उन्हाळ्यासाठी गारेगार बर्फ

Submitted by लसावि on 21 April, 2014 - 00:41

साहित्य -
एक रेफ्रिजिरेटर (चालू)
आईसक्यूब ट्रे (न गळणारा)
पाणी (प्यायचे)

कृती -
१. एका तांब्यात (हे एका प्रकारचे भांडे असते) पाणी घ्यावे.
२. स्वच्छ धुतलेल्या आईसक्यूब ट्रे मध्ये ते हळूहळू ओतावे*.
३. पाणी भरलेला हा ट्रे न हिंदकाळता फ्रीजच्या डीप फ्रीजर मध्ये ठेवावा. (कृतीचा हा भाग फार अवघड आणि महत्वाचा आहे. भरलेला ट्रे एका हातात धरुन त्यातले पाणी न सांडता दुसर्‍या हाताने आधी फ्रीजचा आणि मग डीप फ्रीजरचा दरवाजा उघडणे हे एक परिश्रमसाध्य स्कील आहे.)
४. आता डीप फ्रीजचा आणि मग फ्रीजचा दरवाजा बंद करावा.
५. तुमच्या फ्रीजच्या लायकी प्रमाणे आणि तुमच्याकडे किती वेळ सलग वीज असते त्याप्रमाणे कधीतरी बर्फ तयार होईल.
६. बर्फ वापरायच्या वेळी तो ट्रे डायगोनली पकडून धुणे पिळल्याप्रमाणे हाताची हालचाल करावी. हे करताना काळजी घ्यावी कारण काही चुकार आईसक्यूब्स एकदम उडी मारुन नको तिथे पडू शकतात.
७. अशा प्रकारे तयार झालेला बर्फ इतर अनेक कृतीत वापरता येतो उदा. हळूच कॉलरमागून शर्टात टाकणे इ.इ.

* ही स्टेप करताना पाण्याशी गोड बोलल्यास चांगले आणि त्याला शिव्या घातल्यास खत्रूड आकाराचे क्यूब्स तयार होतात म्हणे. http://rationalwiki.org/wiki/Water_memory
फक्त इच्छाधारी नागांनाच नव्हे तर पाण्यालाही मेमरी असते हेच यावरुन सिद्ध होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसिपि.

मी ही थोड्या फार फरकाने असच बनवते.

आमच्याकडे डबल डोअर फ्रीज आहे त्यामुळे फक्त डीप फ्रीजरचा दरवाजा उघडावा लागतो आणि ५ सेकन्द वाचतात.

(माझे परिश्रम आणि स्किल् तो ट्रे , हात उन्चावून जागच्या जागी ठेवण्यात खर्ची होते. पाण्याच्या बाट्ल्या पायाजवळ असतात हा विचार न करता नवर्याने त्याच्या उन्चीचा फ्रीज घेतला Sad )

शिवाय , आधुनिक तन्त्रज्ञानामुळे , ट्रे धुण्यासारखा पिळायची गरज लागत नाही . फक्त त्याचा कान चावीसारखा पिळल्यावर , क्युब्ज इकडे तिकडे उड्या न मारता , शहाण्या बाळान्सारखे खालच्या भान्ड्यात येउन बसतात .

पण तुमच्या पाकक्रुतीने माहेरी बनणार्य , दुधाळ र.न्गाच्या ट्रे मधिल मोठमोथाल्या क्युब्ज्ची आठवन करून दिली .

शतशः धन्यवाद Happy

rmd,
गुलाबी रंगाच्या ट्रेमधे करून बघ आणि इथे प्रयोगाचे फलित लिही. करताना कर्मण्येवाऽधिकारस्ते हा अ‍ॅप्रोच ठेव. माबोवर लिहिताना हा दृष्टीकोन ठेवावा असे इथल्या एका ज्येष्ठ सभासदाचे मत आहे. आपण तो रेसिप्या करताना अंमलात आणायची जास्त गरज असते असं माझं मत आहे

नक्कीच. वरदा, धन्यवाद! तुझ्या पोस्टींमुळे मला हुरूप आला. आता नक्कीच करून बघेन आणि सांगेन.

खरंतर पुण्यात एकेठिकाणी अगदी अस्साच बर्फ मिळायचा. पण मेलं नाव आठवत नाहीये. या पाकृमुळे त्या आठवणी जाग्या झाल्या.

कर्मण्येवाऽधिकारस्ते हा अ‍ॅप्रोच ठेव. माबोवर लिहिताना हा दृष्टीकोन ठेवावा असे इथल्या एका ज्येष्ठ सभासदाचे मत आहे. >>> खणखणीत!
rmd,तुमचे बी प्रश्न अवघद आहेत!

आगावा.. आजच वाचलं कुठेतरी.. पाणी उकळून थंड करून क्यूब बनवल्यास क्रिस्टल क्लिअर होतो बर्फ बर्का..

साधच माठाबिठातलं घेतलं तर ओपेक च होतो..

काय करणार आगावा... आधीच ही पाकृ माझ्यासाठी नवीन त्यात पुन्हा मला नवीन नवीन प्रयोग करून पहायला फार आवडतात.

हे क्यूब्ज सर्व करताना त्यावर खोबरं आणि कोथिंबीर भुरभुरावी लागते का?

खरंतर पुण्यात एकेठिकाणी अगदी अस्साच बर्फ मिळायचा. >> पारंपारिक रेसिपी आहे असे धागाकर्त्याने लिहिल्यामूळे बर्फ हायजॅक करू नका. प्रत्येकाने आपापले बर्फ घेऊन बसावे हि विनंती. तसेही एकाच्या शर्टात टाकलेला क्यूब दुसर्‍याच्या शर्टात टाकणे हायजिनिक नसावे Lol

लिंबू पिळायची आवश्यकता नाही. पिळलंसच तर त्याबरोबर थोडं मीठही शिंपड. म्हणजे बर्फ आणखी गारेगार होतो व लौकर वितळायची भीती रहात नाही. अगदी कडाकड चावून खाता येतो

खोबरं कोथिंबीर घरात असेल तर, जरूर. पण ऑप्शनल आहे.

भरलेला ट्रे एका हातात धरुन त्यातले पाणी न सांडता दुसर्‍या हाताने आधी फ्रीजचा >> हमखास यशस्वीरीत्या बर्फ करण्यासाठी "भरलेला ट्रे" डीप फ्रीजरमध्ये ठेवताना उजव्या हातात धरावा की डाव्या?
शिवाय फ्रीजच्या जातीवर (ब्रँडवर) चव आणि आकार अवलंबून आहे काय?

कालच ह्या रेस्पीने बर्फ बनवायचा प्रयत्न केला. पण त्यासाठी घेतलेल्या पैकी बरेच पाणी उरले आहे. त्याचे अजुन काय काय करता येईल?

(स्वगतः हा प्रश्न इथे विचारणे योग्य आहे का युसुयुसा वर विचारावा? Uhoh ) Proud

गिरीकंद, अहो उरलेल्या तयार बर्फाचे काय करता येईल हे सांगायचं लेखक अजून टाळतायत. मग उरलेल्या कच्च्या मालाचं सांगतील की नाही शंका आहे. तरीपण वाट बघा.

गिरीकंद, अहो उरलेल्या तयार बर्फाचे काय करता येईल हे सांगायचं लेखक अजून टाळतायत. मग उरलेल्या कच्च्या मालाचं सांगतील की नाही शंका आहे. तरीपण वाट बघा. >>> गजाभाऊ, Proud

झाडांना घाला. (झाडे नसतील घरात तर आधी ती लावा. पण काय हे तुमच्याकडे झाडेच्च नाहीत घरात.. श्या!)

Pages