उन्हाळ्यासाठी गारेगार बर्फ

Submitted by लसावि on 21 April, 2014 - 00:41

साहित्य -
एक रेफ्रिजिरेटर (चालू)
आईसक्यूब ट्रे (न गळणारा)
पाणी (प्यायचे)

कृती -
१. एका तांब्यात (हे एका प्रकारचे भांडे असते) पाणी घ्यावे.
२. स्वच्छ धुतलेल्या आईसक्यूब ट्रे मध्ये ते हळूहळू ओतावे*.
३. पाणी भरलेला हा ट्रे न हिंदकाळता फ्रीजच्या डीप फ्रीजर मध्ये ठेवावा. (कृतीचा हा भाग फार अवघड आणि महत्वाचा आहे. भरलेला ट्रे एका हातात धरुन त्यातले पाणी न सांडता दुसर्‍या हाताने आधी फ्रीजचा आणि मग डीप फ्रीजरचा दरवाजा उघडणे हे एक परिश्रमसाध्य स्कील आहे.)
४. आता डीप फ्रीजचा आणि मग फ्रीजचा दरवाजा बंद करावा.
५. तुमच्या फ्रीजच्या लायकी प्रमाणे आणि तुमच्याकडे किती वेळ सलग वीज असते त्याप्रमाणे कधीतरी बर्फ तयार होईल.
६. बर्फ वापरायच्या वेळी तो ट्रे डायगोनली पकडून धुणे पिळल्याप्रमाणे हाताची हालचाल करावी. हे करताना काळजी घ्यावी कारण काही चुकार आईसक्यूब्स एकदम उडी मारुन नको तिथे पडू शकतात.
७. अशा प्रकारे तयार झालेला बर्फ इतर अनेक कृतीत वापरता येतो उदा. हळूच कॉलरमागून शर्टात टाकणे इ.इ.

* ही स्टेप करताना पाण्याशी गोड बोलल्यास चांगले आणि त्याला शिव्या घातल्यास खत्रूड आकाराचे क्यूब्स तयार होतात म्हणे. http://rationalwiki.org/wiki/Water_memory
फक्त इच्छाधारी नागांनाच नव्हे तर पाण्यालाही मेमरी असते हेच यावरुन सिद्ध होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशू Rofl

अप्रतिम पाककृती आणि प्रतिक्रिया.
यु. के. मध्ये आल्यापासून बर्फ करायची / खायची वेळच आली नाही. आता कृती मिळालीच आहे तर पुढच्या वीकेंडला नक्की करून बघणार.

ही स्टेप करताना पाण्याशी गोड बोलल्यास चांगले आणि त्याला शिव्या घातल्यास खत्रूड आकाराचे क्यूब्स तयार होतात >>> आक्षेप फ्रीज च कांय काल अचानक बंद पडला सौ ने दोन धपाटे/कानफाटात दिले फ्रीजच्या चालू झालाय आता ही पाककृती करून बघेणेत येईल

काही मुलभुत प्रश्न
एका तांब्यात (हे एका प्रकारचे भांडे असते) पाणी घ्यावे.>>>
"तांब्या" हा प्रकार 'बिग बाजार' मध्ये मिळाला नाही, कुठे मिळु शकेल याही माहिती द्यावी. "तांब्या" च प्रची टाकता आले तर उत्तम.
स्वच्छ धुतलेल्या आईसक्यूब ट्रे मध्ये ते हळूहळू ओतावे*.>>
ट्रे धुण्यासाठी फिनायल वापरले तर चालेल का? चविवर काय परिणाम होइल?
तुमच्या फ्रीजच्या लायकी प्रमाणे आणि तुमच्याकडे किती वेळ सलग वीज असते त्याप्रमाणे कधीतरी बर्फ तयार होईल.>>
बर्फ तयार झाल्यास कसा ओळखावा? तयार पाकृ चं प्रची नसल्यामुळे हा प्रश्न उद्भवला आहे..
साधारण किती वेळाने फ्रिजचं दार उघ्डुन बघावे? दर १ मिनिटाने बघितले तर चालेलका?

अग्निपंख, हे वैयक्तिक घेऊ नका, कृपया. मला खरेच असे वाटतेय म्हणून हा सल्ला देतोय.

तुम्हाला हा पदार्थ जमला नाही तर तुम्ही ही पाकृ पुन्हा ट्राय करण्यापूर्वी तात्पुरता का होईना पण आयडी बदला. नावातच अग्नि असेल तर ही पाकृ कितपत यशस्वी होईल, कुणास ठाऊक. नंतर बर्फ ट्रेमधून काढून घेतल्यानंतर परत मूळ आयडी घ्या.

गजानन......:खोखो:
...हो हो....या पिढीला तांब्या हे काय प्रकारचे पात्र (हा शब्द भांडे ..... तेही तांब्याभांडे यातले नव्हे....) .या अर्थी वापरला आहे!
या साठी तांब्याचे प्रचि इथे देता आले तर पदार्थ करताना काही चुकणार नाही!

तुम्हाला हा पदार्थ जमला नाही तर तुम्ही ही पाकृ पुन्हा ट्राय करण्यापूर्वी तात्पुरता का होईना पण आयडी बदला>>
'हिम्सकुल', 'थंड' आदि आय्डी मनात आले होते परंतु हे आधिच बुक झालेले आहेत. Uhoh
'गारेगार" आय्डी घेउन हि पाकृ करता येइल का? Light 1 हे नाव पाकृ च्या शिर्षकातच असल्यामुळे फायदा व्हावा हि अपेक्षा.

ठोक्याचा तांब्या घ्यावा की प्लेन? तांब्याचा का पितळेचा का स्टीलचा?
तांब्याऐवजी लोटी अथवा तपेली अथवा फुलपात्र घेतले तर चालेल का?

तांब्याऐवजी लोटी अथवा तपेली अथवा फुलपात्र घेतले तर चालेल का? ......
बहुदा नाही चालणार! पहिल्यांदा पा.कृ. करताना जशी दिली तशी करावी.नाहीतर पा.कृ. फसण्याची भिती आहे.

गारेगार बर्फ कशाबरोबर खावा? सॉस की चटणी की दही? तसेच चहाबरोबर/जेवताना/येताजाता यावर प्रकाश टाका.

गारेगार बर्फ हा खालील पद्धतीने ( जमल्यास ) खावा.

१) पाण्यात टाकुन प्यावा.( माठ नसल्यास, हा माठ मातीचा आहे ही कृपया नोन्द घ्यावी, माठ हे व्यक्तीविशेषण नाही)

२) सरबतात ढकलुन आल्या-गेलेल्याना द्यावा.

३) त्याच्यावर उरलेले रुह अफजा व तत्सम सरबते टाकुन त्याचे आईसफ्रुट करुन बालक-पालक मन्डळीना द्यावे, ते पण खूश.

४) गरम पाण्याची पिशवी असते तशी बर्फाची पिशवी असतेच, तर डोके कोणत्याही प्रकाराने तापल्यास ती पिशवी डोक्यावर ठेवुन डोके ( असल्यास ) थन्ड् करावे.

५) माठातले पाणी गार होत नसल्यास त्याच्या आजूबाजूला याची आरास करावी.

आता अ‍ॅड करा तुमचे पण.

४) गरम पाण्याची पिशवी असते तशी बर्फाची पिशवी असतेच, तर डोके कोणत्याही प्रकाराने तापल्यास ती पिशवी डोक्यावर ठेवुन डोके ( असल्यास ) थन्ड् करावे....................डोके थंड झाल्यानंतर कसे खावे?

पाण्याचे खूप उपयोग आहेत....त्यासाठी वापरा. हवं तर गुगलून पहा. >>>
तुम्हाला हा पदार्थ जमला नाही तर तुम्ही ही पाकृ पुन्हा ट्राय करण्यापूर्वी तात्पुरता का होईना पण आयडी बदला. >>> Lol

पाण्याचे खूप उपयोग आहेत....त्यासाठी वापरा. हवं तर गुगलून पहा. >>> लै भारी! हे कसं मिसलं मी! Lol

डोके थंड झाल्यानंतर कसे खावे >>> या विषयासाठी वेगळा बीबी... सॉरी... बाफ उघडावा. Proud

या साठी तांब्याचे प्रचि इथे देता आले तर पदार्थ करताना काही चुकणार नाही! > मानुषी हे वाचून मनात काही वेळ फारच संभ्रम निर्माण झाला. तांब्यांच्या फोटोमुळे मी सकाळ वाचणे सोडले. आणि तांब्यांची आयुर्वेदिक आणि हे वरचे होमिओपथिक औषध एकत्र चालेल का असा प्रश्न उदभवाला. पण मूळ कृतीत तांब्या हे एक प्रकारचे भांडे आहे हे परत परत वाचले.

कृपया विषयाला धरुन चर्चा करा, धाग्याचे गांभीर्य राखा.>> अनुमोदन.
पाककला अनिंस गार गारे जातीव्यवस्था धर्म बर्फ बुप्रा ब्रिगेड भ्रष्टाचार संस्कृती , बरीच चर्चा बाकी आहे.

या साठी तांब्याचे प्रचि इथे देता आले तर पदार्थ करताना काही चुकणार नाही! > >आता आगाउ जालावरुन तांब्याची प्रची डाउन लोड करुन स्वताचे नाव टाकण्यात बिझी असेल :प

Rofl

आमच्याकडे आता थंडी सुरू झलिये त्यामुळे गारेगार बर्फ लवकरच आयता मिळायला लागेल... पण उन्हाळा आला की ही पाकृ नक्की करुन बघणार Happy बर्फ करताना यात एक एक द्राक्ष किंवा स्ट्रॉबेरीचा तुकडा, किवीफ्रुटचा तुकडा घालु म्हणते.. हेल्दी अन अ‍ॅट्रॅक्टिव्ह बर्फ Happy

बादवे, ताम्ब्याच्या तांब्यात रात्रभर प्यायचे पाणी भरुन ठेऊन त्या पाण्याचा बर्फ बनवला तर ताम्ब्याचा औषधी गुणधर्म बर्फात उतरेल का हो? आणि मग असा औषधी बर्फ खाऊन त्रास ही नाही होणार नाही का? खासकरून वाताचा.... बर्फ/बर्फाचे पाणी प्यायल्याने वात होतो असे ऐकलय.... खखोदेजा.. किंवा खखोसमताजा (सकाळमधले ताम्बे जाणो)... Happy

>>>> ताम्ब्याच्या तांब्यात रात्रभर प्यायचे पाणी भरुन ठेऊन त्या पाण्याचा बर्फ बनवला तर
त्या तांब्यांचा त्यांच्या सकाळी प्रॉब्लेम होउ शकतो... Wink पण ह्या प्रॉब्लेम मध्ये त्यांना त्यांचा सकाळ मदतही करु शकतो असे वाटते. Lol

मॅक्स Lol

पाण्याचे खूप उपयोग आहेत....त्यासाठी वापरा. हवं तर गुगलून पहा. >>> तांब्याचेही खूप उपयोग आहेत....आणि सकाळचे ही.... Wink

Pages