उन्हाळ्यासाठी गारेगार बर्फ

Submitted by लसावि on 21 April, 2014 - 00:41

साहित्य -
एक रेफ्रिजिरेटर (चालू)
आईसक्यूब ट्रे (न गळणारा)
पाणी (प्यायचे)

कृती -
१. एका तांब्यात (हे एका प्रकारचे भांडे असते) पाणी घ्यावे.
२. स्वच्छ धुतलेल्या आईसक्यूब ट्रे मध्ये ते हळूहळू ओतावे*.
३. पाणी भरलेला हा ट्रे न हिंदकाळता फ्रीजच्या डीप फ्रीजर मध्ये ठेवावा. (कृतीचा हा भाग फार अवघड आणि महत्वाचा आहे. भरलेला ट्रे एका हातात धरुन त्यातले पाणी न सांडता दुसर्‍या हाताने आधी फ्रीजचा आणि मग डीप फ्रीजरचा दरवाजा उघडणे हे एक परिश्रमसाध्य स्कील आहे.)
४. आता डीप फ्रीजचा आणि मग फ्रीजचा दरवाजा बंद करावा.
५. तुमच्या फ्रीजच्या लायकी प्रमाणे आणि तुमच्याकडे किती वेळ सलग वीज असते त्याप्रमाणे कधीतरी बर्फ तयार होईल.
६. बर्फ वापरायच्या वेळी तो ट्रे डायगोनली पकडून धुणे पिळल्याप्रमाणे हाताची हालचाल करावी. हे करताना काळजी घ्यावी कारण काही चुकार आईसक्यूब्स एकदम उडी मारुन नको तिथे पडू शकतात.
७. अशा प्रकारे तयार झालेला बर्फ इतर अनेक कृतीत वापरता येतो उदा. हळूच कॉलरमागून शर्टात टाकणे इ.इ.

* ही स्टेप करताना पाण्याशी गोड बोलल्यास चांगले आणि त्याला शिव्या घातल्यास खत्रूड आकाराचे क्यूब्स तयार होतात म्हणे. http://rationalwiki.org/wiki/Water_memory
फक्त इच्छाधारी नागांनाच नव्हे तर पाण्यालाही मेमरी असते हेच यावरुन सिद्ध होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या खर्‍याचा जमानाच नाही राहिला............. >> एका आर्किऑलॉजिस्ट ने 'सध्या' बद्दल लिहावे ? 'हटकेश्वर, हटकेश्वर !' ... Lol

सुरेख! कोलंबियातले आमचे एक खापरपणजोबा अग्गद्दी अस्साच्च बर्फ करायचे. नंतर काही वर्षांनी कुणा मार्केस नावाच्या लेखकाने त्यांना कॉपीराईट न देता, तो प्रसंग खुश्शाल आपल्या कादंबरीची सुरूवात म्हणून वापरला.

Many years later, as he faced the firing squad, Col. Aureliano Buendía was to remember that distant afternoon when his father took him to discover ice.

मसापच्या शाखेत जाऊन निषेध नोंदवून यावा म्हणतो!

थोरामोठ्यांबद्दल असं एकेरीत बोलू नये माते. मान्नीय खर्‍यांबद्दल लिहायचे असते तर मी 'खर्‍यांचा' जमाना लिहिले असते...

खर्‍यांचा (पीळ) जमाना संपल्याबद्दल जगन्नियंत्याचे माझ्याकडून सहर्ष आभार

पण आयुर्वेद म्हणतो की उन्हाळ्यात गारेगार खावासा वाटला तरी बर्फ खाउ नये त्याने अपायच होतो. आता काय कराचं?

मी बर्फ खाणारा आहे..........

अजुन कोण कोण आहे बर्फ खानारे ????????????????

पण आयुर्वेद म्हणतो की उन्हाळ्यात गारेगार खावासा वाटला तरी बर्फ खाउ नये त्याने अपायच होतो. आता काय कराचं?
<<
होम्योपदीवर शिफ्ट व्हा.
बर्फ उकडून घेऊन गरम गरम असतानाच खात जा.
लोहे को लोहा काटता हय.
लाईक क्युअर्स लाईक. << होम्योपदी प्रिन्सिपल.

आमच्याकडे नळाचं पाणी पारदर्शक असतं. आता मी काय बरे करावे >>>>>>> महापालिका कधीपासुन सुधारली ? >>> वरदा, उदयन Lol

मला वरदाच्या एकूणच ज्ञानाबद्दल शंका येउ लागलेली आहे. एकतर इतके दिवस खणून सुद्धा एकही पुरातन बर्फ शोधलेला नाही. प्राचीन लोक बर्फ पुरत नसत असे म्हणायचे असेल तर वादच मिटला. त्यात 'हा हन्त' मधे एकच हन्त लिहून मॉडरेटपणे लिहीलेले आहे. त्यापेक्षा कोचरेकर मास्तरांचे "ही शुद्ध लुटालूट आहे" जास्त स्ट्राँग असेल. किंवा ओबामा/केरी च्या पुतिनला दिलेल्या धमक्या.

प्राचीन लोक बर्फ पुरत नसत <<<<
फारएंडा, तेव्हा फ्रीज नव्हते. कसाबसा थोडाफार बर्फ बनवायचे तो ड्रिंक्समध्ये घालायला पुरत नसे, पुरायला काय पुरणार?

फारएंडा, तेव्हा फ्रीज नव्हते. >>> !!! शब्दखुणा बघितल्यास का? ज्या काही लोकांना तेथून आमंत्रण दिले गेलेले आहे ते तुझे म्हणणे लौकरच खोडून काढतील यात शंका नाही Proud

फा Lol

आपल्याकडे हिमालय शब्द होता, म्हणजे हिम हा बर्फाला शब्द होता (संदर्भ - कालिदासाच्या कुमारसंभवातला पहिलाच श्लोक - अस्त्युत्तरस्याम् दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः|) म्हणजे बर्फ असणारच. आणि शब्दच केवळ नव्हता तर बर्फालाही आम्ही दैवत्व दिले आहे. नाहीतर आजचे पाश्चिमात्य समाज - एचटूओ म्हणलं की झालं यांचं पाणीवर्णन. आपल्या गौरवास्पद संस्कृतीत पाण्याला जीवन आणि बर्फाला खुद्द देवतात्मा म्हणलंय. तेव्हा बर्फ करायची पाकृ ही सोमरसाच्या कृतीइतकीच महत्वाची असणार. ऋग्वेदात सोमरसावर आख्खं एक मण्डल आहे, तेव्हा बर्फावर पण असाच कुठला तरी महत्वाचा ग्रंथ असणार. तो शोधायला पाहिजे खरंतर

पण आम्ही करंटे संशोधक खापरं, हाडं, दगड असं काहीतरी निरुपयोगी शोधत बसतो. आता प्राचीन बर्फ शोधनावर एक प्रोजेक्ट टाकेन म्हणते. जर 'नवं' राज्य आलं देशात तर हे प्रोजेक्ट मंजूर व्हायची ग्यारंटीच ग्यारंटी!!

अमिश त्रिपाठीला सुपारी द्यायला हवी. तो लगेच 'द चिल ऑफ बर्फाज' असा चौथा भाग लिहून टाकेल. नाहीतरी सोमरसचे त्याचे लॉजिक कोकाकोलासारखेच आहे.

हो हो Proud
सोमरसाची कोकसारखी फ्याक्टरी असू शकते तर बर्फाची का नाही? आणि त्यात असुरांनी दूषित पाण्यापासून केलेला बर्फ वगैरे मालमसाला भरता येईल

मिळाला तर खुश्शाल वापर की. पण ऋग्वेदाच्या काळातच सोम वनस्पती दुर्मिळ झाल्याचे उल्लेख आहेत (आपली पिण्याची तुंबळ कपॅसिटी तेव्हापासून हां --- पिऊन पिऊन वनस्पतीच संपवली) तेव्हा त्याला पर्याय म्हणून हळूहळू इतर उत्तेजक पेये आली.
सध्या ज्याला आपण सोमरस म्हणतो त्या सोनेरी द्रव्याचे क्यूब्ज जांभळ्या रंगाच्या ट्रे मधे कसे करावेत यावर आधीच मंजूडीने पोस्ट लिहिली आहे बघ

आगाऊ, मी अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच गारेगार बर्फ बनवला आणि हळूच कॉलरमागून नवर्‍याच्या शर्टात टाकला तर तो सटासट शिंकायलाच लागला.
'वरील प्रमाणे केलेल्या बर्फामुळे कुणाला काही झाल्यास किंवा न झाल्यास मी जबाबदार नाही' असा डिस्क्लेमर न टाकल्यामुळे मी तुमच्यावर दावा ठोकणार आहे Proud

हो हो. ती वाचली. माझ्याकडे जांभळ्या रंगाचे ट्रे नसून गुलाबी आहेत. त्यामुळे मूळ पाकृच्या चवीत काही फरक होऊ शकतो का? याआधी मी कधीच बर्फ करून पाहीला नाहीये म्हणून मला बी प्रश्न आहेत बरेच Proud

Pages