निसर्गाच्या गप्पांच्या १७ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
वरील कोलाज वर्षू नील यांच्या सौजन्याने
सध्या अनुकूल अशा वातावरणामुळे सगळीकडे रंगीबिरंगी टवटवीत फुले डुलताना दिसत आहेत. फुला,झाडांच्या प्रदर्शनांचेही सध्या हंगाम चालू आहे. निरनिराळी फुले, फळे, रोपे, बी-बियाणे आपले खास आकर्षण घेऊन ह्या प्रदर्शनांमध्ये आपले गुण, वेगळेपण दर्शविण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या निसर्ग प्रेमींपैकी काही निसर्ग प्रेमी ह्या प्रदर्शनांना भेटीही देऊन आले आहेत. राहीलेल्या ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी अशा प्रदर्शनांना भेट देऊन ह्या निसर्ग घटकांच्या सौंदर्याचा, महतीचा लाभ घ्या. तसेच बी-बियाणे, रोपे आणून आपल्या परीसरातही त्यांना सामावून घ्या. व त्यांचे फोटो काढून नि.ग. च्या धाग्यावर सगळ्यांच्या लाभार्थी अवश्य द्या.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
हो दिनेशदा मला वाटत गोईण
हो दिनेशदा मला वाटत गोईण पुस्तकात ती आदिवासींच्या लग्नाच्या रितीची माहीती आहे ना.
शशांकजी भारीच किटक आहे म्हणजे हा.
दोन पक्षी दिसताहेत का यात?
वा जागू ----- एकाच फ्रेममधे
वा जागू ----- एकाच फ्रेममधे व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर आणि ड्रोंगो (कोतवाल) यांना छानच टिपलेस की ...
जागु ताई कोडे पण घालायला
जागु ताई कोडे पण घालायला लागल्या का..... हा वरचा खंड्या आमच्याकडे येऊन की.... करत साद घालतोय हल्ली रोज.. कोणी नाही भेटले अजुन.
आमच्या कडे करंज आणि कडू
आमच्या कडे करंज आणि कडू मेहेंदी अस्जा दोन तिन झाडांनी जाळी केलेल झुडूप आहे त्यावर तर असे वेगवेगळे पक्षी एकत्र बसलेले असतात.
हा पक्षी दिसतोय? हिच त्या झाडांची जाळी
ही दयाळाची मादी आहे काय? आज
ही दयाळाची मादी आहे काय? आज सकाळी पांढरेशुभ्र पोटवाला दयाळ आणि ह्या बाईंचे कायतरी गुफ्तगु चाललेले
त्याला माझ्याकडे पाठव दोन
त्याला माझ्याकडे पाठव दोन जोडीदार आहेत त्याचे आमच्याकडे.
ह्या आमच्या साळूंखी ताई जाम कलकलाट करतात. नुसती ह्यांची बघाव तेंव्हा भांडण चालू असतात.
साधना, जागू काय मस्त मस्त
साधना, जागू काय मस्त मस्त पक्षी दिसतात ग तुम्हाला....सही.
ही दयाळाची मादी आहे काय? >>>>
ही दयाळाची मादी आहे काय? >>>> साधना - हा रेड व्हेंटेड बुलबुल आहे ......
ओक. लालबुड्या का?
ओक. लालबुड्या का?
शशांक जी, आधी त्याला बाहेर
शशांक जी, आधी त्याला बाहेर घालव! वाचुन हसुन हसुन पोट दुखतय...
अगदी जिवंत चित्र उभ राहात... मस्त लिहीलाय..
तुम्ही लोकांनी इथे खुप मज्जा केलेली दिसतेय... मी बरीच उशीरा आले इथे...
पण इथे येऊन मी जाम खुश आहे.....
जागु काय सुंदर सुंदर पक्षी येतात तुमच्यकडे... जणु काही पक्षांचे नंदनवच...
हो बरोबर बुलबुल आहे तो.
हो बरोबर बुलबुल आहे तो.
रेड व्हेन्तेड बुलबुल
रेड व्हेन्तेड बुलबुल आमच्याकडे बऱ्यापैकी दिसतात. साळुंक्या नुसता कलकलाट करत असतात आणि नेहेमीचे कावळे,चिमण्या, कबुतरे भरपूर आहेत. कधीकधी पोपट आणि वेगवेगळे पक्षी दिसतात पण क्वचित.
दिनेशदा यांनी उल्लेख केलेले 'गोईण'-राणी बंग, हे पुस्तक खूप माहितीपुर्ण आहे, मी लायब्ररीतून आणून वाचले होते पण नवरा म्हणाला संग्रही ठेवण्यासारखे आहे म्हणून आता विकत घेणार आहे.
साळुंक्या नुसता कलकलाट करत
साळुंक्या नुसता कलकलाट करत असतात>>>>कदाचित म्हणुनच त्यांना "बोलघेवड्या" म्हणत असतील. लतादिदींच्या या गाण्याप्रमाणे
काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
बोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलेना
असा रुतला पुढयांत भाव मुका जीवघेणा
आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या
एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या
वा जिप्सी, हे आवडतं तुमचं,
वा जिप्सी, हे आवडतं तुमचं, लगेच एक सुंदर कविता पेश करता.
त्यांना 'कर्कश्य मैना' पण म्हणतात, कुठेतरी वाचलंय.
मैना न साळूंकी वेगळी,
मैना न साळूंकी वेगळी, शशांकचाच एक लेख आहे मैनेवर.
मैना न साळूंकी वेगळी,
मैना न साळूंकी वेगळी, शशांकचाच एक लेख आहे मैनेवर.>>>>>मीही निगवर येण्यापूर्वी साळुंकी म्हणजे मैना आणि पीतमोहर म्हणजे सोनबहावा समजायचो.
थँक्स टु ऑल ऑफ यु आता बरीच झाडे, पक्षी ओळखता येऊ लागले आहेत.
निसर्गासारखा नाही रे सोयरा,
निसर्गासारखा नाही रे सोयरा, गुरू, सखा, बंधू, मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप, मिटती क्षणांत आपोआप
आणि
कुण्या देशीचे पाखरू माझ्या अंगणात आले
त्याचे पंख परदेसी परि ओळखीचे डोळे
गीतांचे गीतकार सुधीर मोघे यांचे दु:खद निधन (आत्ताच दुघ धाग्यावर वाचले). माझे अत्यंत आवडते गीतकार.
मैना आणि साळुंकी वेगळी आहे?
मैना आणि साळुंकी वेगळी आहे? अरेरे घोर अज्ञान माझे. कुठे आहे शशांकजीचा लेख, लिंक मिळेल का?
सुधीर मोघे, माझेपण आवडते
सुधीर मोघे, माझेपण आवडते गीतकार.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/23471 - हा माझा लेख - पण हा "ब्राह्मणी मैने"वरचा आहे.
या मैना प्रकारचे अनेक पक्षी आहेत - गुगलून पहाणे .....
ब्राह्मणी मैना
( http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/c/c3/1172ww_brahminy-myna_... ) येथून हा फोटो साभार .....
http://www.mynahbird.org/ या
http://www.mynahbird.org/ या साईटवर मैना प्रकारच्या पक्ष्यांची माहिती मिळेल.
बरेच वेळा वेगवेगळ्या प्रांतानुसार पक्ष्यांची नावे बदलतात - त्यामुळे गोंधळ वाढू शकतो आणि म्हणूनच बायनॉमिअल नॉमेनक्लेचर सिस्टिम अस्तित्वात आली.
Common Myna, Acridotheres tristis - म्हणजेच आपली साळुंकी.
विकिपीडियावर बाकीचे "मैना" प्रकार सापडतीलच..
Thanx शशांकजी, अगदी फोटोंचा
Thanx शशांकजी, अगदी फोटोंचा खजिना मिळाला.
शशांक जी, ब्राह्मणी मैनेच्या
शशांक जी, ब्राह्मणी मैनेच्या पिल्ला वरचा लेख खुपच हृदयस्पर्शी आहे...
खुप खुप आवडला.. तसेच तुमच्या सारखेच तुमचे कुटूंब पण पक्षी प्रेमी आहे हे वाचुन
खरच खुप आनंद झाला.... आज तुमचे दोन लेख मिळालेत.. दिवस सार्थेकी गेला...
सर्गासारखा नाही रे सोयरा,
सर्गासारखा नाही रे सोयरा, गुरू, सखा, बंधू, मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप, मिटती क्षणांत आपोआप
आणि
कुण्या देशीचे पाखरू माझ्या अंगणात आले
त्याचे पंख परदेसी परि ओळखीचे डोळे
.......जिप्सी खरच काय सुरेख ओळी आहेत..
गीतकार सुधीर मोघे यांच्या बद्द्ल वाचुन खुप वाईट वाटले...
देवकी, त्या तणाचा गोडवा खरच
देवकी, त्या तणाचा गोडवा खरच भाळण्यासारखा च आहे...
रंगपंचमीच्या सगळ्या
रंगपंचमीच्या सगळ्या नि.ग.करांना खुप खुप शुभेच्छा!!!!
फोटो मात्र अंतरांजलाहुन सभार........
जागू, मस्त फोटो
जागू, मस्त फोटो
शशांक, छान लेख.
शशांक,
छान लेख.
शशांकजी, बरेच दिवस झाले. मागे
शशांकजी,
बरेच दिवस झाले. मागे एकदा निग वरच तुम्ही बायनॉमिअल नॉमेनक्लेचर बद्दल जास्त माहिती देत होता.
तो विषय तसाच राहिला की तुम्ही वेगळा धागा काढून माहिती दिली ?
अजि मी ब्रम्ह पाहिले...
अजि मी ब्रम्ह पाहिले... माझ्या ऑफिसच्या पायरीजवळ एक तण वाढत होते.. आमच्याकडे पाऊस पडला कि लगेच असे तण उगवतात. पण आमच्याकडचा पाऊस बेभरवश्याचा. त्यामूळे सर्व तण अगदी दादागिरी करत जागा व्यापतात. काँक्रीटच्या रस्त्यावरच काय गंजलेल्या भंगारावर पण वाढतात.
पण माझ्या या लाडक्या तणाने मला अनोखी भेट दिली.. फोटो काढलाय. मग सविस्तर लिहितो.
तोपर्यंत होळीच्या शुभेच्छा !
Pages