साहित्य -
एक रेफ्रिजिरेटर (चालू)
आईसक्यूब ट्रे (न गळणारा)
पाणी (प्यायचे)
कृती -
१. एका तांब्यात (हे एका प्रकारचे भांडे असते) पाणी घ्यावे.
२. स्वच्छ धुतलेल्या आईसक्यूब ट्रे मध्ये ते हळूहळू ओतावे*.
३. पाणी भरलेला हा ट्रे न हिंदकाळता फ्रीजच्या डीप फ्रीजर मध्ये ठेवावा. (कृतीचा हा भाग फार अवघड आणि महत्वाचा आहे. भरलेला ट्रे एका हातात धरुन त्यातले पाणी न सांडता दुसर्या हाताने आधी फ्रीजचा आणि मग डीप फ्रीजरचा दरवाजा उघडणे हे एक परिश्रमसाध्य स्कील आहे.)
४. आता डीप फ्रीजचा आणि मग फ्रीजचा दरवाजा बंद करावा.
५. तुमच्या फ्रीजच्या लायकी प्रमाणे आणि तुमच्याकडे किती वेळ सलग वीज असते त्याप्रमाणे कधीतरी बर्फ तयार होईल.
६. बर्फ वापरायच्या वेळी तो ट्रे डायगोनली पकडून धुणे पिळल्याप्रमाणे हाताची हालचाल करावी. हे करताना काळजी घ्यावी कारण काही चुकार आईसक्यूब्स एकदम उडी मारुन नको तिथे पडू शकतात.
७. अशा प्रकारे तयार झालेला बर्फ इतर अनेक कृतीत वापरता येतो उदा. हळूच कॉलरमागून शर्टात टाकणे इ.इ.
* ही स्टेप करताना पाण्याशी गोड बोलल्यास चांगले आणि त्याला शिव्या घातल्यास खत्रूड आकाराचे क्यूब्स तयार होतात म्हणे. http://rationalwiki.org/wiki/Water_memory
फक्त इच्छाधारी नागांनाच नव्हे तर पाण्यालाही मेमरी असते हेच यावरुन सिद्ध होते.
भन्नाट पाकृ
भन्नाट पाकृ
किट अमेझॉनवर मिळतय. तांब्या , किरमिजी ट्रे , श्लोकाची सिडी अन डिहायड्रेटेड पाण्याचा सॅशे !
>>>>>
हे सॅशे पाण्यात मिक्स करायचे की दूधात? आणि प्रमाण किती घ्यायचं?
आणि वुली मॅमथ सापडलाच फ्रीजमधे तर त्याचं काय करायचं? ज्येनांना मॅमथ सोसवणार नाही म्हणून विचारतेय…
अरे.. एकच नंबर !!
अरे.. एकच नंबर !!
माझ्या लेकाने वय वर्ष ६ करून बघितली रेसिपी आणि चक्क जमली. आता स्वतः च्या मनाने वेगवेगळे व्हेरीएशन चालू आहेत. एकदा हॅण्डवॉश आणि परवा वॉटर कलर घातले होते.
यंदाच्या ज्युनिअर मास्टरशेफ ला जाईन म्हणतो.
:हहगलो::हहगलो:
मला वाटल काहि तरी नवीन पाकृ
मला वाटल काहि तरी नवीन पाकृ आहे की काय . ही तर अतिशयच जुनी पाकृ वाटते आहे .
ही पाकृ उपासाला चालते का?
ही पाकृ उपासाला चालते का?
काही उत्तर भारतीय मैत्रिणी येणार आहेत, मेनू ठरवते आहे, एकीचा उपास आहे, एक डाएट वाली आहेतर गारेगार बरफाच्या जोडीला अजून काय करू?
आपले महाराष्ट्रीयन फ्लेवर्स बरे लागतील की pizza पास्ता वगैरे?
Pages