साहित्य -
एक रेफ्रिजिरेटर (चालू)
आईसक्यूब ट्रे (न गळणारा)
पाणी (प्यायचे)
कृती -
१. एका तांब्यात (हे एका प्रकारचे भांडे असते) पाणी घ्यावे.
२. स्वच्छ धुतलेल्या आईसक्यूब ट्रे मध्ये ते हळूहळू ओतावे*.
३. पाणी भरलेला हा ट्रे न हिंदकाळता फ्रीजच्या डीप फ्रीजर मध्ये ठेवावा. (कृतीचा हा भाग फार अवघड आणि महत्वाचा आहे. भरलेला ट्रे एका हातात धरुन त्यातले पाणी न सांडता दुसर्या हाताने आधी फ्रीजचा आणि मग डीप फ्रीजरचा दरवाजा उघडणे हे एक परिश्रमसाध्य स्कील आहे.)
४. आता डीप फ्रीजचा आणि मग फ्रीजचा दरवाजा बंद करावा.
५. तुमच्या फ्रीजच्या लायकी प्रमाणे आणि तुमच्याकडे किती वेळ सलग वीज असते त्याप्रमाणे कधीतरी बर्फ तयार होईल.
६. बर्फ वापरायच्या वेळी तो ट्रे डायगोनली पकडून धुणे पिळल्याप्रमाणे हाताची हालचाल करावी. हे करताना काळजी घ्यावी कारण काही चुकार आईसक्यूब्स एकदम उडी मारुन नको तिथे पडू शकतात.
७. अशा प्रकारे तयार झालेला बर्फ इतर अनेक कृतीत वापरता येतो उदा. हळूच कॉलरमागून शर्टात टाकणे इ.इ.
* ही स्टेप करताना पाण्याशी गोड बोलल्यास चांगले आणि त्याला शिव्या घातल्यास खत्रूड आकाराचे क्यूब्स तयार होतात म्हणे. http://rationalwiki.org/wiki/Water_memory
फक्त इच्छाधारी नागांनाच नव्हे तर पाण्यालाही मेमरी असते हेच यावरुन सिद्ध होते.
मस्त रेसिपि. मी ही थोड्या फार
मस्त रेसिपि.
मी ही थोड्या फार फरकाने असच बनवते.
आमच्याकडे डबल डोअर फ्रीज आहे त्यामुळे फक्त डीप फ्रीजरचा दरवाजा उघडावा लागतो आणि ५ सेकन्द वाचतात.
(माझे परिश्रम आणि स्किल् तो ट्रे , हात उन्चावून जागच्या जागी ठेवण्यात खर्ची होते. पाण्याच्या बाट्ल्या पायाजवळ असतात हा विचार न करता नवर्याने त्याच्या उन्चीचा फ्रीज घेतला )
शिवाय , आधुनिक तन्त्रज्ञानामुळे , ट्रे धुण्यासारखा पिळायची गरज लागत नाही . फक्त त्याचा कान चावीसारखा पिळल्यावर , क्युब्ज इकडे तिकडे उड्या न मारता , शहाण्या बाळान्सारखे खालच्या भान्ड्यात येउन बसतात .
पण तुमच्या पाकक्रुतीने माहेरी बनणार्य , दुधाळ र.न्गाच्या ट्रे मधिल मोठमोथाल्या क्युब्ज्ची आठवन करून दिली .
शतशः धन्यवाद
rmd, गुलाबी रंगाच्या ट्रेमधे
rmd,
गुलाबी रंगाच्या ट्रेमधे करून बघ आणि इथे प्रयोगाचे फलित लिही. करताना कर्मण्येवाऽधिकारस्ते हा अॅप्रोच ठेव. माबोवर लिहिताना हा दृष्टीकोन ठेवावा असे इथल्या एका ज्येष्ठ सभासदाचे मत आहे. आपण तो रेसिप्या करताना अंमलात आणायची जास्त गरज असते असं माझं मत आहे
नक्कीच. वरदा, धन्यवाद! तुझ्या
नक्कीच. वरदा, धन्यवाद! तुझ्या पोस्टींमुळे मला हुरूप आला. आता नक्कीच करून बघेन आणि सांगेन.
खरंतर पुण्यात एकेठिकाणी अगदी अस्साच बर्फ मिळायचा. पण मेलं नाव आठवत नाहीये. या पाकृमुळे त्या आठवणी जाग्या झाल्या.
१५०+
१५०+
कर्मण्येवाऽधिकारस्ते हा
कर्मण्येवाऽधिकारस्ते हा अॅप्रोच ठेव. माबोवर लिहिताना हा दृष्टीकोन ठेवावा असे इथल्या एका ज्येष्ठ सभासदाचे मत आहे. >>> खणखणीत!
rmd,तुमचे बी प्रश्न अवघद आहेत!
चालू रेफ्रिजरेटर चुकार
चालू रेफ्रिजरेटर
चुकार आइसक्यूब
खत्रूड आइसक्यूब..
चांगलंय!
सुरेख रेसीपी..धन्यवाद
आगावा.. आजच वाचलं कुठेतरी..
आगावा.. आजच वाचलं कुठेतरी.. पाणी उकळून थंड करून क्यूब बनवल्यास क्रिस्टल क्लिअर होतो बर्फ बर्का..
साधच माठाबिठातलं घेतलं तर ओपेक च होतो..
काय करणार आगावा... आधीच ही
काय करणार आगावा... आधीच ही पाकृ माझ्यासाठी नवीन त्यात पुन्हा मला नवीन नवीन प्रयोग करून पहायला फार आवडतात.
हे क्यूब्ज सर्व करताना त्यावर खोबरं आणि कोथिंबीर भुरभुरावी लागते का?
खरंतर पुण्यात एकेठिकाणी अगदी
खरंतर पुण्यात एकेठिकाणी अगदी अस्साच बर्फ मिळायचा. >> पारंपारिक रेसिपी आहे असे धागाकर्त्याने लिहिल्यामूळे बर्फ हायजॅक करू नका. प्रत्येकाने आपापले बर्फ घेऊन बसावे हि विनंती. तसेही एकाच्या शर्टात टाकलेला क्यूब दुसर्याच्या शर्टात टाकणे हायजिनिक नसावे
लिंबू पिळायची आवश्यकता नाही.
लिंबू पिळायची आवश्यकता नाही. पिळलंसच तर त्याबरोबर थोडं मीठही शिंपड. म्हणजे बर्फ आणखी गारेगार होतो व लौकर वितळायची भीती रहात नाही. अगदी कडाकड चावून खाता येतो
खोबरं कोथिंबीर घरात असेल तर, जरूर. पण ऑप्शनल आहे.
प्रत्येकाने आपापले बर्फ घेऊन
प्रत्येकाने आपापले बर्फ घेऊन बसावे>>
बर्फ थंड पडला वाट्टं
बर्फ थंड पडला वाट्टं
भरलेला ट्रे एका हातात धरुन
भरलेला ट्रे एका हातात धरुन त्यातले पाणी न सांडता दुसर्या हाताने आधी फ्रीजचा >> हमखास यशस्वीरीत्या बर्फ करण्यासाठी "भरलेला ट्रे" डीप फ्रीजरमध्ये ठेवताना उजव्या हातात धरावा की डाव्या?
शिवाय फ्रीजच्या जातीवर (ब्रँडवर) चव आणि आकार अवलंबून आहे काय?
लोक्स बर्फ खाऊन थंड होऊन
लोक्स बर्फ खाऊन थंड होऊन झोपले
अर्रर्र .. काय ती चविष्ट
अर्रर्र .. काय ती चविष्ट पा.कृ नि प्रतिसादातल्या टिपा ..
कालच ह्या रेस्पीने बर्फ
कालच ह्या रेस्पीने बर्फ बनवायचा प्रयत्न केला. पण त्यासाठी घेतलेल्या पैकी बरेच पाणी उरले आहे. त्याचे अजुन काय काय करता येईल?
(स्वगतः हा प्रश्न इथे विचारणे योग्य आहे का युसुयुसा वर विचारावा? )
पण त्यासाठी घेतलेल्या पैकी
पण त्यासाठी घेतलेल्या पैकी बरेच पाणी उरले आहे. >>>
गिरीकंद, अहो उरलेल्या तयार
गिरीकंद, अहो उरलेल्या तयार बर्फाचे काय करता येईल हे सांगायचं लेखक अजून टाळतायत. मग उरलेल्या कच्च्या मालाचं सांगतील की नाही शंका आहे. तरीपण वाट बघा.
पाण्याचे खूप उपयोग
पाण्याचे खूप उपयोग आहेत....त्यासाठी वापरा. हवं तर गुगलून पहा.
गिरीकंद, पाणी उरलंच कसं पण?
गिरीकंद, पाणी उरलंच कसं पण? पाण्याच्यापुढे प्यायचे अशी कंसातली सूचना वाचलेली दिसत नाही तुम्ही.
पाणी वाचवा ...... जीवन
पाणी वाचवा ...... जीवन वाचवा.......
गिरीकंद, अहो उरलेल्या तयार
गिरीकंद, अहो उरलेल्या तयार बर्फाचे काय करता येईल हे सांगायचं लेखक अजून टाळतायत. मग उरलेल्या कच्च्या मालाचं सांगतील की नाही शंका आहे. तरीपण वाट बघा. >>> गजाभाऊ,
पाण्याच्यापुढे प्यायचे अशी
पाण्याच्यापुढे प्यायचे अशी कंसातली सूचना वाचलेली दिसत नाही तुम्ही >>>
अॅक्च्युली, घरी नेहमी पाणी
अॅक्च्युली, घरी नेहमी पाणी पिऊनच संपवतो, म्हणुन यावेळेला वेगळे काय करता येईल ह्या विचारात होतो.
झाडांना घाला. (झाडे नसतील
झाडांना घाला. (झाडे नसतील घरात तर आधी ती लावा. पण काय हे तुमच्याकडे झाडेच्च नाहीत घरात.. श्या!)
अहो गिरीकंद, आता बर्फ केलंत
अहो गिरीकंद, आता बर्फ केलंत ना तयार. अजून काय आणि किती वेगळं करायचंय तुम्हाला?
र्म्द, अहो मत कहो ना. :हम
र्म्द, अहो मत कहो ना. :हम पांच मोडः
(No subject)
र्म्द,>>>
र्म्द,>>>
बर्फ चान्गलाच हिट झालाय.
बर्फ चान्गलाच हिट झालाय.:फिदी:
Pages