निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा अगदी इमोशनल केलंत. खंडेराव मार्केटमध्ये हिरव्यागार भाज्या मिळायच्या आणि स्वस्तही भरपूर मुंबईच्या मानाने, तुरीच्या शेंगा घेऊन यायचो आम्ही.

थोडं अवांतर पण बडोद्याचे खमण, पेढे आणि सुगम श्रीखंड कुठेच मिळत नाही. अलिबागजवळ चौलला थोडे त्याच्या जवळपास जाणारे पेढे मिळतात पण बडोद्याचे ते बडोद्याचे. १९८८नंतर बडोद्याला जाणेच झाले नाही.

हं....इथेही धुवांधार पाऊस चालू आहे.
>>>>मानुषी, चेरी ब्लॉसमचे फोटो पायजे म्हंजे पाय्जे म्हंजे पायज्जे.>>>>>
हो तिकडे प्रचि विभागात टाकण्याचं धाड्स करणार आहे. असेच काही फोटो प्रचि विभागात टाकले होते तेव्हा एका आयडीने इतक्या विचित्र कमेन्ट्स केल्या होत्या की खूप फोटो असूनही तिकडे टाकण्याची इच्छा झाली नाही.
आणि आधी केले मग सांगितले अश्या जिप्सी सारख्या लोकांनी फोटोग्राफी बाबत काही सुचवलं तर उलट आपल्याला गायड्न्सच मिळतो...पण ..................
असो.....दिनेश यांच्या आग्रहवजा विनंतीला मान देऊन चेब्लॉ चे फोटो प्रचि विभागात डकवण्यात येतील. :स्मितः

मी एका कुंडीमधे अनंताचे नर्सरीतून आणून रोप लावले. आणताणच त्याला १०-१२ कळ्या होत्या.मी त्याला रोज पाणी देते. आणि बाल्कनीत असल्याने प्रकाशही आहे. एक फूल ही फुलले. पण तरी त्याच्या २ मोठ्या कळ्या आपोआप गळून गेल्या आणि पाने ही करपायला लागली आहेत.हया झाडाला किती वेळ ऊन हवे. आणखी काही काळजी घ्यायला हवी का?

एका आयडीने इतक्या विचित्र कमेन्ट्स केल्या होत्या की खूप फोटो असूनही तिकडे टाकण्याची इच्छा झाली नाही.

अगं म्हणुन काय झाले? टीका हे प्रोत्साहन आहे समजुन पुढे जायचे.

आणि तु फोटो टाकले नाहीस तर आम्हाला कसे कळणार तु काय काय पाहिलेस ते? आम्ही थोडेच जाणारोत तिकडे? निदान फोटो तरी पाहु. Happy

मानुषी, काय मस्त फोटो आहेत. प्रसन्न वाटलं... त्या आयडीच्या नाकावर टिच्चून फोटो टाकायचे. मायबोली प्रशासनाच्याच सूचना मानायच्या.. बाकिच्यांच्या नाहीत.

साहिश,
नर्सरीत कदाचित रसायने फवारून जास्त कळ्या आणल्या असतील. झाड लहान असेल तर आधी जोमदार वाढ होऊ दे.

धन्यवाद दिनेश. झाड साधारण एक फूट उंचीचे आहे.मी कुंडी थोडी सावलीत पण शीफ्ट केली आहे जास्त ऊन लागुन पाने करपु नयेत म्हणून.

ब्रम्हपुत्र बद्दल नविन माहीती.

माझा असा समज आहे की गुलमोहोर पूर्ण फुलल्यावर पाउस येतो. पण सध्या मुंबईत काही झाडांवर थोडीफार फुले फुललेली दिसतात. काल पुण्यात होते, तिथे तर लक्षात येण्याजोगा गुलमोहोर फुलला होता. काय कारण असावे?

पाषाण-सुस रोड परीसरात रस्त्याच्या कडेला पिंपळाची झाडे लावलेली पाहीली. बर वाटले.

मानुषीताई, साधना/दिनेशदा सांगत आहे ते खरंय. बिनधास्त फोटो टाका, आमच्यासाठी :-).
एक-दोन लोक म्हणजे मायबोली नाही (रियाकडुन साभार Happy ) त्यांच्यासाठी इतरांचा आनंद हिरावून घेऊ नका. (खरंतर हा सल्ला मी स्वतःलाही १-२ महिने आधी दिला पाहिजे होता. असो.....)
भविष्यात कधी चेरी ब्लॉसम पहायला मिळेल न मिळेल पण सध्यातरी तुमच्या फोटोतुन तो पाहिल्याचा आनंद आम्हाला मिळतोय.

रच्याकने, वर दिनेशदा आणि अन्जूने नर्मदा नदी आणि भरूच रेल्वे पुलाचा उल्लेख केला आहे, त्यावरुन अभिजीतने (बित्तुबंगा) "जीवनदायिनी रेवा" शिर्षकांतर्गत नर्मदेचे फार सुंदर फोटो मायबोलीवर प्रदर्शित केले होते, त्याची प्रकर्षाने आठवण झाली. दुर्दैवाने त्यानेही सगळे फोटो अप्रकाशित/डिलीट केलेत. Sad
असो...

मानुषीताई, तुम्ही फोटो प्रदर्शित करतच रहा. सध्या तुमची फोटोग्राफी खरंच बहरत आहे. Happy

हो जिप्स्या, मला पण त्याचेच फोटो आठवले. तोही हल्ली दिसत नाही इथे.

तू वरचा ट्यूलिपचा फोटो बघितलास का ? तू गेला होतास तिथे ?

तू वरचा ट्यूलिपचा फोटो बघितलास का ? तू गेला होतास तिथे ?>>>>दिनेशदा, ती लिंक इथे ओपन होत नाही आहे. घरी जाऊन बघतो. श्रीनगर (काश्मिर)ला ट्युलिप गार्डन आहे तेथे याच महिन्यात बहर असतो.

माझा असा समज आहे की गुलमोहोर पूर्ण फुलल्यावर पाउस येतो. पण सध्या मुंबईत काही झाडांवर थोडीफार फुले फुललेली दिसतात

गुलमोहोर ग्रीष्मात फुलणारे फुल आहे. मे महिन्यात बहराला येईल. वसंताची सगळी बहार ओसरुन गेली की मग तो येतो मिरवायला.

बाकी पुणे तिथे काय उणे हा विचार करुन पुण्यात तो ग्रीष्मही आधीच आला असेल. Happy

एक-दोन लोक म्हणजे मायबोली नाही (रियाकडुन साभार ) त्यांच्यासाठी इतरांचा आनंद हिरावून घेऊ नका. (खरंतर हा सल्ला मी स्वतःलाही १-२ महिने आधी दिला पाहिजे होता. असो.....)

ये हुईना बात..... आपला आनंद आपणच मिळवायचा आणि इतरांना द्यायचा. काही जणांना त्यात खटकत असेल काही तर ठिकाय, आपल्याला पटले तर आपण जमेल तसे दुरूस्त करावे.

माझ्या घराच्या पाठीमागे सोनमोहोर फुललाय. गुलमोहोर पुढच्या महिन्यात फुलेल.

जिप्सी मी मिसले ते फोटो नर्मदेचे.

साधना Happy

शनिवारच्या गटगला अजुन कोण कोण येतंय? सकाळी ९:३० ला भेटायचे का?

सध्या इतके(च) लोक येत आहेत Happy

१. जिप्सी
२. साधना आणि ऐशु (?)
३. उजु आणि इशिका
४. वर्षूदी (?)

जागू, कुठे गायब आहे सध्या?

हे घ्या ट्युलीप्स - चक्क पुण्यात .......... (पुणे तिथे काय उणे!!) >>>>> Happy Happy

आम्ही यावर्षी मुंबईत राणीबागेत ट्युलिप पाहिले होते. प्रदर्शनात.

गेल्या भागाच्या शेवटी माबोकर चंद्रा यांनी ट्युलिप लागवडीबद्दल सांगितले होते. Happy

आम्ही यावर्षी मुंबईत राणीबागेत ट्युलिप पाहिले होते. प्रदर्शनात.>>>> त्या कुंड्या पुण्यातूनच उचलून तिथे ठेवल्या होत्या रे ... Happy Wink

जागु ताई कशि आहेस ??

अजुन माझ्या मोगर्‍याला फुले नाहि आलि.... खत घालावे का ??( रोप गेल्या वर्षी विकत घेतले होते )

अरे जागुने रविवारी जायचे का अशी पृच्छा केलीय. >>>> बघ साधना - पुणेकरांचा विचार करता करता तूही एक संस्कृतोद्भव शब्द वापरलास की - पृच्छा .... (रच्याकने - पुणेकर नारळाला "श्रीफळ" म्हणतात आणि शाल / चादरीला "महावस्त्र" .... - इति पु ल .... Happy Wink ...)

इंद्रा कुठे असतो हल्ली ? आणि नितीन ?>>>>दिनेशदा, इंद्रा आहे इथेच पण नितीन सध्या गायब आहे.

तिला शनवारी जमणार नाही पण रव्वारी जमेल.>>>>>मला रविवारीसुद्धा चालेल.

Pages