निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुण्यात मधेच ढगाळ हवा होते पण पाउस नाही फारसा पडत. कोकणात पडला तर अंब्यांचं नुकसानच आहे. पुणे सोडून इतरत्र पडतोय मधेच.

जागू, ताजेताजे ताडगोळे छान व माहिती उपयोगी.मी मात्र अजून त्यांची चव घेतली नाहीये!
जांभळे तर माझी अत्यंत आवडती.
इनडोअर केळीचे हिरवेगार रोप मस्त.त्याला घरातला सूर्यप्रकाश पुरतो का?
कांचनाची फुले व मोराचे फोटो अगदी नैसर्गिक.

145 pratisad vachun kadhale..
kokan mhatla tari kiti chan vatat na..fanas gav majha aajol

नाचरा मोर समोरुन बघायला काटक्यांमुळे व्यत्यय येतोय, तरीपण छान आहेत फोटो.

कांचनच्या फुलाचा कलर मस्त आहे वर्षुताई. आमच्या गावाला जास्त पांढ-या रंगाची आहेत.

कांचन मस्त!
काल एका नर्सरीत गेले होते. आत शिरणारा शहाणा माणूस कम्प्लेट्च येडा होऊन बाहेर पडेल. पुराव्यानिशी शाबीत करीन!
बागेशी रिलेटेड कोणती गोष्ट नव्हती ते विचारा!

.

दिनेश Lol

कांचन .. ओह थांकु साधना..कार मधून जाताना पाहिले होते मैलोमैल ही झाडे फुलांनी भर्रून उभी होती... दुसर्‍या दिवशी परत येऊन अजून फोटो काढीन असं मनात म्हटलं.. पण त्याच रात्री तुफान वारं, पाऊस इतक्या जोरात आला ( प्रूफ आहे जागु च्या व्हॉट्सॅप वर Happy )आणी तिसर्‍या दिवशी जाऊन पाहते तो ही नाजुक साजुक फुलं ९०% गळून झाडांच्या पायाशी कार्पेट बनून गेली होती..

बाप्रे.. मानु तू ठीकैस ना Wink Proud

कचनार किंवा कांचन.. गुगलून पाहता समजलं कि अ‍ॅस्ट्रिंजंट मधे , लेप्रसी सारखे त्वचारोग बरे करण्याकरता या झाडाच्या च्या बार्क (साल?)चा उपयोग केला जातो. या सालींचा काढा डिसेंट्री वर उपयोगी पडतो तर वाळलेल्या कळ्यांचा काढा डायरिया बरा करण्याकरता . या झाडांच्या मुळा चा काढा , स्थूलता कमी करण्या करता तर कळ्यांचे इन्फ्यूजन ( मराठी शब्द प्लीज!! ) खोकला बरा करण्याकरता उपयोगात येतो.

वॉव.. मुळा पासून फुलांपर्यन्त औषधी आहे कचनार..

हे फूल मला अनमोड्च्या जंगलात दिसलं. अगदी एकाकी झाड , एकामोठ्या झाडाच्या बुंध्यात ४ फुटाचं हे झाड होतं. नाव कुणाला माहित आहे कां?
हे फोटो थोडे जास्त एक्स्पोज झालेत. IMG_3140.jpgIMG_3141.jpgIMG_3142.jpgIMG_3143.jpg

अंजली, आपली दुसरी अंजली म्हणजे शांकली खात्रीने सांगेल.. मला हे थोडेसे वाघाटीच्या फुलासारखे दिसतेय. पण तो वेल असतो.

वर्षू, कांचनाच्या कोवळ्या पानांची, कळ्यांची आणि शेंगांची पण भाजी करतात. ( मला खादाडीच सूचणार ना ? )


या नर्सरीत बागकामाचं सगळं साहित्य तेही अगदी मस्त कलरफुल! आणि या नर्सरीचे विनम्र तत्पर मदतनीस. तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करायला उत्सुक!

वॉ>>>>>>व ही नर्सरी????????????

खरंच वेड लावणारी... काय काय घेतलंस तू इथून?? काहीच ना घेणार्‍याला ही मोह झाला असेल खरेदीचा Happy

अगं इथून सिमला मिरची,टोमॅटो, आणि काही शोभेची झाडं घेतली. लेक जावयांनी परवाच बाग कामाचं साहित्य आणलं.
कुन्ड्या आणि कुंड्याखाली ठेवण्याचे चाक' असलेले लोखंडी स्टॅन्ड असलंही काय काय आण्लं होतं त्यांनी.
आता इथे सगळे अगदी स्प्रिन्गाळ्लेले आहेत. बाल्कन्या मधे रंगित खुर्च्या दिसताहेत. पोरी बाळी हातात ग्लोव्ज घालून छोट्या कुन्ड्यामधे झाडं लावताहेत.

मानुषी मस्तच ग.

आमच्या झुंबरावर पुन्हा बाळंतपण होणार. घरटे विणताना बुलबुल.

आंब्याच्या झाडावरचे कावळ्याचे घरटे.

अरे, कालच्या दिवसात इथे फिरकलो नाही तर ६०+ पोस्टी Happy
सगळेच फोटो/माहिती मस्त. Happy

काल आमच्या येथे रात्री विजांच्या कडकडासहित १० मिनिटे जोरदार पाऊस. Happy

काल पुण्याहुन दौंडला जाऊन आलो. शिवाजीनगर जवळ दिवाणी न्यायालयाच्या परीसरात सोनबहावा मस्तपैकी बहरला आहे. खंडाळा ते पळसदरी दरम्यान पांढरा कुडा अगदी बहरलाय. Happy

Pages