर घरटी करत नाहीत असे वाचले होते. पण यावर्षी आमच्या इथल्या एका कावळ्याने ऑस्ट्रेलियन बाभळीवरच घरटे केले आहे. त्याचा आणि पावसाचा संबंध कसा असेल काय माहीत !!

मागे दिनेशदांनी पिंपळाच्या पानावर काहितरी चाटायचं असं लिहिलं होत ना त्याची आज आठवण झाली. माझा भाचा श्लोक (वय २ वर्षे ४ महिने) याची पोपटपंची सुरू असते. त्याला अजुन "ड" नीट बोलता येत नाही. वयाच्या मानाने त्याची बालगीत अगदी तोंडपाठ आहेत. त्याचे फेव्हरीट "लकडी कि काठी, काठी पे घोडा". Happy हे गाणं तो असं म्हणतो, जे ऐकायला खुप गोड वाटतं. Happy
लकली कि काठी, काठी पे घोला, घोले के दुमपे जो मारा हथोला
दौला दौला दौला घोला दुम उठाके दौला (हे एकदम फास्ट म्हणणार Happy )

अजुन अडीच वर्षाचा झाला नाही पण इतका आगाऊ आहे कि बस्स Happy
गेल्या आठवड्यात त्याला थोडा खोकला झाला होता. २ दिवस औषध घेतल्यावर तिसर्‍या दिवशी बहिणीने जेंव्हा पुन्हा औषध घेतले तेंव्हा पठ्ठ्याने दरवाजा उघडुन बाहेर "वाचवा, वाचवा. मला वाचवा" म्हणुन धूम ठोकली. Happy त्याला पकडुन आणल्यावर मी म्हणालो कि तिथे कोपर्‍यात जाउन देवासारखा बस तर थोड्या वेळाने परत माझ्याजवळ येऊन विचारतोय, "अरे मामा, देव कसा बसतो ते तरी सांग आधी." (माझी विकेट) Happy

त्या दिवशी मस्ती करत होता म्हणुन दरवाजा उघडुन बाहेर जायला सांगितल्यावर हा उंबरठ्यावर दोन्ही हात गालाला लावून बसला. शेजारच्या काकांनी काय झाले विचारल्यावर निरागस चेहर्‍याने म्हणतोय, "मामाने घराबाहेर काढलंय". Happy

(विषयांतराबद्दल क्षमस्व :-))

त्या दिवशी मस्ती करत होता म्हणुन दरवाजा उघडुन बाहेर जायला सांगितल्यावर हा उंबरठ्यावर दोन्ही हात गालाला लावून बसला. शेजारच्या काकांनी काय झाले विचारल्यावर निरागस चेहर्‍याने म्हणतोय, "मामाने घराबाहेर काढलंय".

Happy फोटो काढायला हवा होता रे.......

कित्ती गोड आहे तुमचा भाचा जिप्सी. तुमच्याजवळ असणा-या उत्तमोत्तम व्यसनांसाठी हॅटस ऑफ तुम्हाला.

साधना, अन्जू Happy Happy

सावली, छान माहिती. दोन्ही लिंक इथे ऑफिसमध्ये ओपन होत नाही. घरी जाऊन वाचेन. Happy

हेहेहे..जिप्सी!! कित्ती गोड! खरच फोटु काढायला हवा होता. Happy

सावली लेख खुपच सुंदर आहे चितमपल्लींचा. Happy
कावळ्याच्या घरट्याच्या पोजिशनवरुन पण ठरवतात ना किती पाऊस पडणार ते!
झाडाच्या अगदी टोकाला घरटे असेल तर कमी पाऊस. मध्यावर असेल तर मध्यम पाऊस, आणि खाली असेल तर भरपुर पाऊस असेल असं.
मला वाटतं, आपल्या चिऊ काऊच्या गोष्टीप्रमाणे काऊचं घरटं तकलादु असतं...काड्यांचं. आणि ते शेंड्यावर बांधलं तर भरपुर पावसाने लगेच वाहुन जाईल, त्यामुळे कमी पावसाचा संकेत मिळाला तरच काऊ शेंड्यावर बांधत असावा. तीच गोष्ट लेखातल्या बाभळी, कांटेसावर अशा झाडांची. जोरदार पावसात बाभळीसारख्या कमी पर्णसंभार असलेल्या झाडांवरचं घरटं वाहुन जात असेल तर आंब्यासारख्या डेरेदार वृक्षावर घरट्याला जरुरीपुरतं तरी संरक्षण मिळत असेल.

मला वाटतं, आपल्या चिऊ काऊच्या गोष्टीप्रमाणे काऊचं घरटं तकलादु असतं...काड्यांचं. आणि ते शेंड्यावर बांधलं तर भरपुर पावसाने लगेच वाहुन जाईल, त्यामुळे कमी पावसाचा संकेत मिळाला तरच काऊ शेंड्यावर बांधत असावा. तीच गोष्ट लेखातल्या बाभळी, कांटेसावर अशा झाडांची. जोरदार पावसात बाभळीसारख्या कमी पर्णसंभार असलेल्या झाडांवरचं घरटं वाहुन जात असेल तर आंब्यासारख्या डेरेदार वृक्षावर घरट्याला जरुरीपुरतं तरी संरक्षण मिळत असेल.

क्या बात है, आर्या. याचा कधी विचारच केला नव्हता, रादर हे माहितीच नव्हतं. धन्यवाद. Happy

जिप्सी खूपच गोड आहे अवांतर.. Happy
देव कसा बसतो, मामाने घराबाहेर काढलं Rofl Rofl

विकेट उडलेल्या जिप्स्याचाच फोटो हवा होता काढायला Proud

कावळ्याच्या घरट्या बद्दल ची माहिती खूपच रंजक आहे.. सायंटिफिक सुद्धा.. Happy

श्लोकला भेटायचे राहिलेच आहे अजून !

कावळा काय किंवा मगर काय, पावसाचा अचूक अंदाज बांधतात. ते कौशल्य सोडा पण ते कुठल्या संकेताचा वापर करतात तेवढे आपल्याला कळले तरी बास. ( मगरीने अंडी घातल्यावर बरोबर २१ व्या दिवशी नदीला पूर येतो.)

तसेच किटकांच्या बाबतीत सुद्धा.. नराने किंवा मादीने हवेत सोडलेला गंध म्हणजे एक प्रकारचे केमिकलच. हवेतील इतक्य सूक्ष्म प्रमाणातील केमिकल, इतक्या अचूकपणे नोंदवून ते आपल्या जोडीदाराचा बरोबर माग काढतात. तसे सेन्सर्स आपल्याला अजून जमलेले नाहीत तयार करायला.

काय रिया. मामा काय आमचा इतका लब्बाड नै कै..................... याहून जास्त बदमाश आहे.
( असे मला त्याच्याच एका मित्राने सांगितले. मला सांगितले कि तो फक्त माझ्यापुढे सभ्यपणाचा आव आणतो.
मित्राचे नाव सांगितल्यास दोघांनाही ( म्हणजे त्या मित्राला आणि मला ) धोका आहे. असे पण त्या मित्रानेच सांगितलेय. )

Pages