निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांक... खरे श्रीफळ म्हणजे बेलफळ असे एक पुणेकर.. श्रीकांत यांनीच लिहिलेले आहे Happy
नितिन चा नंबर असेल उजूकडे कदाचित. त्याला हल्ली मायबोलीचा अ‍ॅक्सेस नाही.

२१ तारखेदरम्यान नलिनी असेल माझ्याघरी. तिला आवडेल तूमच्यासोबत यायला.

नितिन चा नंबर असेल उजूकडे कदाचित>>>>नितीनचा नंबर आहे माझ्याकडेसुद्धा. आज कॉल करतो त्याला.

२१ तारखेदरम्यान नलिनी असेल माझ्याघरी>>>>>२० तारखेला जमेल का?

ओह.......सर्व निगकर्स यांचे आभार्स! इथे दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल(मन भरून आलेली बाहुली,!!,)
आणि तिकडे प्रचि विभागात चेब्लॉ ला दिलेल्या प्रतिसादांबद्दल धन्यवादच!

अगं म्हणुन काय झाले? टीका हे प्रोत्साहन आहे समजुन पुढे जायचे.>>>>>>>>>>>>
साधने हे कळ्लं,

आणि तु फोटो टाकले नाहीस तर आम्हाला कसे कळणार तु काय काय पाहिलेस ते? आम्ही थोडेच जाणारोत तिकडे? >>>>>>>>>>>>>> हे नाही कळ्लं . जाशील की कधी तरी....त्यात काय मोठंसं ते? :स्मितः

पण तारीख पक्की झाल्याशिवाय सांगण्यात काय पॉइन्ट.>>>>मला रविवार २० तारीख चालेल. उजु आणि वर्षूदीला विचारायला पाहिजे. नितीनला फोन केलेला, तो बहुतेक येईल.

जिप्स्या, भेटच त्याला. अगदी तान्हा असल्यापासून तो तसाच आहे. बाळ असताना त्याचा फोटो काढायचा होता मला तर त्याला टांगून ठेवावं लागलं ( चादरीत ). पण खुपच गोड आहे तो. ( त्याचे फोटो काढायला नलिनी नक्की परवानगी देईल.)

मानूषी, तूमच्या नगरात मात्र उन्हाळा सुरू झाला बरं का. तेव्हा परत यायची घाई नको.

दिनेश आता परतावं लागणार आहे. यापेक्षा जास्त रहायची अमेरिकन सरकारची परवानगी नाही.
पण खरंच अजूनही इथे स्वेटर/जॅकेट शिवाय चालत नाहीये.
आणि इथून आता डायरेक्ट भट्टीतच.....
हो ...नलिनीचं बाळ फार गोड आहे आता मोठा झाला असणार!

नाही. नैरोबी, अदीस अबाबा, हरारे थंड हवेची ठिकाणे आहेत. नैरोबीत माझ्या घरी एसीच काय पंखाही नव्हता.

हं ...हे पंख्याचं वाचल्यावर तुम्ही हे कुठे तरी लिहिल्याचं आठवतंय!
नाहीतर जनरली आफ्रिकन देश म्हण्जे मरणाचे उष्ण प्रदेश असंच डोळ्यापुढे येते.
हेही देश बघायची खूप् उत्सुकता आहे.

व्हीसा, ऑन अरायव्हल आहे. ( ५० यू एस डी )....वॉव हे मस्तय!

मानूषी, तुम्ही दोघींनी खरे तर किलिमांजारो ट्रेक केला पाहिजे. ५ दिवसांचा ट्रेक आहे. यू ट्यूबवर पूर्ण चित्रीकरण आहे. त्याच्या माथ्यावर बारा महिने बर्फ असते ( टांझानियात आहे पण केनयातूनही जाता येते. त्या तिन्ही देशात
म्हणजेच युगांडा, टांझानिया, केनया मधे बॉर्डर रेग्यूलेशन नाही. )
माऊंट केनया जरा कठीण आहे. केनया, युगांडा बॉर्डरवरचा माऊंट एल्गॉन त्या मानाने सोपा आहे.

गेले आठ्वडाभर कोकणात गेले होते. कोकण अप्रतिम. पण फोन, नेट काही नव्हत तिथे. तेवढया काळात किती वाचायचे राहुन गेले. आज सगळं वाचलं मस्त माहिती आणि मस्त फोटो. हे काही कोकणचे फोटो
आमराई
From mayboli

झाडावरचे आंबे
From mayboli

लेकुरवाळा फणस
From mayboli

सागाच्या पानाची जाळी
From mayboli

जाळीमंदी पिकायची करवंद
From mayboli

From mayboli

मनिमोहोर मस्तच.

जिप्स्या घरी आहे म्हणून गायब आहे. वेळच मिळत नाही कॉम्प्युटर ओपन करायला. Lol

बाकी मस्त माहिती, गप्पा, फोटो चालू आहेत.

आँ???? जागू कशात बीझी आहेस एवढी घरी? बघ हं ...म्हणजे सांगायचं असल्यास सांग नाहीतर राहिलं...नाही म्हण्जे "वेळ मिळ्त नाही " ...सांगताना फार हसू येतय तुला म्हणून म्हट्लं Wink
हेमा कोकण मस्त! मलाही माझ्या गावची आठवण झाली.

कैर्यांचे फोटो पाहून जीव जळायला सुरूवात झाली आहे.

निगकर्स सांगा बरं हे झाड कसलं आहे? (फॉर चेंज मला माहीत आहे आणि काल याचं हे रूप पाहून फोटोही घेतला गेला)

Happy

tree1.gif

नमस्कार लोक्स! आज एक नविन रेसिपी पोस्ट केली आहे.. करुन बघा..

मनिमोहर... आमराई, आणि कैर्‍यांनी लदबदले झाड... आ हा हा!

लेकुर वाळा फणस... व्वा कीती साजेस नाव दिलयं....

काय मजा असते ना, इथे अंगोलात आंबे, फणस आणि करवंद सगळं आहे. चवीला पण चांगलेच असतात.
जवळच्या जंगलातच असल्याने मला विकतही घ्यावे लागत नाहीत.. तरीही हे फोटो बघून वाटायचं ते वाटतंच !

Pages