निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील फोटो दिनेशदांकडून.
रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
केळीचे इन्डोअर प्लान्ट
केळीचे इन्डोअर प्लान्ट ....काल.
हे आजचे.
मानुषीताई मस्त, मस्त. फार
मानुषीताई मस्त, मस्त. फार पूर्वी माझ्यापण कढीलिंबाला असे तुरे आणि फळे आली होती. खूप छान होते कढीलिंबाचे रोप माझ्याकडे पण नंतर काही कारणाने मेले ते. परत नाहीच आले.
हो अन्जू ... नगरच्या घरातले
हो अन्जू ... नगरच्या घरातले दोन्ही कढिलिंब वृक्षात रूपांतरित आहेत. त्याच्या खाली खूप पिल्लं आलेली असतात. खूप लोक घेऊन जातात. स्वयंपाकासाठी पानं आणि लावायला रोपं.
मानुषी.. कढीलिंबाच्या फळाचा
मानुषी.. कढीलिंबाच्या फळाचा आणी तुर्याचा मस्तचे फोटो
पहिल्यांदाच पाहिली फळं आणी मोहोर... पाहिली कस्ची, ऐकलंही पहिल्यांदाच..
केळीचे इंडोअर प्लांट... वॉव ऑस्सम!!!
मामे.. स्वारीगा.. फळं खावी
मामे.. स्वारीगा.. फळं खावी लागली ना आतील बियांचा फोटू काढायला..
सुप्रभात
सुप्रभात
मिसिंग कमेंट्स फ्रॉम शांकली
मिसिंग कमेंट्स फ्रॉम शांकली आणी शशांक... आपण यांना पाहिलंत का????????
वर्षू नील सुंदर
वर्षू नील
सुंदर फोटो!
कढीलिंबाचे रोप माझ्याकडे आहे (७-८.वर्षें) तुरे मात्र पाहिले नाहीत.
वर्षू नील, डोळे निवले अगदी
वर्षू नील, डोळे निवले अगदी फोटो बघून. मस्त .
सगळे फोटो छानच.विशेषतः
सगळे फोटो छानच.विशेषतः भूर्जपत्र आणि सफरचंदाच्या फुलांचे! कढीलिंबाची फुले,फळे व पेरूच्या झाडाचे खोड माझ्याकडूनही
१
२
३.
सरिवा, सुंदर.
सरिवा, सुंदर.
वाह!! सरिवा सुर्रेख फोटोज..
वाह!! सरिवा सुर्रेख फोटोज.. कढीलिंबाची फळ कधी करवंदांसारखी तर कधी लिची सारखी दिस्ताहेत.. प्रत्यक्ष कधी / कुठे पाहायला मिळतील क्या पता
वर्षु निल, इथल्या मुलींना
वर्षु निल, इथल्या मुलींना लोकल भाषेत या कोयी ची च उपमा देत असावेत.. :
काय सुंदर फळं आहेत.. व्वा!
गोड लिंब / कढी लिंबाची फळं
गोड लिंब / कढी लिंबाची फळं मस्तच.. आमच्या कडे पण आले आहेत असेच तुर्रे...
आज महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस
आज महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस होणार आहे अशी बातमी आलीय. जपून !
मानुषी, झाडांच्या पॅकींगची कला बघितली का ? मोठी पाने असतील ( नारळ, केळी ) तर कशी व्यवस्थित घडी, गुंडाळी करून पाठवतात
वर्षू, त्या फुलांचा क्लोजप फोटो हवा होता.. शशांक आणि शांकली ला वेगवेगळी हाक मारायची नसते. ( शांकली = शशांक + अंजली )
गोव्याला या दिवसात ओली तिरफळे
गोव्याला या दिवसात ओली तिरफळे बाजारात विकायला असतात. तिरफळे घालून केलेले हुमण, खतखते वगैरे मस्तच लागते. पण त्याचे झाड कधी बघितले नाही मी. साधना म्हणाली होती, सावंतवाडीत आहेत.. पण तिनेही कधी फोटो टाकला नाही.
कढीपत्त्यावरून आठवले ते. हा मसाल्याचा प्रकार गोवा, कारवार भाग सोडला तर बाकी कोकणात पण फारसा वापरात नाही. देशावर तर नाहीच.
कटाच्या आमटीत पण छान लागतात ती.
वर्षुताई, सरिवा फोटो आवडले.
वर्षुताई, सरिवा फोटो आवडले.
वर्षूताई, मानुषी मस्त
वर्षूताई, मानुषी मस्त फोटो.
गारेगार ताडगोळे घ्या.
वॉव ताडगोळे. कालच आणणार होते
वॉव ताडगोळे. कालच आणणार होते पण विशेष समजत नाही मला त्यातलं. जागू आता इथेच उचलून तोंडात टाकते.
जागूच्या घरचे ताडगोळे का
जागूच्या घरचे ताडगोळे का ?
अन्जू फारसे कठीण नाही. जर गाडीवाला असे सोलून देत असेल तर फार चांगले. आधीच काढलेले असतील तर तपकिरी पडलेले नकोत. फार मोठे चामट असतात तर फार छोटे अगदीच मऊ असतात. साधारण ५ ते ६ सेमी व्यासाचे चांगले. पाण्यात ठेवलेले पण नको.
अख्खे फळ आणून घरी ताडगोळे काढायला मात्र कौशल्य हवे.
जांभळाला धरत असलेली
जांभळाला धरत असलेली फळे.
लहानपणी कोड होत ना ज्याला लांब लांब दाढी?
हा स्वर्गिय नर्तक का?
आमचा खंड्या अगदी व्यवस्थित फोटो काढून देतो.
अजुन खुप काही शेअर करायच बाकी आहे. वेळ मिळताच करेन.
अन्जु पांढरे असलेले घे.
अन्जु पांढरे असलेले घे. गुलाबी असतात तेही छानच पण फार कवळे असतात. चॉकलेटी आजीबात घ्यायचे नाहीत. जुन असतात.
दिनेशदा खुपच कौशल्याचे काम असते ताडगोळे काढणे. मी बर्याचदा काढण्याचा प्रयत्न केलाय. एक दोनदा यशही आलय. पण हात, कोयता आणि ताडफळ ह्या तिन्हीकडे तर लक्ष द्यावे लागतेच पण गोळा आख्खा येण्यासाठि अगदी गोळ्याच्या भागाच्या बाहेर फटका बसावा लागतो.
वर्षू नील, जागू, सरिवा फोटो
वर्षू नील, जागू, सरिवा
फोटो मस्तच ......
कुंडीतल केळ्याच झाड पहिल्यांदिच पाहिलं
जागु, ही स्वर्गिय नर्तकी आहे.
जागु, ही स्वर्गिय नर्तकी आहे. नर्तक गोरा असतो.
बर्याच दिवसानी वेताळ टेकडी
बर्याच दिवसानी वेताळ टेकडी परिसरात फिरायला गेलो. काल आणि आज दोन्ही दिवस मस्त वातावरण होतं. दोन्ही दिवस मोरांनी मस्त स्वागत केलं. बरेच पक्षी दिसले.
मगाशी ताडगोळे दिसलेच नाहीत,,
मगाशी ताडगोळे दिसलेच नाहीत,, मस्तच
अक्षरशहा तोंपासु
ताडगोळे काय असतं? मी कधीच
ताडगोळे काय असतं?
मी कधीच खाल्लं नाहीये
जागू, दिनेशदा धन्यवाद.
जागू, दिनेशदा धन्यवाद. सोललेलेच असतात विकायला.
जांभूळ वा, काय चाललंय जागू जळवतेस का? माहेरी कोकणात जांभूळ खात खात डोंगरावर खूप फिरलोय.
खंड्या आणि स्वर्गीय नर्तकी मस्त.
जो.. पुण्यात पाऊस पडतो आहे
जो.. पुण्यात पाऊस पडतो आहे का ? कोकणात पडला तर आंब्याचे नुकसान होणार.
जागु तुझं घर एकदा बघावस वाटतं
जागु तुझं घर एकदा बघावस वाटतं आहे....
ताडगोळे काय? जांभुळ काय? आणि पक्षी तरी किती वेगवेगळे...
तो बुलबुल चा कोणी चुलता असावा? डोक्यावर तुर्रा दिसतोय! :
Pages